✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ऍसेट.

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 08/22/2008 - 20:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6631 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 08/22/2008 - 21:16 नवीन

२ मुली...

२ मुली... लाँग टर्म इन्वेस्टमेन्ट आहे, टॅक्स लागेल बहुतेक, वृध्दाश्रम बघावा लागू नये... ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 08/22/2008 - 22:36 नवीन

आमचे ऍसेट्स

प्रभू साहेबांसारखे आपले काय बी ऍसेट्स नाहीत.. आय-बापानी ज्या ४ चांगल्या गोष्टी सांगितल्या .... त्येच आपले ऍसेट्स .............. बाकी नो कमेंट्स -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ड
डोमकावळा Mon, 08/25/2008 - 10:45 नवीन

एकदम बरोबर....

अगदी १००% खरं बोललास टार्‍या..... खरंय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रकाश घाटपांडे Fri, 08/22/2008 - 21:32 नवीन

एक मुलगी

मपल्याला एक पोर हायं. या वर्शी दहावीला. पन ते काय आपल ऍसेट नायं . वृद्धाश्रम पघावा लागनारचं . मानसिक तयारी आहेच. त्याला वृद्धांच होस्ष्टेल म्हनु. पुढचं कुनी पाह्यलयं! सध्या बायको हेच ऍसेट. कार्येषु मंत्री | करुणेषु दासी| शयनेषु रंभा | भोजनेषु माता| ( इकड्ची काडी तिकडं न करणारा) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 08/23/2008 - 00:43 नवीन

घाटपांडे सर..

तुम्हाला एक पोर आहे ना.. मग सगळ्यात चांगलं एसेट आहे तुमच्याक्डे. वृद्धाश्रम वगैरे विसरून जा. मुलापेक्षा सुद्धा सगळ्यात उत्तम ऍसेट आहे ते. कधीही तुम्हाला नुकसानीत नाही जाऊ देणार.. विश्वास ठेवा. - (सर्वव्यापी, एका मुलाची आई)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ल
लिखाळ Fri, 08/22/2008 - 21:40 नवीन

स्वभाव

आजवर जे काही वाचन केले आहे, त्यावर विचार केला आहे ; वावरताना जे काही अनुभव आले आहेत, त्यावर विचार केला आहे ; आणि विचारानुसार वागायचा प्रयत्न करत आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणून जो काही स्वभाव बनला आहे तेच ऍसेट आहे असे सध्या वाटते. भौतिक गोष्टींपेक्षा त्यानेच मला विचित्र काळात तगायला मदत केली आहे. (ऍसेट हे भौतिकच असावे असा संकेत असेल तर आमचे उत्तर चुकले. शुन्य गुण !) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/24/2008 - 17:47 नवीन

लिखाळांशी

लिखाळांशी सहमत + आरोग्य. जेव्हा खायला घालणारे एक दिवस सोडून गेले आणि हातात किती पैसे आहेत तेही माहित नव्हतं तेव्हा आरोग्य हाच सगळ्यात मोठा ऍसेट वाटला होता, अजूनही आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ब
बहुगुणी Fri, 08/22/2008 - 21:47 नवीन

अगदी ह्याच प्रश्नाचं उत्तर...

...द्यायची वेळ माझ्यावर नुकतीच आली. मी अमेरिकेतील सध्याचं राहतं शहर सोडून नोकरीनिमित्त दुसर्‍या शहरात जाण्याच्या संधीविषयी मित्रमंडळीत विचार व्यक्त करीत असतांना त्यांना हे सांगितलं की आमचा मुलगा मात्र इथेच नोकरी करायचं आणि राह्यचं म्हणतोय. तेंव्हा मला एका परिचयातल्या वहिनींनी विचारलं की 'मग तुम्हाला आमची कंपनी आवडली नाही का?' तेंव्हा मी त्यांना म्हंटलं की 'अहो, तुमची कंपनी आवडली आणि तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा, आमचा एकुलता एक लेक इथे सोडून जायची हिंमत करतोय'. हे इंग्लिश मध्ये बोलतांना मात्र 'ठेवा' चं रुपांतर अनाहुतपणे 'our greatest possession' असं झालं. याविषयी नंतर विचार करतांना मात्र मला ते खटकलं; मुलगा (किंवा मुलगी) आपलं possession नसतं (शब्दच्छल करण्याचा हेतू नाही, पण assett असंही वर्णन चुकीचं असेल असं वाटतं), मला वाटतं की आपण आपल्या अपत्यांकडे फारतर एक 'गुंतवणूक' (investment) म्हणून पहावं, तसा विचार केला तर "बरोबर मेंटेन केलं तर वृध्दाश्रमाची गरज नाही." हे मात्र पटलं.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 08/22/2008 - 22:58 नवीन

ऍसेट

आहे पण ते सोन्याच्या दागिन्यांसारखं. एकदा घेतले की पुन्हा विकायची वेळ येत नाही सहसा तसे. वृद्धाश्रमाची तरतूद व्हावी अशी जबाबदारी घालून त्या ऍसेटला ताठ उभं राहण्याआधीच कमरेत वाकवायचं नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 08/23/2008 - 09:48 नवीन

आत्मविष्वास ही माझी सर्वात मोठी ऍसेट

वृद्धाश्रमाची तरतूद व्हावी अशी जबाबदारी घालून त्या ऍसेटला ताठ उभं राहण्याआधीच कमरेत वाकवायचं नाही. १००% सहमत माझा आत्मविष्वास ही माझी सर्वात मोठी ऍसेट पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 08/23/2008 - 10:21 नवीन

आता गुंतवणूक, मालमत्ता, मौल्यवान ठेवा

आता गुंतवणूक, मालमत्ता, मौल्यवान ठेवा असेच म्हणायचे असेल व त्यात सजीव लोक पण धरायची असतील तर.....हं...[प्रभु सर विचारात पडलोय हा चेहरा नाही उतरला ;-) ] गुंतवणूक शास्त्राच्या नियमाप्रमाणे सर्व भार/जोर एकाच "असेट" क्लास वर ठेवणे इज ए बॅड आयडिया.... मी असेही ऐकले की वाचले आहे, बेस्ट गिफ्ट यु कॅन गिव्ह युअर चाईल्ड इज नॉट बी डिपेंडंट ऑन हिम्/हर इन एनीवे. खरी आपली एसेट आपण स्व:ताच, आपण जर शेवटच्या क्षणापर्यंत धडधाकट राहू शकलो तर बेस्ट्च!! बाकी निव्वळ फायनान्शियल प्लॅनिंग किंवा ओव्हरऑल रिटायमेंट लाईफ प्लँनिंग हे दोन्ही मोठे व स्वतंत्र विषय आहेत.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 08/23/2008 - 10:30 नवीन

कसली ऍसेट आणि काय.....

आपली भलीबुरी कर्मेच आपली खरी ऍसेट आहेत. जे पेरले तेच उगवणार आहे. चांगली कामे केली असतील तर कोणत्याच आश्रमाची गरज पडणार नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 08/23/2008 - 10:57 नवीन

हम्म्म!

आपला तर प्रपंच गोंदवल्याचा बुवा चालवतो बॉ. त्यामुळे भविष्याची सोय वगैरेवर अजून फारसा विचार नाही केलेला अन् गरज आहे असेही वाटत नाही, कारण शेवटी तिथेच जाऊन राहणार आहे. जे व्हायचे ते तिथे होईलच. शेवटपर्यंत कर्तव्य समाधानात नीट पार पाडता यावे एवढी मनापासून ईच्छा आहे. तेवढे मिळवले की झाले. सध्यातरी काही मूल-बाळ नाही. अन् नंतर झाल्यावरदेखील त्यांच्याकडून काही अपेक्षा असण्याचे कारण नाही. त्यामुळे माझे ऍसेट म्हणून सांगायचे झाले तर एकच.. श्रीमहाराज. :) मुमुक्षू.
  • Log in or register to post comments
म
मिंटी Sat, 08/23/2008 - 11:09 नवीन

आपली

आपली भलीबुरी कर्मेच आपली खरी ऍसेट आहेत. जे पेरले तेच उगवणार आहे. चांगली कामे केली असतील तर कोणत्याच आश्रमाची गरज पडणार नाही. सहमत........... आणि देवाचा,वडिलधार्‍या माणसांचा आशिर्वाद असला की झालं....तेच आपलं ऍसेट... :)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 08/23/2008 - 11:52 नवीन

प्राजु

मनी मनी कुमुदिनी फुलल्या. वि.प्र.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 08/23/2008 - 12:22 नवीन

सहज

अभिनंदन्.ईश्वर तुम्हाला तुम्ही म्हण्ता आहे ते पुर्ण करायला शक्ति देवो.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 08/23/2008 - 13:01 नवीन

मी-

दोन मुलांची आई असले, तरी ते मला गुंतवणूक वा ऍसेट नाही वाटत.. माझे ऍसेट मला वाटतात. माझी देवावरची श्रध्दा आणि माझा स्वभाव.. जे कुठल्याही परिस्थितीत मला जगण्याचे बळ देईल...
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Sun, 08/24/2008 - 17:42 नवीन

सुनेचे काय

तुमचा चिरंजव त्याच्या सख्या बायकोच्या मिठित्..........मुठित गेल्या वर सुनेने तुमची एसेट ताब्यात घेतली व तुम्हाला बाहेचा रस्ता दाखवला तर................?
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sun, 08/24/2008 - 17:54 नवीन

हे तर..

आपण आजुबाजुला, नातेवाईकात पहतोच की.. त्यात नविन काय आहे? नीट वाचा, मी त्यांना ऍसेट म्हटलच नाही आहे..
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 08/24/2008 - 18:03 नवीन

चिरंजव

बहुधा टाइपींग मिस्टेक असावी. मिठित ...........मुठित एसेट चे ऍसेट बद्दल बोलताय का? आधीच वेगळ घ॑र करुन ठेवल आहे. आव्शिचो घोव त्याच्या. म्हण्जे मी च नाही का? बाहेर काढायला जागाच नाही. हा आता म्हातारी तेव्हा काय करेल त्याचि गॅरंटी नाही. आणि काढ्ल्च तर बर आहे की. नातिचरामी शपथेतुन मोकळा. जमेल तेवढ चरीन. नि:संकोच वि.प्र.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 08/24/2008 - 18:06 नवीन

या ऍसेट्सबद्दल

एक गोष्ट लिहावी म्हणते. (खरीखुरी वास्तविक भयकथा) सध्या अजिबात वेळ नाही. पुढील महिन्यात करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ग
गणा मास्तर Mon, 08/25/2008 - 09:42 नवीन

टार्‍या

टार्‍याच माझ मत जुळत. आईबापानं शाळत मास्तरान ४ गोष्टी सांगितल्या आन ह्या दुनियेत टक्केटोणपे खाउन अनुभव आले तेच आपले ऍसेट.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 08/25/2008 - 10:18 नवीन

अनुभव

आजवरच्या अनुभवातुन तरी अनुभव हेच ऍसेट वाटतात, कोण जाणे नविन येणार्‍या अनुभवातुन कदाचित हे मत बदलण्याचा अनुभव पण येइल !
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Mon, 08/25/2008 - 10:29 नवीन

लायबिलीटिज् ऍन्ड एक्विटि

यांच्या मॅनेजमेन्टमध्ये बिझि आहोत... अर्निंग अथवा नॉनअर्निंग ऍसेटची चिंता तूर्तास नाही. नॉनपरफॉर्मिंग ऍसेटच्या ओझ्याखाली भल्याभल्या बँका कोसळलेल्या पाहिल्याने वरील अक्कल आलेली आहे. एकलव्य
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 08/25/2008 - 10:38 नवीन

आनंद

मुलांचा आनंद बघूनच खूप आनंद होतो त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जास्तीत जास्त आनंद निर्माण करणे हि गोष्ट महत्वाचि वाटते, त्यामुळे त्यांच्या कडे व्यवहारि दॄष्टिकोनातुन (ऍसेट) बघु शकत नाहि.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा