✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आजचा सवाल आणि त्याचे होणारे परिणाम (स्वतःवर आणि त्यामुळे इतरांवर)

स
सुचेल तसं यांनी
गुरुवार, 12/27/2012 - 01:15  ·  लेख
लेख
मी काही वर्षांपासून आयबीएन लोकमतवर आजचा सवाल नियमितपणे पहात आहे. आधी विरंगुळा म्हणून, नंतर माहितीपर कार्यक्रम म्हणून आणि हल्ली तर व्यसन लागल्यासारखं १० वाजता ते पहायला टीव्ही चालू करतो. माझ्या घरचे त्या सूत्रसंचालकावर जाम वैतागतात - किती आक्रस्ताळेपणाने, तावातावाने आणि हातवारे करुन तो बोलतो ह्यावर. घरच्यांना मराठी मालिका, काही हिन्दी मालिका - बडे अच्छे, कुछ तो लोग वगैरे सोबर वाटतात आणि त्यापुढे आजचा सवाल फार जहाल कार्यक्रम वाटतो. मलाही आजकाल सूत्रसंचालकाबरोबर त्यातली पाहुणे मंडळी आक्रस्ताळी वाटायला लागली आहेत. घरच्यांचं म्हणणं की हे रोज पाहून पाहून मीही (विनाकारण) हातवारे आणि तावातावाने बोलायला लागलो आहे. खरोखरच असा परिणाम होऊ शकतो का? हा कार्यक्रम पाहणं बंद करावं का? तुमचं सगळ्यांचं मत जाणून घ्यायला आवडेल :-)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5833 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

चांगला मुद्दा आहे हा...

आनन्दिता
गुरुवार, 12/27/2012 - 04:23 नवीन
मी तर त्या सुत्रसंचालका ला दाढीवालं वट'वागुळ' च म्हणते... तुमच्या प्रमाणेच माझ्याही घरी या ' आजच्या सवाल' ने बरेच सवाल तयार केले होते... सुरुवातीला आम्हीसगळेच जण हा कार्यक्रम अगदी चवीने पहायचो.. त्यातल्या काही debate खुप चांगल्या रंगल्या होत्या… अनेकवेळा आमच्या घरातच त्यातल्या वादानुसार दोन दोन गट पडुन आमची तुंबळ जुंपायची सुद्दा… पण नंतर नंतर मला जाणवु लागलं की बरेच दिवस झाले कुठे काही चांगलं झाल्याची चर्चा आपण ऐकलीच नाहीये.. तिथे बोलायला येणारे दोन गटांचे राजकारणी, तटस्थ (हे सगळे मेले congress धार्जिणेच), यांचं बोलणं ऐकुन कधी कधी इतकं विषण्ण वाटायचं की देशात सगळीकडे अंदाधुंदी च माजलीये हा समज पक्काच होउन बसला… चांगल्या गोष्टींना बातमी म्हणुन कधी स्थानच मिळत नाही आजकाल्… सगळं कसं negative च! त्यातही तेच तेच वक्ते प्रत्येकवेळी आणले गेल्याने भाई जगताप वगैरे लोकं त्या IBN चे part time employee आहेत की काय अशी शंकाही मला येते =)) स्वत:ला निर्भिड, निपक्षपाती म्हणवणारे सुत्रसंचालक शिवसेना, भाजप वर जितक्या आवेशात तुटुन पड्तात तितक्या सफाइदार पणे राष्ट्रवादी वर congress विरुद्ध का बोलत नाहीत याला उत्तर नाही। यासगळ्यातून मला तरीइ इतकंच जाणवलं की इतके दिवस मी खर्या स्वरुपातल्या बातम्या ऐकतच नव्हते॥ आप्ल्याला ते ऐकवलं जातं what they want us to listen. अन् हो ते आक्रस्ताळेपणे वाद घालण्याची 'कला' :) आपल्या अंगी येणे वैग्रे प्रकार आमच्याइथे पण आढळले :) शेवटी मीच " आजपासुन आजचा सवाल बंद" या विषयावर त्या सुत्रसंचालकाला ही लाजवतील अशा तोडीचे हातवारे करुन हा वाद जिंकला.. सध्यातरी आमच्या इथुन आक्रस्ताळे वादविवाद अन् डोकेदुखी हद्द्पार आहे.. त्यातुनही एखाद्या घटनेची बाजु समजावुन घ्याविशी वाटली तर paper मधली अभ्यासपुर्ण सदरे वाचते.. ज्यांची perticular विषयावर बोलायची खरंच योग्यता आहे त्यांच्या comments वाचते..internet बाबा दिमतीला असल्याने हे सगळं जास्त कष्ट न घेता होतय ही माझ्यासारख्या आळशी व्यक्तिसाठी आणखी एक जमेची बाजु आहे… कधीमधी हा कार्यक्रम ही मी पाहते. सुरुवातीचे काही मुद्दे ऐकले की एकंदरीतच चर्चेच स्वरूप कळून जातं.. बोले तो आपुन भी स्मार्ट बननेका... वादविवादाचा मुद्दा समजेपर्यंन्त च फक्त चर्चा ऐकायची...स्पर्धका मधली नंतरची 'बाचबाची' अन् वट'वागुळ' ची पोपट्पंची ऐकायचीच नाही..:)
  • Log in or register to post comments

शेम टू शेम

चिर्कुट
गुरुवार, 12/27/2012 - 09:38 नवीन
अगदी हेच आणि हेच होत होतं आमच्याकडेही..बंद करुन टाकलं तो चॅनल पाहाणं.. तो निखील वागळे अत्यंत पक्षपाती आहे हे पक्कं समजलं आहे आता सगळ्यांना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

अहो चिर्कुट राव ते चायनलच

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 12/27/2012 - 10:05 नवीन
अहो चिर्कुट राव ते चायनलच कॉन्ग्रेस धार्जिण आहे,त्यामुळे वागळे काय अन दुसरा आला काय सारखेच आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट

खोखोखो !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/27/2012 - 21:06 नवीन
शेवटी मीच " आजपासुन आजचा सवाल बंद" या विषयावर त्या सुत्रसंचालकाला ही लाजवतील अशा तोडीचे हातवारे करुन हा वाद जिंकला..
सांगण्याची पद्धत एकदम लाजबाब ! +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

काय करणार घरातली ९९% लोक नाही

आनन्दिता
Sun, 12/30/2012 - 09:45 नवीन
काय करणार घरातली ९९% लोक नाही म्हणत होती ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आनंदिता , चिर्कुट , तुम्ही

गवि
गुरुवार, 12/27/2012 - 11:06 नवीन
आनंदिता , चिर्कुट , तुम्ही थांबा. मी तुमच्याकडे परत येतोय. गावसेना प्रमुख यांना बोलू द्या.. गावसेनाप्रमुख साहेब, मला प्रश्नाचं थेट उत्तर हवं आहे.. हो किंवा नाही .. .. हो किंवा नाही ? तुम्ही उत्तर देण्याचं टाळताय.. प्रश्न असा आहे "हा कार्यक्रम पाहणं बंद करावं का?" आनंदिता यांनी म्हटलंय की त्यांनी हा कार्यक्रम पाहणं थांबवलंय. "सुचेल तसं" यांनी या कार्यक्रमावर आक्रस्ताळेपणाचा थेट आरोप केला आहे. हा गंभीर आरोप आहे. यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा कार्यक्रम पाहणं थांबवावं की नाही? तुम्ही उत्तर द्या... लवकर आपल्याकडे वेळ कमी आहे. एका वाक्यात उत्तर द्या.. प्रश्न असा आहे.. हा कार्यक्रम बघणं थांबवावं का? पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..
  • Log in or register to post comments

परफेक्ट

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 12/27/2012 - 11:26 नवीन
:D :D :D गवि बगळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आता हात्वार्‍यांची व्हिडीओ

बाळ सप्रे
गुरुवार, 12/27/2012 - 11:42 नवीन
आता हात्वार्‍यांची व्हिडीओ क्लिप येउद्या !! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एकदम पर्फेक्ट!!!!!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 12/27/2012 - 11:51 नवीन
एकदम पर्फेक्ट!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

"बाजार उठवणे"

चिर्कुट
गुरुवार, 12/27/2012 - 12:02 नवीन
या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करुन दाखविल्याबद्दल गविंचे आभार्स.. :D >>प्रश्न असा आहे.. हा कार्यक्रम बघणं थांबवावं का? <<यामध्ये बॅकग्राउंड्ला, अर्रे किती मेसेज आले? ४? ओके.. :) >> (प्रगट) पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हा हा हा !!!!!!!

विजय नरवडे
गुरुवार, 12/27/2012 - 13:53 नवीन
हा हा हा !!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

प्रत्येक प्रश्नाच थेट उत्तर

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 12/27/2012 - 14:05 नवीन
प्रत्येक प्रश्नाच थेट उत्तर देता येइलच असे होइल काय्,बाकी कार्यक्रम बघणे किंवा न बघणे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे किंवा असावा,मी असे म्हटलोच नाही कि हा कार्यक्रम बघु नका,मी फक्त एव्हढेच म्हणालो की अहो चिर्कुट राव ते चायनलच कॉन्ग्रेस धार्जिण आहे,त्यामुळे वागळे काय अन दुसरा आला काय सारखेच आहे, आता सांगा मि काय बघु नका असे थोडेच म्हणालो, राहीली वागळ्यांची बात वागळे किंवा तत्सम मंडळी किंवा त्यांच्या जागी आलेले दुसरी मंडळी हि मालकाच्या(दर्डांच्या) इच्छेनुसारच चॅनल चालवतात किंवा चालवीत असावीत त्यामुळे त्यांचा ( आय बी एन )कार्यक्रम निरंतर चालतच राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हाहा जबरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/27/2012 - 19:52 नवीन
लंबर एक. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

दादा कोंडके
गुरुवार, 12/27/2012 - 20:02 नवीन
सहमत! मानलं गवि तुम्हाला. :) पण वरती त्यावर श्री गावसेना प्रमुख यांची प्रतिक्रिया वाचून हहपुवा झाली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत

श्रीरंग
गुरुवार, 12/27/2012 - 20:43 नवीन
पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..
याचा एकच अर्थ असू शकतो.. इतर ५ टक्के लोकं शिवसैनिक आहेत, किंवा ५% लोकांना प्रश्नच नीट समजला नाहिये.. आपण इथे एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर मी श्री गावसेना प्रमुख यांच्याकडे येणार आहे..पाहत रहा (तुम्ही ५% पैकी नसाल तर).. फक्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

(No subject)

किसन शिंदे
गुरुवार, 12/27/2012 - 23:15 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फर्माईश

रमेश आठवले
गुरुवार, 12/27/2012 - 11:15 नवीन
वट'वागुळ' चा कार्यक्रम आवडत नसेल तर खालील कार्यक्रमांची फर्माईश करत आहे. १.सोम-मंगळ -रात्री साडेनौपासून साडेदहा पर्यंत - गौरव महाराष्ट्राचा- इ टी.व्ही. मराठी. २.बुध-गुरु -रात्री साडेनौपासून साडेदहा पर्यंत- अवधूत गुप्तेंचे खुपते तिथे गुप्ते - झी मराठी. ३.शुक्रवार -रात्री साडेनौपासून साडेदहा पर्यंत-सलिल कुलकर्णी यांची मधली सुट्टी- झी मराठी ४..शनि-रवि -रात्री नौ पासून साडेदहा पर्यंत- झी टी.व्ही वर . सा रे ग म प हिंदी - या कार्यक्रमातील संगीताचा दर्जा फार चांगला आहे. जसराज जोशी व विश्वजित बोरवणकर यां मराठी मुलांचा समावेश आता उरलेल्या सात स्पर्धकात आहे.
  • Log in or register to post comments

नाही ...

छोटा डॉन
गुरुवार, 12/27/2012 - 11:21 नवीन
असे कार्यक्रम बंद व्हावेत किंवा आपण ते पहाणे थांबवावे असे मला वाटत नाही. इन्फॅक्ट मला असे कार्यक्रम पाहताना मज्जा येते (असे कार्यक्रम सोडले तर फुटबॉल मॅचेस सोडुन इतर काय पाहण्यासारखे असते टिव्हीवर ? ;) ) काही मुद्दे व्हॅलिड आहेत, उदाहरणार्थ एकच पॅनेल पुन्हा पुन्हा बोलावणे. पण त्याला पर्याय नाही कारण त्या त्या व्यक्ती त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणुन येत असतात, फार तर प्रवक्ते म्हणु आपण, हे पद लिमिटेडच असावे लागते. दुसरा मुद्दा असा की "स्वत:ला निर्भिड, निपक्षपाती म्हणवणारे सुत्रसंचालक शिवसेना, भाजप वर जितक्या आवेशात तुटुन पड्तात तितक्या सफाइदार पणे राष्ट्रवादी वर congress विरुद्ध का बोलत नाहीत याला उत्तर नाही". हे खरे आहे, पण माझ्या नजरेत हे वागळेंच्या बाबतीत तसे कमीच घडते. इतर चॅनेल्सवरचे महान सुत्रसंचालक जणु रामशास्त्री किंवा गेलाबाजार न्या.काटजुंचा आव आणुन इतरांना हाणत असतात. वागळे निदान त्या बाबतीत बरेच सुसंगत आणि सुसह्य आहेत. 'एबीपी माझा'वर जेव्हा त्यांचे संपादक राजीव खांडेकर येतात तेव्हा चर्चा उत्तम होते. मला अजुन एक वाटते ते असे की काही राजकिय विषय बाजुला ठेवले तर अशा मंचावर बर्‍याचदा अत्यंत उत्तम म्हणावी अशी चर्चा झाली आहे. असे कार्यक्रम चालु रहाणे हे उत्तमच आहे (फक्त काही सुचसंचालकांना आता नारळ द्यायला हवा). भिती फक्त एवढ्याचीच आहे की ही चर्चा त्याचा सुत्रसंचालकाच्या नावावे चालते, उदा. जेव्हा वागळे सुट्टीवर असतात आणि दुसरा कोणी 'आजचा सवाल' विचारत असतो तेव्हा कार्यक्रम बेचव होतो. इथे वागळ्यांच्या आरडाओरड्याला हायलाईट न करता मी त्यांचे सर्व वक्त्यांकडुन वदवुन घेण्याचे स्कील आणि चर्चेवर त्यांचा असणारा कंट्रोल इत्यादी बाबी अधोरेखीत करतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

तो वागळे भांडण लावयच काम भारी

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 12/27/2012 - 11:34 नवीन
तो वागळे भांडण लावयच काम भारी करतो. कळीचा नारद आहे तो. "त्यांनी तुमच्यावर उघड उघ्ड आरोप केलाय, तुम्ही याला उत्तर दिल पाहिजे" "सेनेची भुमिका अमुक आहे, मनसेची काय भुमिका आहे यावर" आणि परत सगळी कडे मी, मी, मी जणु काही याचाच चॅनल आहे. "आता मी या ठिकाणी एक ब्रेक घेणार आहे" शिवसेनेने त्याला एकदा मस्त ठोकला होता. तोंडाला काळं देखील फासलं होत तरी पण सुधरल नाही ते. त्यापेक्षा मग तो ABP माझा वरचा प्रसन्न जरा बरा आहे.
  • Log in or register to post comments

इतर मराठी चानल वरील

पिंपातला उंदीर
गुरुवार, 12/27/2012 - 11:35 नवीन
इतर मराठी चानल वरील चर्चांपेक्षा वागलेन्चा कार्यक्रम त्यातल्या त्यात उजवा आहे असे माझे मत.
  • Log in or register to post comments

आह !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/27/2012 - 11:40 नवीन
लोकं अजून टिव्ही पाहतात ?
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
गुरुवार, 12/27/2012 - 19:43 नवीन
प.रा शेट, कुठली चॅनेल आणि वेबसाईट कधी पहाव्या यावर एकदा आपल्याशी चर्चा करावयाची आहे बरं.... आजचा सवाल मधे हा विषय चर्चेला घेता येइल का? (नवपुणेकर)सौरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हिंदी मध्ये देखील हाच प्रकार

अनुप कुलकर्णी
गुरुवार, 12/27/2012 - 12:31 नवीन
हिंदी मध्ये देखील हाच प्रकार आहे. Times Now वरच्या अर्णब गोस्वामी ची चर्चासत्रं ऐकल्यावर निखिल वागळे बरा म्हणायची वेळ येते दुसर्याचं मत ऐकून घेणं ही Group Discussion/Debate मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं सांगण्यात आलं होतं आणि बर्याचदा चर्चेत भाग घेणारे लोक हे पाळतही असतात, पण वागळे आणि गोस्वामी सारखे होस्ट मुद्दामच चर्चा एकांगी करवतात असं माझं मत आहे.
  • Log in or register to post comments

बरोबर

इरसाल
गुरुवार, 12/27/2012 - 13:13 नवीन
आता इथुन हिंदी-मराठी सुरु................ चालु द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप कुलकर्णी

कार्यक्रम आणि व्यक्तीमत्वावर होणारे परिणाम...

दादा कोंडके
गुरुवार, 12/27/2012 - 15:24 नवीन
माझा एक मित्र इंग्रजी सुधारण्यासाठी 'कॉफी विथ करन' बघायचा. :) मी पण बघावं म्हणून वेळ लक्षात ठेउन लावला टिवी. त्यात पहिल्याच भागात कुठल्याश्या उठवळ बाईबरोबर गॉसिपबद्दल तो नाटकी, बायकी चर्चा करत होता. ते बघून, 'बालिश बहु बायकात बडबडला' ही ओळ त्यासाठीच आहे असं वाटलं होतं. लोकं कशातून काय शिकतील याचा भरवसा नाही.
  • Log in or register to post comments

आवडतात

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 12/27/2012 - 18:35 नवीन
मला प्रसन्न जोशी चे एबीपी माझा वर चे अँकरिंग आवडते. असे कार्यक्रम पहायला मला आवडतात. जर बोअर व्हायला लागल तर रिमोट आहेच आपल्या हातात. कुठलाही अँकर कमी अधिक प्रमाणात बायस्ड असतोच. कारण प्रत्येकाचा संदर्भबिंदू वेगळा आहे. बॉलिवूड च्या गॉसिपिंग पेक्षा हे चांगलच आहे.
  • Log in or register to post comments

प्रॉब्लेम

आनंदी गोपाळ
गुरुवार, 12/27/2012 - 23:51 नवीन
प्रश्न असा आहे.. हा कार्यक्रम बघणं थांबवावं का? पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..
प्रॉब्लेम असा आहे.. हा कार्यक्रम बघणं थांबवावं का? पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..
  • Log in or register to post comments

फावला वेळ

आशु जोग
गुरुवार, 12/27/2012 - 23:51 नवीन
अलिकडे बोलायला काही विषय नसला की फावला वेळ कसा घालवावा असा अनेकांना प्रश्न पडतो. अशावेळी दिग्विजयसिंग, निखिल वागळे, राखी सावंत मदतीला धावतात. त्यांच्याबद्दल बोलताना, त्यांना शिव्या देताना वेळ कसा छान जातो कळतच नाही नवे नवे विषय दिल्याबद्दल या तिघांचेही आभार.
  • Log in or register to post comments

अरेच्चा!

पैसा
Sun, 12/30/2012 - 09:03 नवीन
दृष्टी बदला हो! फालतू विषय असेल तर विनोदी कार्यक्रम म्हणून बघा. हाकानाका!
  • Log in or register to post comments

@घरच्यांचं म्हणणं की हे रोज

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/30/2012 - 16:57 नवीन
@घरच्यांचं म्हणणं की हे रोज पाहून पाहून मीही (विनाकारण) हातवारे आणि तावातावाने बोलायला लागलो आहे. खरोखरच असा परिणाम होऊ शकतो का? >>> मग हा धागा काय उगीच निघाला काय? ;-) तुमच्याकडुन :-b
  • Log in or register to post comments

मिपा मध्ये आजच सवाल ,

निनाद मुक्काम …
Sun, 12/30/2012 - 17:14 नवीन
  • मिपा मध्ये आजच सवाल ,
  • प्रतिसादाची धमाल ,
  • मिपा इफेक्टचा चा कमाल
  • असे सदर चालू करावे का अशी विनंती वजा आगाऊ विचारपूस करत आहे.
  • ह्यामुळे आभासी जगतात का होईना लोकशाही जागृत असल्याचा फील येईल.
  • Log in or register to post comments

आवडत नाही तू टी वी बंद कर

आशु जोग
Sun, 12/30/2012 - 23:13 नवीन
आवडत नाही तू टी वी बंद कर इतका साधा उपाय आहे. असे असताना मिपावरचा एक धागा का वाया घालवावा मिसळीच्या संपादकांना विनंती अशा टी पी विषयांना घरची वाट दाखवावी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा