साहित्य: कणीक, तेल, मीठ, साखर, किसलेली गाजरे व सोलून किसलेली बीटरूटस् एक मोठा बाऊल प्रत्येकी, ३ हिरव्या मिरच्या व पेरभर आलं यांची पेस्ट (चवीनुसार प्रमाण कमी जास्त करावे), लिंबूरस व कोथिंबीर.
कृती: चमचाभर तेल व किंचित मीठ घालून कणीक थोडी घट्ट भिजवावी.
तेलाचा हात लावून बाजूला झाकून ठेवावी.
आता एका पातेल्यात एक टेबलस्पून तेल तापवावे. त्यात आलं, मिरचीची पेस्ट परतावी.
अर्ध्या मिनिटानंतर भाज्यांचे कीस घालावेत. एक वाफ आल्यावर मीठ, साखर, लिंबूरस घालावे.
हलकेच एकत्र करून मिश्रणाला पुन्हा एक वाफ आणावी व कोथिंबीर घालावी.
आता हे सारण ताटलीत पसरून गार करावे. पराठा करण्यासाठी मध्यम आंचेवर तवा तापत ठेवावा.
मोठी पुरी करता येईल इतपत कणकेचे छोटे गोळे करावेत. एक मोठी पुरी लाटून बाजूला ठेवावी.
दुसरी पुरी लाटून घ्यावी व त्यावर दोन मोठे चमचे सारण पसरवावे.
आधी लाटलेली पुरी यावर ठेवून कडा दाबून घ्याव्यात. आता लाटणे हलकेच फिरवून पराठा लाटावा.
तव्यावर तेल सोडून खरपूस भाजावा व लोणचे, दही यापैकी जे आवडत असेल त्याबरोबर गरमगरम वाढावा.
*ही पाककृती एका पाककला स्पर्धेत पहिल्यांदा पाहिली होती व नंतर माझ्याकडील पुस्तकात पाहून करून बघितली.
वाचने
44160
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त दिसत आहेत आजच करुन
व्वा!! पराठे खूपच छान
असे पराठे आम्ही करतो पण अशी
+१
In reply to असे पराठे आम्ही करतो पण अशी by ऋषिकेश
सारण सगळीकडे सारखं लागलेलं
वा मस्त दिसताहेत
चतकोर तुकडे
व्वा...........काय मस्त
वाह्ह...
मस्त!
मस्त रंगबिरंगी पराठे !
मस्त दिसतायत.
पराठे 'गोड' दिसतायत.
मस्त!
आय्च्या गावात... मस्त
छान आहेत .मी इथे नवीन आहे
मस्तच दिसतायत पराठे... करुन
वाह वाह !
सोमालिया?
In reply to वाह वाह ! by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद मंडळी.
मस्तचं...
वाह आज्ज्जे!!
वाह!
मस्त....!
(No subject)
झकास.
छान
अप्रतिम रंग!!
यात लसूण मला तरी आवडणार नाही.
In reply to अप्रतिम रंग!! by अनन्न्या
पराठे करून बघितले