साहित्यः सारणासाठी: ओल्या नारळाचा चव दोन वाट्या, खसखस अर्धी वाटी, गूळ दीड वाटी, अर्धा चमचा वेलची पावडर.
पारीसाठी: कणिक तीन वाट्या, रवा एक वाटी, तेल पाव वाटी,मीठ.
क्रुती: खसखस भाजून पावडर करून घ्यावी. खोबरे व गूळ एकत्र करुन मोदकाप्रमाणे सारण करावे. सारण तयार झाल्यावर त्यात खसखस पावडर आणि वेलची पावडर मिसळावी.
सारण तयार करण्यापूर्वी कणिक, रवा एकत्र करून त्यात तेल आणि चवीला मीठ घालून घट्टसर कणिक मळावी. सारण तयार होईपर्यंत कणिक भिजत राहू द्यावी. सारण गार झाले की मिक्सरला बारीक करून घ्यावे. कणिक फूड्प्रोसेसरला मऊ करून घ्यावी. सारणाच्या गोळीच्या दीड्पट (अंदाजे) पिठाची गोळी घ्यावी. पिठाच्या गोळीला वाटीचा आकार देऊन सारणाची गोळी त्यात ठेवून वाटीचे तोंड बंद करावे. मध्यम आचेवर पोळी भाजावी. ही पोळी अजिबात फुटत नाही. मी कोणत्याही पोळीसाठी दोन पाय्रा करत नाही. पोळ्या पटापट होतात्, आणि गुळाच्या पोळीसारख्या टिकतात. खोबरे आणि खसखशीमुळे खमंग होतात.


वाचने
5155
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख दिसतायत पोळ्या. ओल्या
+१
In reply to सुरेख दिसतायत पोळ्या. ओल्या by रेवती
मी नेहमी करते त्यामुळे...
In reply to +१ by सूड
या पोळ्या गुळाच्या
In reply to मी नेहमी करते त्यामुळे... by अनन्न्या
व्वा व्वा
मस्तच आहे... करुन बघायला
वा...
ओल्या खोबय्राची चव न्यारीच!!
In reply to वा... by दिपक.कुवेत
छान...!
लै भारी!
तीळ-गुळाची पोळी
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
मी मागे साउथमध्ये एकदा ओल्या