साहित्यः
१. हिरवी सफरचंद - २
२. कांदा - १ (पातळ उभा कापुन)
३. लसुण पाकळ्या - २ (पातळ कापुन)
४. सुख्या लाल मिरच्या - ३
५. आख्खे धणे - १ चमचा
६. बडिशेप पावडर - १ चमचा
७. आमचुर पावडर - १/२ चमचा
८. तिळाचि पावडर - १ चमचा
९. हळद - १/२ चमचा
१०. हिंग / मीठ / मोहरि - चवीनुसार
११. तेल - १ पळि
१२. कोथिंबिर
कृती:
१. सुख्या लाल मिरच्या आणि आख्खे धणे कोरडेच भाजुन मिक्सरमधे भरडसर वाटुन घ्या
२. तिळ सुध्धा कोरडेच बाजुन बारिक पुड करा (पाणि न घालता)
३. रेडिमेड बडिशेप पावडर असेल तर ठिक नाहितर बडिशेप पण कोरडिच भाजुन बारिक पुड करा
४. हि तयारि झाली कि कांदा / लसुण पातळ उभा चिरुन घ्या
५. आता सफरचंदाचे मध्यम तुकडे करुन घ्या
६. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाका
७. तेल तापले कि मोहरि, हिंग, हळद टाकुन फोडणी करा
८. मोहरी तडतडली कि कांदा / लसुण घालुन परता
९. कांदा / लसुण मोठया आचेवार परता...थोडेसं जळलं तरि हरकत नाहि...नव्हे तसं कराच कारण नंतर त्याच्यामुळे भाजी मस्त खमंग लागते
१०. आता सफरचंदाच्या फोडि टाकुन परता व वाफेवर शिजवा
११. मधे मधे हलक्या हाताने परता म्हणजे फोडि मोडणार नाहित
१२. आता सफरचंदाची साल मउ झाली कि अनुक्रमे मिरची-धणे पुड, बडिशेप, आमचुर, तिळाचि पावडर, चविनुसार मिठ टाकुन हलकेसे परता
१३. ५ मि. गॅस बंद करुन बारिक चिरलेली कोथिंबीर पेरा
१४. गरमा गरम चटपटित भाजी पोळि, गर्लिक नान, फुलक्या सोबत सर्व करा...:)
वाचने
5421
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या पाककृती नेहमी हटके
सहमत. वेगळीच पाकृ.
In reply to तुमच्या पाककृती नेहमी हटके by गणपा
+२
In reply to सहमत. वेगळीच पाकृ. by गवि
तसं सफरचंद कापायचे एक यंत्र
In reply to +२ by प्रचेतस
अरे वा... सहिच.... पण मग ही
हटके रेशिपी आहे.
मस्तच पाकृ; खरंच चटपटीत असणार
सगळ्यांना
मस्त पाकृ
नाही ती हिरवीच असतात
अगदी वेगळी भाजी. फोटो आवडला.
लई भारी, अशीच भाजी हल्ली
वेगळीच पाककृती
हटके. हिरवी सफरचंद आहेत घरात
अरे व्वा
कल्पक आणि चविष्ट पाकृ करण्यात
वेगळीच पाककृती
मी केली होती आज. मला तरी
अरे वा... एकदम हटके पाकॄ
मस्त
थंड व्हायच्या आता वाढा हो! लय
In reply to मस्त by धनंजय