Skip to main content

पेठा

लेखक गणपा यांनी मंगळवार, 01/01/2013 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त जालिय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना नवं वर्षाच्या गोड गोड शुभेच्छा !!! साहित्य :  १/२ ते ३/४ किलो कोहळं (अ‍ॅशगार्ड) १/२ किलो साखर. १-२ चमचे खायचा चुना. तुरटी. गुलाब/केवडा वॉटर. कृती :  कोहळं सोलुन आतल्या बीया आणि स्पंजी भाग काढुन टाकावा आणि एक ते दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे. या तुकड्यांना काट्याने / टुथपीकने सर्व बाजुंनी टोचे मारुन घ्यावे.   चुना पाण्यात मिसळुन त्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे किमान २-३ तास मुरत ठेवावे. कपभर पाण्यात तुरटीही विरघळुन घ्यावी. दोन-तीन तासांनी कोहळ्याचे तुकडे ३-४ वेळा स्वच्छ पाण्यातुन धुवून घ्यावे. परत एकदा तुरटीच्या पाण्याने धुवुन घ्यावे.   एका भांड्यात भरपुर पाणी घेउन हे तुकडे मध्यम आचेवर अंदाजे तासभर शीजत ठेवावे. कोहळं शिजल्यावर चाळणीत काढुन बाजुला ठेवावे.   एका भांड्यात मंद आचेवर साखर भीजेल इतपत पाणी टाकुन उकळी आणावी. पाकाला उकळी आल्यावर त्यात कोहळ्याचे तुकडे अलगद सोडावे.  मध्यम आचेवर कोहळ्याचे तुकडे पाकात परतत रहावे. साधारण अर्ध्या तासात साखरेचे स्फटिक (क्रिस्टस्ल्) तयात होऊ लागतील. आच थोडी मंदावून अजुन थोडावेळ परतत रहावं. एखाद्या ताटात हे तुकडे काढुन वरून जाळी ठेउन किमान ३-४ चार तास थंड करत ठेवावे. (झटपट थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊ नये. :) ) पुर्ण पणे थंड झाल्यावर वाटल्यास वरुन गुलाबपाणी वा केवड्याचे पाणी शिंपडावे. दोन तासांच्या मेहनती नंतर आनि एकुण ८ तासंच्या प्रतिक्षे नंतर तुमच्या श्रमाचं गोड फळ तायार असेल........ हे असं.   (ऐसी अक्षरे दिवाळी अंकात पुर्वप्रकशित)

वाचने 25753
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

पेठा कसा बनवतात, हे प्रथमच कळले, धन्यवाद. याप्रकारे बनवलेला पेठा हे पेठ्याचे मूळ स्वरूप असावेसे दिसते. आग्रा वगैरेला अनेक प्रकारचे पेठे मिळतात, त्यांचे आकारही विविध असतात, आणि ते अगदी नेमक्या आकारचे, गुळगुळीत असतात. ते कसे बनवतात? तसेच अंगूरी पेठा कसा बनवतात?

वा ! :) सर्व मिपाकरांना नविन वर्षाच्या ग्वाड ग्वाड शुभेच्छ्या ! :) राजकीय ठोंब्यांना राष्ट्रहिताचे / जनहिताचे निर्णय घेण्याची सुबुद्धी होउ दे... अशी या नविन वर्षी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो.

पेठ्याचं आणि आमचं फार कधी जमलं नाही... पण ८ तासांच्या मेहनतीसाठी तुम्हाला सलाम तुरटीमुळे नक्की काय होते ते समजलं नाही...

आहा! पेठा म्हणजे अगदी जीव की प्राण! बाहेर मिळणारा पेठा पांढराशुभ्र असतो, त्यात काही वेगळं घालतात का? आणि असंच 'पानपेठा' प्रकाराचीही रेसिपी द्याल कय?

आभारी आहोत.तुमच्या मुलेच मि पा वर आलो. बाकी मी फक्त प्रेक्शक. बायको प्रयत्न करते पन फोतोतल्या सारखे नाही येत.

बापरे... पेठा हा आवडता पदार्थ असला तरी तो बनवताना ईतकी मेहनत घ्यावी लागते हे माहिती नव्हतं. आणि बनवण्यासाठी लागणारे जिन्नस तर हटकेच आहे. कोहळा, तुरटी, खायचा चुना...

In reply to by नाना चेंगट

ही कृती वैदिक आहे का? अंडी घालून करता येईल का? ते तुम्ही अंडे घालून किती वेळ झाला आहे त्यावर अवलंबून आहे

झक्कास झाली नवीन वर्षाची सुरूवात!!

पेठ्यात कोहळ्याचा किस लागतो असे मला वाटायचे...पण असो हे झकास दिसतंय म्हणजे तसेच चवीला तसेच असणार...

नव वर्षाच्या पेठामय शुभेच्छा गंपा भौ व समस्त मिपाकरांना आवडेश हो पेठा :)

मस्त. वरकरणी सोपी तरी जाम मेहनतीची आणि लैच हटके पाकृ आहे.

मिठाईच्या दुकानातला ख्रिश्चन नववधूसारखा पाढरी जाळीदार ओढणी घेऊन बसलेला तो फिकट हिरवा क्यूट क्यूब असा बनवतात होय...!

आजपासून आग्रा तुझ्या नावावर केलंय .

__/\__ यु आर ग्रेट!! पेठा तर छानच दिसत आहे पण तुमच्या मेहनतीला विशेष सलाम :)

गणपाभौ, तुस्सी ग्रेट हो!!!!!!

यम्मी ... भारी दिसतोय. पण हा पेठा एवढा गोड असतो कि एकाच्या वर खाववत नाही :(

पेठा म्हणजे माझा अगदी जीव की प्राण. खुप दिवसांपासुन याची पाककृती शोधत होते.

"पेठा करण्याचे कसब असण्यापेक्षा गणपाची मैतरकी अधिक गोडीची" असंच खरंतर पुलंना म्हणायचं होतं बरं का! अप्रतिम पाकृ, गणपाजी, तुम्हाला मानलं बुवा! पेठा माझ्या फेव लिस्ट मध्ये आहेच. अवांतर: याच रीतीने भोपळ्याचा वगैरे पेठा करता येईल का?

पेठा अतिशय आवडतो पण त्याची कृती एवढी टाईम कन्झ्युमिंग असेल असं वाटलं नव्हतं. तेवढा संयम बाळगणार्‍या गणपाभाऊंना दंडवत!

खरं तर पेठा अजिबात आवडत नाही. पण गणपानं केलेली पाककृती म्हटल्यावर न राहवून इथे आले. जबरी आहे बाबा कृती. इतका खटाटोप.. मान गये उस्ताद !!

पण खटाटोप फार असल्या कारणाने भारतवारित विकतचा खाईन. गणपाभाऊंच्या ईच्छाशक्ति आणि संयमाला दंडवत...लगे रहो

सलाम गणपाभौंच्या पेठ्याला आणि गणपाभौंनाही!!!! वरती चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे अंगूरी पेठा कसा बनवतात हे जाणण्याची इच्छा मलादेखील आहे. आग्र्याला गेलो असताना तिथला प्रसिद्ध ब्रँड "पंछी पेठा" चा अंगुरी फ्लेवर आणला होता. लै म्हंजे लै भारी होता. पिवळसर, पाकाने माखलेला आणि केशराच्या अवलेपनाने प्रचंड टेम्प्टिंग दिसत होता.

एकदम वेगळी पाकृ... एकदा करुन बघीतले पाहिजे... आता त्या साठी आधी कोहळा शोधायला लागेल, आणि तो इथे मिळणे महामुश्कील..

वा पेठा हा माझा एक आवडता पदार्थ आहे. एवढी मेहनत घ्यावी लागते हे माहीत नव्हत. खुप छान. आता करुन पाहीन एकदा. आमच्या इथे दत्त जयंतीला जत्रा असते. तेंव्हा मी त्या जत्रेतून नेहमी हा पेठा घेते.

..

अतिशय आवडणारी मिठाई (माफक प्रमाणात गोड असल्यास). तयार करण्या मागे मेहनत खुप असल्यामुळे विकत घेणेच पसंत करतो :)

ह्याच ऍशगॉर्ड ची पेठया सारखी अजुन एक ज़रा जास्त पाकात न्हालेली मिठाई असते नाव तिचे केसर गंडेरी!!अप्रतिम असते