Skip to main content

बलात्काराविरूद्धचा रामबाण उपाय

लेखक अर्धवट यांनी रविवार, 06/01/2013 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहावा की न लिहावा हे नक्की होत नव्हतं, पण माझ्या सर्व जालीय मित्रांच्या हे नजरेला पडलं असेलच असं नाही म्हणून मुद्दाम लिहितोय. मिडीयावर, जालावर, वृत्तपत्रांमधून आणि एकूणच सर्व समाजचव्हाट्यावर बलात्कार, पीडीतांना न्याय, बलात्कार्‍यांची मानसीकता यावर उहापोह चालू आहे. ह्या सर्व मंथनातून काही चांगले कायदे, अंमलबजावणीत सुसूत्रता व कठोरता, समाजाच्या एकूण मनोवॄतीत सुधारणा वगैरेर फायदे झाले तर ते निश्चीतच चांगले ठरेल. भेदरलेली जनता सध्यातरी रोज न्यूज चॅनलवर कोकलणार्‍या पॅनेलीस्टना पाहाणे याखेरीज काहीही करू शकत नाही. पण ह्याच भेदरलेल्या समाजमनाचा फायदा इतरही काही लोक अत्यंत साळसूदपणे व घृणास्पदरित्या घेताना दिसले. ह्या यादीमधे तथाकथीत अध्यात्मीक गुरूही असतील याची कल्पना नव्हती. गणपाच्या फेसबूक वॉलवर अनिरुद्ध बापूने सांगीतलेल्या बलात्कारापासून वाचण्याच्या जालीम उपायांची यादी पाहिली आणि थक्क झालो. आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी आणि सुरक्षेसाठी ती यादी इथे देत आहे.. दिनांक ३ जानेवारी रोजी आपल्या परमपूज्य सद्गुरूंनी श्रीहारीगुरुग्राम येथे सर्व स्त्रियांना भयमुक्त केले. एवढेच नाही तर, एका गोष्टीची खात्री बाळगायला सांगितली कि यापुढे कोणीच माझ्या मुलींकडे वाकडया नजरेने पाहू शकणार नाही - परमपुज्य बापूंनी खालील पंचसुत्री सांगितली, ०१. कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हंटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल . ०२. जी व्यक्ती रोज पाच वेळा श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही. ०३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने श्री मातृवात्सल्य उपनिषदातल्या, श्रीशिवगंगागौरीच्या महात्म्याचे दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल. ०४. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येत नसेल अशा व्यक्तीने पूर्ण विश्वासाने व प्रेमाने फक्त अनिरुद्ध अनिरुद्ध म्हंटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल. ०५. अहिल्या संघाच्या बल गटास व श्रीचंडिका आर्मीच्या गटास स्वतः परमपुज्य बापू असे टेक्निक शिकवणार कि ज्याने बलात्कार करणारा लागलीच कायमचा नपुंसक होईल. परमपुज्य सद्गुरूंनी सर्वांना सांगितले कि आत्माविश्वासाने भयमुक्त जीवन जगा व त्या परमात्म्यावर मनापासून प्रेम करत संपूर्ण सुखमय जीवनाचा आनंद लुटा. आपण खरोखरच फार सुदैवी आहोत की आपल्याला बापुंसारखा बाप, नंदाईसारखी आई आणि सुचीतदादासारखा मामा सातत्याने आपले सर्व वाईट गोष्टींपासून रक्षण करावयास ढालीसारखे आपल्या सर्वबाजुनी उभे आहेत. मला स्वत:ला कोणी तथाकथीत गुरू असे सांगून स्वतःचेच हसे करून घेइल असे अजीबात वाटले नव्हते, म्हणूनच अर्थात ह्या प्रकारावर विश्वास बसला नव्हता, पण नंतर गणपाच्याच वॉलवर प्रत्यक्ष त्याच बुवाच्या प्रवचनाची वीडीओ लिंक पाहिली.. http://www.youtube.com/watch?v=kO04G6gLUEc&feature=youtu.be आता ह्या सगळ्या प्रकारावर हसावं की रडावं हे मला खरोखरीच कळत नाहिये. वास्तवीक हा सगळा प्रकार मी केवळ हास्यास्पद म्हणून सोडून दिलाही असता पण मला जास्ती त्रासदायक वाटला त्या बापूच्या प्रत्येक वाक्यानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट. प्राथमीक उद्वेग ओसरल्यावर काही प्रश्न मनात आले त्यावर इथल्या सदस्यांनी काही विचारप्रदर्शन केल्यास चर्चा पुढे नेता येइल. १. माझे नाव घ्या म्हणजे अमूकमूक होइल असे छातीठोकपणे सांगण्याचे धाडस ह्या लोकांमधे कुठून येत असावे. २. ते जे सांगतात त्यामागची प्रेरणा काय असेल, म्हणजे त्यावर खरोखरीच त्यांचा स्वतःचा विश्वास असेल की समोर बसलेल्या माणासांना केवळ फसवण्याचा उद्देश असेल. ३.असल्या कल्टमधे ओढले गेलेले लोक नक्की कशामुळे असल्या मूर्खपणाच्या कथांवर विश्वास ठेवत असतील. ४. कल्ट्मधे ओढल्या जाणार्‍या लोकांची विचारशक्ती इतकी मृतवत कशामुळे होत असेल.

वाचने 31423
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by निनाद मुक्काम …

@नाम स्मरण केले आणि सर्व काही आपसूकच धुतल्या गेले , >>> http://www.sherv.net/cm/emo/happy/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif अरे बा.....स आता,इथे हसून हसून मरायची पाळी येतीये..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hard-smiley-emoticon.gif

In reply to by दादा कोंडके

रात्रीच्या वेळी पडदा वेग्रे लावावा लागत असेल ना बापुंच्या फोटोला !!! नाहीतर काही खरं नै बाब्ब्बौ...

In reply to by वपाडाव

बापु जळी स्थळी, काष्टी, पाषाणी आणी वस्त्री आहेत, क्षुल्लक पडदा तो काय काय आवरणार आपलं झाकणार ?

In reply to by वपाडाव

किंवा मग दिवसा वादावादी झाली की म्हणायचं, 'बघताय ना बापू, कसं घालून पाडून बोलतात!' :D

In reply to by दादा कोंडके

बाकी, क्रम चुकवला वाट्टे तुम्ही...

सकाळ एकदम मस्त सुरु झाली.धन्स अर्धवट राव. बाकी मोदकराव, अशा तथाकथित बुवांची कुंडलीच माडंलीत की राव,आणी नंबर ८) चा गुण मस्टच.

त्यात भक्तांच्या अनुभवांचं कथन असायचं. पेट्रोल नसतानाही बापूनामस्मरणाने कार चालत राहिली.
__ हे खरं असतं तर बरं झाल असतं. :). शेख लोकं बापुंचा जबर्दस्त तिरस्कार करत असणार नक्कीच :). बापुंच नाव घेउन पेट्रोल न भरता गाडी चालली असती तर सगळा देश त्यांच्या दर"बारा"त गेला असता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो, पेट्रोलशिवाय कार चालणे वगैरे हे खरोखरचे चमत्कार तरी आहेत हो. पण त्या जाडजूड अंकांमधे सर्वाधिक अनुभव असे असायचे की ते चमत्कार आहेत असं फक्त त्या "ऑरा"ने भारलेल्या भक्तांनाच पटू शकेल. ताप आला आणि रात्रीत उतरला, सकाळी ठीक. रिक्षा मिळेना, नाव घेतले, अचानक रिक्षा आली. रिझर्वेशन फुल होते,प्रवासाचे कारण महत्वाचे होते,अचानक कॅन्सलेशनच्या अगेन्स्ट रिझर्वेशन कन्फर्म झाले..बापूंची कृपा.. बसमधून उतरताना (किंवा तत्सम प्रसंगी) अचानक तोल गेला. पडतापडता अचानक एका हाताने मला धरले, त्या हाताच्या उबदार स्पर्शाने मला कळले की त्या व्यक्तीच्या रुपात "ते"च होते.... रोजच्या आयुष्यातल्या घटनांनाही चमत्कार समजणं किंवा कृपाछत्राखाली असल्याचा भास ही एक गरज आहे का मनाची?

यडझव बुवा आणी त्याच्या दुप्पट त्याचे बिनडोक भक्त,बाभळीला उलट टांगुन त्याला मिरच्याची धुरी द्या,ते अनिसच विधेयक कधी पास होणार आहे,साले विधानसभेतले निम्मे तरी आमदार आणी मंत्री असल्याच बुवांच्या नादी लागलेले आहेत्,त्यामुळे सगळाच आनंदी आनंद......

या असल्या मानसिक बलात्काराविरुद्धच्या रामबाण उपायांवर कुणी वेगळा धागा काढा रे!!

हे बुवालोकांची भक्ती करणार्‍या लोकांचं डोकं पण अजब असतं. या बुवाला नावं ठेवणार आणि आपण ज्याला मानतो तो बाबा/बापू/माई/गुरु कसे चांगले आणि योग्य मार्गदर्शक आहेत त्याचं गुणगान करणार. शेवटी हेही त्याच माळेचे मणी असतात. बाकी बापूंबद्दल काय बोलणार. एक महाभाग थर्टीफर्स्टच्या रात्र मित्रांबरोबर हॉटेलमध्ये खायला वैगरे न जाता या बापूंचा 'नामजागर' करायला गेला होता. एक तारखेला सकाळी भेटल्यावर म्हणे अंग फार दुखतंय. का तर म्हणे नामजागर करताना रात्रभर नाचत होतो. :))

In reply to by सूड

एक तारखेला सकाळी भेटल्यावर म्हणे अंग फार दुखतंय. का तर म्हणे नामजागर करताना रात्रभर नाचत होतो. smiley
=)) =)) नामजागर म्हणे. &*^%% त्याची!

मी तर एका प्रोफेसरच्या घरी पाहिलय, सकाळपासून जे आपण खातो पितो ते फोटोसमोर ठेवायचं. मी जेवणापर्यंत पाहिलय. पुढे बापू जाणे.

अतिशय एकसुरी !! घ्रुणा वाटते सतत एकाबाजूने लिहीले जाणारे लेख पाहुन.. अंधश्रध्देचे समर्थन करत नसुन या संबंधी फक्त संतांबद्द्ल (? असो सध्या ह्या लोकांना दुसरा शब्द सुचत नाहीये) लिहिणारे राजकारण्यांच्या बाबतीत मौन का धरुन आहेत?

In reply to by प्रचंड तापट

लिहिणारे राजकारण्यांच्या बाबतीत मौन का धरुन आहेत?
म्हणजे श्री श्री , भैयुजी आणि मैया यांच्यावर धागा काढावा काय ?

In reply to by प्रचंड तापट

हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद श्री.प्रचंड तापट यांना आवडले नाहीत.ते उद्विग्न झालेले दिसतात.सतत एका बाजूने लिहिलेले लेख पाहून त्यांना घृणा वाटते.वस्तुतः इथे बुवा-बापू-गुरू-श्रद्धा अशा विषयांवरील लेखांचे प्रमाण अत्यल्प दिसते.तरी श्री.प्र.ता.यांना ते अधिक का भासते? मला वाटते त्यांच्या उपजत तर्कबुद्धीला हा लेख आणि प्रतिसाद यांतील विचार पटतात.पण लहानपणापासून कळत नकळत मनावर झालेल्या श्रद्धासंस्कारांमुळे भावना ते पटणे नाकारते. या द्वंद्वामुळे उद्विग्नता येते.हे संभाव्य कारण असावे.

अनिरुध्द बापुंचा मी भक्त मुळिच नाही. पण, ही चर्चा करणारे गणपतीच्या वेलेस कुणिकडे असतात??

In reply to by प्रचंड तापट

म्हणायचं आहे.. जरा इस्कटून सांगाल का? यफ-वाय-आय, गणपतीच्या काळात होणार्‍या गैरप्रकारांचा मिपावर वेळोवेळी निषेधच झालेला आहे.

In reply to by प्रचंड तापट

आपलं स्वागत आहे. बाकी काही असो पण बापूंचा महिमा केवढा अगाध आहे पहा बरं मंडळी. दिड-दिड वर्ष मौनव्रतात (पक्षी : मुके) असलेले पटा पटा बोलायला लागले.

ह्या उपायांपेक्षाही एकच "सोपा आणि सरस" उपाय आपले परमपूज्य सदगुरू श्री आसारामबापू यांनी सांगितला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिल्लीत झालेल्या घटनेत त्या मुलीऩे जर त्यांचा हा उपाय आजमावला असता तर हा प्रसंग तिच्यावर ओढवला नसता. त्यांच्या वाणीतच हा उपाय म्हणजे "त्या मुलीने आरोपींना भाऊ म्हणत प्रार्थना करून तेथून निघून जायला हवे होते. त्यामुळे तिचा सन्मान आणि जीव दोन्ही वाचले असते." दुवा:

मंत्र माझा बापू म्हणणार | १०८ बाय अकरा वेळा घेणार | मी वानरचाळे करणार | रावण नपुंसक निश्चीत || || एन्टी बलात्कार महावाक्यम् ||

०४. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येत नसेल अशा व्यक्तीने पूर्ण विश्वासाने व प्रेमाने फक्त अनिरुद्ध अनिरुद्ध म्हंटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल. >>> हे असं काही केलं तर बलात्कार करणारा हसत हसत बलात्कार करेल इतकेच ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

तिच्या संमतीनंच केला असं कोर्टापुढे सांगेल

In reply to by संजय क्षीरसागर

काय माझ्या नावाचे धिंडवडे ऊडत आहेत :)

(अवांतर : बलात्काराविरूद्धचा रामबाण उपाय असे गुगलताना दुसर्‍या बापुनी सुचवलेला हा उपाय सापडला In the 6th July, 1926, edition of the Navajivan, Gandhi wrote that “He would kiss the feet of the (Muslim) violator of the modesty of a sister” (Mahatma Gandhi, D Keer, Popular Prakashan, p-473). Just before the partition, both Hindu and Sikh women were being raped by the Muslims in large numbers. Gandhi advised them that if a Muslim expressed his desire to rape a Hindu or a Sikh lady, she should never refuse him but cooperate with him. She should lie down like a dead with her tongue in between her teeth. Thus the rapist Muslim will be satisfied soon and sooner he leave her. (D Lapierre and L Collins, Freedom at Midnight, Vikas, 1997, p-479) जाणकार मिपाकर ह्या "उपाया"च्या सत्यासत्यतेवर प्रकाश टाकतिल का ?)

In reply to by प्रसाद गोडबोले

शिवाय तिसर्‍या बापूंनी हल्लीच भाऊ भाऊ असं म्हणत त्यांचे पाय धरावे आणि सोडून देण्याची विनंती करावी असा उपायही सुचवला आहे.. नुसता उपायच सुचवला आहे असं नव्हे, तर हा उपाय न केल्याबद्दल दिल्ली बलात्कार प्रकरणी त्या मुलीलाही बरोबरीने जबाबदार धरलं आहे..

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या बापुंबद्दल बोलायला सगळेच घाबरतात!! पण इतरांबद्दल कसे अगदी पोपटासारखे बोलतील...

यात नविन असं काय आहे? महालक्ष्मी स्तोत्रात तरी काय वेगळ सांगीतलय? महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः । सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥९॥ (9.1: Whoever reads this Mahalakshmi Ashtakam with Devotion, Will attain all Success through the Grace of Mother Mahalakshmi.) एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥१०॥ (Reading this Once Every Day will Destroy Great Sins,Reading this Twice Every Day will bring Prosperity.) त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् । महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥ (Reading this Thrice Everyday will Destroy Great Enemies, And will bring Joy in Life with the Blessings of Mahalakshmi.)

In reply to by यसवायजी

ओऽऽऽ या फलश्रूतीत अभिप्रेत असलेले महाशत्रू म्हणजे षडरिपू आहेत असं म्हणतात. आणि तसंही ह्या दांभिक लोकांच्या उपदेशाशी महालक्ष्मी अष्टकाची तुलना होऊ नये असं माझं मत !! पुढे तुमची इच्छा.

In reply to by सूड

सर्वसिद्धिमवाप्नोति ? महापापविनाशनम्? धनधान्यसमन्वितः? anyway, षडरिपूंच ठीक आहे... पण पापाचा नाश करयचा असेल किंवा सम्रुद्धीसाठी हे अष्टक म्हणायचं?.. मग भले कितीहि पाप केलं तर चालतं का?? अशी स्तोत्रं महत्पातुन 'वाचवत' असतील तर मज्जा आहे बाबा.. Njoy.. :)

In reply to by यसवायजी

अच्छा म्हणजे तुम्हाला वाद घालायचा म्हणूनच तुम्ही हे टाकलंय !! नाय म्हणजे आधी 'महाशत्रुविनाशनम्' वर तुमचा आक्षेप होता. आता त्याला थोडं स्पष्टीकरण मिळालं तर नवीन मुद्दा ? ग्रेट !! चालू द्या. या बुवाबाजी करणार्‍यांच्या मंत्रांशी तुम्ही स्तोत्रांची तुलना करताय यातच सारं आलं. नावाप्रमाणे आपलीच टिमकी वाजवा. धन्यवाद !!

In reply to by स्पंदना

ताई, तो बापु असेल नालायक. (मी म्हणतो, तो आहेच). पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही.. मग ते घडत नसतील तर तो ते घडवून आणतो.. तो त्याच काम चोख पार पाडतोय.. मग तो ते मंत्र स्वतः लिहिल, किंवा भक्त स्तुतीप्रदं रचतील. पण समाजात पुर्विपासुन हे असले प्रकार चालतच आल्यामुळे लोक त्याला बळी पडतात. (उदा: सत्यनारायण/ वैभवलक्ष्मी / इतर व्रत-वैकल्यं etc).. सगळ्या सन्कटातुन आपली सुटका होईल/ किवा 'तो' करेल अशी भाबडी आशा असते.( मग 'तो'/'ती' कुणीही असेल. बापु, स्वामी, गुरु, महाराज, मां).. सगळीच कार्टी..

In reply to by सूड

मी बहुतेक चुकत नाही आहे, पण पहिलच रिपू "काम" आहे..खरच स्तोत्रं म्हटल्याने "कामा'वर ताबा मिळतो का हो?? भल्या-भल्या साधु-मुनिंची तपस्या भंग झाली.. तुमच्या-आमच्या सारख्यांच काय होणार असले मंत्र आणी स्तोत्र म्हणुन? तुलना तर होइलच. जे चुकीच आहे ते चुकिचंच आहे.. तुमच्या स्पष्टीकरणात असं काही विषेश नव्हतं, की मला वाद घालवा लागेल. माझा आक्षेप तर त्या सगळ्याच ओळींवर होता.. स्पष्टीकरण हवय.. (आग्रह नाही)

In reply to by यसवायजी

मुद्दा तुम्ही भरकटवताय असं नाही का वाटत तुम्हाला? ह्या धाग्यावर जे बुवाबाजी करणारे लोक मीच कसा श्रेष्ठ आहे आणि मीच माझ्या तथाकथित भक्तांचं, माझा अमुक एक तथाकथित मंत्र म्हटल्यावर कसं रक्षण करु शकतो यावर चर्चा करणारा आहे. माझं म्हणणं फक्त येवढंच आहे की कोणत्याही स्तोत्रांची तुलना या बुवाबाजी करणार्‍या लोकांच्या तथाकथित मंत्रांशी करु नका. माझं हे सरळ सोप्पं म्हणणं तुम्हाला अजूनही कळलेलं दिसत नाही. कळेल अशी शक्यताही दिसत नाही.

In reply to by यसवायजी

महालक्ष्मीनी स्वतः माझे स्तोत्र म्हणा असे सांगितल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यामुळे इथे मूळात महालक्ष्मी स्तोत्राचा मुद्दा अस्थानी वाटतोय. अत्तापर्यन्त जगात 'रेप व्हिक्टिम' ठरलेल्या व्यक्ती कुठलेही स्तोत्र वगरै रोज म्हणत होते का याचाही माझा अभ्यास नाहीए, आणि स्तोत्र मीही म्हणत नाही त्यामुले स्तोत्रामुळे माणूस वाचतो की नाही हे मला बिल्कुलच माहित नाही. ज्यांच्याकडे हा विदा असेल त्यांनी कृपया या मुद्द्यावर उजेड पाडावा ही विनंती. अवांतरः टिमकी ताई/दादा यांचे प्रतिसाद वाचताना मला 'देजा वू' फीलिन्ग का बरे येत असावे?

In reply to by कवितानागेश

>>अवांतरः टिमकी ताई/दादा यांचे प्रतिसाद वाचताना मला 'देजा वू' फीलिन्ग का बरे येत असावे? अय्याऽऽऽऽ तुलापऽऽऽण !!! ;)

मस्त लेख आहे. याच दुव्याचा मी पण शोध घेत होतो. मला आधी वाटलं की उगीच कुणीतरी या बापूच्या नावावर पिल्लू सोडून दिलं असावं. पण याचे प्रवचन म्हणजे निखळ करमणूक आहे. ;) ..... असं जर कुनी नपुंसक वगैरे व्हायला लागलं आणि ते देखील लगेच जाहीर व्हायला लागलं तर बघायला नको. ;) या बापूंना खरं तर बाप दाखवण्याची वेळ आली आहे. इकडे अनिरुद्ध बापू आणि तिकडे आसारामबापू ;)

ह्या सर्व बापुमंडळी संबंधात पण धाग्यातील विषया पेक्षा थोडा वेगळा प्रश्न पडला आहे. देव एकावेळी किंवा एका कालखंडात पृथ्वीतलावर किती "अवतार" घेऊ शकतात ह्याबद्दल कोणाला माहिती आहे का? पुराणातील कथांनुसार देवांनी साधारणपणे एकच अवतार एकावेळी घेतला आहे. पण सद्ध्या स्वताला एखाद्या देवाचे अवतार म्हणवून घेणार्‍या "बाबा", बापू", व "संत" ह्यांच्या दाव्याप्रमाणे भगवान विष्णुचे चार ते पाच, भगवान शंकरांचे तीन ते चार, देवी दूर्गेचे चार ते पाच अवतार एकाचवेळी , भूतलावरील एकटया भारतात मौजुद आहेत. यापैकी नेमका कोणत्या रुपातील अवतार खरा, का सगळेच खरे, का सगळेच .......??

In reply to by श्रिया

एकटया भारतात मौजुद आहेत.
जगात सगळ्या मानव प्राण्यांमध्ये ईश्वर मौजुद आहेत बर एक सांगा तुम्हालाच हा प्रश्न का पडावा.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

उत्तराबद्दल धन्यवाद! माझा वरील प्रतिसाद स्वता:ची मी ईश्वराचा अवतार आहे असे सांगून लोकांची भलावण करणार्‍या "बाबा" लोकांबद्दल उपहासानेदिला आहे.तरीसुद्धा १. सगळ्याच प्राण्यांमध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे, १००% मान्य. पण तरीही आपले काही भाऊबंद "मीच ईश्वर आहे " असा दावा करणार्यांच्या अधीन झाले आहेत आणि होत आहेत. २ . "जगात सगळ्या मानव प्राण्यांमध्ये ईश्वर मौजुद आहेत" ते ह्या आधीही होतेच तरीसुद्धा देवाने अवतार घेतलेच कि पण एकावेळी "मल्टीपल अवतार (एकाच देवाने)" घेतल्याचे ऐकिवात नाही. ३. माझा प्रश्न ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल नसून एकावेळी किती अवतार घेतात ह्याबद्दल आहे. ४.बर एक सांगा तुम्हालाच हा प्रश्न का पडावा. माफ करा ,तुमचा "हा" प्रश्न कळला नाही.

In reply to by श्रिया

देव एकावेळेस किती अवतार घेउ शकतात हा प्रश्न तुम्हालाच का पडावा(त्याच उत्तर कुणाच कडे नाही) हा प्रश्न मला पडलाय, तसेही बहुसंख्याकांच्या श्रद्धास्थानावर टिका(उपहासात्मक का होइना) करुन वैचारीक पातळी वाढल्याचा भास होतो.