साहित्यः
मैदा - १ कप
Brown sugar - पाऊण कप
बटर - १ कप (room temprature)
बेकिंग पावडर - १ टि स्पुन
अंडी - २
मिक्स्ड ड्राय फ्रुट्स (बदाम, मणुका, आक्रोड, ड्राय प्लम, जर्दाळु, काजु, ऑरेंज पील कँडी, ड्राय चेरी)
चोको चिप्स - २-३ चमचे
रम इसेन्स - १ टि स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १ टि स्पुन
Baking sheet
केक मोल्ड
कृती:
१. मैदा व बेकिंग पावडर एकत्र २ वेळा पिठाच्या चाळणीने चाळुन घ्यावे.
२. सर्व ड्राय फ्रुट्स व चोको चिप्स एका भांड्यात घेउन त्यात १-२ चमचे मैदा टाकुन मिक्स करावे. ह्यामुळे केक मधे ड्राय फ्रुट्स खाली न बसता सगळीकडे पसरतात.
३. एका भांड्यात बटर, रम इसेन्स, व्हॅनिला इसेन्स व brown sugar एकत्र करुन hand mixer ने साखर dissolve होई पर्यंत फेटुन घ्यावे.
४. त्यात १ अंडे व १/२ कप मैदा टाकुन मिक्स करावे.
५. वरील मिश्रण एकत्र झाल्यावर त्यात उरलेले १ अंडे, मैदा, ड्राय फ्रुट्स मिक्स करावे.
६. हे सर्व होई पर्यंत ओव्ह्न २०० degree celcius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
७. केक मोल्डला आतुन बटर लावावे व त्यावर बेकिंग शिट लावुन घ्यावी.
८. ह्या केक मोल्ड मधे वरील केकचे मिश्रण टाकुन निट पसरुन घ्यावे.
९. आता केक ओव्हन मधे १८० degree celcius ला २०-३० मिनिटे बेक करुन घ्यावा.
१०. २०-३० मिनिटांनी केक मधे toothpick टाकुन केक झाला आहे कि नाही ते बघावे.
११. केक झाल्यावर बाहेर काढुन, १०-१५ मिनिटे गार करावा.
१२. केक गार झाल्यावर त्याचे स्लाईसेस कापुन serve करावा.
वाचने
6935
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!! छान दिसतोय केक.
मस्तच बनला केक आवडला
मस्त !
सुंदर!
कमाल भारी दिसतायत त्या स्लाइस
नाही.. ह्यात अंडी नाही फेटली
In reply to कमाल भारी दिसतायत त्या स्लाइस by अनुप कुलकर्णी
छानच..
मॄणालिनि...
कुवेतमध्ये काय स्वस्त आहे,
In reply to मॄणालिनि... by दिपक.कुवेत
मला तरी काय एवढे त्यातले समजत
In reply to मॄणालिनि... by दिपक.कुवेत
आवडला.रम ईसेन्स घालणे जरुरीचे
हा हा हा... गणपा बोलतो ते
In reply to आवडला.रम ईसेन्स घालणे जरुरीचे by ज्योति प्रकाश
नाताळ म्हटला की रम-प्लम केक
कालच प्लमकेकची आठवण आली होती,
मस्त. नक्की करुन बघणार.
अरे दोन्हि
ह्ह्हह्हा.......!
तोंपासू
मस्तच
मी ब्रँडी घालुन बनवला होता.
बिन अंड्याचा कसा करणार
ओव्हन नसेल तर ..................