Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by neeta on Sun, 12/23/2012 - 14:48
लेखनविषय (Tags)
संगीत
आता जरा नवीन व जुनी गाणी आठ्वूया, एका शब्दावरून किती गाणी आठवता आहेत ते बघूया . हे संकेत स्थळ मराठी साठी असल्यामुळे मराठी गाणी आठवूया. शब्द आहे जीवन. माझ्याकडून : जीवनात ही घडी अशीच राहू दे. धागा आवडला नाही तर प्रतिसाद देऊ नका. ज्यांना गाणी आवडतात त्यांना लिहून देत.
  • Log in or register to post comments
  • 20827 views

प्रतिक्रिया

Submitted by दिपक.कुवेत on Sun, 12/23/2012 - 14:56

Permalink

मझ्याकडुन...

१. जीवनगाणे गातच जावे...झाले गेले विसरुन जावे...पुढे पुढे चालावे..जीवनगाणे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 12/23/2012 - 15:00

In reply to मझ्याकडुन... by दिपक.कुवेत

Permalink

असं कसं

अर्रर्र, माझा प्रतिसाद चुकला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sun, 12/23/2012 - 15:27

In reply to असं कसं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

डॉ.साहेब ग वरुन ना हो,

डॉ.साहेब ग वरुन ना हो, गुमनाम है कोइ बदनाम है कोइ किसको खबर कौन है वो बदनाम है कोइ एक सांगाच मला तुम्ही स्वतचा प्रतीसाद संपादीत करु शकता का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 12/23/2012 - 18:42

In reply to डॉ.साहेब ग वरुन ना हो, by श्री गावसेना प्रमुख

Permalink

संपादकांना खूप कै करता येतं.

>> एक सांगाच मला तुम्ही स्वतचा प्रतीसाद संपादीत करु शकता का ? हो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sun, 12/23/2012 - 19:00

In reply to संपादकांना खूप कै करता येतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

धन्यवाद माहीती दिल्या बद्दल्

धन्यवाद माहीती दिल्या बद्दल्,फक्त अजुन काही क्वेरी एकुण किती संपादक आहेत हो,आणी संपादक काय नाही करु शकत जे निलकांत करु शकतात, Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Mon, 12/24/2012 - 01:24

In reply to मझ्याकडुन... by दिपक.कुवेत

Permalink

झाले गेले विसरुन जावे...पुढे

झाले गेले विसरुन जावे...पुढे पुढे चालावे..जीवनगाणे
झाले गेले विसरुन जावे... रोज नवे कै च्या कै धागे काढावे... =))
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Sun, 12/23/2012 - 14:57

Permalink

अजुन एक....

दोन घडिचा डाव...याला जीवन एसे नाव..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 12/23/2012 - 14:58

Permalink

ठीक आहे.

ग गपासून.....अ....हं... गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आन http://www.misalpav.com/node/31 इथंही मिसळपाववर अंताक्षरी दिसते आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 12/23/2012 - 14:58

Permalink

बॉर्र!

दिवसामाजी काहीतरीच ते लिहित जावे... प्रतिसाद आवडला नाही तर लक्ष देऊ नका. ज्यांना आवडला नाही त्यांना तसे लिहून देत.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 12/23/2012 - 15:23

In reply to बॉर्र! by परिकथेतील राजकुमार

Permalink

अरे!

अरे, २०१३ च्या नव्या डायर्‍या आल्या नाहीत काय अजून?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Sun, 12/23/2012 - 15:40

In reply to बॉर्र! by परिकथेतील राजकुमार

Permalink

खरं सांग हा तुझाच नवा आयडी

खरं सांग हा तुझाच नवा आयडी आहे ना? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sun, 12/23/2012 - 15:13

Permalink

येउ देत भेन्ड्या ,,मिसळपाव

येउ देत भेन्ड्या ,,मिसळपाव जहां जहां जायेगा,मेरा नाम उपरही रहेगा, @निता ताई इतक छान छान कसे काय सुचत हो, Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by neeta on Sun, 12/23/2012 - 15:17

Permalink

जीवन गगन मी पाखरु

जीवन गगन मी पाखरु
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 12/23/2012 - 17:09

Permalink

माझे जीवन गाणे

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे ! व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमीर असू दे वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे ! कधी ऐकतो गीत झर्‍यातुन वंशवनाच्या कधी मनातुन कधि वार्‍यांतुन, कधि तार्‍यांतुन झुळझुळतात तराणे ! गा विहगांनो माझ्यासंगे सुरांवरी हा जीव तरंगे तुमच्यापरी माझ्याहि स्वरांतुन उसळे प्रेम दिवाणे !
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 12/23/2012 - 17:10

Permalink

कुन्या गावाचं अलं पाखरु?!

कुन्या गावाचं अलं पाखरु?! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 12/23/2012 - 17:25

Permalink

जीवनात ही घडी अशीच राहु दे

जीवनात ही घडी अशीच राहु दे प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे रंगविले मी मनात चित्र देखणे आवडले वेडीला स्वप्‍न खेळणे स्वप्‍नातिल चांदवा जीवास लाभु दे हळुच तुला बघण्याचा छंद आगळा लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा स्पर्षातुन अंग अंग धुंद होऊ दे पाहु दे असेच तुला नित्य हासता जाउ दे असाच काळ शब्द झेलता मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे
  • Log in or register to post comments

Submitted by समयांत on Sun, 12/23/2012 - 17:29

Permalink

नॉट ऍट होम.

नॉट ऍट होम. आता प्रतिसाद तर दिला आहे म्हणजे धागा आवडलाय कसातरी, पण 'गाण्या'त नो आवड. मराठी गाणी अपवाद मात्र ; )
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 12/23/2012 - 17:44

Permalink

काही आगामी गाणी

एक आगामी गाणे: मुखडा: तो: माझं जीवन..हुं.हुं हुं.. ती: तुझं जीवन लरलला.. दोघे: अ‍ॅडजस्ट एव्हरिथिंग..लाइट, साउंड..एव्हरिथिंग... तो: तुझं जीवन लरलला... ती: माझं जीवन हुं.हुं हुं.. दोघे: करेक्ट लायटिंग, मोर र्हिदम.. फास्ट... येस.. ओके वन टू स्टार्ट... अंतरा: तो: टा रा रा रा...टा रा रा रा ती: ल ल ल ला...ल ल ल ला... तो: दोघे मिळुनि आपले जीवन ती: जगुया जगुया जगुया .... (आवाज हळळूळू विरत जाऊन पार्श्वसंगीत गहिरे होत जाते) तो: जगता जगता जगता .... (आवाज हळळूळू विरत जाऊन पार्श्वसंगीत गहिरे होत जाते) दोघे: मरुया मरुया मरुया.... ती: आय्याम डेड..डेड.. डेड.. तो: यूआर डेड..डेड.. डेड .... संगीतः जोरात र्‍हदयाचे ठोके ऐकू येतात, आणि हळुहळु मंद होत जातात... ऑर्केस्ट्राचा गदारोळ : ढिंग टकाक..टिंग धडाक...टट्टर टट्टा.. टट्टर टट्टा.. पप्पर पप्पा..पप्पर पप्पा.. पीपी पीपी...धडाक धूम तडाक धूम... आणखी बरीच आगामी गाणी आहेत, सध्या एकच देत आहे. याचे रेकॉर्डिंग अद्याप व्हायचे असून या गाण्याने 'कोलावेरी' चे विक्रम मोडावेत, यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखली जात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 12/23/2012 - 18:57

In reply to काही आगामी गाणी by चित्रगुप्त

Permalink

हसून पुरेवाट झाली की हो. देवा

हसून पुरेवाट झाली की हो. देवा, मेले मेले!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 12/26/2012 - 21:01

In reply to हसून पुरेवाट झाली की हो. देवा by रेवती

Permalink

+१

खी खी...काय ते दिव्य म्युझिक ! हसून मेले..
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Sun, 12/23/2012 - 18:21

Permalink

हा घ्या समग्र संग्रह. http:/

हा घ्या समग्र संग्रह. http://www.aathavanitli-gani.com/Anukramanika कशाला डोक्याला अन बोटांना त्रास? (मुलखाचा आळशी) अन्या
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Sat, 02/02/2013 - 21:10

In reply to हा घ्या समग्र संग्रह. http:/ by अन्या दातार

Permalink

खरोखर निव्वळ आहे हा संग्रह!

निव्वळ म्हणजे एकदम निव्वळच. पण माझ्या आवडिचं साजणी मैत्रिणी ग हरणी उन्हात चांदण पडलं गं... शोधायला मद करणार काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 12/24/2012 - 11:58

Permalink

सर्व संबंधितांना पुन्हा एकदा

सर्व संबंधितांना पुन्हा एकदा नम्र व प्रामाणिक विनंती, मिसळपावचं ऑर्कुट किंवा फेसबुक करु नये. मा संपादक मंडळ अशा धाग्यांबद्दल काही कार्यवाही करु शकेल काय.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Mon, 12/24/2012 - 23:09

In reply to सर्व संबंधितांना पुन्हा एकदा by ५० फक्त

Permalink

पन्नासशी अगदी सहमत .

पन्नासशी अगदी सहमत .
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Mon, 12/24/2012 - 16:07

Permalink

एक धागा

एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे.... हे गाणं आजकाल फार फार सुचतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Mon, 12/24/2012 - 23:06

In reply to एक धागा by स्मिता.

Permalink

+++++११११११

:-) एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे.... लय भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 12/24/2012 - 21:47

Permalink

छ्या.

काल पासून जीवनावर काही गाणं आठवेना. :( जीवनाची ही घडीच आठवतंय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 12/26/2012 - 20:24

Permalink

अरे बापरे. बिरुटे सर. नुसत्या

अरे बापरे. बिरुटे सर. नुसत्या घड्या घालत बसला आहात कालपासून.
  • Log in or register to post comments

Submitted by neeta on गुरुवार, 12/27/2012 - 09:40

Permalink

गाणी कमी येत आहेत. वायफळ

गाणी कमी येत आहेत. वायफळ वाक्यच जास्त दिसत आहेत.स्मरण शक्तीला चालना द्या की जरा.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 12/27/2012 - 16:37

In reply to गाणी कमी येत आहेत. वायफळ by neeta

Permalink

काऽऽऽय वो हे ?? हे बघाऽऽऽ की

काऽऽऽय वो हे ?? हे बघाऽऽऽ की जरा म्हणतो मी !! तुमचं स्मरणशक्ती सुन्नं होतंय येवडी गाणी हायत की वो.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 12/27/2012 - 16:53

Permalink

छान धागा...

छान धागा... असे अनेक धागे रोज मिपावर यावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 12/27/2012 - 17:07

Permalink

आकाशी झोप घे रे पाखरा...

आकाशी झोप घे रे पाखरा... चांदण्यात घोरताना माझा धरलास हात... छोडो ना मेरी जुल्फ़े, सब लोग क्या कहेंगे...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीनिवास टिळक on Sun, 01/27/2013 - 07:13

Permalink

मराठी गाणी

८२ साली मुंबईला हिंदमाता सिनेमात एक मराठी चित्रपट बघितला. नाव आता आठवत नाही पण त्यातील एक गाणे मला फारच आवडले होते आणि अजून काही ते डोक्यातून जात नाहीये. त्याची एक ओळ अशी होती "भावफुलांची बाग इथे बघ कशी फुलली..." मिसळपावाच्या सूज्ञ सभासदांपैकी कोणाला हे गाणे आणि चित्रपट माहित असतील तर कृपया कळवावे. मी आपला सदैव ऋणी राहीन.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Sun, 01/27/2013 - 08:20

In reply to मराठी गाणी by श्रीनिवास टिळक

Permalink

चित्रपट : दैवत

चित्रपट : दैवत गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर. इथे ऐकु शकाल http://m.dhingana.com/marathi/daivat-songs-31973d1 इथे विकत घेउ शकाल. http://www.flipkart.com/bhaav-phulanchi-baag-sakhaye/p/itmd5bgz5wyhdvkm
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीनिवास टिळक on Mon, 01/28/2013 - 07:11

In reply to चित्रपट : दैवत by आनन्दिता

Permalink

मराठी गाणी

धन्यवाद. इतक्या लवकर माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल याची कल्पना नव्हती. पण माझे नशीब थोर म्हणून मिसळपावच्या माध्यमातून आपण मला शांती मिळवून दिलीत. पुनःश्च आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Mon, 01/28/2013 - 09:15

In reply to मराठी गाणी by श्रीनिवास टिळक

Permalink

मेन्शन नॉट !!!

मेन्शन नॉट !!!
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Sun, 01/27/2013 - 11:15

Permalink

बोरकरांची कविता

जीवन त्यांना कळले हो मीपण ज्यांचे , पक्‍व फळापरी सहजपणाने गळले हो ( मि पा त्यांना कळले हो , धागे ज्यांचे सहजपणाने उडले हो...)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 01/28/2013 - 12:07

In reply to बोरकरांची कविता by तर्री

Permalink

थोडी सुधारणा...

मिपा त्यांना कळले हो धागे ज्यांचे, पंख लागूनि प्रतिसादासह उडले हो !!
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Mon, 01/28/2013 - 13:11

In reply to थोडी सुधारणा... by सूड

Permalink

सही ....

मला असेच काहीतरी म्हणायचे होते.....पण ती प्रतिभा की कोण ती रुसली होती. भावना पुढे ढकलल्या बददल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिया on Mon, 01/28/2013 - 10:17

Permalink

हे जीवन सुंदर आहे ! (चित्रपट

हे जीवन सुंदर आहे ! (चित्रपट : चौकट राजा) नितळ निळाई आकाशाची अन् क्षितिजाची लाली दवांत भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी कोठेही जा अवतीभवती निसर्ग एकच आहे हे जीवन सुंदर आहे ! पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबील पक्षांची झूळझुळ पाणी वेळूमधुनी खुळी शीळ वार्‍याची इथेतिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे हे जीवन सुंदर आहे ! गायक: आशा भोसले, रवींद्र साठे, अंजली मराठे
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 01/28/2013 - 14:58

Permalink

"देव भाकरीशिवाय कशाकशातही

"देव भाकरीशिवाय कशाकशातही नाही" एवढी एकच ओळ एका दूरदर्शनच्या कार्यक्रमात एका भजन / कीर्तन करणार्‍याने गायलेल्या गाण्यातली आठवते आहे. एकदाच ऐकल्याने इतर तपशील लक्षात नाहीत पण चाल इतकी उत्तम लावलेली होती की ते व्यक्तिगत त्या गायकाचं बनवलेलं गाणं नसणार. पूर्ण गाणं, टायटल असं काहीही कळलं तरी बाकी शोध घेता येईल. पण जालावर अजिबात सापडलं नाही. :( कोणी देईल का माहिती?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीनिवास टिळक on Tue, 01/29/2013 - 08:11

Permalink

कलंक शोभा

७२ साली प्राध्यापक ना सी फडके यांच्या कादंबरीवर आधारित कलंक शोभा हा चित्रपट बघितला होता. त्यातील खालील एक गाणे मी अजूनही नेहमी ऐकतो कारण शब्द आणि चाल दोन्ही अत्यंत मधुर आणि भावपूर्ण आहेत. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे ! भाव अंतरी उमलत होते परि मनोगत मुकेच होते शब्दांतुन साकार जाहले, तुझ्यामुळे ! परोपरीचे रंग जमविले स्तब्धच होते करी कुंचले रंगांतुन त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे ! करात माझ्या होती वीणा आली नव्हती जाग सुरांना तारांतुन झंकार उमटले, तुझ्यामुळे ! हृदयमंदिरी होती मूर्ती तिमिर परंतु होता भवती आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे !
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on Fri, 02/01/2013 - 08:56

Permalink

मराठी गाणं आता आठव ना झालय,

मराठी गाणं आता आठव ना झालय, माफ करा पण लाई आवडणार हिंदी गाणं सांगतो यॅ यॅ यॅ यॅ........... ओह यॅ यॅ यॅ यॅ........... जीवन मे जाने जाना एक बार है होता प्यार - 4 वन्स यू फॉल इन लव इन लाइफ, वन्स यू फॉल इन लव - (2) आ आ आ आ......... रे पा पा रे पा पा पा...................
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Sat, 02/02/2013 - 21:03

Permalink

मराठी ...? वाइट नाही...

पण बहुतांश गाणी फ्रिक्वेंट रिपीट व्हॅल्यो नसलेलीच असल्याने जी खरच छान व फ्रिक्वेंट रिपीट व्हॅल्यो असलेलि अगदी मराठ्मोळी साँग्ज आहेत ना त्यावर फारच लोड येतो व गुड असुनही चटकन बोर मारतात म्हणून आपला पास..... हे तुमी नक्कि ऐका पण!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com