मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेझवान

श्रीयुत संतोष जोशी · · पाककृती
साहित्य : आलं ( एकदम बारीक चिरून ) , लसूण ( एकदम बारीक चिरून ) , हिरवी मिरची ( एकदम बारीक चिरून ) , सेलरी पानं , सोया सास , चिली सास , मीठ , तेल लाल तिखट. कृती : एका कढई मधे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेलं आलं व लसूण टाकून चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यावे , मग त्यात बारीक चिरलेली मिरची टाकून पुन्हा परतावे. व्यवस्थित परतल्यावर त्यात लाल तिखट घालून अजून २ मि. ढवळावे. मग त्यात सोया व चिली सास घालून एकजीव होईपर्यंत ढवळावे.चांगले रटरटल्यावर त्यात बारीक चिरलेली सेलरी घालून एकदा नीट एकजीव करून उतरावे. गार झाल्यावर चायनीज रोल , स्प्रिंग रोल इ. चायनिज पदार्थांबरोबर सर्व्ह करावे . हे किमान ७/८ दिवस फ्रिजमधे न ठेवता टिकते. ( लाल तिखट व चिली सास ची मात्रा प्रत्येकाच्या तिखटाच्या आवडीप्रमाणॅ ठेवावी. सोया सास ही फार घालू नये आंबट होईल. )

वाचने 7118 वाचनखूण प्रतिक्रिया 5

वेताळ 06/12/2009 - 10:23
एकदा हे करताना शिंका चालु झालेल्या लवकर थांबत नाहित. बाकी चायनिझ पदार्थ खायला आपल्याला खुप आवडतात. त्याची एकादी रेसिपी टाका भाउ. वेताळ

गणपा 06/12/2009 - 12:07
धन्यु रे संतोष, तु कॉन फ्लॉवर नाही का वापरत? परवाच बनवला होता. थोडी वगळी पद्ध्त वापरली. -माझी खादाडी.