"गुरुजी, तुमच्या पोराला गणित येत काय हो" ?
असा प्रश्न विचारुन मला रिंगणात घ्यायचा प्रयत्न करणारे बुवा हे आमचे शेजारी. शिक्षण ६/७ वी पर्यंत झालेले.
त्यांना हो हे उत्तर मिळाले की विचारायचे सहा सहा ढुंगणाला ढुंगण सांग किती ?
त्यावेळेस काही वर्षांपुर्वीच वडिलांची बदली त्या गावात झाली होती. त्यामुळे आम्ही नवेच होतो गावाला आणी असणार्या शेजार्यांना सुद्धा.
बुवांचे वय साधारण २७/२८ असावे. सकाळी उठुन मोठ्या भावाला शेतीकामासाठी थोडी मदत करायची दुपारी गावातल्या काही तरुणांबरोबर नदीवर जावुन मासे पकडायचे ते आणुन कच्ची मारायची व माश्याचे जेवण जेवायचे, परत संध्याकाळी खळ्यात जायचे.
लग्न झालेले होतेच दोन्ही भाउ वेग-वेगळे रहात होते. बुवांना २ मुलीही होत्या. मोठी ४/५ वर्ष, लहान २/३ वर्ष आणी बायको परत गरोदर.
बुवांचे नाव खरतरं बाळाराम, बरोबरीची मंडळीं बाळु, लहान बाळ्दा, व मोठी बाळ्या असे म्हणत.या छानपैकी चाललेल्या संसाराला थोडे दु:खद वळण लागले ते दुसर्या मुलीच्या जन्मापासुन.बुवांचा स्वभाव तसा देवभोळा कोणी देवाची भीती घातली की लगेच मानणारे.
तर दुसर्या मुलीच्या जन्मानंतर बुवांच्या घरातील पहिल्या खोलीची भिंत अचानक वेगवेगळ्या देवादिकांच्या फोटोने तसेच निरनिराळ्या बाबांच्या फोटोंनी भरुन गेली.घरात घातवार,घातचक्र याबद्दल माहिती देणारी पुस्तके दिसु लागली.
आणी एक दिवस तुळशीची माळ गळ्यात घालुन बाळाराम, बुवा मधे परिवर्तीत झाले,तेव्हा पासुन त्यांना सगळे बुवा म्हणुनच ओळखु लागले. कोकणात बुवा झाला ही मानाची बाब होते.ह्यांनी ते आचरणात आणायला सुरुवात केली.सकाळी उठुन पुजाअर्चा, संपुर्ण शाकाहार, दारुत्याग वगैरे वगैरे.घरचे साहाजिकच आनंदले.
गावात किंवा बाजुच्या कोणत्याही गावाला भजन-कीर्तन असु द्या बुवा तेथे जाणार म्हणजे जाणारच.हे वेड हळु हळु वाढत जात होते.कोणत्यातरी गोष्टीचा पगडा त्यांच्या मनावर भारी पडत होता.गावात येणारे भगवे कापडधारी बुवांच्या घराला पाय लावल्याशिवाय जाइनासे झाले.कोणी साधु-संत आल्याचे माहित पडल्यास बुवा स्वतः जातीने त्यांना घरी घेवुन येवु लागले. त्या लोकांनी सांगितल्या प्रमाणे पुजा, प्रार्थना व आचरण करु लागले धागे दोरे, गंडे काय काय केले ह्याला सीमाच राहिली नाही.
आधी मजा घेणारे बुवा आता अध्यात्म, मोक्ष, मुक्ती जनमानसाचे आचरण ह्यावर धीरगंभीरतेने भाष्य करु लागले, कमी शिकलेले असुन सुद्धा. जवळच्या मित्रांना मासेमटण खावु नका सांगु लागले.तश्यातच घरातुन बाहेर पडताना घातवेळ, घातवार तर नाही ना याची खात्री करायला लागले.एकंदरीत भक्तीच्या वाटेवर जाताना विक्षिप्तपणा* वाढल्याचे जाणवु लागले होतेच.
अश्यातच बुवांना मुलगा झाला,त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता.कोकणात बारश्याला घुगर्या आणी मुद करतात पण दोन मुलींनंतर मुलगा याचा आनंद इतका मोठा कि त्यांनी सगळ्यांना चिवडा-लाडु खावु घातले. आज चिवडालाडुचे अप्रुप वाटणार नाही कदाचित पण ७०/८० घरांच्या गावात ८७ साली हे अप्रुपच होते.
त्यानंतर ३/४ महिन्यातच त्यांचे पावलोपावली नक्षत्र, तारे,ग्रह, वार, बाबा यावर अवलंबुन रहायचे प्रमाण आवाक्या बाहेर झाले होते.
अश्याच एका सकाळी घराबाहेर जोरात रडारड ऐकायला येवुन मी जागा झालो पहातो तर काय बुवांच्या घरी ही गर्दी आणी ती वाढतच होती.
मी आईला विचारले काय झाले ? उत्तर नाही, म्हटल मी जातो बघायला तर म्हणे नको जावुस. त्यांच्या घरात नी आमच्या घरात अंगणाचे अंतर.
मी आईची नजर चुकवुन गर्दीत गेलो, पाहतो तर काय बाहेरच्या पडवीसमोर लोक घेरा करुन उभे आणी कुजबुज सुरु होती, त्यात शिरण्याचा प्रयत्न करुन पडवीच्या तोंडाशी गेलो आणी माझी बोबडीच वळली मी भितीने मागे पळालो.
पडवीच्या मधोमध वाश्याला दोर बांधुन फाशी घेवुन बुवा पद्मासनात मरुन बसलेले होते, मांडीवर तीच पुस्तके आणी आजुबाजुलाही पसरलेली होतीच. मुलगा केवळ ६ महिन्याचा असताना बुवांना ही दुर्बुद्धी सुचली होती. सुरेखाच्या आई बायांकडुन आवरल्या जात नव्हत्या.
जवळचे पोलीसस्टेशन ४ किमी अंतरावर व जायला बस सकाळी ८वा. म्हणुन पोलीस येइपर्यंत गावकर्यांनी बुवांना तसेच राहु दिले.
पोलीस आल्यावर त्यांना खाली उतरवले आणी पीएमसाठी घेवुन गेले. ती रात्र आम्ही शेजारी रहाणार्या ३/४ घरांसाठी काळरात्र वाटत होती. रोज होणार्या आवाजाला सुद्धा घाबरुन "बुवा आले" असेच वाटत होते.
कालांतराने ती भिती नाहीशी झाली.
बायकोच्या खांद्यावर २ मुली आणी तान्हेला मुलगा टाकुन बुवांनी काय बरं साध्य केल असेल ?
* विक्षिप्तपणा ह्याकरिता की ह्याचा जो शेवट झाला.
तुम्हाला कदाचित आठवत असेल की मागे पैसा यांच्या वैजयंती धाग्यावर मी " हातभट्टी" चा प्रतिसाद दिला होता.नवरा वारल्यावर त्या बाईंनी मग दारु पाडायला सुरुवात केली ती कशी बनते ते ह्यांच्याच कडे पाहिले.
वाचने
3524
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरं तेच्या
हम्म!
+१११११११११११११११११११
In reply to हम्म! by स्मिता.
+११११११११११
In reply to +१११११११११११११११११११ by बॅटमॅन
कठीण आहे!
हम्म
कठीण आहे !
शोकांतिका खरीच.
बापरे
लिहिलेलं आवडलं, पण हे थोडंसं
पॉइंटचा मुद्दाये
सहमत
In reply to पॉइंटचा मुद्दाये by संजय क्षीरसागर
ओक्के
खपलो !!
In reply to ओक्के by इरसाल
बा इरसाला तु स्वतःच्या
+१
In reply to बा इरसाला तु स्वतःच्या by गणपा
आता
मला वाटतं