जंबो पास्ता शेल्ल्स सॅलॅड

Mrunalini's picture
Mrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म
7 Nov 2012 - 9:14 pm

साहित्यः

जंबो पास्ता शेल्ल्स - १०-१२
चिकन - १ कप (उकडुन आणि shreded)
क्रिम चिज - १ कप (मी लसुणच्या फ्लेवरचे घेतले होते)
स्वीटकॉर्न - १/४ कप
चेरी टोमॅटो - ३ चमचे बारीक चिरुन (टोमॅटो मधील गर काढुन टाकावा)
गाजर - ३ चमचे बारीक चिरुन
बेसील - २ पाने बारीक चिरुन
ऑलिव्ह ऑईल - २ चमचे
काळि मिरी पावडर - १ चमचा
मिठ चवीनुसार
पाणी पास्ता उकडण्यासाठी

कृती:

१. एका भांड्यामधे पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात १ चमचा ऑलिव्ह ऑईल व २ चमचे मिठ टाकावे.
२. पाणी उकळल्यावर त्यात पास्ता टाकुन १०-१२ मिनिटे शिजवुन घ्यावा. (किंवा तुम्ही पास्ताच्या पॅकेटवर दिल्या प्रमाणे कृती करु शकता)
३. पास्ता उकडल्यावर तो गार पाण्याखाली २-३ मिनिटे धुवुन घ्यावा. त्यावर वरतुन १/२ चमचा ऑलिव्ह ऑईल टाकुन मिक्स करावे, त्यामुळे ते चिकटणार नाहित.

salad

४. एका बाउल मधे क्रिम चीज, चिकन, स्वीटकॉर्न, टोमॅटो, गाजर, बेसील, ऑलिव्ह ऑईल, काळि मिरी पावडर व चवीप्रमाणे मिठ घेउन मिक्स करावे.
५. हे सॅलॅड प्रत्येक पास्ता शेल मध्ये भरावे व १०-१५ मिनिटे गार करावे.
६. सॅलॅड बेसील, लाल मिरची पावडर किंवा chilly flakes व ऑलिव्ह ऑईलने सजवुन serve करावे.

salad

प्रतिक्रिया

वाह! फोटो तर चांगला आला आहेच पण साहित्यही भारतात मिळण्यासारखे आहे. आम्ही चिकन वगळून हा प्रकार बनवू.

पियुशा's picture

8 Nov 2012 - 10:11 am | पियुशा

जबर्याच !!!
मी चिकन खात नाही , शाकाहारी लोकांकरीता दुसरा पर्याय आहे काय ?

Mrunalini's picture

8 Nov 2012 - 11:48 am | Mrunalini

धन्स पियुशा :)

तु हेच सॅलॅड चिकन वगळुन पण करु शकते किंवा त्या बदली अजुन उकडलेला बटाटा, फ्लॉवर etc वापरु शकते.

गणपा's picture

8 Nov 2012 - 1:06 pm | गणपा

जब्रा दिसतय.
पहिल्यांदा जेव्हा हा पास्ता चाखला तेव्हा तो चक्क रब्बर सारखा चिवट होता. तेव्हा पासुन एकुणच पास्ता प्रकाराविषयी धास्ती बसली आहे मनात.

स्मिता.'s picture

8 Nov 2012 - 2:06 pm | स्मिता.

एक नंबर जबराट प्रकार दिसतोय हा... करून बघायलाच हवा. लसूणाच्या फ्लेवरचं चीज क्रीम आवडतंच.

मी_आहे_ना's picture

8 Nov 2012 - 2:08 pm | मी_आहे_ना

जबरी पाकृ.

Mrunalini जी, पास्ता रेसिपी मस्त आहे.

स्वाती दिनेश's picture

8 Nov 2012 - 5:26 pm | स्वाती दिनेश

पास्ता सॅलड आवडले,
स्वाती

सिध्दार्थ's picture

8 Nov 2012 - 6:05 pm | सिध्दार्थ

अप्रतिम !

सानिकास्वप्निल's picture

9 Nov 2012 - 5:16 pm | सानिकास्वप्निल

सॅलॅड खूप छान दिसत आहे :)

कच्ची कैरी's picture

10 Nov 2012 - 8:43 am | कच्ची कैरी

माझ्या मुलाला पास्ता हा प्रकार खुपच आवडतो तेव्हा ही पाककृती त्याला नक्की आवडेल :) नक्कीच करुन बघीतली जाईल
http://mejwani.in/

पैसा's picture

10 Nov 2012 - 3:13 pm | पैसा

पण पास्ता फार आवडत नाही त्यामुळे त्यात काहीही [चिकन्/भज्या]भरण्यापेक्षा फोटो बघून समाधान झालं.

मदनबाण's picture

10 Nov 2012 - 4:38 pm | मदनबाण

पैसा तायशी यकदम सहमत... मला पण हे पास्ता प्रकरण आवडत नाही.
काय माहिती पण हे मला अगदी लिबलिबीत वाट्ट खाताना !

इरसाल's picture

10 Nov 2012 - 4:50 pm | इरसाल

हे भरलेले पास्ता म्हणजे कोणीतरी शंखच सजवुन ठेवले आहेत असे वाटते.फटु लै भारी.
पास्ता हा माझ्या मुलीचा जीव की प्राण आहे. ट्राय मारावा म्हणतो. जरी इतका छान आणी सुंदर नाही बनवता आला तरी.

अवांतर : हे बघा मी अजुनही माझा झेंडा घट्टपणे सांभाळत सुचना देतोय की ह्या मोजक्या २/३ गृहिणा/गृहिणींना बंदी घाला मिपावर. मागाहुन तक्रार चालणार नाही. ;)

जयवी's picture

18 Dec 2012 - 1:07 pm | जयवी

व्वा.........पाककृती एकदम आवडेश :)
पास्ता प्रिय आहेच त्यामुळे नक्की करुन बघणार !!

यशोधरा's picture

18 Dec 2012 - 1:27 pm | यशोधरा

मस्त अहे पाकृ.
सॅलड भरायलाच काय वेळ लागेल तो. :P