✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक पी. जे.

प
प्रशांतकवळे यांनी
गुरुवार, 11/15/2007 - 19:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7503 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Fri, 11/16/2007 - 00:33 नवीन

अजून एक..

एकदा कोकणात तात्या अभ्यंकरच्या वाडीत एक हुप्प्या (मोठा वानर) घुसतो आणि आंब्याफणसाची, सुपारीची, ताडामाडांची व इतर झाडांची भरपूर नासाडी सुरू करतो. तात्या खूप वैतागतो व त्या हुप्प्याला हाकलायचा हरेक प्रयत्न करतो. परंतु हुप्प्या काही त्याला दाद देत नसतो. त्याच गावात तात्याचा शिकारी मित्र मिलिंद भांडारकर राहात असतो. मिलिंदला बोलावणं धाडलं जातं. मिलिंद लगेच एक बंदुक आणि शिकारी कुत्रा, अश्या तयारीनिशी तात्याच्या वाडीत हजर होतो आणि तात्याला म्हणतो, "आता मी आलो आहे. घाबरू नकोस. कुठाय तो हुप्प्या?" "तो बघ! त्या आंब्याच्या झाडावर बसून माझ्या आंब्यांचं नुकसान करतोय." तात्या म्हणतो. त्यावर मिलिंद म्हणतो, "मी एक काम करतो. त्या आंब्याच्या झाडावर चढतो आणि त्या हुप्प्याशी मारामारी करून त्याला खाली पाडतो. हुप्प्या खाली पडताक्षणी माझा शिकारी कुत्रा धावत जाऊन त्या हुप्प्याच्या अवघड जागी जोरात चावेल आणि त्याला ठार मारेल!" हे ऐकून तात्या खुश होतो. मिलिंद भराभर आंब्याच्या झाडावर चढायला लागतो. तेवढ्यात तात्याची ट्युब पेटते. तो तिथे पडलेल्या बंदुकीकडे पाहात ओरडून मिलिंदला विचारतो, "अरे असंच जर का होतं, तर तू ही बंदुक कशाला आणली होतीस?" मिलिंद झाडावरनच उत्तर देतो, "अर्रर्रर्र, विसरलोच बघ! जर in case मी खाली पडलो तर तू पहिली कुत्र्याला गोळी घाल!" :) आपला, (कोकणातला आंबा बागयतदार) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 11/16/2007 - 00:43 नवीन

कुत्र्याचे नाव : जिम्या ?

विसोबा, कुत्र्याचे नाव 'जिम्या' असे नाही का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/16/2007 - 00:48 नवीन

मस्त !!

जबरा पीजे आहे ! - शिकारी सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नंदन Fri, 11/16/2007 - 04:10 नवीन

:)

कुत्र्यापुढे उभा असणारा पेच -- नरो वा वानरो वा. [कृ. ह. घे.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
किमयागार (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/16/2007 - 08:45 नवीन

अध्यक्ष

अध्यक्ष महोदय, फार पूर्वी जीम कॉर्बेटच्या नावाने खपवलेला हा किस्सा आमच्या वाचनात आला होता. आणि 'अवघड जागा' असला 'अवघड' शब्द काय वापरता? आमच्या वाचनानुसार,ते कुत्रं त्या वानरांच्या वृषणांचा वेध घ्यायचं! -किमयागार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 11/16/2007 - 09:14 नवीन

:)

आमच्या वाचनानुसार,ते कुत्रं त्या वानरांच्या वृषणांचा वेध घ्यायचं! खरं आहे, आम्हीही असंच ऐकलं होतं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किमयागार
म
मोगॅम्बो Fri, 11/16/2007 - 19:39 नवीन

जोक मात्र मस्त

त्या कुत्र्याला कुठेही चावू द्या, पण जोक बाकी मस्त आहे विसोबांचा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/16/2007 - 21:59 नवीन

चला!

म्हणजे मोगँबो खुश हुआ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगॅम्बो

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा