साहित्यः
रेडीमेड स्पाँज केक मिक्स (हे नाही मिळाल्यास बेसीक स्पाँज केकची पाकृ खाली दिली आहे)
५० मिली + २५ मिली पाणी (केक मिक्सच्या पाकिटावर पाणी आणी अंड्याचे जसे प्रमाण दिले आहे तसे घ्यावे)
१ अंडं
६-७ खाण्याचे रंग (मी लाल,शेंद्री,पिवळा,हिरवा,निळा,गुलाबी रंग वापरला आहे. लाल्+निळा+पिवळा रंग एकत्र करून ब्राऊन रंग तयार केला आहे)
फ्रेश क्रीम
पाकृ:
ओव्हन २०० डिग्री सेंटीग्रेडवर प्री-हीट करा.
एका मिक्सींग बाऊल मध्ये केक मिक्स, अंडं व ५० मिली पाणी एकत्र करुन फेटून घेणे.
त्यात आता उरलेले २५ मिली पाणी घालून चांगले फेटणे.
फेटलेल्या मिश्रणाचे ७ भाग करावे व प्रत्येक भागात वेगवेगळा खाण्याचा रंग घालून मिक्स करावे. (वेगळे बाऊल व चमचे वापरावे म्हणजे रंग एकमेकांमध्ये मिसळणार नाही)
केक टीनला बेकींग पेपर लावून घ्यावा किंवा बटर ने ग्रीज करून घ्यावे.
आता टीनच्या मध्यभागी लाल रंगाचे मिश्रण ओतावे, चमच्याने अजिबात पसरवायचे नाही.
लाल मिश्रणाच्या मधो-मध शेंद्री रंगाचे मिश्रण घालावे म्हणज लाल रंगाचे बॅटर आपोआप पसरेल.
शेंद्री रंगाच्या मिश्रणाच्या मधोमध गुलाबी रंगाचे मिश्रण घालावे.
असेच इतर रंगाचे मिश्रण मधोमध घालावे व केक टीन हलकेच आपटून घ्यावे म्हणजे हवेचे बुडबुडे निघून जातील.
प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये केक टीन ठेवून १५-२० मिनिटे बेक करणे.
विणायची सुई घालून पहावी, सुई स्वच्छ निघाली म्हणजे केक तयार झाला समजावे.
केकला कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी काढून ठेवावे.
केक गार होतोय तोपर्यंत क्रीम व्हिप करुन घ्यावे.
एका भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावा.
त्यात गार असलेले फ्रेश क्रीम ओतावे व बीटरने २-३ मिनिटे फेटावे. (असे केल्याने क्रीम लवकर फेटले जाते)
आता त्यात चवीपूरती साखर व १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालावे.
पुन्हा २-३ मिनिटे क्रीम घट्ट व सॉफ्ट पिक्स तयार होईपर्यंत फेटावे.
गार झालेल्या केकचा बेकिंग पेपर काढून टाकावा व केकला सगळीकढून क्रीम लावून पसरावे.
मी थोडेसे फेटलेले क्रीम बाजूला काढून त्यात खायचा गुलाबी रंग घातला व पायपींग बॅगने केकवर सजावट केली.
सजावट केलेला केक थोड्या वेळ फ्रिजमध्ये ठेवा.
केक कापला की आतले सप्तरंग खुलून दिसतील :)
नोटः
ज्यांना केक मिक्स सहज उपलब्ध नाही त्यांनी घरीच स्पाँज केकचे मिश्रण तयार करावे.
त्यांनी १७५ ग्राम मैदा चाळून घ्यावा.
१२५ ग्राम बटर आणी १२५ ग्राम साखर एकत्र हलके होईपर्यंत फेटावे.
त्यात एक-एक करत २ अंडी घालून चांगले फेटावे.
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा फेटावे.
त्यात चाळून घेतलेला मैदा थोडा थोडा करून घालावा व मिश्रण फोल्ड करावे.
ह्याच मिश्रणाचे सात भाग करून, त्यात रंग घालावे व पुढिल कृती वर दिल्याप्रमाणे करावी.

वाचने
9385
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुपच मस्त दिसतोय केक... आणि
अप्रतिम!!! रुचकर आणी सुंदर
मस्त !!!!
देखणा
बघ बरं, मी काय म्हणालो होतो
हा हा हा
In reply to बघ बरं, मी काय म्हणालो होतो by गणपा
अलबत.
In reply to हा हा हा by सानिकास्वप्निल
सु रे ख. आणि बाकी प्रतिसाद
+ १
In reply to सु रे ख. आणि बाकी प्रतिसाद by रेवती
अशक्य देखणा झालाय केक.
मशत!& बेस्ट विशेस !
आहाहा !! क ह र !!
जबरा झालाय केक किती निगुतीने
अतिशय सुरेख मस्तच.......
मस्त
(नेहमीप्रमाणेच) सुंदरतेचा अन
अप्रतिम खाद्य कलाकृती
कसला जीवघेणा दिसतोय गं केक...
अमेझिंग!
काय बोलू
याच सप्तरंगांची उधळण आपल्या आयुष्यात ही होवो!
अगदी फेस्टीव्ह केक झाला आहे.
खूपच मस्त दिसतोय केक
शॉलिट्ट !!!
भा हा री ही!
या अल्ला!
केक
छान
पुर्ण केक चेपुवर पाहिला होताच
खल्लास.. असा केक तर विकत
झकास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स