Skip to main content

दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरण आणि स्त्री सुरक्षितता उपाय

लेखक sanjivanik१ यांनी बुधवार, 19/12/2012 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील ...........(शिव्या समजून घ्याव्यात)ना फाशी पण कमीच शिक्षा आहे. एखाद्या मुस्लिम देशा मधील सर्वात भयंकर शिक्षा द्यायला हवी. सरकारने तर लाज सोडलीच आहे . फक्त भाषणा मधून दुख व्यक्त करण्या पेक्षा कृती करावी . अर्थात ती कृती करायला आणखी किती वर्ष घेतील देवास ठाऊक. तो पर्यंत त्या मुलीला आणि कुटुंबियांना किती त्रास होईल त्याची कल्पना न केलेली बरी. मुंबईत बायका इतक्या तरी असुरक्षित नाही हे मात्र खर पण एकदम सुरक्षित आहेत अस पण नाही. तर समस्त स्त्रीवर्गाला विनंती कि ह्या परिस्थितीला तोंड द्यायला हत्यार पर्स मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. तेव्हाच आपण सुरक्षित राहण्याची आणि नराधमाना वाचक बसण्याची शक्यता जास्त... स्व सुरक्षितता आणि स्व रक्षणा साठी वेगवेगळ्या वयो गटातील स्त्री वर्ग काय करू शकतो ? किंवा केल आहे? त्याचे अनुभव ,हे जरूर इथे कळवा .

वाचने 38852
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

ऐकीव माहितीप्रमाणे दिल्लीत तसेही आठ वाजल्यानंतर मुली, बायका फारश्या बाहेर फिरत नाहीत. हा गुन्हा बराच अवेळी झाला आहे. जे झाले त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच. किती क्रूर असावे माणासाने! कामातुराणां न भयं न लज्जा असे म्हणतात त्याचा वाईट अवतार आहे हा! आता "आम्हालाही बाहेर फिरण्याचा हक्क" वगैरे मिळेल तेंव्हा मिळो, कायदे येतील तेंव्हा येवोत, सध्या स्वत:ला जपून असणे हेच शहाणपणाचे आहे असे वाटते. अगदी सातच्या आत घरात टाईप वाटेल, जुने मत वाटेल पण जीव वाचवणे महत्वाचे आहे. अवेळी घराबाहेर न पडणे.....अगदी भावा, वडीलां, नवर्‍याबरोबरही नाही. बसमधून कचरा बाहेर टाकावा तसे जर वापरून मनुष्याला टाकून देणार असले तर पुढचे आयुष्य विकलांग होऊन जगण्यापेक्षा आपापली बाहेरची कामे वेळेत आटोपून घरात बसलेले बरे.

In reply to by रेवती

सध्या स्वत:ला जपून असणे हेच शहाणपणाचे आहे असे वाटते.
सहमत पण हे रिगार्डलेस कायदे असावे लागते. उदाहरणादाखलः बॉस्टन एकदम सेफ शहर आहे. येथे चार्ल्सनदीला लागून खूप छान जागा आहे जेथे अनेक जण पळायला जातात संध्याकाळी फिरायला वगैरे जातात. पण तेथे देखील पोलीस, विशेष करून स्त्रीयांना अवेळी पळायला जाऊ नका म्हणून सल्ला देतातच आणि तो न पाळणार्‍यांच्या बाबतीत घटना घडल्याचे प्रकार झाले आहेत. त्याचे कारण पोलीस सर्वत्र कायम असू शकत नाही आणि तुम्ही म्हणलात तसे "कामातुराणाम..." प्र्कारातली एकच व्यक्ती समोर येयची अशा वेळेस गरज असते. पण तरी देखील विशेषतः दिल्लीत आणि इतरत्रही नजरेच्या स्पर्शापासून हपापलेल्या असल्या विकृत लोकांना मेसेज मिळेल असे कायदे आणि सुव्यवस्था दोन्ही हवे. त्यामुळे पब्लीकने आवाज उठवलाच पाहीजे. एकाने उठवला आता मला गरज नाही असे देखील म्हणून चालणार नाही. असो. स्मीता पाटीलला बस मधून उतरत असताना सहज धक्का मारलेल्याला पचतवायला लावणारा, अर्धसत्य मधील ओम पुरी आठवला...

In reply to by रेवती

यापेक्षा भयानक ही गोष्ट आहे की गुन्हासाठी वापरलेली ती स्कूलबस आहे. लहान तसेच वयात येणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना भक्ष्य बनवायला कितीसा वेळ लागणार? बरेच वर्षांपूर्वी अमेरिकेत स्कूलबस ड्रायव्हरने काही वर्तन केल्याची बातमी ऐकली होती (नक्की कधी ते आठवत नाही). फक्त मुलींची नाही तर मुलांचीही तेवढीच काळजी घ्यावी लागते.

In reply to by रेवती

बातमी वाचून अंगावर शहारा आला.खरं सांगायचं तर पेपरात ही बातमी सगळी वाचलीच नाही की न्यूज चॅनेलवरच्या चर्चा ऐकल्या नाहीत.कारण अशा बातम्या वाचल्या की नुसताच त्रास होतो आणि काही करता तर येत नाही.तेव्हा ही घटना रात्री नक्की किती वाजता झाली याची कल्पना नाही.जितक्या तितक्या वाजता झाली असेल तेव्हा असले गुन्हे केल्याबद्दल कडक शिक्षा व्हायलाच हवी.
आता "आम्हालाही बाहेर फिरण्याचा हक्क" वगैरे मिळेल तेंव्हा मिळो, कायदे येतील तेंव्हा येवोत, सध्या स्वत:ला जपून असणे हेच शहाणपणाचे आहे असे वाटते.
याला अगदी +१.न्यू यॉर्क-शिकागोमध्ये असे काही भाग आहेत की जिथे अंधार पडल्यानंतर गेल्यास सुरक्षिततेची खात्री नसते.अशा ठिकाणी तिथे जायचा हक्क असला तरी आपल्या सुरक्षिततेसाठी न गेलेले बरे.असाच प्रकार या केससंबंधीही.

In reply to by रेवती

अगदी बरोबर आहे...पन तरिहि ज्या स्त्रियाना कामानिमित्त मनाविरुध जास्त वेळ बाहेर रहाव लागत आसेल त्याच्या सुरक्षेचि खरच गरज आहे...

रेवतीताईशी पुर्ण सहमत. काही महिन्यांपुर्वी पेठकरकाकांनी एका धाग्यावर हेच सांगितलं होतं, त्यावेळी वादासाठी वाद घालण्यात आला होता. आपली सुरक्षितता आपणच पाहायची असते.

पुन्हा एकदा एक प्रामाणिक विनंती, बाकी तथाकथित सामाजिक आंतरजालीय संस्थळांवर व टिव्हीवर मिडियामध्ये या विषयावर वांझोटी चर्चा चालु आहे, तशीच पुन्हा इथं करण्यात काय हशील आहे, त्यापेक्षा अशा प्रकारांविरुद्ध आपण प्रत्येकानं आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणं आणि इच्छाशक्तीप्रमाणे जेंव्हा जिथं जे जमेल ते करत रहावं असं ठरवुन असे धागे बंद करु या का ?

In reply to by ५० फक्त

असे धागे बंद करु या का ? यावरून एकच वाटतं की असे गुन्हे वारंवार होताहेत व वारंवार स्त्रिया जिथे जमेल तसे, जमेल तेंव्हा मुद्दा वर काढताहेत. ५० राव, बाईची दु:खं वगैरे मी बोलत बसणार नाही, पुरुषांनाही भावना असतात हे गृहित धरून सांगतीये की एक छोटे लेखन करण्याचा हा एक साधा मार्गही आपण का अवलंबीला नाही असे धागाकर्तीला वाटू शकते. फारतर आपण प्रतिसाद देणे थांबवू शकतो.

In reply to by ५० फक्त

अति चर्चा केल्याने होणारा तुमचा त्रास मला कळतो आहे, पण असे विषय लोक मांडल्यावर लोक जरा भावनावश होऊन बोलती होतातच . पण लोक आपल्या क्षमतेप्रमाणं आणि इच्छाशक्तीप्रमाणे काय करतात ते या चर्चेतूनच कळेल, चर्चा एकदम बंद करून नाही. तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद....

माझ्या कॉलेजमध्ये एकदा एका मुलीने लायब्ररीत एकाला खेचला होता. त्याने झिप उघडली वगैरे वगैरे. हिने त्याला त्या अवस्थेतच बोंबाबोंब करत सर्वांपुढे आणले. रंगे हात पकडला गेला तो माणूस. धाडसच म्हणायला हवे.

स्वसंरक्षण. अशा वेळी अचानक केलेला हल्ला हाच सर्वोत्तम बचाव असतो. सगळ्या मुलींनी ज्युदो कराटे तैक्वांडो वगैरे आवश्यक तेवढे शिकून घेतलेच पाहिजे. एक तर ते उत्तम व्यायाम प्रकार आहेत आणि वेळप्रसंगी आपल्या वाटेला जाणार्‍याला बर्‍यापैकी इजा पोचवता येते. शक्य तेवढे लवकर घरी पोचले पाहिजे. जेव्हा शक्य नसेल तेव्हा जास्तीत जास्त मोठा जमाव करणे आवश्यक. आयटीमधे नोकरी करणार्‍या मुली/स्त्रिया वगळता इतर कोणाला अशी उशीरापर्यंत कामावर रहायची वेळ येत नसावी, पण जर मौजमजा करण्यासाठी बाहेर रहायचे असेल तर अगदी १/२ जण असण्यापेक्षा मोठा घोळका असावा. घरी आपल्या हालचालींची खरी माहिती कळवत रहाणे हेही जरूरीचे आहे. दिल्लीत ज्या मुलीवर अत्याचार झाला ती मृत्यूशी झुंजत आहे अशा बातम्या आल्या आहेत. जिवंत राहिली तरी कोणत्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत बिचारी राहील देवजाणे. अरुणा शानभग ३८ वर्षे नरकयातना भोगत आहे. तिच्यावर अत्याचार करणारा मात्र ७ वर्षे चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात काढून सुटला. :(

त्या प्रतिभा पाटिलनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्या अनेकांची फाशी माफ करून कायद्यावरचा सामान्यांचा विश्वास कधीच उडवून टाकला आहे. या हरामखोरांनाही फारशी शिक्षा होणार नाही हे निश्चित!

या असल्या विकॄत लोकांना काय शिक्षा व्हावी या बद्दल माझी फार टोकाची मतं आहेत. जी भारतात कधीही आमलात येऊ शकणार नाहीत हेही माहीत आहे. म्हणुन गप्प बसतो. काय खबरदारी घेऊ शकतो? सगळ्यात महत्वाचं स्वसंरक्षण करण्यासाठी एखादी मार्शल आर्ट शिकून घ्यावी. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी सदैव आपल्या पर्स मध्ये पेपर स्प्रे बाळगावा. जर तो उपलब्ध नसेल तर लाल मिरची पूड बाळगावी.

In reply to by गणपा

अगदि बरोबर बोललात, ह्या विक्रुत लोकाना शिक्षा कधि होइल महित नाहि. भारतात अजुन तरि याबद्द्ल कड्क अधिनियम अमलात आलेला नाहि आनि नंतर कधि येइल असे वाटतहि नाहि..

स्वसंरक्षण करण्यासाठी मार्शल आर्ट शिकून घ्यावी. सदैव आपल्या पर्स मध्ये पेपर स्प्रे बाळगावा.लाल मिरची पूड बाळगावी. हे सगळे ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचे कि स्वताला मर्द म्हणणार्यांनी/ सामाजानार्यानी पहिला अशा प्रासंगी मदतीला पुढे येणे जरुरी आहे..........

In reply to by खबो जाप

खरंय तुम्ही म्हणताय ते. समजा कुणी 'मर्द' नाहीच आला मदतीला तर प्रत्येक स्त्री आपल्या परीने कशी सावधानता बाळगावी ते म्हणतोय.

In reply to by खबो जाप

बाईला वेळ प्रसंगी मदत करण्या पेक्षा तिचा मजे साठी वापर करण्यात खरा पुरुषी पणा आहे अस समज न्या र्या पुरुषांची संख्या आपल्या समाजात जास्त आहे. त्यांच्या कडून काय अपेक्षा बाळगणार

विश्वास बसत नाही की माणूस या थरालाही जाऊ शकतो.. :( गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केला आहे आणि स्वतःला फाशी द्यावी अशी मागणी केली आहे म्हणे.. पण आपल्याकडे रोजच बलात्काराच्या घटना घडत असतात..अचानक या एकाच केसला एवढी प्रसिद्धी का बरं मिळाली, हे काही कळलं नाही. कुणी 'बडे बाप के बेटे' आहेत का यात?

In reply to by चिर्कुट

पण आपल्याकडे रोजच बलात्काराच्या घटना घडत असतात..अचानक या एकाच केसला एवढी प्रसिद्धी का बरं मिळाली, हे काही कळलं नाही. कुणी 'बडे बाप के बेटे' आहेत का यात? जी घटना घडली आहे त्याची निर्घ्रुणता न कळता हे असले भलतेच विचार मनात प्रसवतात हे बघुन मोठाच खेद झाला. अजुनही घटनेची तीव्रता तुम्हाला कळलेली नसेल तर सांगतो: १. एकापाठोपाठ ७ सो कॉल्ड पुरुषांनी त्या मुलीवर बलात्कार केला. २. तिला लोखंडी कांबीने आणि इतर हत्यारांनी इतके मारले की तिची सगळी आतडी डॉक्टरना काढावी लागली. ३. आतड्याला दुखापत झाली आहे आणि दुरुस्त न करण्याइतपत आणि इतकी की अजुनही संसर्ग संभवतो तर यात केवऴ् पाशवी संभोग आणि बाह्यांगाला केलेली दुखापत एवढेच अंतर्भुत नसावे हे कळण्यासाठी फार प्रचंड बुद्धीची गरज नाही. ४. ती मुलगी यापुढे कधीही एका नॉर्मल माणसाचे वैवाहिक जीवन जगु शकणार नाही इतकी तिची अवस्था वाइट आहे. ५. हे पाशवी कृत्य केल्यानंतर त्या नराधमांनी त्या अवस्थेत त्या दोघांच्या अंगावरचे सगळे कपडे काढुन घेउन त्यांना चालत्या बसमधुन रस्त्यावर फेकले. ६. नंतर १ तास ती मुलगी त्या अवस्थेत रस्त्यात तळमळत होती. ७. गेल्या काही दिवसात तिच्यावर ७ ऑपरेशन्स झालेली आहेत आणि अजुनही होतील. ८. ती मुलगी अजुनही अधुन्मधुन कोमामध्ये जाते आणी ती जगेलच याची खात्री डॉक्टर्स देत नाही आहेत. ९. इतक्या क्रिटिकल अवस्थेत असणार्‍या स्त्रीवर उपचार करणारे डॉ़क्टर्स अतिशय तज्ञ असणार. त्यांनी अनेको सर्जेरी केल्या असाव्यात. अश्या डॉक्टरांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे की इतका पाशवी अत्याचार झालेले शरीर त्यांनी आजवर पाहिलेले नाही. हे सगळे वाचुन अजुनही तुम्हाला असे वाटते की ही "जस्ट अनादर केस" आहे. हॅट्स ऑफ टू यु.

In reply to by मृत्युन्जय

खरंच मला इतके डिटेल्स माहिती नव्ह्ते. 'गँगरेप' हाच एक शब्द काल मी पाहात असलेल्या बातम्यांमध्ये होता. तरीही मला या घटनेस मिळणार्‍या प्रसिद्धीबद्दल कसलाही आक्षेप नव्हता हे मी नोंदवू इच्छितो. एरवी बलात्काराच्या घटना कोणतीही वाहिनी इतका वेळ दाखवत नाही आणि इतके राजकारणीही अचानक याच विषयावर बोलत होते म्हणून असा प्रश्न मनात आला. कृपया गैरसमज नसावा. बलात्काराच्या कोणत्याही केसमध्ये गुन्हेगाराला भयानक शिक्षा मिळावी याच मताचा मी आहे. काय शिक्षा मिळावी असं मला वाटतं ते मी इथे सांगू शकत नाही.

In reply to by चिर्कुट

मृत्युंजय यांनी २,३ आणि ४ हे लिहीताना संयमाने लिहीले आहे. जो प्रकार झाला आहे त्यचे वर्णन इथे लिहीणे अशक्य आहे. गणपाने म्हणले आहे तसे मलासुध्दा वाटते. पण आपल्या देशात ते शक्य नाही.

In reply to by मृत्युन्जय

यातील काही DETAILS माहित होते , काही नाही. वाचताना त्रास झाला तो शब्दात सांगण शक्य नाही , पण तो होण मला आणि इतर वाचकांना पण होण आवश्यक . धन्यवाद

हे सगळं वाचून मला तर असं वाटायला लागलं आहे की आपण गृहितच धरून चाललोय की पुरूषानं स्वतःच्या भावनांना आवर घालण्याऐवजी स्त्रीने स्वतःच स्वातंत्र्यावर निर्बंध घातलेच पाहिजेत.. जेव्हा स्त्रिया, मुली जरी कराटे तायक्वांदो वगैरेचं प्रशिक्षण नसताना, पर्समधे पेपर स्प्रे मिरची पावडर न बाळगता रात्री उशिरापर्यंत घराबाहेर निर्धास्त राहू शकतात तेव्हा कायदा सुव्यवस्था खर्‍या अर्थाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असं म्हणता येईल.

In reply to by ह भ प

हे सगळं वाचून मला तर असं वाटायला लागलं आहे की आपण गृहितच धरून चाललोय की पुरूषानं स्वतःच्या भावनांना आवर घालण्याऐवजी स्त्रीने स्वतःच स्वातंत्र्यावर निर्बंध घातलेच पाहिजेत..
दुरदैवानं बोचरं सत्य आहे. सध्याची परिस्थिती पहाता स्वसंरक्षणाची खबरदारी घेतली तर त्यात चुक काय?
जेव्हा स्त्रिया, मुली जरी कराटे तायक्वांदो वगैरेचं प्रशिक्षण नसताना, पर्समधे पेपर स्प्रे मिरची पावडर न बाळगता रात्री उशिरापर्यंत घराबाहेर निर्धास्त राहू शकतात तेव्हा कायदा सुव्यवस्था खर्‍या अर्थाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असं म्हणता येईल.
असा स्वप्नातला भारत लवकर पहायला मिळावा अशी माझीही प्रामाणिक इच्छा आहे.

In reply to by गणपा

सध्याची परिस्थिती पहाता स्वसंरक्षणाची खबरदारी घेतली तर त्यात चुक काय?
काय गणपाशेठ काय बोलता आहात हे?तुम्ही पण स्त्रीविरोधी म्हणून गणले जाल बरं का!!

साला वाईट वाटत अश्या बातम्या वाचुन. गंगाजल चित्रपट प्रत्यक्शात येणारे बहुतेक काही वर्षात. लोक चिडतील तेव्हा खरी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. आत्ताच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवण अशक्य आहे. पुर्वीच्या काळी अशी क्रुत्य कर्णार्याचे हात पाय तोडन्यात येत असत, तेच परत सुरु व्हाय्ला हवय.

कामातुराणां न भयं न लज्जा| चीड येउन संवेदनशील माणसाचा तोल जाउन सूड घ्यावा असे वाटावे अशीच परिस्थिती आहे. बेदरकार पणे ड्रायव्हींग करुन सिग्नल तोडून जाणारे वाहनचालक पाहिले कि मनातल्या मनात मी त्यांच्या मागे जाउन त्यांच्या गाडीवर बाँब टाकतो किंवा त्यांना मशीनगनने गोळ्या घालतो. इतरांच्या जिवाशी खेळतात काय? यांना अशीच शिक्षा पाहिजे असे वर मनातल्या मनात म्हणतो. मी मनातल्या मनात या बलात्कार्‍यांना हाल हाल करुन जिवंत ठेव अशी माझ्या देवाजवळ प्रार्थना केली. फाशी हा शॉर्टकट झाला.

घडलेल्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. दोषी व्यक्तींवर शक्य तितकी लवकर आणि कठोर कारवाई व्हायला हवी. :(

In reply to by नितिन थत्ते

बरं. अर्धवटराव

दरवेळी लिहितो तेच पुन्हा १. मिरची, स्प्रे, पावडर वगैरे वगैरे २. बलात्कार झालाच तर लगेच तक्रार करणे ३. बलात्कार झाल्यावर आंघोळ न करता + कपडे न बदलता पोलिस स्टेशनला जाणे आणि गेल्या गेल्या बायोलॉजिकल एव्हिडन्स कलेक्ट करायला लावणे (शक्य असल्यास सहा/आठ तासांच्या आत पो.स्टे.ला पोचायचे आहे, नसल्यास लवकरात लवकर) सर्वात मुख्य बलात्कार झाला यात अजिबात लाज न बाळगणे. जी काय लाज वाटायची आहे ती बलात्कार करणार्‍याला वाटली पाहिजे.. बलात्कार हा खुनापेक्षा मोठा गुन्हा आहे वगैरे वाचलं की बलात्कारीत व्यक्तीलाच आपण अधिक कोशात ढकलत असतो असे वाटते. अवांतरः बलात्कार करणार्‍याला कडक शिक्षेपेक्षा जलद शिक्षा महत्त्वाची वाटते. अति-शिक्षा कडक झाली की गुन्हेगार गुन्हाची कबुली द्यायला नकार देतो आणि मग ते सिद्ध करण्यासाठी बलात्कारीतेला नको त्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. शिवाय अतिकडक शिक्षेमुळे घाबरून खून करणे वगैरेही होऊ शकते. असो. हे मत द्यायची ही वेळ नव्हे.. पण राहवत नाही

In reply to by ऋषिकेश

अवांतरः बलात्कार करणार्‍याला कडक शिक्षेपेक्षा जलद शिक्षा महत्त्वाची वाटते. अति-शिक्षा कडक झाली की गुन्हेगार गुन्हाची कबुली द्यायला नकार देतो आणि मग ते सिद्ध करण्यासाठी बलात्कारीतेला नको त्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. शिवाय अतिकडक शिक्षेमुळे घाबरून खून करणे वगैरेही होऊ शकते. ओक्के. समजा केवळ एकाच वर्षाची शिक्षा जाहीर केली तर Voluntary Disclosure of Income स्कीम प्रमाणे सगळे बलात्कारी रांगा लावुन आपल्या गुन्ह्याची कबुली देतील काय? किंवा हायकाय एका वर्षाची तर शिक्षा आहे. कर बलात्कार दे कबुली असा प्रकार करुन बलात्कारित स्त्रीचे आणि कायद्याचे काम सुकर करतील? बलात्कार हा खुनापेक्षा मोठा गुन्हा आहे की नाही हे मला तरी वाटते समाजच ठरवेल. आणि सद्यस्थितीत तो तसा आहे. डोक्याने विचार करणार्‍या आणि माणुसकी असणार्‍या मुठभर लोकांनी समाज बनत नाही. तसे असले असते तर बलात्कारच झाले नसते. दुर्दैवाने आजही ९९% जनता बलात्कारित मुलीला आपली पत्नी म्हणुन स्वीकारणार नाहित. लग्न आधीच झाले असेल तर गोष्ट वेगळी. समाज अजुनही इतका पुढारलेला नाही की बलात्कारित मुलीला समजवावे की " तु कशाला घाबरतेस. घाबरले तर त्याने पाहिजे. तु काहीच चुक केलेली नाही". अब्रु ही नेह्मी ज्याच्यावर बळजबरी होते त्याचीच जाते. कारण तो माणूस मनातुन खचुन जातो आणी समाजही अजुन तसेच समजतो. त्यामुळे बलत्कार्‍याला जोवर त्याच मानहानीला सामोरे जावे लागत नाही तोवर तरी त्याला त्याच्या गुन्ह्याची तीव्रता कळणार नाही आणि बलात्कारित स्त्रीला न्याय मिळाल्यासारखा वाटणार नाही. राहता राहिला कडक शिक्षेचा प्रश्न तर कडक शिक्षा म्हणजे फाशी असेल तर त्याच्या मीही विरोधात आहे. बलात्कार्‍याला भर चौकात नागडा करुन त्याला सर्वांसमक्ष नपुंसक बनवला पाहिजे आणि मग ते त्याच्या कपाळावर, हातावर, पायावर गोंदवुन त्याला नग्नावस्थेत रस्त्यावर सोडला पाहिजे. आणि हो त्यावर २४ तास पहारा ठेवुन आत्महत्या करण्यापासुन प्रवृत्त केले पाहिजे. त्या असहाय्य, अपमानित अवस्थेत तो जगत राहिलाच पाहिजे. १० जणांना शिक्षा करा म्हणजे बंद दरवाज्याआड आपल्या बायकोवर देखील बळजबरी करण्याची हिंमत करणार नाही कोणी.

In reply to by मृत्युन्जय

अरुणा शानभाग बलात्कार आणि मारहाण यानंतर गेली ३८ वर्षे केवळ जिवंत राहिली आहे आणि तिच्यावर अत्याचार करणार्‍यावर बलात्काराचा आरोप सुद्धा लावला नव्हता म्हणे. तो पशु फक्त चोरी आणि मारहाण या दोन आरोपांवरून सात वर्षे शिक्षा भोगून नॉर्मल आयुष्य जागायला मोकळा सुटला. :(

In reply to by मृत्युन्जय

अब्रु ही नेह्मी ज्याच्यावर बळजबरी होते त्याचीच जाते. कारण तो माणूस मनातुन खचुन जातो आणी समाजही अजुन तसेच समजतो
असे का होते? तो माणूस का खचून जातो? बलात्कार हा खुनापेक्षा वाईट आहे वगैरे वाक्ये जेव्हा समाज ऐकवतो तेव्हा आधीच भांबावलेल्या माणसाला आपल्यावर काहितरी भयंकर दिवस आले आहेत असे वाटते. कित्येक बलात्कार तक्रार करूनही केवळ यामुळे सिद्ध होऊ शकत नाही कारण त्या स्त्रिया आंघोळ करून व त्यावेळचे कपडे जाळून, जिथे बलात्कार झाला तिथेच टाकून येतात. हे होते ते ही एकूणच 'बलात्कार' या विषयाबद्द्ल माहिती नसल्याने किंवा तितके समाज प्रबोधन नसल्याने. याविषयावर कोणी सांगायला गेलाच तर लोक यावर बोलायचे टाळतात तरी नाहितर काहितरी पोकळ भावनिक भुमिका घेतात. यात मानसिक ताण पडतो तो बलात्कारीत स्त्रियांवर कडक कायदे (आता आहे त्यापेक्षा अधिक कडक म्हणजे फाशीच झाली कारण आजन्म कारावासाची तरतूद आधीच आहे) करून बलात्कार कमी होतील असे मानणे म्हणजे दिवास्वप्न बघितल्यासारखे वाटते.
बलात्कार हा खुनापेक्षा मोठा गुन्हा आहे की नाही हे मला तरी वाटते समाजच ठरवेल. आणि सद्यस्थितीत तो तसा आहे.
यावर मी काहिच बोलू शकत नाही. अश्याच कमेंट्स मुळे जराही चुक नसणार्‍या बलात्कारीत स्त्रिला आत्महत्या करायला समाज प्रवृत्त करत असतो. (याच वाक्याचा ध्वनित अर्थ त्याने तुला मारून टाकले असते तर परवडले असते पण हे असे कशाला सोडले! असा होतो) अश्या विधानांचा निषेध करावा तितका कमीच प्रत्येक गुन्ह्याला किती शिक्षा असावी हे बहुमत ठरवेल याच्याशी सहमत. मी केवळ माझे मत दिले, जे सद्यस्थितीत बहुमत नाही याची पूर्ण जाण आहे.

In reply to by ऋषिकेश

यावर मी काहिच बोलू शकत नाही. अश्याच कमेंट्स मुळे जराही चुक नसणार्‍या बलात्कारीत स्त्रिला आत्महत्या करायला समाज प्रवृत्त करत असतो. बरोबर आहे. पण ज्या समाजात आपण राहतो तिथे जर ९०% लोक अजुनही याच मानसिकतेतील असतील तर सद्यपरिस्थितीत तरी बलात्कार हा खूनापेक्षा मोठा गुन्हा ठरतो. गरज आहे ती समाजाची मानसिकता बदलण्याची. पण ती इतक्या सहज बदलता येत नाही. त्यामुळे किमान कायदा कठोर करावा. तो ही जर नरमाईचा असेल तर काय उपयोग? (याच वाक्याचा ध्वनित अर्थ त्याने तुला मारून टाकले असते तर परवडले असते पण हे असे कशाला सोडले! असा होतो) अश्या विधानांचा निषेध करावा तितका कमीच माफ करा पण मी असे म्हणालो असे जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही फारच चुकीचे बोलत आहात. मी असे कधीच म्हणालो नव्हतो. केवळ बलात्कार हा खूनापेक्षा मोठा गुन्हा आहे असे मी म्हटल्याने मी पिडीत स्त्रियांना "मरण बरे" असा उपदेश कसा करतो ते कळत नाही. पण सद्यस्थितीत अश्या स्त्रियांचे जीवन एकुण समाज फारसे सुसह्य करत नाही हे तरी मला अमान्य करता येत नाही. अश्या परिस्थितीत तिला मिळालेला न्यायच तिचे जीवन सुसह्य करु शकतो. बलात्कार हा शारिरिक नुकसानीपेक्षा मानसिक नुकसान अधिक करतो त्यामुळे मानसिक समाधान होणारा न्यायच असावा. चोरीची शिक्षा पैशाच्या स्वरुपात होउ शकते, खूनाची शिक्षा फाशी असु शकते मग मानसिक यातनांच्या बदल्यात मानसिक यातनाच व्हायला पाहिजेत आणी पशुवत पुरुषत्वाचे प्रदर्शन करणार्‍यांकडुन त्यांची लंइगिक मर्दुमकी काड्।उन घेण्याहुन अधिक चांगला न्याय असुच शकत नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या गुन्ह्यांची शिक्षा कृपा करुन बलात्काराला लावु नका. शिवाय बलात्कारित स्त्रीने काय काळजी घ्यावी हे तुम्ही जे सांगितले ते १००% बरोबर पण अव्यवहार्य आहे. समाजाची मानसिक स्थिती लक्षात घेता सद्यस्थितीत ते शक्य नाही. पहिल्यांदा समाज प्रबोधन करावे आणि मग समाज तितपत समजुतदार झाल्यानंतर पिडीत स्त्रियांकडुन अशी अपेक्षा करावी असे मला वाटते.

In reply to by मृत्युन्जय

दुर्दैवाने आजही ९९% जनता बलात्कारित मुलीला आपली पत्नी म्हणुन स्वीकारणार नाहित. लग्न आधीच झाले असेल तर गोष्ट वेगळी.
लग्न झालं म्हणजे त्या मुलीचं कोटकल्याण होतं का? लग्न ही मुलगी/स्त्रीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे हे शिकलेले, खाऊन-पिऊन सुखी घरातले, चर्चाप्रेमी, बुद्धीजीवी लोक समजतात तर खरोखर अजून चिक्कार शिक्षणाची आवश्यकता आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोटकल्याण नसेल होत, पण लग्न झाल्यावर समाजात मानाने जगायला आधार मिळतो. आपल्या समाजातील प्रचलीत रीतीनुसार लग्न न करता रहाणे स्त्रियांसाठी फारसे भुषणास्पद नाही. त्यात बलात्कारीत मुलीला चांगल्या घरी लग्न व्हायची शक्यता जवळ जवळ नाहीच.या मुळेच बलात्कारीत मुलगी आत्महत्येचा मार्ग स्विकारते. या चालीरीती बदलायला खरोखच प्रचंड लोकप्रबोधनाची गरज आहे. आणी पुढच्या ५० वर्षांतही आपला समाज या चालीरीती बदलेल असे वाटत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुश्मिताचं कौतुक मलाही वाटतंच पण सुश्मिताकडे जे स्टेटस आहे, ज्या वर्तुळात ती वावरते आणि जो पैसा आहे, हे सगळं नसतं, तर तिने जे केलं आहे ते तिला शक्य झालं असतं का ह्याचा वस्तुनिष्ठरीत्या जमल्यास जरुर विचार करावा. Proff, if not iron solid, is not proof enough.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमची आदर्श - सुश्मिता सेन
क्रांतिकारी जन्माला यावा पण तो शेजाऱ्याच्या घरात, नाही?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लग्न म्हणजे कोटकल्याण नव्हे या मताविषयी: कोटकल्याण नसले तरी लक्षकल्याण किंवा सहस्रकल्याण इतपत सुख त्याला असाईन करायला हरकत नाही. मी काय म्हणतो, की लग्नाशिवाय फार काही नुकसान होत नाही असं का बुवा म्हणायचं? लग्न करण्यात एक सहजीवनाचा, कुटुंब बनवणं त्या कुटुंबाचा मानसिक,शारिरीक आधार असे अनेक आनंद असतात. ते नसले तर जगात इतर काहीच आनंद नाहीत असं नव्हे, पण स्वतःचा नवरा / बायको असणं, पोरंबाळं असणं हे खूप मोठं सुख आहेच. मला तर मी घरी आल्यावर पोरगं येऊन झळंबतं तेव्हा जगण्याचं सार्थक वाटतं. तीव्र निराशेच्या वेळी सुद्धा बायको आणि पोर मला जगाशी घट्ट बांधून ठेवतात. एकटेपणात वेगळं स्वातंत्र्य असलं तरी ते बॅचरलीमधे उपभोगून झालं. आता हे पाश जगण्यासाठी फार उत्तम कारण पुरवतात. तेव्हा लग्न हे ओव्हरऑल चांगलं असू शकतं असं मानायला काहीच हरकत नाही. ते होऊ शकलं नाही याचा अर्थ आयुष्य भकास असा नव्हे, पण ते न होण्याने एक मोठं नुकसान झालं असं म्हणणं चूकही नाही.

In reply to by गवि

अगदी अगदी... संसार ही माया असेल , पण ती फार सुंदर आहे आणि आजतरी मला मोक्षापेक्षा ही मायाच जास्त प्यारी आहे.. लग्न करणे वा न करणे हा बर्‍यापैकी व्यक्तीगत चॉईस असला तरी समाजधारणेसाठी लग्नाचा पर्याय मान्य करणारे लोक जास्त असणे गरजेचे आहे. शेवटी बंध तर सगळीकडेच आहेत, साधा चहा घ्यायचा म्हटला तरी सकाळी उठुन दुध आणायच बंधन असतं, बंधनात राहुनही उन्मुक्त जगता येत, आणी उन्मुक्त जगतानाही अनेक बंधन पाळावी लागतात, सो लेट इट बी..

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लग्न झालं म्हणजे त्या मुलीचं कोटकल्याण होतं का? मी असे कुठे म्हटले आहे? लग्न ही मुलगी/स्त्रीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे हे शिकलेले, खाऊन-पिऊन सुखी घरातले, चर्चाप्रेमी, बुद्धीजीवी लोक समजतात तर खरोखर अजून चिक्कार शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणजे कोणते लोक? मी असे काही म्हटलेले नसल्याने इथे मी अभिप्रेत आहे असे मला वाटत नाही तरी स्पष्ट करुन सांग म्हणजे बरे पडेल. अजुन काय उत्तर देउ मला वाटते तुझ्या प्रतिसादाची गल्ली चुकली.

In reply to by मृत्युन्जय

हं... मग बलात्काराला बळी पडलेल्या मुलीच्या लग्न होण्याचा उल्लेख का? संबंध काय या दोन गोष्टींचा? एखादीचा नवरा जिवंत नसेल तर तिला सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमाला न बोलावणारे आणि "अमकी गोष्ट झाली तर तिचं लग्न कसं होणार", "लग्न नाही झालं तर तिला सामाजिक प्रतिष्ठा नाही" म्हणणारे यांच्यातला मला फार फरक दिसत नाही. सुशिक्षित, well-to-do, चर्चा करण्यास उत्सुक लोकांकडून माझ्या खूपच जास्त अपेक्षा होत्या. असो. --- सुश्मिता सेन वेगळ्या सामाजिक वर्तुळात वावरत असेलही; तिच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचतात. किंवा ती याच समाजाचा एक हिस्सा आहे. संपर्क नसलेल्या एखाद्या परग्रहावरची नाही. माझ्या सामाजिक वर्तुळात लग्न न करता एकापेक्षा अधिक बॉयफ्रेंड असणार्‍या, लग्न न करता मूल दत्तक घेणार्‍या किंवा लग्न न करण्याचा निर्णय घेणार्‍या स्त्रिया आहेत. संख्येने कमी आहेत, पण आहेत; आणि त्यांच्यापैकी कोणीही बहिष्कृतेचे आयुष्य जगत नाहीत. त्यांच्याबद्दल इथे कोणाला माहित असण्याची शक्यता फार नाही. त्या आमच्या समाजाचा भाग नाहीत किंवा त्या अ‍ॅबनॉर्मल आहेत म्हणून त्यांना वेगळं काढणंही सहजशक्य आहे. (मग हे थोडं नाडीसारखं होतं, अनुभव घ्या आणि मगच विश्वास ठेवा. स्वतःच या स्त्रियांना बहिष्कृत करा, वेगळं म्हणा आणि मग म्हणा "बघा त्या वेगळ्या आहेत, बहिष्कृत आहेत.")

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हं... मग बलात्काराला बळी पडलेल्या मुलीच्या लग्न होण्याचा उल्लेख का? संबंध काय या दोन गोष्टींचा? अर्थातच संबंध आहे. मी समाजाच्या मानसिकतेबद्दल बोलतो आहे. समाजाची अशी मानसिकता आहे. लग्न झाल्याने मुलीचे काही कल्याण किंवा अकल्याण होत असे काहिच बोललेलो नाही. लग्न ही दोन व्यक्तींची गरज असते. जितकी मुलीची तितकीची मुलाची किंवा जितकी मुलाची तितकीच मुलीची. कौमार्य आणि लग्न या २ गोष्टींचा संबंध जर समाज लावत असेल किंवा त्यांच्या पावित्र्याच्या संकल्पना जर बलात्काराशी निगडीत असतील तर संबंध नक्कीच आहे. आजही आपल्याच समाजातील पुरुष बलात्कारित मुलीशी लग्न लावायला तयार होत नाहित त्याचे कारण यामागे आहे. हे योग्य आहे असे मी कुठे म्हटल्याचे किंवा त्यामुळे स्त्रीजातीचे काही प्रचंड नुकसान होते आहे असेही मी कुठे म्हटलेले नाही. तुला माझ्या प्रतिसादाचा रोखच कळालेला नाही आहे काय? लग्न करणे गरजेचे आहे की नाही, लग्नाशिवाय प्रेम होउ शकत नाही का आणी आयुष्यभर टिककु शकत नाही का वगैरे प्रश्न आत्तापुरते सोडुन दे. पण लग्नानंतर आधाराची आणि प्रेमाची गरज दोघांनाही असते. जर सुखा समाधानाने नांदले तर दोघांचेही त्यातुन कल्याणच होते. परंतु आयुष्याची इतिकर्तव्यता लग्नामुळे ना मुलाची होते ना मुलीची होते. मी तसे म्हटलेही नाही आहे आणि माझ्या वाक्यांतुन तसे ध्वनितही होत नाही आहे. एखादीचा नवरा जिवंत नसेल तर तिला सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमाला न बोलावणारे आणि "अमकी गोष्ट झाली तर तिचं लग्न कसं होणार", "लग्न नाही झालं तर तिला सामाजिक प्रतिष्ठा नाही" म्हणणारे यांच्यातला मला फार फरक दिसत नाही. अर्थाअर्थी काहीच फरक नाही. तसे म्हटला तर आहे देखील. पहिल्या प्रकारातील लोक एका व्यक्तीसमूहाला कुठल्या तरी गोष्टीपासून वंचित ठेवत आहेत तर दूसर्‍या मधील तो व्यक्तीसमूह एखाद्या गोष्टीपासून वंचित राहिला आहे किंवा राहिल याबद्दल हळहळ व्यक्त करत आहे. यात असे व्हायला नको पण होते आहे याचे दुंख आहे. एखादी गोष्ट मिळाल्याने फायदा असो किंवा नसो पण काही चुकीच्या कारणाने त्या व्यक्तीला त्या अधिकारापासून वंचित रहावे लागते आहे ही विषण्णता आहे. दोन्हीमध्ये एकांगी विचार केलास तर काहीच फरक नाही पण नीट विचार केलास तर २ धृवांचा फरक आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लग्न झालं म्हणजे त्या मुलीचं कोटकल्याण होतं का?
लग्न न झाल्याने कोट कल्याण होते असेही नाही. मुळात दर वेळी टोकाला गेलेच पाहिजे का ताई ?? कुठे बलात्कार कुठे सुष्मिता सेन.. प्रतिसादातले एक वाक्य उचलायचे आणि त्यातून उगाच काहीतरी गर्भित अर्थ काढायचे कशाला? अजून बोललो असतो, पण जाऊदे. आधीच इथे वैयक्तिक प्रश्न विचारल्याचे आरोप होतात, उगाच अजून गोंधळ नको.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

whatever.. :) मुद्दा समजून न घेता ताडताड आणि बेसलेस विधाने करण्यामधे हशील नाही. तितक्यापुरतीच ती ठीक वाटतात. सबब पास.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्थ समजून न घेता भावनेच्या आहारी जाऊन दिलेला उथळ स्त्रीमुक्तीवादी प्रतिसाद. 'बलात्कार झालेया स्त्रीला पत्नी म्हणून स्विकारणार नाहीत' ह्या वाक्याचा अर्थ त्या मुलीला पुन्हा पूर्वीसारखी, इतर मुलींसारखी नॉर्मल वागणूक मिळणार नाही असा होतो. आणि लग्न करून कोटकल्याण होत नसलं तरी जवळ जवळ प्रत्येक जण झक्कत लग्न करतोच नी त्या लग्नसंस्थेचे व्यवस्थीत फायदेही उपटतोच. सबब, ह्यावर बोलणं उचीत होणार नाही.

वरती काही प्रतिसादातल स्वसरंक्षण वगैरे वाचून गंमत वाटली. चूक ते चूकच, सध्याची परिस्थिती पाहून वगैरे म्हणजे काय ते कळलं नाही. उद्या मग, 'असं आहे ते आहे', आणि म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी बुरखा घालण्याचे सल्ले सुद्धा देतील लोक! हे म्हणजे मुंबई मनपा सारखं नाले स्वच्छ करण्याचं सोडून आता सद्ध्याची परिस्थिती पाहून लोकांना वासाचा त्रास होउ नये म्हणून त्यावर सुगंधी फवारणी करण्यासारखं आहे. :)

झालेली घटना अंधार्‍या/निर्जन/गावाबाहेर्/मध्यरात्री/एकटी मुलगी वगैरे घडलेली नाहीये. अत्यंत पॉश समजल्या जाणार्‍या वस्तीत झालेली आहे. ज्या मार्गावरून ९० मिनिटे ही अमानुष घटना घ्डली त्या मार्गावर ३ पोलिस स्टेशनं आहेत. कितीही पेपर स्प्रे, कराटे वगैरे शिकलं तरी ७ लोकांसमोर काय काय पुरं पडणार? पोलिसांच्या सांगण्यानुसार या मुलीचा मित्र अतिशय सुदॄढ समजावा असा आहे ( ही इज इक्वल टू २ असं कमिशनर म्हटले ) त्यालाही डोक्यात लोखंडी रॉड घालून मारलंय. याची सुरूवात का झाली तर या नालायकांच्या अरबट चरबट क्मेंट्स ना 'गप्प बसा' असा शाब्दिक विरोध केल्यामुळं. नंतर त्या मुलाला मारयला लागल्यावर मुलीनं केलेला विरोध ...त्यामुळे स्वसंरक्षण करायला येत असेल आणि करायची मानसिकताही असेल तरी काय उपयोग? टिंटेड गाडया आणि जाड पडदे असलेल्या गाडया सुप्रिम कोर्टानं बर्‍याच वर्षांपुरवी बेकायदेशीर ठरवल्या असतानासुद्धा अशी गाडी बेदरकारपणे शहरात सकाळ-संध्याकाळ फिरतेय, पोलिस अशी गाडी फिरू देतात. या दोघांना मारण्याआधी एका सुताराला लुटलं ७ जणांनी ७५०० रूपयाला..., म्हण्जे चांगलेच सराइत/अट्ट्ल गुन्हेगा/अट्ट्ल, पहिली वेळ नसावी. जर या सुताराला पोलिसांवर जरा जरी विश्वास असता तर त्यानं ताबडतोब तक्रार केली असती आणि कदाचित पुढची घटना टळली असती. झालेल्या घटनेसाठी मी पोलिसांना ६० % जबाबदार धरते.

In reply to by पुष्करिणी

अत्यंत पॉश समजल्या जाणार्‍या वस्तीत झालेली आहे.
सहमत. बलात्कार तर एक्स्ट्रीम गोष्ट आहे. स्त्रियांना अगदी रोजचे येणारे अनुभव ही तसेच. अगदी आयटी कंपनीच्या बसेस मध्ये आधी जाउन एसल शीटावर पुरुष बसतलेले बघितलेत. याचं कारण नंतर येणार्‍या बायकांचे स्पर्श 'एंजॉय' करण्यासाठी' असं एका त्यापैकीच मित्रानं सांगितल. :(

In reply to by दादा कोंडके

निदान काही लोकांसाठी परदु:ख शीतल नसतं आणि काही स्त्रिया स्वबडव्या (masochist) नसतात हे पाहून आनंद झाला.

स्वसंरक्षण ही बाजूही महत्वाची आहे अन सामाजिक विरोधही. घटना घडल्यानंतर चिकित्सा काय कामाची ? शक्यतो, असे प्रकार होण्यापूर्वीच आजूबाजूला लोक असतील तर त्यांनी एकजुटीने रोखले पाहिजे. अन्यथा होऊन गेल्यानंतर समजले तर बलात्कार करणाऱ्याना ओळखीच्या सर्व लोकांनी इतकेच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनीही छी:थू करून वाळीत टाकले पाहिजे. सर्व प्रकारे त्यांची मानहानी, पदोपदी अपमान करून अन चुकीच्या वर्तनाची जाणीव करून दिली पाहिजे. ते अन्न-वस्त्र निवाऱ्याला महाग होतील अशी वेळ समाजानेच आणली पाहिजे. तरच हे प्रकार कमी होतील.

In reply to by सस्नेह

तुमचे म्हणणे पटले. खरं तर बलात्कारीला फाशीची शिक्षा देऊन एका फटक्यात मोकळं करण्यापेक्षा त्याचं जगणं अवघड करायला पाहिजे. पण बलात्कारीची मान, अब्रू, इज्जत वगैरे वगैरे कधीच जात नसते. अब्रू जाते ती निपराध स्त्रिचीच! तुम्ही म्हणताय ती मानहानी, पदोपदीचा अपमान, समाजाकडून छी-थू स्त्री सहन करते. आरोपी मात्र स्वतःला मर्द म्हणवत अभिमानाने मिरवतो. जसं एखाद्याने चोरी, अफरातफर केली तर ते करणार्‍याची अब्रू जाते तशी बलात्कार करणार्‍याची का जात नाही? छे! कालपासून मन नुसतं सुन्नं झालंय. डोक्यात विचारांचा कल्लोळ होतोय पण शब्दात मांडणं जमत नाहीये. :(

स्वसंरक्षण, घरात लवकर येणे आपली काळजी आपण घेणे वगैरे ठीक आहे.यासाठी ही लिंक पहावी - http://www.womanatics.com/2012/03/9-critical-safety-rules-for-women.html पण घरातही बलात्कार झालेल्या कितीतरी केसेस आहेत. घरात घुसलेल्या अनोळखी व्यक्तीने , ओळखीतल्या व्यक्तिने, विश्वास असलेल्या व्यक्तीने, अगदी नवर्‍याने सुध्दा बलात्कार केलेल्या केसेस आहेत. अशावेळी बाईने वागून वागून तरी किती जपून वागायचे ? मुळात बाईकडे भोग्य वस्तू म्हणुन बघण्याची मानसिकता तर बदललीच पाहिजे पण कायद्यानेही अतिकडक शिक्षा झाली पाहिजे.आणि बलात्कार करणारा गुन्हेगार शिक्षा संपवून बाहेर आलाच तर त्याला समाजात अजिबात मानाने जगता येऊ नये ..त्याला वाहन चालवण्याचा परवाना मिळू नये, बँकेत खाते उघडता येऊ नये, लोन मिळू नये,वगैरे..अशा अनेक सुविधा वा गरजा ज्या सामान्य नागरिकाला मिळतात वा असतात त्या त्याला मिळू नयेत / पूर्ण करता येऊ नयेत.त्याच्या हातावर 'मी बलात्कारी आहे' असे गोंदवावे.

In reply to by पक्या

मुळात बाईकडे भोग्य वस्तू म्हणुन बघण्याची मानसिकता तर बदललीच पाहिजे>> १००% खरे आहे. पण कसे काय??? :(

In reply to by कवितानागेश

या साठी खरे तर स्त्रियांनी कणखर व्हायला हवे,वरच्या केस मध्ये जाउ द्या पण एकट्याने जेव्हा हा प्रकार होतो तेव्हा खरे तर स्त्रियांनी त्याला लाथेने नपुंसक करायला हवे,जेव्हा मानसावर हल्ला होतो तेव्हा तो जीव एकवटुन प्रतीकार करतो तसे.
मुळात बाईकडे भोग्य वस्तू म्हणुन बघण्याची मानसिकता तर बदललीच पाहिजे>> १००% खरे आहे. पण कसे काय???
जो पर्यंत एक पुरुष आपल्या बायकोला मान सन्मानाने घरी वागवत नाही तो पर्यंत ही मानसीकता बदलने किंवा बदलवने अवघड आहे,यात एक गोष्ट नमुद करावीसी वाटते की पाश्चात्यांचे अन्धानुकरण्,प्रत्येक शहरात बोकाळलेले पब नाइट क्लब हे सुध्दा कारणीभुत असतात,याला कोण आवर घालणार मागे इण्डीया टुडे च्या नाइट क्लब विशेषांकात एक क्लब वाल्याने सांगीतले की आमच्या क्लब मध्ये मुख्यमंत्री सुध्दा येतात म्हने, मणीपुरी होता तो खरे खोटे देवच जाणो

In reply to by कवितानागेश

मुळात बाईकडे भोग्य वस्तू म्हणुन बघण्याची मानसिकता तर बदललीच पाहिजे>> सहमत. आमच्या समोर तर प्रत्येक माध्यम हे थोड्या बहुत प्रमाणात स्त्रिचे असे चित्रण हिरहीरीने रंगवत आहे. कुठल्या नटीमधे किती सेक्स अपील आहे यालाच महत्व आहे. संस्कार होणार कसा जेव्हा माध्यमांचा मारा जोरात आहे. "मैं करू तो साला कॅरॅक्टर ढीला है" आमच्या कानावर दणदणत असतो. असो. ती मुलगी मरणयातनातून जात असताना असली चर्चा मला योग्य न वाटल्याने हा एकच प्रतिसाद देऊन थांबतो. बाकी चालूद्या.

In reply to by पक्या

मानसिकता बदलणे हाच खरा उपाय आहे पण ती बदलेल याची शक्यता कमीच , पण म्हणून कुणी उपट सुम्भाने असे पाशवी कृत्य करावे हे अजिबात मान्य नाही. स्वत: काही बायकाच लोकांच्या या मानसिकतेचा स्वताच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात त्या पण या मानसिकतेला वाढवायला कारणीभूत आहेत आणि अप्रत्यक्षरीत्या अशा पाशवी क्र्युत्या साठी पण तुम्ही सुचवलेले शिक्षेचे मार्ग उत्तमच .

त्या आधी आपला नवरा एक हलकट माणुस आहे हे त्या स्त्रीला कळु नये काय? त्याच्या जवळ राहण्यापेक्षा तीने घटस्फोट घेणे योग्य होते.पण दिल्लीची केस ह्या गटात मोडत नाही. मुलींनी रात्री ७ नंतर घराबाहेर पडु नये हा त्यावरील उपाय नाही. मुळात आपल्या कडे स्त्री-पुरुष भेदभाव जाती व्यवस्थेपेक्षा खुप भिनला गेला आहे. सुंदर मुलगी किंवा बाई दिसली की आपण पुरुष अगदी वळुन वळुन त्या स्त्री कडे बघत असतो.रस्त्यावर जर कोणी एकाद्या स्त्रीच्या अगंचटी लागत असेल तर आपण बिनधास्त डोळेझाक करतो.आपण बनियन वर फिरले तरी चालेल पण स्त्री ने अंगभर कपडे घातले पाहिजेत ही मानसिकता सगळी कडे आहे.तसेच दर हजारी पुरुषांपेक्षा महिलांचे घटलेले प्रमाण देखिल खुप चिंताजनक आहे.भारतात १०००/७५० असे जवळ जवळ सगळ्या राज्यात आहे.तसेच भारतात लैगिंक भावनाचा निचरा करणे देखिल खुप अवघड काम आहे. इथे विवाहबाह्य संबध सामाजिक तसेच कायद्याच्या नजरेत मोठा गुन्हा आहे.त्यामुळे देखिल बलात्काराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.शहरात हा प्रश्न खुप गंभीर आहे. काही ठिकाणी विदेशात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे त्याप्रमाणे आपल्या इथे काही शहरात देखिल प्रायोगिक तत्वावर वेश्याव्यवसायाला मान्यता द्यायला हवी. आरोपीना फक्त कठोर शिक्षा करुन हा प्रश्न सोडवणे शक्य नाही. त्यासाठी लोकांच्यात जागृती करणे गरजेचे आहे. कोणी जर मुळींची छेड काढत असेल तर त्याला लगेच जाब विचारणे गरजेचे आहे.सडकसख्याहरींच्या वर पोलिसानी कडक कारवाई करणे गरजेचे आहे. स्त्रींयाची छेडछाड करणार्‍या लोकाना सरकारच्या सर्व सोयीतुन वगळुन टाकले पाहिजे. म्हणजे त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करणे,सरकारी अनुदाने किंवा शिष्युवृत्या बंद करणे,पुढची पायरी सरकारी नोकरी साठी अपात्र करणे असे उपाय करुन हे आटोक्यात येवु शकते.

(साल-१९९१ ते१९९६) मी कॉलेज करत असताना एका दुर्गम खेडेगावातून रोज अर्धा तास सुनसान रस्त्याने चालत यावे लागे. रोजचा दिवस पोटात भितीचा गोळा घेऊनच. एकदा एक रिक्षावाला मागेही लागला होता. कशीबशी निसटून घर गाठले. अजूनही अंगावर शहारा येतो. अर्थात बसची सोयच नव्ह्ती आणि शहरात रहाण्यासारखी परिस्थीती नव्ह्ती. शिक्षण हवे असेल तर पर्याय नव्हता. त्यावेळी बाबांनी सांगितलेले एक वाक्य आठवते, माणसा व्यतिरीक्त कोणताही प्राणी उगाच अंगावर येत नाही. वाघ आला तरी तो आपल्या वाटेने जाईल पण माणसाचा भरवसा नाही.

In reply to by अनन्न्या

माणसा व्यतिरीक्त कोणताही प्राणी उगाच अंगावर येत नाही.
अगदी १००% सहमत. म्हणूनच अशा विकृत लोकांबद्दल त्रागा करताना त्यांना जनावर वगैरे म्हणणे जीवावर येते.

यकटी बाई बगितली, का मनानं विकृत आसलेला पुरुष लगीच जनावर बनतुया. बायांनी एक जमन्यासारका सोपा उपाय करावा. आपल्या आजूबाजूला न्हेमी ३-४ बायका आसतील याची खात्री करुन घ्यावी. आपुन येकटीच आन् भवती सगळं पुरुष आसा प्रसंग आसंल तितं बाईचं मन आलर्ट व्हायालाच हवं. एकांद्या बाईच्या वाटला पुरुष जात आसल आनि बाकी दोगींनी जरा आवाज चडवला तरी पुरुषातलं जनावर *** शेपूट घालतं. बाईचा यकटेपना हा कंदीबी तिचा वैरीच ठरनार. मैत्रिनींच्या घोळक्यात आसावं हे चांगलं. यकटा नवरा किंवा मित्र सात सात गुंडांना भारी पडू शकत न्हाई. त्ये सगळं पिक्चरमंदी बगाया चांगलं आसतं.

दिल्लितिल पोलिस अधिकारि जर असे विचारत असेल कि," गुन्हा घडल्यावर त्याचि पोलिसात नोन्द केलि का ..."??? आणि वर तोन्ड करुन हसत असेल तर यावर तुमचे काय मत आहे ????? आधि लोकान्नि तिला रुग्णालयात दाखल करयला हवे होते कि आधि पोलिसान्ना कळवायला हवे होते ...??? याचे महत्व पोलिसन्नाच कळत नसेल तर हे लोक कसे काय संरक्षण करणार स्त्रियांचे..?? दुसरे असे कि माझे तर म्हणणे आहे कि या नराधमांना फाशीची शिक्षा न देता भर रस्त्यावर विवस्त्र करुन चाबकाचे फट्के मारुन लोळा गोळा करुन तसेच रस्त्यात फेकुन द्यायचे .कोणीहि त्यांचि विचार्पूस नकरता , कोणत्याहि प्रकारचि मदत त्यांना न देता अन्न्पाण्यावाचुन तसेच फेकुन द्यायचे जरा पक्षांन्नि पण त्यांचे लचके तोडावेत . आणि अशाच अवस्थेत त्यांना मरण यावे इतक्या वाईट प्रकारचि शिक्षा झाल्या शिवाय गुन्हे थांबणार नाहित . जर त्यांचि कोर्टाने सुटका केलि तर मी असे म्हणीन कि मग दिल्लिच्या कोर्टा बाहेर लोकांनिच त्यांना अशाप्रकारे चाबकाचे फटके द्यावेत.