Skip to main content

भूक

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 19/12/2012 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
आला तेव्हा होता नंगा, त्याले कपडे घातले सोन कांतीचिये रंगा, त्याचे रुपडे झाकले कपड्यांच्या अंगा अंगा, सदा लागलेली भूक जिव्हा खादाडीचा दंगा, डोया हवे दृष्टीसूख कान मागती सुराले, त्वचा आसुसली स्पर्शा नाक सुवासा हुंगते, सारी शोधताती हर्षा पंचेद्रियांचे चोचले, पुरविता पुरे नाही किती ह्यांना भरविले, देह वखाखला राही कपड्यांच्या अंतर्भागा, वसे सोनेरी झळाळी त्याची भूक भागेना गा, मारी आक्रोशाने हाळी सारे देहाचे चोचले, पुरे होती त्याचे लाड तेज भुकेने गांजले, पाच गजांचिये आड पंचेंद्रिये अंग अंग खाउ खाउनी खंगले जीर्ण होताची तुरूंग तेज मोक्षाशी धावले
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2424
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अहिराणी भाषेचा स्पर्श दाद देण्याजोगा आहे. विषय सध्या सगळीकडे चर्चिला जात आहे, त्या अनुषंगाने आपली कविता योग्य वाटत आहे.

झकास एकदम. शब्द शब्द आवडेश.

कविता अतिशय आवडली आहे.

शेवट्ची ओळ म्हणजे जिवनाचा सारन्श....

सुरेख. खूप आवडली

मस्त :)