Skip to main content

दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरण आणि स्त्री सुरक्षितता उपाय

लेखक sanjivanik१ यांनी बुधवार, 19/12/2012 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील ...........(शिव्या समजून घ्याव्यात)ना फाशी पण कमीच शिक्षा आहे. एखाद्या मुस्लिम देशा मधील सर्वात भयंकर शिक्षा द्यायला हवी. सरकारने तर लाज सोडलीच आहे . फक्त भाषणा मधून दुख व्यक्त करण्या पेक्षा कृती करावी . अर्थात ती कृती करायला आणखी किती वर्ष घेतील देवास ठाऊक. तो पर्यंत त्या मुलीला आणि कुटुंबियांना किती त्रास होईल त्याची कल्पना न केलेली बरी. मुंबईत बायका इतक्या तरी असुरक्षित नाही हे मात्र खर पण एकदम सुरक्षित आहेत अस पण नाही. तर समस्त स्त्रीवर्गाला विनंती कि ह्या परिस्थितीला तोंड द्यायला हत्यार पर्स मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. तेव्हाच आपण सुरक्षित राहण्याची आणि नराधमाना वाचक बसण्याची शक्यता जास्त... स्व सुरक्षितता आणि स्व रक्षणा साठी वेगवेगळ्या वयो गटातील स्त्री वर्ग काय करू शकतो ? किंवा केल आहे? त्याचे अनुभव ,हे जरूर इथे कळवा .

वाचने 38852
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

तर्रीबाज . म्हणजे तुमच म्हणण असं आहे कि जे काय करायचे ते सगळ बायकांनिच कराव . आम्ही पुरुष काही सुधारणार नाही. आम्हा बायकांना बघून तुम्ही लोक कधीच तुमच्या मनाला आवर घालणार नाही ते कायमच विचालीतच होत राहणार . पण त्याच वेळी असा का विचार करणार नाही कि हि पण कुणाची तरी बहिण, बायको , आई , मुलगी आहे .तुम्हा पुरूषांना का कुणी बंधन नाही घालायची . किंवा तुम्ही स्वत:च स्वत:ला का नाही बंधनं घालणार????

In reply to by नेहरिन

नेहरीन ताई, म्या समोर दिसंल त्यो सोपा उपाय सुचवला. आमच्या गावाकडं बाया मान्सं झाड्याला जाताना, धुनं धुवायला, पानी भरायला आनि बाजाराला बी जाताना कुना तरी बाईमानसाची संगत बगून जात्यात. दोन तीन बाया समोर बगितल्यावर कुनी आगावपना करायची हिंमत करत न्हाई. त्यातून यकांदा जादाच कराया लागला तर साक्षीला त्या बरुबरच्या बायका आसत्यातच. त्या गावभर वरडा करत्यात आनि टवाळखोर नेमकं त्यालाच भेत्यात. तुमी समद्या बायका अल्याड, आन सम्दी पुरुषं पल्याड आसं समजून कायबाय लिवलं हायसा. आमी आडानी मान्सं. आमाला काय आसं वकिलावानी प्वाईंटाच बोलता येत न्हाई. पन आमा गावाकडल्या लोकांचं जुनं आडाखंच येळेला कामाला येत्यात. म्हंजी आसं बगा. यकांद कुत्रं पिसाळलं हाय आसं समजल्यावर आमच्याकडची लोकं समद्या कुत्र्यांना सुधारन्याच्या मागं जात न्हाईत.

In reply to by नेहरिन

अगदी हेच.. पण जिथं स्त्रियाच स्त्रियांना जपून राहण्याचे सल्ले देतात, तेव्हा अगदी उबग येतो. जिथं एकटा नवरा/मित्र सात जणांपुढे काही करू शकत नाही, तिथं अशा अचानक आलेल्या संकटात त्या बाईला खिसा(असेल तर्)/पर्समधून चाकू/मिरचीपूड पटकन बाहेर काढून त्याचा उपयोग करता येईल का नाही याची शंका वाटते.

बलात्कारासारख्या घटनांना कायद्याच्या धाकाने रोखणे म्हणजे भूक लागली असता वैद्यकीय इलाज करणे झाले. हा व्यक्तीगत-कौटुंबीक-सामाजीक प्रश्न आहे... कायद्याची वाट न बघता समाजाने यावर उपाय शोधला तरच काहि संभावना. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

मी तर पुढे जाउन अस सुचवेन की अ‍ॅपल कापता येण्याजोगा एक चाकू कायम प्रत्येकीने जवळ बाळगावा अन त्या चाकूला पर्समध्ये न ठेवता हातात घेउन फिराव. फार अंगचटीला येताना कुणी दिसल तर सऱळ खालच्या बाजुला फिरवायचा. एक नराधम निदान 'त्या' भागाच्या उपयोगातून निकामी होइल.

In reply to by स्पंदना

नीट विचार करा अपर्णाताई. अंगचटीला कुणी आले तर थेट सुरीहल्ला?? पायात काटा गेला तर तो सुईने काढायचा की तलवारीने ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

काट्यान काटा काढण शक्य नाही. आमचा समाज अश्यावेळी आमची मदत करत नाही. कायदा जमतील तेव्हढ्या पळवाटा काढु देतो. करायच काय? आमच्या मुलींनी जगायच कस अश्या समाजात. किती घाण झालीय पहाताय ना विमे? अश्या अघोरी उपायांनीच आळा बसेल. एखाद दुसरा तुमच्या सारखा मदत करायला पुढे आला तरी त्याची वाट लावुन टाकतात ही लोक. एकदा भिती बसली तर कमी होतील प्रकार हे. पण या निमित्त्यान मला आणखी एक गोष्ट बोलायची आहे. ही पोर अशी चेकाळुन का फिरतात? का वाटत यांना अस वागावस? उत्तर जात आपल्या सन्माननिय दिलखेच आयटम साँग कडे. आता ही सॉग्ज सादर करणार्‍या बायका जर स्वतःला समाजा पुढे निव्वळ भोग वस्तु म्हणुन सादर करत असतील तर ते पाहुन चेकाळलेले लोक बाहेर पडल्यावर अशी शिकार शोधतच हिंडणार. कुठेतरी थाम्बायला हव हे सगळ. माझा उपाय काही इतका ठिक नाही आहे, पन मग जर कायद्याचा बडगा असता तर हे घडल नसत. पाण्यात बुडताना हातपाय झाडले म्हणुन तुम्ही बुडणार्‍याला दोषी धरु शकत नाही. नेपाळचच उदाहरण घ्या. पिडीत महिलेची मानसिक अवस्था जाणुन तिला वा तिच्या रक्ताच्या आप्तांना २४ तासाच्या आत गुन्हेगाराच्या हत्येची मोकळीक आहे तिथे. काय अर्थ याचा? इतकाच की तेथे स्त्रीच्या अपमानाला अपमान समजल जात. त्याचा बदला घेण्याची कायद्याने तरतूद आहे. अन आपल्या वागण्याचा परिणाम आपल्या मृत्युत होउ शकतो याची गुन्हेगाराला भिती आहे. काय आहे आपलया कायद्यात अस काही की ज्याची भिती अश्या मस्तवाल जनावरांना वाटेल? मग निदान अशी तरी भिती वाटु दे. हातात चाकु घेउन चालतेय त्या अर्थी तिच्या जवळपास नको जायला. हा आता स्त्रीया याचा गैरफायदा घेणार नाहीत याची मला हमी नाही पन निदान काहीतरी जनसामान्यांच्या हातात असेल. निदान एखादा तरी स्वतःच रक्त पाहुन पुन्हा धजावायचा नाही?

In reply to by स्पंदना

कायदा भावनेने बनत किंवा चालत नाही. भावनेने बनवता किंवा चालवता येत नाही. त्याची दुसरी बाजू, नव्हे सर्व बाजू कायदा ठरवताना पहाव्या लागतात. लाखात एका केसमधे का होईना, पण त्याचा उलट दिशेने होऊ शकणारा उपयोग विचारात घ्यावा लागतो. -पीडिताच्या इच्छेने गुन्हेगाराला शिक्षा देणं योग्य असं ठरवलं तर अपरिहार्यपणे अशा सिस्टीममधे गुन्हेगारालाही (आणि अनुषंगाने कोणालाही) त्याच्या त्याच्या इच्छेने काहीही करण्याची मोकळीक आपोआप मिळते. कारण मग ती लढाई व्यवस्था विरुद्ध गुन्हेगार असं न राहता व्यक्ती विरुद्ध व्यक्ती अशी होते. शिक्षेमधे स्टँडर्डायझेशन येत नाही. एकाच गुन्ह्याला एका अ‍ॅग्रेसिव्ह व्यक्तिमत्वाच्या पीडिताच्या इच्छेने दगडांनी ठेचून हत्या, आणि दुसर्‍या गुन्हेगाराला (मवाळ व्यक्तीवर बलात्कार केल्याने?!) तिच्या इच्छेनुसार फक्त पाच वर्षे कैद असा फरक पडतो. कोणती स्त्री बलात्कार झाल्यावर योग्य शिक्षा ठरवण्याच्या रास्त मनस्थितीत असते? नातेवाईकांना इथे शिक्षा ठरवण्यामधे काय जागा आहे? बलात्कार = फाशी / मरण असं ठरवून टाकलं की बलात्कार होत असलेली स्त्री जिवंत सुटण्याची शक्यता शून्यवत होणार. बलात्कार = स्त्रीच्या जबानीवर एकतर्फी निकाल असं म्हटलं की अशा कायद्याचे एरवी होत नसलेले दुरुपयोग वाढणार. बलात्कार = नपुंसक बनवण्याची शस्त्रक्रिया आणि बाकी मोकळीक (तुरुंग नाही) असं केलं की त्या स्त्रीवर सूड उगवायला मोकळं रान. पुरुषाबाबत नपुंसकत्व, विशेषतः शिक्षा म्हणून केलेलं, हा आजरोजीच्या सामाजिक मानसिकतेत अगदी स्त्रीच्या बलात्काराइतकाच मानसिक खच्चीकरणाचा विषय ठरेल. शिक्षा म्हणून ती अगदी चपखल दिसली तरी तो पुरुष अशावेळी जणू "सर्वहारा" अशा भूमिकेतून फक्त सूड घेणं या एकाच उद्देशाने जगत राहण्याची शक्यता बरीच आहे. तेव्हा तुरुंगवासाऐवजी अशी शिक्षा ठेवणं योग्य ठरत नाही. प्रत्येक बलात्कारित स्त्रीला बलात्कार करणार्‍या पुरुषाच्या नपुंसकीकरणानंतर लाईफलाँग पोलीस प्रोटेक्शन देणं शक्य नाही. बलात्काराला काय शिक्षा असावी या विषयावर योग्य मत देणं मला शक्य नाही, पण कायदा आणि सुव्यवस्था असं आपण ज्याला म्हणतो ती अशा विचारसरणीने निर्माण करता किंवा चालवता येत नाही ही बाजू दाखवण्याचा थोडा प्रयत्न केला.

In reply to by गवि

लाखात एका केसमधे का होईना, पण त्याचा उलट दिशेने होऊ शकणारा उपयोग विचारात घ्यावा लागतो.
एक जनरल कायदा म्हणून नाही पण अशा घटणावर जरब बसवण्यासाठी त्यातल्या कलमांना थोडसं वाकवून काही 'एक्सेंप्लरी पनिशमेंट' देण्यास हरकत नसावी. कारण रोज घडणार्‍या घटणां रोखण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसेल, सामाजिक वातावरण नसेल तर शिक्षेची भितीच गुन्हेगारांना रोखू शकते. एकूण बलात्कारापैकी पोलिसात दाखल होणार्‍या केसेस बघितल्या तर उगाच हजारो शक्यता ध्यानात घेउन केलेला गुळमुळीत कायदा काय कामाचा? दिल्लीतली घटणा आणि लोक भावनेचा आदर करून सातही गुन्हेगारांना फाशी द्यायला हवी.

In reply to by दादा कोंडके

(सुदैवाने) आपल्या न्यायव्यवस्थेत निकाल हे लोकभावनेचा आदर वगैरे करून लागत नाही. सदर घटनेत त्या सात जणांपैकी जे दोषी सिद्ध होतील त्यांना योग्य ती शिक्षा न्यायालय देईलच

In reply to by ऋषिकेश

थोडक्यात योग्य बोललात ऋ. गुन्ह्याला शिक्षा गुन्हा घडण्याआधी ठरलेली असावी. गुन्ह्याच्या व्हेरिएशनप्रमाणे शिक्षेची किमान आणि कमाल मर्यादा आणि पद्धत गुन्हा घडण्याआधी ठरलेली असावी. फक्त सिद्धता आणि अंमलबजावणी बाकी असावी. अशा सिस्टीमला चांगली कायदेपद्धत म्हणता येईल. गुन्हा घडल्यावर मग मुळत शिक्षा ठरवण्याची प्रक्रिया ही पद्धत म्हणजे चांगली पद्धत असं म्हणता येणं शक्य नाही.

In reply to by गवि

मला वाटलं, या प्रकाराने एकुणच देशाच्या इतर भागात स्त्रियां किती सुरक्षित असतील याची जाणीव होते. या दिवसात पेपरभर विनयभंग, बलात्कार आणि अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. हे अचानकच घडलं नाहीये. या दिल्लीच्या घटणेनं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे इतकच. हे सर्व थांबायचं असेल तर दिर्घकालीन सामाजिक उपचारांची गरज आहे हे मान्य पण आत्ता या घडीला माझ्या आया-बहिणींना आणि मुलींना थोडं सुरक्षीत वातावरण देण्यासाठी आपण काय करू शकतो? याचा विचार करून थोडसं भावूक होउन प्रतिसाद दिला मी. पण माझे डोळे उघडले तुम्ही. तो बलात्कार अगदी भारताच्या राजधानीत चालत्या पब्लीक ट्रान्सपोर्ट बसमध्ये झाला म्हणून काय झालं? हां, आता तिनं कोऑपरेट केलं नसल्यामुळं तदनुषंगाने थोडीफार मारहाण झाली, आणि सात जणांनी एका पाठोपाठ बलात्कार केले म्हणून थोडीशी अवस्था वाईट आहे इतकच. त्यामुळे तुमच्या आदर्शवादी कायद्याच्या दृष्टीने प्रत्येकाला एका बलात्काराबद्दल जी काय थोडी-फार शिक्षा आहे ती जमली तर द्या.

In reply to by दादा कोंडके

.

In reply to by दादा कोंडके

दिल्लीमध्ये कोणत्याही राजकीय झेंड्याशिवाय उत्स्फुर्तपणे जमलेल्या लोकांच्यात आणि पोलिसांच्यात झटापट झाली. काही फोटो इसकाळवर आहेत. त्यातलाच हा, आपल्या छोटुकलीला कडेवर घेउन आलेले आईवडील पोलिसांशी भांडण करतानाचा फोटो बघून वाईट वाटल. :( foto

In reply to by दादा कोंडके

मी फक्त भावनातिरेकाने कायदे बनवता येत नाहीत हे म्हणतोय. अन्य वाक्यरचना करायची तर असं म्हणून पाहतो की: वर सुचवलेल्या अनेक शिक्षा / कारवाया या अन्याय पाहून संतापलेल्या आपल्यासारख्या सामान्याच्या दृष्टीने किंवा प्रत्यक्ष अत्याचारपीडित व्यक्तीच्या दृष्टीने अगदी तडफड कमी करणार्‍या, योग्य अशा वाटतील. पण एका मोठ्या समाजासाठी कायदा बनवणार्‍याला आणि त्या कायद्याचा वापर करुन निकाल देणार्‍यांना त्या त्या जागी , त्या त्या सिच्युएशनल रोलमधे बसून अशा विचारांनी काम करता येत नाही, तसं केलं तर एकूण प्रक्रियेसाठी ते चांगलं नाही. बलात्कार्‍याला फाशी किंवा अमुक इतकी शिक्षा देऊच नये अशी भूमिका मी मांडत नाहीये, किंवा त्या बलात्कार्‍याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करावा अशी एकतर्फी किंवा भंपक मागणी मी करत नाहीये. नपुंसकत्वाची शिक्षा देण्यालाही विरोध नाही, फक्त त्यासाठी कायदा बनवणारी ऑथॉरिटी काय विचार करेल ते मी मांडतोय. जे आहे ते स्टँडर्ड असावं. "उलटा टांगून मिरच्यांची धुरी द्या, पासून त्याचे लिंग भर चौकात छाटा" पर्यंत रेंज असलेली क्षोभजन्य लोकभावना कायद्याच्या कामाची नाही. प्रमाण कायदा असेल तरच व्यवस्था नीट चालते. बाकी हे "हुच्चभ्रू" वाटत असेल तर तो तुमचा पर्स्पेक्टिव्ह. उच्चभ्रू किंवा फॉर दॅट मॅटर नीचभ्रू समजले जाण्यामुळे मनात असलेला प्रतिसाद बदलून उपयोग नसतोच..

In reply to by गवि

कोणती स्त्री बलात्कार झाल्यावर योग्य शिक्षा ठरवण्याच्या रास्त मनस्थितीत असते? नातेवाईकांना इथे शिक्षा ठरवण्यामधे काय जागा आहे?
ज्याने बलात्कार केलाय त्याची मन:स्थीती कशी आहे आणि होती याची तपासणी करायची सोडुन पिडीत, जीच्या शरीराचा असा पाशवी वापर केला गेला, जे तिच्या मनःपटलावरुन कधीही पुसल जाणार नाही. एक जळजळती जखम, जीच वर्णन तुमच्या कोणत्याही अलंकारिक भाषेत होउ शकणार नाही तीची मनःस्थीती तुम्ही तपासताय? अन आता नातेवाईक्...तुमच्या जन्माचा आनंद ज्यांना, जे तुम्हाला जन्म देतात, तुमचे सहोदर असतात, तुमचे पालक असतात, त्याम्ना तुमच्या दु:खाचा अधिकार नाही? तिच्या त्या अवस्थेत जर ती हलु शकत नसेल तर तिच्यावतीने तिच्या भावाने, नवर्‍याने, आईने वा बहिणीने तिला या बाबतीत सहाय्य करु नये? मी तर नुसती एक बाई म्हणुन मदत करेन तिला सुड ..हो सुडच्...घ्यायला. या असल्या गोष्टींचा सुडच घ्यायचा अस्तो. मरणापेक्षा वाईट अवस्था असते ही. निदान नेपाळच्या कायद्यात मला स्त्री बद्दल आदर अन सहानुभुती दिसते जी आपल्या कायद्यात नाही दिसत आहे. पुळचट कायदा. अन म्हणुनच अश्यावेळी स्त्रीयांनी असल्या पराकोटीच्या पाशवीपणाच्या विरोधात पराकोटीचे उपाय योजले पाहिजेत.

In reply to by स्पंदना

रास्त मनःस्थितीत नसते याचा अर्थ हाच की पीडीत हाच स्वतः न्यायकर्ता अन न्यायाधीश होऊ शकत नाही. यात ज्याने बलात्कार केला त्याची मानसिकता न तपासता बळीची मानसिकता तपासतो आहे किंवा नातेवाईक आपल्याशी कसे घनिष्ठपणे अ‍ॅटॅच असतात याचा काहीच संबंध नाही. सब्जेक्टिव्ह कृतींना न्याय म्हणता येत नाही. त्याने किती लवकर अराजक येऊ शकतं त्याची कल्पना करणं वाटतं तितकं कठीण नव्हे. आज जे चालू आहे ते अराजक आहे असंही कोणी म्हणेल, पण तसं नाहीये, नीट पाहिलं तर. कायदा कितीही कडक करण्याविषयी काही आक्षेप नाही. पण बळी किंवा नातेवाईकांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असण्यात कोणतीही व्यवस्था नाही.

In reply to by गवि

सब्जेक्टिव्ह कृतींना न्याय म्हणता येत नाही. त्याने किती लवकर अराजक येऊ शकतं त्याची कल्पना करणं वाटतं तितकं कठीण नव्हे. आज जे चालू आहे ते अराजक आहे असंही कोणी म्हणेल, पण तसं नाहीये, नीट पाहिलं तर. कायदा कितीही कडक करण्याविषयी काही आक्षेप नाही. पण बळी किंवा नातेवाईकांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असण्यात कोणतीही व्यवस्था नाही.
एग्झॅक्टलि गवि.........भावनेच्या भरात अराजकाला प्रोत्साहन देण्याचाच प्रकार आहे हा. प्रत्येक गोष्टीचा विचार पर्सनल अँगलने केला की अशा इरॅशनल प्रतिक्रिया येतात-जे वैयक्तिकरीत्या बरोबर, पण समाजाच्या दृष्टीने अतिशय चूक असते.

In reply to by बॅटमॅन

आज जे चालू आहे ते अराजक आहे असंही कोणी म्हणेल, पण तसं नाहीये, नीट पाहिलं तर. गवि अराजकता म्हणजे नक्की काय ते तुम्ही जरा स्पष्ट करुन सांगाल का ? कायद्याचा धाक लोकांत नसेल तर ते अराजकतेचे पहिले लक्षण आहे, असे तुम्हाला वाटते का ? देशभर सतत बलात्कार होत असुन ( जवळ जवळ रोजच) त्यांची संख्या वाढतांनाच दिसते,असे असताना या देशात अराजकता नाही असे तुम्हाला का वाटते ? फक्त्त दिलीत दर वर्षी ४५०-५०० बलात्कारांच्या गुन्हयांची नोंद होते (नोंद न-होणारे गुन्हे वेगळे असावेत.) मग जर देशाची राजधानीच स्त्रीयांसाठी सुरक्षित नसेल तर देशाच्या इतर भागाची स्थिती काय असावी ? असे असताना देशात अराजकता नाही असे तुम्हाला का वाटावे ? याच देशाच्या स्त्री राष्ट्रपती स्वतः एक स्त्री असुन बलात्कारी गुन्हा करणार्‍यांची शिक्षा कमी करतात हे उत्तम शासन व्यवस्थेचे लक्षण आहे काय ? फक्त बलात्कारच हा मुद्दा नसुन,देशातील लोकांच्या आत्महत्यांचे प्रमाण आणि त्यातही शेतकर्‍यांचे आत्महत्येचे प्रमाण देशात सर्वकाही आलबेल आहे असे दर्शवते का ? इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्या राष्ट्रात होत आहे,ते अराजकतेचे प्रतिक नाही का ? शीला दिक्षीत सारखी "स्त्री" मुख्यंमंत्री, ज्या १९९८ पासुन मुख्यंत्री पदावर आरुढ आहेत... त्या म्हणतात ६०० रु प्रति महिना हे ५ जणांच्या कुटुंबाला पोट भरण्यासाठी पुरेसे आहे. असे विधान करणारी स्त्री मुख्यमंत्री जिच्या राज्यातच सर्वात जास्त बलात्कार होतात ती हे अजब विधान करते, तेव्हा या देशात अराजकता आहे असे का म्हणु नये ? मुंबई हल्ला झाल्या नंतर सागरी सुरक्षता वाढवण्यासाठी घेतलेल्या बोटी भंगारात जातात आणि सीसीटिव्ही कॅमेरे सरकार अजुनही बसवु शकत नाही...अश्या या देशात जिथे प्रत्येक नागरिकाचे व्यक्तिगत आयुष्य /सुरक्षा आजच्या घडीला "राम भरोसे" आहे तिथे अराजकतेसाठी अजुन कोणती अधिक लक्षणे शोधली पाहिजेत ? जाता जाता :--- या धाग्यात अनेकांची मते/विचार वाचतो आहे,समजवुन घेण्याचा प्रयत्न करतो आहे.प्रत्येकाची विचार सरणी ही वेगळी असते आणि त्या क्षणाला एखाद्याचे विचार पटतीलच असे नाही.

In reply to by मदनबाण

जरा या धाग्याच्या संदर्भा पासुन वेगळा असा एक व्हिडीयो इथे देत आहे. अभिनेता परेश रावल यांचे हे विधान इथे देतो आहे कारण दिल्लीत सामान्य जनतेचा सरकार विरोधी आक्रोश सध्या मिडीयाच्या माध्यमातुन सर्वत्र दाखवला जात आहे... याच राजकारण्यां बद्धलचे मत या व्हिडीयोत व्यक्त करण्यात आले आहे, जे मला वाटतं माझे आणि या देशातल्या सर्व सामान्य नागरिकांचे मतच परेश रावल यांनी मांडले आहे. http://youtu.be/ZEpfc7gI6Bc

In reply to by मदनबाण

त्याला राज्यव्यवस्थेतले, प्रशासनातले दोष असं म्हणता येईल. दोषांचं प्रमाण गंभीररित्या वाढतं आहे असं सिद्ध करता येईल. पण हे "अराजक" नव्हे. अराजक म्हणजे मोगादिशू, काहीकाळ इजिप्त, मधल्या काहीकाळात इराक यांमधे जे चालू आहे किंवा होतं ते अराजक. अराजक म्हणजे लोकभावनेवर कायदा चालणं. अराजक म्हणजे एकाच गुन्ह्याला कधीकधी चौकात हात तोडण्याची शिक्षा तर कधीकधी त्याच गुन्ह्याला अफेक्टेड कुटुंबाने पैसे घेऊन माफ केलं तर माफसुद्धा..आणि कधीकधी कोणाकोणाला "वास्ता" असल्याने सोडून देणं. अराजक म्हणजे एकाच शहरात सात वेगवेगळ्या गटांचे सात वेगळ्या युनिफॉर्मचे वेगळे वेगळे पोलीस, आणि प्रत्येकाच्या हाती वेगवेगळ्या ब्रँडची अनधिकृत हत्यारं. आपली व्यवस्था आज जितकी घसरली आहे तितकी का होईना पण टिकवून धरली तरच सुधारणेची शक्यता राहते. हाडांमधे कॅल्शियम कमी आहे म्हणून पेशंटचा आहे तो हाडांचा सापळा उखडून टाकून देत नाही आपण. त्या नाजुक ठिसूळ हाडांच्या साहाय्याने जिवंत राहून आपण योग्य दिशेने उपचार करतो की ज्याने हाडांना बळकटी येईल. सिस्टीमच्या आत राहूनच सिस्टीम सुधारता येते. अ‍ॅबरप्ट , भावनेच्या उद्रेकाने दिलेल्या उत्स्फूर्त शिक्षा, सूडभावनेने कारवाई असं सगळं व्यक्तिगत पातळीवरच चालू शकतं. एक शासन / सरकार असं वागलं तर आपलाही त्वरित सोमालिया होईल. यात कुठेही बलात्कार्‍यांना सौम्य शिक्षा व्हावी असा उद्देश नाही. हे सर्व मुळात लिहीलं ते इथल्या "ठेचा, तुडवा, छाटा" अशा मूडमधल्या प्रतिक्रिया वाचूनच.

आज मटा, सकाळ उघडला तर मुंबईच्या २ मुली अन उत्तरप्रदेशची १ मुलगी यांच्या बातम्या.. मुंबईच्या मुलीतर १०-११ वर्षाच्या अन यु.पी.ची ७ वर्षाची.. शिवाय बारामतीची पण बातमी होती.. अर्रे यार.. काय चाललय काय?

काही गोष्टी मुद्दाम बोलाव्याशा वाटल्या. बलात्कारात संभोगाच्या इच्छेपेक्षाही बलात्कारित व्यक्तीवर अधिकार गाजवण्याची इच्छा बाळगण्याची प्रवॄत्ती जास्त आहे हे समजून घेतले पाहिजे. अधिकार आणि अमर्याद सत्ता गाजवण्याचा विचार आहे. बाईला बलात्कार करून आणि पुरुषांना बेदम मारून सत्ता गाजवता येते. वाटेल तसे वापरून झाल्यावर कचरा म्हणून टाकून देता येते हा विचार आहे. लग्न करावे का नाही, कपडे कोणते घातले किंवा नाही घातले, रात्री बाहेर पडले का दिवसा, हे प्रश्न इतर वेळी योग्य असले तरी अशावेळी उपयोगाचे नाहीत. कायद्याने काही होणार नाही, हा विचार मला योग्य वाटत नाही. कोणत्याही व्यक्तींवर अमर्यादित सत्ता गाजवता येत नाही ; आणि अपराधाला आयुष्यभर पुरून उरेल अशी शिक्षा होते, हे जेव्हा डोक्यात शिरेल तेव्हा असले प्रकार कमी होतील. सध्या होते आहे ते असे की सगळीकडे अशा घटना घडत असूनही, लोकांकडून आणि पोलिसांकडून या गुन्ह्यांची दखल घेतली जात नाही, कायदा प्रत्येक वेळी नीट वापरला जात नाही, पकडले गेले तर होणार्‍या शिक्षा अपराधासाठी पुरेशा नसतात म्हणून अपराध्यांना, किंवा कायद्याचे उल्लंघन करू पाहणार्‍यांना धाक नाही. त्या शिक्षा कडकपणे राबवल्या आणि दीर्घ काळाच्या केल्या तर अपराध करण्याचे प्रमाण कमी व्हावे. संरक्षणासाठी आपल्याबरोबर हत्यार घेऊन फिरावे हा विचार तेवढ्यापुरता सुडाच्या भावनेतून ठीक वाटला तरी योग्य नाही.

ज्या आईच्या पोटातही सुरक्षित नाहीत त्यांना इथे जगात मोठेपणीतरी कसली सुरक्षितता देणार समाज..? कधीकधी निराशा येते. बहुसंख्य सामान्य माणूसच असा आहे का या देशातला किंवा जगातला..? असं वाटून जबरदस्त निराशा येते. हा मुळात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे का असंही वाटतं. मग सातच्या आत घरात किंवा उलट बाजूने नपुंसक करण्याच्या शिक्षा हे सर्व वरवरचं वाटायला लागतं.. कधीकधी असा काही विचार करण्याचंही बळ राहात नाही.

स्त्रीयांनी होताहोईल तितके अधिकाधिक सुरक्षित ठिकाणाचा वापर करावा, असे वाटते. बाकी, कायद्याने अशा आरोपींना कोणत्याही संशयाचा फायदा न मिळता जलद न्यायालयासमोर अशा सर्व आरोपींना कठोर* शिक्षा व्हावी, आणि अशा शिक्षेची आणि शिक्षा कशाची भोगावी लागते याची खूप जाहिरात करायची अशा अपराधाबद्दल समाजात एक दहशत बसली पाहिजे, हाच त्यावर जालीम उपाय आहे. * कठोर शिक्षा : आरोपी मरणार नाही याची काळजी घेऊन अधिक व्होल्टेजच्या  वीजेच्या तारांवर आरोपीला होत असेल तितक्या वेळी लघवी करायला लावणे.
* अंधारकोठडीत उपाशी ठेवणे, पाणी न देणे, ढुंगावर सकाळ संध्याकाळ रट्टे देऊन बर्फाच्या लादीवर झोपायला लावणे इत्यादि. जितके क्रूर शिक्षा देता येईल तितकी द्यावी.



-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेसर्..सिंगापुरच उदाहरण घ्या. एखाद्या स्त्रीला जर कुणी पुरुषाने असा नको त्या अर्थाने हात लावला, तर तिचे म्हणने ग्राह्य धरुन त्या व्यक्तीला ताबडतोब एक वर्षाची सक्त मजुरी अन ढुंगणावर कमीत कमी ५ रत्तान्चे फटके ही शिक्षा आहे. जर संबंधीत व्यक्ती परदेशीय असेल तर एका वर्षाने हाता पासपोर्ट अन टिकीट. परत सिंगापुर मध्ये प्रवेश नाही. जन्मभराकरती. पहा हा कायदा. अन मला खरच दु:ख होतय, पन हा कायदा मला खणखणीत हिंदीत दोघा तिघा आपल्या वंशियाम्नाच साम्गावा लागला. आता वाटतय सरळ कंप्लेन करुन रिकामी व्हायला हव होत. आम्हाला बांधव वाटतात त्या भडव्यांना वाटते का की ही भारतिय दिसतेय? गळ्यात मंगळसुत्र अन कपाळी कुंकु आहे?

In reply to by स्पंदना

कडक कायद्यांच्या बाबतीत होतं काय की कायद्याचा बराच वेळा दुरुपयोग होतो की काय असे वाटायला लागते आणि म्हणून कायद्यात काही पळवाटा आपल्या नजरेस येतात. सिंगापूरमधील कायदे असे असतील तर चांगलीच गोष्ट आहे, निरपराध त्यात अडकणार नाही, अडकत नसेल तेव्हा मला वाटतं हा पर्याय उत्तमच. आपल्याकडं असं म्हटल्या जातं की एक आरोपी निर्दोष सुटला तरी चालेल परंतु निर्दोष माणसाला शिक्षा होऊ नये. आणि त्यामुळेच आपल्याकडे कायदेशीर कार्यवाही आणि शिक्षेच्या बाबतीत तो कठोरपणा नाही, असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

सुरक्षिततेचे उपाय योजण्यासाठी बलात्कार का होतात या मूलगामी प्रश्नाची चर्चा करणे गरजेचे आहे. यासाठी जनुकीय अभियांत्रिक/शास्त्रज्ञ. मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांची मते घेणे आवश्यक ठरेल.मानवी प्रवृत्तीला कृष्णधवल चौकटीत बंदिस्त करता येत नाही.एखादा क्रूर माणूस काही बाबतीत हळवा संवेदनशील असू शकतो वा एखादा हळवा संवेदनशील माणुस एखाद्या बाबतीत क्रुर असु शकतो. दिल्ली च्या केस मधे अगदी सातही जणांना फाशी दिल तरी पिडीत स्त्रीचे नुकसान भरुन येणार आहे का? फार तर इतरांवर त्याचा वचक बसेल.तो ही काही काळ. जेव्हा उन्माद ही भावना जागृत होते त्यावेळी भय लोपले जाते. कामातुराणां न भयं न लज्जा| सर्वकाही आलबेल चालाव, जगा आणि जगू द्या हे तत्व सर्वत्र असाव, सर्वेपि सुखिन: संतु ही सुखद व भ्रामक कल्पना आहे. जगाच्या कुठल्या कालखंडात, कुठल्या देशात, कुठल्या समाजात अन्याय ( या केस मधे बलात्कार) झाला नाही? हा प्रश्न विचारल्यास मति कुंठीत होते. हे विश्लेषण कदाचित काहींना असंवेदनशील वाटेल पण विचार करायला लावणारे आहे. जर पिडित व्यक्तीच्या जागी आपण असतो वा आपले आप्तेष्ट असते तर विवेक वगैरे गोष्टी गेल्या *** मधे. त्या ठिकाणी सूडाचीच भावना निर्माण होईल. कारण ही भावना देखील मानवी प्रवृत्तीचाच भाग आहे. जसजसा काळ लोटला जाईल तस तशी या भावनेची तिव्रता कमी होत जाते. मी मनातल्या मनात बलात्कार्‍यांना हाल हाल होत जगण्याची शिक्षा दिली आहे जी मरणापेक्षा भयंकर असेल. किमान (माझ्या) देवाकडे तशी मागणी केली आहे.

योनिशुचितेच्या अवास्तव कल्पना,स्त्रीला भोगवस्तू समजण्याची सरंजामी पद्धती,स्त्री-पुरुष मुक्त वातावरणाचा अभाव,दारूचे व्यसन,कुठल्याही मेहनतीच्या आणि कन्स्ट्रक्टिव कामाला न भिडण्याचा आळशीपणा आणि त्यासोबतची मग्रूरी,त्यामुळे सेक्स आणि दारू हेच करमणुकीचे मुख्य साधन ही सगळी कारणमीमांसा हज्जारदा करून झालीय.मध्यप्रदेशच्या एका दुर्गम खेड्यातल्या सर्व्हेमध्ये तिथल्या बायकांना पुरुष काय करतात(म्हणजे काय उद्योगधंदा करतात)असे विचारले असता 'और क्या करेंगे,ठर्रा और ठुकाई' असे उद्वेगजनक उत्तर दिलेले वाचले होते. पुढची दोनशे वर्षे तरी यात बदल संभवत नाही. मुलींना जन्माला येऊ दिले जात नाही ते एका अर्थी बरेच आहे.पिढ्यानपिढ्या मुली जन्मालाच येऊ दिल्या नाहीत तर भारतापुरते तरी उत्क्रांतिवादाच्या नैसर्गिक निवडीनुसार मुलींचे प्रजनन थांबेल तो दिवस किती आनंदाचा असेल!

एकंदरच खूप जास्त क्रूर घटना आहे. मला तर हल्ली प्रत्येकच पुरुष ससेप्टिबल बलात्कारी तर नसतो ना अशी शंका येउ लागली आहे. रेप करणे ही आदिम प्रेरणा वगैरे तर नाही ना असे वाटून गेले. कुत्र्यांमधला रेप स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे वाटले असेल कदाचित. माझ्या एका मित्राने जेंव्हा 'वुमन एन्जॉय रेप आफ्टर पेनिट्रेशन' असे बेजबाबदार विधान केले होते. मी त्याला तू याआधी रेप केला आहेस का असे विचारले तर नाही म्हणाला. कुठून असली अ‍ॅझम्शन्स तयार होतात कोणास ठाउक ?

खाली विकीवरून विदा घेतला आहे. हा युएनचा विदा असून त्यात केवळ पोलीसांकडे रिपोर्ट केल्या गेलेल्या (बलात्काराच्या) अधिकृत केसेसच आहेत.
Year Reported Cases Reported cases per day
2004 18233 50
2005 18359 50
2006 19348 53
2007 20737 57
2008 21467 59
2009 21397 59
2010 22172 61
एक सहज लक्षात येणारी गोष्ट म्हणजे दर दिवसाला घडणार्‍या आणि रिपोर्ट केल्या गेलेल्या केसेस या २००४ ते २०१० च्या कालावधीत वाढत गेल्या आहेत. त्याचे देखील दोन अर्थ होतात, एक म्हणजे गुन्हे वाढलेत आणि/अथवा रिपोर्टींग वाढले आहे. तरी देखील त्यात भितीपोटी, लाजेपोटी, समाजातील अत्यंत दुर्बल घटक असल्याने (त्यात दलीत आले आणि लहान मुले देखील आली) इत्यादी, अनेक रिपोर्ट न झालेले गुन्हे असतील. या कॅटेगरीतील कुठलाही गुन्हा हा विकृतच आहे. पण दिल्लीतला प्रसंग अत्यंत नीच स्वरूपाचा होता आणि तसेच प्रसंग अजूनही घडले आहेत जे वृत्तपत्रात येत असतात. पण मग आज होणारा आवाज केवळ हे दिल्लीत झाले, सीसीटिव्हीमुळे प्रत्यक्ष उजेडात आले म्हणून होत आहे का? एरवी त्याच हीन पातळीवर होणार्‍या गुन्ह्याकडे ना धड राजकारणी, ना धड समाजसेवी संस्था इतक्या गांभिर्याने आवाज उठवताना दिसत नाहीत...

चौरंगा करणे ही शिवाजी महाराजांच्या काळातली शिक्षा आजच्या काळातही दिली गेली पाहिजे हे माझे ठाम मत आहे. हात-पाय कापुन अश्या नराधमांना सार्वजनिक ठिकाणी कायमचे बसवले गेले पाहिजे,जाता येता लोकांनी अश्या व्यक्तीवर थुकावे अशी देखील तिथे सोय असावी. शिक्षेचा धाक /कायद्याचा धाक उरला नाही की अशा घटनां मधे वाढ होते.तारिख पे तारिख चालण्यामुळे न्याय मागणारा न्याय मिळे परंत जिवंत राहतील की नाही याची शाश्वती आजच्या घडीला दिसत नाही. जिथे कडक कायदा आणि शिक्षा देण्यासाठी निवडुन दिलेल्या राजकिय नेत्यांना स्मारके आणि पुतळे हे महत्वाचे विषय वाटतात त्या देशाची अवस्था अशीच असणार !आपला देश पुतळ्यांचा देश झाला आहे,जिथे फक्त शिश्नोदरपरायण मोकाट हिंडतात ! :( ४ दिवस चर्चा,मेणबत्ती मोर्चा आणि मोठ्या प्रमाणात काही दिवस मिडीया कव्हरेज / डिबेट या व्यतिरिक्त काही होणे नाही हे सामान्य लोकांना उमजले आहे.रोज बलात्कार / विनयभंग अश्या बातम्यांनी हिंदुस्थानातली वर्तमानपत्रे भरलेली असतात !सर्व वयोगटांच्या स्त्रीयांवर रोज हिंदुस्थानात बलात्कार होत असतो,मग ती चिमुरडी असो वा वॄद्धा ! :( जाता जाता :--- काही दिवसांपूर्वी मी इथे माजी "स्त्री" राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या दयाळुपणावर ४ शब्द टंकले होते,तसेच कौतुक आज लोकसत्ते मधे देखील वाचायला मिळाले.आपले राजकारणी मग ती स्त्री असो वा पुरुष यांना सत्तेचा आणि पैशाचा भस्म्या रोग झाला आहे,ज्यात सगळे राष्ट्र होरपळले जात आहे. तुमची आणि तुमच्या देशाची सुरक्षा तुम्हीच बघा ! हे लोक फक्त आयुष्य चैनीत घालवणार ! :(

परदु:ख शितल हेच खरे. ह्या बाबतीत सौम्य विचार करणार्‍यांनी फक्त एवढा विचार करावा बलात्कार झालेल्या स्त्री च्या जागी आपली आई, बहीण, मुलगी , बायको असती तर तेव्हा त्यांना कसे वाटले असते? डोळ्यासमोर असा प्रसंग आणून बघावा. बलात्कारी गुन्हेगारांना गुन्हा सिध्द झाल्यावर कायदा जी काय शिक्षा देईल ती देईल पण ती शिक्षा भोगण्याआधी त्या लोकांना भर रस्त्यावर आणून नग्नावस्थेत १५-२० चाबकाचे फटके हाणावेत. जेव्हा अशी काही शिक्षा सर्वांसमक्ष दिली जाईल तेव्हा काही प्रमाणात तरी अशा विकृत लोकांवर जरब बसेल. आणी तुरुंगातही सक्त मजुरीमध्ये सर्वात हलक्या दर्जाची किळस आणणारी कामे ह्यांना द्यावीत.

राही आणि चित्रा ह्यांच्या प्रत्येक वाक्याशी सहमत बलात्काराच्या बहुतांशी केस मध्ये स्त्रियांवर मालकी हक्क गाजवण्याची वृत्ती असते. काही प्रमाणात विकृत माणसे लहान मुलांवर बलात्कार करतात. कायदे कठोर झाले पाहिजे पण त्याच सोबत योग्य वयात लैंगिक शिक्षण असले पाहिजे. माझ्या मते एखाद्या माणसाचे बलात्कारी होणे व एखाद्याने आत्महत्या करणे ह्यामध्ये दोन समान गोष्टी आहेत पहिली समान गोष्ट म्हणजे खुपदा भावनेचा उद्वेग होऊन तडकाफडकी बलात्कार किंवा आत्महत्या होते. तर दुसर्‍या प्रकारात वरवर सामान्य वर्तन करणारा माणसाच्या डोक्यात हळूहळू भावनेचा भडका उडायला लागतो व ते ठरवून हे कृत्य करतात. पण आपल्या समाजात बलात्कारी का निर्माण होतात हा कळीचा मुद्दा आहे महिला स्वसंरक्षण करतील किंवा रात्री घराबाहेर कदाचित पडणार नाही मात्र २ महिन्याचे बाळ ते लहान मुलांवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा वरचे मुद्दे गैरलागू ठरतात ह्यात कितीतरी वेळा बलात्कार करणारे नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्ती असतात ही लोक मी उल्लेख केला तसा दुसऱ्या प्रकारात मोडतात. उत्पल नावाच्या व्यक्तीची हो पोस्ट माझ्या मतांशी सुसंगत आहे ती येथे मी शेअर करतो , जगन रेप कर. असं जगनला कुणी सांगत नाही. जगन आपणहूनच रेप करतो. शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न केलेला, फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत. त्यातले सगळेच रेप करू शकतात. ... जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल. पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो. आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही टाकतो. जगन वाईट आहे. भयानक वाईट. पण वाईट जगनपैकी एकाची एक केस आहे. या केस मधल्या जगनला इतर जगनसारखंच पंधरा-सोळाव्या वर्षी इरेक्शन आलं. कमलला न्हाण आलं त्याच्या एक-दोन वर्षांनंतर. इरेक्शन आल्यावर काय करायचं हे त्याला आई-बाबांनी सांगितलं नाही. कारण त्यांना त्याचा संकोच वाटायचा. कमलला पाळी आली की आई तिला काय करायचं ते सांगते. पण जगनला इरेक्शन आलं की काय करायचं हे बाबा त्याला सांगत नाही. कारण बाबालाही ते कुणी सांगितलं नव्हतं. बाबाच्या बाबाने त्याला एकदा नग्न बायकांची चित्रं असलेलं पुस्तक वाचताना पकडलं होतं आणि मारलं होतं. पण इरेक्शनचं काय करायचं हे सांगितलं नव्हतं. बाबाने तीसएक वर्षांपूर्वी हेलनला नाचताना बघून हस्तमैथुन केलं होतं. आता तर नाचाची खूप प्रगती झालीय. जगनपुढे आता खूप बायका नाचतात. मल्लिका, मुन्नी, शीला वगैरे सगळया. शिवाय कॅमेरा त्यांच्या शरीरावर फिरतो. कारण कॅमेऱ्याला हे माहीत आहे की जगनला ते आवडेल. आणि कॅमेऱ्यांच्या मागच्या माणसांना खूप पैसे मिळतील. असे खूप जगन तयार करणं हे कॅमेऱ्याचं ध्येय आहे. पण ते असो. चूक जगनची आहे. जगनही मग हस्तमैथुन करतो. ते करताना एकदा आईने पाहिलं तर तिने भंजाळून जाऊन बाबाला सांगितलं. बाबाने मार खाल्ला होता, म्हणून त्याने जगनला पण मार दिला. पण मार खाऊन इरेक्शन थांबत नाही. म्हणून मग जगन पुन्हा नाच बघतो, संभोग चित्रांची पुस्तकं वाचतो, ब्ल्यू-फिल्म बघतो. आणि हस्त मैथुन करतो. आपली परंपरा फार थोर आहे. तिचा विजय असो. आपल्या परंपरेने शिकवलं आहे की लग्नाआधी संभोग वाईट. त्यामुळे लग्नापर्यंत थांबून नंतर सगळी कसर भरून काढली तरी चालेल. म्हणजे पहिल्या रात्री बायकोला त्रास झाला तर चालेल. पण लग्नापर्यंत स्त्रीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे. त्यामुळे जगन नग्न बाईचे फोटो बघत थांबतो. शिवाय अशा नग्न बायकांना वाईट समजलं जातं. कारण त्या जगनला बिघडवतात. पण जगनला त्या आवडतात. कारण ज्याच्यामुळे इरेक्शनपासून सुटका मिळते ते जगनला चांगलं वाटतं. पण इरेक्शन कायमचं कधीच संपत नाही. जगनला आता 'बाई' हवीच असते. तो कमलकडे आता बाई म्हणूनच बघू लागतो. आणि एके दिवशी तिच्यावर झडप घालतो. जगनचं जनावर होतं. दुर्दैवाने जगन पुरूष आहे. संस्कृती प्रगत झाली तरी संस्कृतीकडे अजूनही इरेक्शनला उत्तर नाही. शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं. पुरूषसत्ताकतेचं. म्हणजे बाबा कुटुंबप्रमुख. आई त्यानंतर. जगन, तू मुलगा आहेस. मुलींसारखा रडतोस काय? जगन, तू मुलांच्यात बस बघू. मुलींबरोबर कसला बसतोस? जगन, मुली फक्त क्रिकेटमध्ये नाचण्यासाठी असतात. क्रिकेट खेळायचा असतो मुलांनी. जगन, स्वयंपाक तू नाही करायचास. पण तुला प्लंबिंग आलं तर चांगलं आहे. जगन, बायकांना डोकं जरा कमीच असतं. त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच बसावं. जगन, तू मर्द आहेस. बाईला जिंकणं यात मर्दानगी असते. वगैरे. आधीच इरेक्शन आणि त्यात पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन. जगन पार बिघडून गेलाय. त्याच्यातला हिंस्त्रपणा जनावरांनी लाजावं इतका वाढलाय. कमलच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी, आई-बाबा आणि परंपरा सगळ्यांनाच जगनचा प्रचंड राग येतो. त्याला फाशी द्यावी असं वाटतं. जगनला फाशी जरूरच द्यावी. त्याने जगन नक्की मरेल. पण नर उरेल. कारण नर आणि मादी कधीच कायम मेलेले नाहीत. अजूनही मरत नाहीत. नर पुन्हा हस्त मैथुन करत वाढेल आणि पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन त्याला दिलं जाईल. आणि मादी पुन्हा अनंतकाळ पहात असलेली वाट पहात राहील. शुभंकर संभोगाची. - उत्पल

In reply to by गवि

?

In reply to by निनाद मुक्काम …

आपल्या कडे मुलांना किंवा मुलींना लैगिंक शिक्षण मिळत नाही.त्यात लैगिंक भावनांचा निचरा योग्य प्रकारे करता येत नाही. त्याची फळे ही अशी बलात्काराची प्रकरणे घडण्यात होतो.

In reply to by वेताळ

जगन पुरुष आहे,जगन सारखे इरेक्शन इतर पुरुषांना देखील येते, मग सगळेच पुरुष बलात्कारी होतात का ? ज्या ज्या मुलांना लैगिंक शिक्षण मिळत नाही ते सर्वच बलात्कारी का होत नाहीत ? बलात्कार ही वासना शमवण्यासाठी केलेली परमोच्च अविचारी / अविवेकी कॄती आहे,या कॄतीचे जात-पात वय/लैगिंक शिक्षण यांच्याशी संबंध लावणे पूर्णतः चुकीचे आहे. या संदर्भात जंगली दिल्ली हा लेख वाचण्या सारखा आहे.

In reply to by मदनबाण

सगळे बलात्कारी होत नाहीत मात्र बायकांच्या येताजाता स्पर्श करणे ,गर्दीचा फायदा घेऊन चिमटा काढणे , किंवा कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या समवेत द्व्यर्थी बोलणे आभासी जगतात महिला प्रोफाईल उघडून महिलांशी संपर्क साधणे आणि बर्‍याच विकृती जगन मध्ये आजकाल बोकाळल्याने आहेत. ह्याचा महिलांना सार्वजनिक जीवनात प्रचंड त्रास होतो , विनय भंगाचे प्रकार घडतात. आणि ह्याचे पुढचे अंतिम पाऊल म्हणजे बलात्कारात होतो. माझ्यामते महिलेवर बलात्कारातून अधिक घृणास्पद म्हणजे बालकांचे लैंगिक शोषण ते अजून वाईट का तर मुलांना कळत सुद्धा नाही कि आपल्या सोबत चाललय ते अनैसर्गिक आहे , त्याचा प्रतिकार करावासा वाटून तो करता येत नाही ,सर्वात महत्वाचे म्हणजे , ह्या प्रकाराविरुद्ध तक्रार करायची असते तो कायद्याने गुन्हा आहे , ह्याची त्यांना कल्पना नसते. आणि ह्या सर्व गोष्टी महिला व बालकांवर बल पूर्वक केलेल्या अत्याचारात मोडतात.

In reply to by निनाद मुक्काम …

हं. यानिमित्ताने काही घटना आठवून गेल्या. माझ्या कॉलेजच्या रस्त्यावर एक झोपडपट्टी होती. तिथे स्वतःच्या लहान मुलांना पाजत बसलेल्या गरीब बायकांकडे चवी चवीने पाहाणारा आणि नंतर तितक्याच चवीचवीने ते वर्णन करणारा एक मित्र आठवला. कॉलेजच्या फेस्टिवलमधे आम्ही सगळे मित्र दारु पिउन नाचत असू. तेंव्हा या जनावराने आमच्या वर्गातल्या एका मुलीच्या पार्श्वभागावर अशा काही चापट्या मारल्या की तिथून मुलींचा तो अक्खा ग्रुपच पळून गेला. आणखीन एका मित्राच्या हॉस्टेलवर राहणारा मुलगा काहीसा फेमिनाईन होता आणि कसल्याशा हार्मोनल प्रॉब्लेममुळे त्याची छाती मुलीसारखी होती. तर त्याचे रुममेट रोजच्या रोज त्याचा विनयभंग करत असत. आज माझी टर्न आहे यावरुन इतरांमधे म्हणे भांडणे चालायची. शिवाय हिजड्यांना ट्रेनच्या टॉयलेटमधे घेउन जाणारे लोक तर नित्यच द्रूष्टीस पडतात. याच्यात भरीस भर म्हणून गे असणे किंवा लेस्बियन असणे किती नैसर्गिक आहे असे ठासून सांगणारे विचारवंत तर मराठी संस्थळांवर पैशाला पासरीभर आहेत. दुसर्‍याला पीडा देत देत सेक्स करण्यात काहींना आनंद मिळतो असेही एकदोन ठिकाणी नुकतेच वाचले. त्यामुळे डोके भंजाळून जाउन नक्की प्रक्रूती कोणती आणि विक्रूती कोणती याचा विचार करणेच सोडून दिले आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आणि ते वर्णन आपण किंवा आपल्या मित्रांनी ऐकण्यापेक्षा त्याला तिथेच टोकले की नाही? शिवाय कॉलेज फेस्टिवल मधेही ज्याने कोणी वरील प्रसंग बघितला असल्यास (आपण वा आपले मित्र) लगेच त्या मुलाची तक्रार कॉलेज प्रशासनाकडे केलीत काय? गुन्हे घडत असताना असल्या मित्रांना रोखणे , विरोध करणे आणि ते शक्य नसल्यास त्यास वाळीत टाकणे एवढे तरी आपण नक्किच करू शकतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

तेंव्हा या जनावराने आमच्या वर्गातल्या एका मुलीच्या पार्श्वभागावर अशा काही चापट्या मारल्या की तिथून मुलींचा तो अक्खा ग्रुपच पळून गेला
आणि तुम्ही त्याला थोबाडून काढला नाहीत ? नंतर पुढे संबंध ठेवले त्याच्याशी ? मी व्यक्तिश: अशा माणसाशी मैत्रीचे संबंध ठेवले नसते. तो जनावर तर तुम्ही बघे कोण मग ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नाही. मी त्याला थोबडवले नाही. यापुढे जाउन हेही सांगेन की तो माणूस आजदेखील माझा अत्यंत चांगला मित्र आहे. याचा अर्थ मी त्याच्या त्या कृत्याचे समर्थन करतो असा नाही. ते घृणास्पद कृत्य होतेच. त्याबद्दल त्याला चार शिव्या हासडण्यापलीकडे मी काही केले नाही हे खरे आहे. शिवाय ज्या मुलीशी त्याने हे गैरवर्तन केले ती माझी मैत्रीण वगैरे नव्हती. मग या सगळ्या गदारोळात माझी काहीच चूक नसताना मी कशासाठी माझे पॉईंट मायनस करुन घेउ ? आपल्या आजूबाजूची, जिवाभावाची किंबहुना घरातलीसुद्धा माणसं चुकतात. जर अशी फूटपट्टी घेऊन बसलो तर मला कित्येक माणसांना मुकावे लागेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

>>शिवाय ज्या मुलीशी त्याने हे गैरवर्तन केले ती माझी मैत्रीण वगैरे नव्हती. मग या सगळ्या गदारोळात माझी काहीच चूक नसताना मी कशासाठी माझे पॉईंट मायनस करुन घेउ ?>>
हे वाक्य वाचून हतबुद्ध झाले आहे! म्हणजे समजा उद्या रस्त्यावर एखाद्या अपरिचित स्त्रीला कोणी त्रास देत असले तर तुम्ही त्याकडे डोळेझाक करणार? आणि अशी डोळेझाक करुन पुन्हा सुखाने ज्गालही पुढे, कसलीही मानसिक टोचणी न लागता, नाही? बहुतांशी भारतीय समाजमन संवेदनारहित आहे हेच खरे.. :( समजा उद्या तुमच्या स्त्री नातेवाईकांवर, मैत्रिणींवर असा त्रास सहन करायची वेळ आली तर इतरांनी त्यांना मदत करावी असे तुम्हांला वाटते की त्यांनीही ही माझी कोणी नाही, मग मी का माझे पॉईंट्स मायनस करुन घेऊ असे म्हणायचे आणि अशा मला काय करायचे आहे प्रवृत्तीमुळे तुमच्या परिघतल्या स्त्रीच्या जिवावर बेतले तर? तेही चालेल का? कदाचित चालेल. हो ना?

In reply to by निनाद मुक्काम …

हा एकांगी विचार झाला निनाद. तुला असे वाटते का इरेक्शन येणार्‍या प्रत्येक पुरूषात ही वि़कृती असेल? चांगले संस्कार, शिक्षणाची जोड ह्या बरोबरच कायद्याचा ही धाक हा हवाच.

रेवतीतैच्या पहिल्या पोस्टला अनुमोदन. या विषयावरची सगळ्यात प्रगल्भ चर्चा मिपावर चालू आहे हे जाणवलं. अशा ऑनलाईन चर्चांमधे कुठपर्यंत वाहवत जायचं याची लक्ष्मणरेषा कशी असावी हे इथं शिकायला मिळतं.

In reply to by Kavita Mahajan

जमेल तेवढ्यांनी आपाअपली मते/सूचना तिथे पोस्ट कराव्यात.

In reply to by Kavita Mahajan

आभार! माझी मते न्या. वर्मा यांना इमेल केली आहेत

१) Justice Verma Commitee http://www.thehindu.com/news/national/justice-verma-committee-begins-wo… २) नमिता भंडारे यांनी फाइल केलेले पेटिशन http://www.change.org/petitions/president-cji-stop-rape-now ३) प्रज्वलच्या सुनिता यांचा ब्लॉग http://sunithakrishnan.blogspot.com/2012/12/the-painthe-angerthe-outrag…

ते दिर्घकालीन उपाय वगैरे बडबडणं काही उपयोगाचं नाही. जेवढे गुन्हेगार सध्या कोठडीत बंद आहेत, त्यांना तुरुंगावर हल्ला करून त्यांची कत्तल केली पाहिजे. तरच या देशाला भवितव्य आहे. यात निरपराध पण मरतील. मरु देत. लोक आता अशा स्टेज ला पोचलेत, कि गन्गाजल सारख्या घटना वारंवार घडू लागतील, नव्हे घडल्याच पाहिजेत. हे जे कायदा कायदा म्हणून बडबडताहेत, त्यांनी त्या वेळी लोकांना समजावून दाखवावं.

संजिवनीके१ ताई, इतके प्रतिसाद आलेत, तुमचे यावर मत काय? तुमचा काथ्याकूट सुरु करण्याचा उद्देश सफल झाला का? यातून अनुमान काय निघाले असे वाटते? तुम्हाला या चर्चेत महत्वाच्या वाटलेल्या गोष्टी थोडक्यात मांडता येतील काय?

In reply to by रेवती

सर्वात योग्य प्रश्न, नाहीतर या चर्चेचा हेतुच मुळी मिपावर पहिल्याच धाग्यावर टिआर्पी खेचणे आहे असे वाटेल. धागाकर्ता किंवा कर्ती यांनी काही लिहावे ही विनंती. मा. संपादक मंडळ, असे चर्चा प्रस्ताव मांडणारे किंवा मदत मागणारे धागाकर्ते किंवा कर्ती यांना सदर धाग्यावर चर्चा करुन झाल्यावर किंवा मदत करुन झाल्यावर, आभार प्रदर्शन किंवा अमुमान मांडणारा एक प्रतिसाद देणे कंपल्सरी करावे, ही नम्र विनंती.

दिल्लीतल्या अशा पुष्कळश्या घटना खाजगी बसेस किंवा वाहनामध्ये घडलेल्या आहेत.सुरक्षाकर्मचार्‍यांचाही यात मोठा सहभाग असतो. हे कर्मचारी बहुधा अनागर,पुरुषवर्चस्वी कल्पनांचा पगडा असलेल्या जातीजमातीतून येतात.(पुलीसही तसेच.)सुरक्षा एजन्सीज आणि खाजगी वाहतूक कम्पन्यांच्या मालकांना सक्तीने काही नियम पाळायला लावणे मनात आणले तर तितकेसे कठिण नाही.भरतीच्या वेळी कसून तपासणी/पडताळणी,सक्तीची जैवविदा नोंद आणि भरतीनंतर या कर्मचार्‍यांचे वारंवार प्रबोधन,समुपदेशन करून (प्रशिक्षण शिबिरांद्वारे) स्त्रियांविषयी त्यांच्या मनात आदरभाव रुजवण्याचा प्रयत्न करता येईल.त्यांच्या वर्तनावर कडक नजर राखून मग्रूरी,अतिसंताप, कामांधता आढळल्यास प्रथम समज देणे आणि नंतर नोकरीतून कमी करणे अशी शिस्तभंगाची कारवाई करणे खरे तर अशक्य नाही.पण निदान उत्तरभारतात तरी सध्या तरी हे शक्य दिसत नाही कारण अशा तर्‍हेचे गुन्हे हे गुन्हे नसून पुरुषार्थ आहे हीच भावना सर्वत्र रुजलेली आहे. एक छोटीशी माय्क्रोस्कोपिक आशादायक गोष्ट मला दिसते ती ही की आता या गुन्ह्यांबद्दल लोक उघडपणे बोलू तरी लागलेत आणि सनसनाटीखोरपणासाठी का होईना,रिपोर्टिंग तरी होतेय.