सरकारी नोकऱ्यांमधील बढतीमधे आरक्षण लागू व्हावे ह्यासाठी घटनादुरुस्तीचा प्रस्ताव संसदेत येणार आहे. शिवसेना आणि समाजवादी पक्ष ह्यांचा अपवाद वगळता प्रत्येक पक्षाने ह्याला पाठींबा जाहीर केलाय.
शिवसेनेचा जातीय आरक्षणालाच विरोध असल्याने त्यांचा विरोध समजण्यासारखा आहे, पण सपाचा विरोध ह्याकरता असावा की ओबीसीं आरक्षणाचा त्यात समावेश नाही. हे आरक्षण फ़क्त SC/ST गटालाच आहे.
ह्या विधेयकाने मायावतींचा सपोर्ट युपीएला पुढील दिड वर्ष मिळत राहिल आणि सरकार तरेल असं एक राजकारण त्यामागे असावं कारण मायावतीं ह्याचा प्रचार आधीपासुन करत आहेत. मायावतींचा राजकिय बेसही ह्यामुळे अधिक मजबुत होईल. कदाचित दलितांच्या राष्ट्रीय नेत्या म्हणुन त्या आता अधिक मोठ्या होतील. बाकीच्या राजकिय पक्षांनाही ह्याला विरोध करता येणार नाही..कारण ते निवडणुकीचे राजकारण करतात. अर्थातच शिवसेना ही अपवाद आहे (ह्याबद्दल मी "legacy of bal thackeray" म्हणुन लेख लिहिला होता).
राजकारणाच्या दृष्टीने हा मायावतींचा निश्चितच विजय आहे. पण अनेक लोकांनी (अराजकिय) ह्याचा निषेध केला आहे. कारण नोकरीभरतीत एकदा आरक्षणाचा फ़ायदा झाल्यावर नोकरीतील सेवाजेष्ठता, कार्यक्षमता आणि वरचा रोल करायची क्षमता ह्यावरुनच बढती मिळावी हे लॉजिकल आहे.
पण SC/ST संस्थांचा हा दावा आहे की नोकरीत भरती झाल्यावर पुढे बढती मिळत नाही कारण SC/ST असल्याने त्यांचा द्वेष केला जातो..त्यांच्याविरुद्ध prejudices असतात. सरकारी जावई म्हणुन त्यांना टोमणे मारले जातात. आणि पुढील बढतींसाठी त्यांचा विचारच होत नाही. उच्च पदांवर दलित नसल्याने सामाजिक न्यायाचे कार्यक्रम राबवले जात नाहीत.
नेटवर एक आकडेवारी काही दिवसांपासुन फिरतेय त्यानुसार केंद्र सरकारमधे ८०% पेक्षा जास्त उच्चपदस्थ अधिकारी हे ब्राह्मण समाजाचे आहे. ती आकडेवारी खरी की खोटी हे सांगता येत नाही पण एका ब्लॉगवर backward class commission च्या हवाल्याने असं म्हटलं आहे की टोटल ब्युरोक्रसीमधे ३७% ब्राह्मण आहेत. http://escapefromindia.wordpress.com/indias-brahmin-rule-data/
संविधानाचा अभ्यास असलेले लोकं म्हणतात की ही घटनादुरुस्ती घटनेच्या बेसिक फ़्रेमवर्कविरोधी आहे. Right to Equality चा भंग त्यामुळे होतो आणि सुप्रीम कोर्ट ह्या घटनादुरुस्तीला केराची टोपली दाखवु शकते.
माझं मत ह्यावर असं आहे की नोकरीत असलेल्या मंडळींचा विचार करण्यापेक्षा नोकरीत नसलेल्या लोकांचा विचार करणे हे दलित संघटना आणि राजकिय पक्षांसाठी जास्त महत्वाचं आहे. घटनादुरुस्तीत आपली सगळी उर्जा आणि प्रतिष्ठा पणाला लावायची होती तर कुठला मोठा विषय हाती घ्यायला हवा होता. घटनादुरुस्तीसाठी संसदेत एकुण २/३ सदस्यांचा पाठींबा लागतो. मायावतींनी वेळ योग्य शोधलीय, पण विषय खुपच निरर्थक आहे.
वाचने
5384
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
पात्रता नसतांना फक्त जातीच्या
प्रमोशनसाठी आरक्षण देण्यात
बाडीस. बढतीमध्ये आरक्षण
माझे मत
संसदीय लोकशाहीत मतांचे
हे कोण ठरवणार?
In reply to संसदीय लोकशाहीत मतांचे by शैलेंद्रसिंह
-१ असहमत
In reply to हे कोण ठरवणार? by ऋषिकेश
संसदीय लोकशाहीत जर बहुमतात
In reply to -१ असहमत by चेतन
कुठलीही राज्यव्यवस्था ही
In reply to हे कोण ठरवणार? by ऋषिकेश
मतदान कंपल्सरी करा आणि एका
In reply to कुठलीही राज्यव्यवस्था ही by शैलेंद्रसिंह
आरक्षण पुराण
बर्याच मुद्दांशी सहमत.
In reply to आरक्षण पुराण by पुण्याचे वटवाघूळ
हम्म
दर्जा
:)
In reply to दर्जा by कॅप्टन जॅक स्पॅरो
उत्तर
In reply to :) by ऋषिकेश
पात्रता सिद्ध करण्याची संधी
In reply to उत्तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
शंका
In reply to उत्तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
शन्केच समाधान.
In reply to शंका by आजानुकर्ण
ज्यांचा पायाच पक्का नाही
In reply to शन्केच समाधान. by कॅप्टन जॅक स्पॅरो
असो..!!
In reply to ज्यांचा पायाच पक्का नाही by आजानुकर्ण
ह्यातला विनोद प्लीज मला सांगा
In reply to असो..!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
ठीक आहे...
...आणि
In reply to ठीक आहे... by एस
+१
In reply to ...आणि by एस
नुकतच पार्टनर हा सिनेमा येत
ही संकल्पना जगातील सर्व
In reply to नुकतच पार्टनर हा सिनेमा येत by निनाद मुक्काम …
नको तीकडे जावून Affirmative
In reply to ही संकल्पना जगातील सर्व by श्री गावसेना प्रमुख