जपानी कलात्मकतेच्या प्रतिसादांवरुन बर्याच जणांनी सुचविले यात तुमची कलात्मकता काय आहे तुम्ही तर नुसते फोटो डकवलेत. आता मिपाकरांची कल्पनाशक्ती बघूया. मी लिहीलेले काही नवीन उखाणे देत आहे. तेच तेच जुने उखाणे ऐकून कंटाळा आलाय, नवीन पीढी लग्नात कसे उखाणे घेईल ते वाचा आणि तुम्हीही त्यात नवीन भर टाका.
लग्नाच्या आहेरात आई वडिलांनी
दिला मला ब्लैक बेरीचा मोबाईल
------रावांच नाव घेते आता
मी फेसबुकवर अपडेट करीन माझा प्रोफाईल
डी व्ही डी प्लेअर मध्ये सी डी घालते वाकून
-----रावांच नाव घेते सर्वांचा मान राखून
पुढे तुमच्या कल्पना----------
वाचने
24074
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा...
हे वाचल्यानंतर पुढचं वाचेपर्यंत नाही नाही त्या ओळी सुचल्या हो...
असो. आमचा एक उखाणा.
लगीन झाल्याची वर्दी दिली फेसबूक वॉल अपडेट करून,
आणि ___रावांशी काडीमोड घेते ट्वीटर वर ट्वीट करून....
लगीन झाल्याची वर्दी दिली
In reply to हा हा... by दादा कोंडके
'ऊ' खाणे
In reply to हा हा... by दादा कोंडके
'ऊ' खाणे हे नवीन पीढीचे
---कडून धडे गिरवीन शुद्धलेखनाचे.
मिपाकरांच्या तोंडी लागून पाय घसरुन पडले
---रावांचा हात धरुन थोबाडपंथी झाले
मेलो?
आम्ही सामूहिकरीत्या मेलो असे म्हणायचे आहे का?(बायकांनी जोहारबिहार करून सामूहिकरीत्या मरण्याची पद्धत होती म्हणे एके काळी)
किंवा स्त्रिया आणि पुरुष
In reply to मेलो? by राही
किंवा स्त्रिया आणि पुरुष मिळून 'मेलो' असे म्हणायचे असावे..
नाही गं स्नेहातै एकवचनी
In reply to किंवा स्त्रिया आणि पुरुष by सस्नेह
नाही गं स्नेहातै एकवचनी आदरार्थी लिहीलंय ...
आमचाही एक उखाणा
फेसबुकची वाल आणि ट्वीटरची ट्वीट आहे माझ्या आवडीची,
आणि .......... चे नाव घेतो, ती राणी आहे माझ्या प्रितीची !!!
मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर
मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर केलं मला एल्बी...
त्याच मेल्यांचं नाव घेऊन ही भरवते दुसरी जिल्बी...
नेता :-b
अग्गागाअगागागागा....!
In reply to मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर by अत्रुप्त आत्मा
अग्गागाअगागागागा....!
लय ब्येकार हाणलाय!
मला लागली कुणाची उचकी?
In reply to मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर by अत्रुप्त आत्मा
मला लागली कुणाची उचकी?
@ अत्रुप्त
In reply to मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर by अत्रुप्त आत्मा
तुम्ही कवा दिताय वो खर्रीखुर्री जिल्बी :-)
सायीची भुक भागली का, आता
In reply to @ अत्रुप्त by लीलाधर
सायीची भुक भागली का, आता जिल्बीच्या मागं लागलाय ते.
कलात्मकतेच्या जिलेबीला लावले
कलात्मकतेच्या जिलेबीला लावले जपानी वळण
मिपाच्या गिरणीत आणले आता उखाण्याचे जुने दळण !
उ खा णा
रोज रोज चढत जाते मी बुद्धीची नवं नवी पायरी..
.... रावांचे नाव घेते, फाट्यावरती मारुन डायरी.
राव?
In reply to उ खा णा by परिकथेतील राजकुमार
तू कशाला रे कुणा रावाचं नाव घेतोस? राणीचं तरी घ्यायचं होतंस...
अगं
In reply to राव? by स्मिता.
ते नाव मी त्यांना घेण्यासाठी सुचवले आहे.
आणखी एक..
माझा मित्र PLC, SCADA प्रोग्रामिंगमधे होता तो म्हणाला मला जेवताना घास भरवायच्या वेळेस घेण्यासाठी एखादा उखाणा सुचव.. मी सुचवलं:
"अमुकतमुक कंपनी मधे प्रोग्राम करतो PLC, SCADA
अमकीतमकीचं नाव घेतो आतातरी जेवायला वाढा..!!"
आला आला धागा दणाणली आळी
आला आला धागा दणाणली आळी
उघडून बघितला तर एक फोटो नि दोन ओळी !!
....
हे राम.. मारलात दगड..?
हे राम.. मारलात दगड..?
In reply to .... by गवि
=))
त्यांनी म्हणलं हे राम, कारण
In reply to हे राम.. मारलात दगड..? by किसन शिंदे
त्यांनी म्हणलं हे राम, कारण लागली होती गोळी
मी म्हणतो हे राम, कारण ____ करते पोळी.
सेंच्युरिअन..
आता शंभरी ठरलेलीच..
अज्जुन येक
टु इज कंपनी, थ्री इज क्राउड
ु टु इज कंपनी, थ्री इज क्राउड
.......... च नाव घेतो वाटुन भारी प्राउड. !!!!!
=)) =))
कंपनी आणि क्राउडच्या जागी
In reply to अज्जुन येक by स्पा
कंपनी आणि क्राउडच्या जागी मुळचे शब्द बदललेले पाहुन आनंद जाहला.
भर
आयटीची नोकरी म्हणजे जणू पैशाचे झाड
...रावांच्या फोनमधे ६४ जीबीचे कार्ड
नशीब अजुन त्या ६४ जिबीत काय
In reply to भर by हुप्प्या
नशीब अजुन त्या ६४ जिबीत काय काय आहे ते पाहिलं नाहि.
हा हा...
In reply to नशीब अजुन त्या ६४ जिबीत काय by ५० फक्त
"अ गुड गर्लफ्रेंड सेव्स हंड्रेड जीबी स्पेस ऑन हर बॉयफ्रेण्डस पीसी" शेअर इफ यू अग्री. असं चेपू वर वाचल्याचे स्मरते. :)
नावाला शोभेसा प्रतिसाद) सहमत
In reply to हा हा... by दादा कोंडके
नावाला शोभेसा प्रतिसाद)=)) सहमत आहे हेवेसांनल ;)
अजून काही
साखरपुड्याला मिळाली डायमंडची रिंग
***राव वापरतात मायक्रोसॉफ्ट बिंग!
वाघ असतो शूर आणि हरीण असते भित्रं
*** रावांचे फेसबुकवर हजारो मित्रं !
जशी बढती मिळाली तसे नशीब फळफळले
*** रावांचा आयपॅड बघून सगळे जळफळले!
...
*** राव पार्टीमधे पिऊन झाले टाईट
बघा एचवन मिळवला उद्या आमची फ्लाईट !
हा हा हा. देवा रे!
In reply to ... by हुप्प्या
हा हा हा. देवा रे!
आकाशात उडालं हॅलीकाप्टर
आकाशात उडालं हॅलीकाप्टर
आमचे ... राव बाई लै चाप्टर...
उखाण्यांच्या धाग्यावर पुरुषांचीच जास्त गर्दी झालीय .. या सगळ्या पोरी गेल्यातरी कुठे म्हणायचं,,,,
**** च नाव घेतो परत विचारु
**** च नाव घेतो परत विचारु नका काय,
आता तुच माझी करीना कपुर आणि तुच माझी ऐश्वर्या राय.
फुलात फुल शेवंती, फुलात फुल शेवंती
मी तुझा वीरु आणि तु माझी बसंती B-)
आय टी
आय टीच्या विश्वात क्लाऊडची हवा.
xxरावांचा टॅब्लेट पी.सी. मला हवा.
नाव घ्येते ऐका हं ...........
नाव घ्येते ऐका हं ............ ;)
" नारळात पाणी अन संग्रामची देवयानी"
"चुलिवर वरण अन आभाचा करण "
"गवतावर माशी अन अर्णव ची खुशी "
"सिंहाची गर्जना अन मानवची अर्चना "
"देवची किर्ती अन यशची आरती "
"सरदेशमुख घराण्याची राणी ती सोहमची कल्याणी "
लग्नाची नाती काही केल्या कळेना ;) नाव कुणाच घ्याव ?नाव घेणारा मिळेना " ;)
इतकी नावे ?
In reply to नाव घ्येते ऐका हं ........... by पियुशा
द्रौपदीची अपडेटेड आवृत्ती दिसतेय...!
हा हा...
In reply to नाव घ्येते ऐका हं ........... by पियुशा
हे नवीन पिढीचे उखाणे बघून परत एकदा ड्वाले पाणावले. :)
@कुणाच घ्याव ?नाव घेणारा
In reply to नाव घ्येते ऐका हं ........... by पियुशा
@कुणाच घ्याव ?नाव घेणारा मिळेना ">>> =)) बाप रे...! =))
पिवशा पिवशा घाईला आली,आधीच नाव घेऊन मोकळी झाली. ;-)
एक(ता) नंबर!!!
In reply to नाव घ्येते ऐका हं ........... by पियुशा
एक(ता) नंबर!!!
जाना था जापान, पहुंच गये चीन
जाना था जापान, पहुंच गये चीन
एक आयडी उडला तर दुसरा घेइन
;)
अरे वा!
"अबक" वाचतो मटा
"कखग" च्या पायात बाटा
"टठड" ला दाखवला अंगठा
"क्षयझ" चं नाव घेते
"बभम" ला करून टाटा
नुसते...
नुसते फोटो डकवण्यावरुन मिपावर माजला एवढा काहुर...
....रावांच नाव घेते, दया जरा सबुर...
हिंदू
नेटवर झालेत इंटरनेट हिंदू चिक्कार.
माझे **राव कधीच होणार नाहीत बेकार.
चिरोटाचंद्र गुहा
फेसबुका वरती हायेत मला
फेसबुका वरती हायेत मला शंभरावर फ्रेण्ड
फेसबुका वरती हायेत मला शंभरावर फ्रेण्ड
....रावांच्या आन् माझ्या पिरमाचा हाय येगळाच ट्रेंड