साहित्य: पालक, गाजर, खजूर, कोथिंबीर,मिरची, लिंबू, साखर व मीठ.
कृती: सगळ्यात आधी वाटीभर खजुराचे बीया काढून उभे तुकडे करून घ्यावेत. नंतर वाटीभर गाजराचे पातळ काप करून घ्यावेत. सुरीने जमत नसल्यास बटाट्याची साले काढण्याच्या सोलण्याने गाजराचे तुकडे करावेत. वाटीभर पालक धुवून, बारीक चिरून घ्यावा. पालकाच्या अर्धी कोथिंबीर चिरून घ्यावी. चारही चिरलेले प्रकार वेगळे ठेवावेत. एका वाटीत लिंबूरस, साखर, मीठ व अगदी पेरभर (पाहिजे असल्यास जास्त) मिरचीचा ठेचलेला तुकडा असे एकत्र करून ठेवावे.वाढून घेण्याआधी हे सर्व प्रकार हलक्या हाताने एकत्र करावेत. ही कोशिंबीर लगेच संपवावी लागते पण एरवीच्या कोशिंबीरींमध्ये बदल म्हणून खूपच चवदार लागते. अगदी सॅलड म्हणूनही एरवी खाण्यास योग्य व शक्तिवर्धक.
सूचना: १. मिरची खूपच कमी पुरते.
२. मीठ, साखर हे लिंबूरसातच मिसळावे म्हणजे सगळीकडे सारखी चव येते.
३. पाहुणे येण्याच्यावेळी गाजराचे काप नक्षीदार व पातळ कापावेत.
४. पालकाचा किंचित उग्र स्वाद कोथिंबीरीमुळे कमी होतो म्हणून ती घालणे आवश्यक.
५. बरीच आधी कोशिंबीर कालवून ठेवल्यास भाज्यांचा रंग बदलतो व पाणी सुटते म्हणून आयत्यावेळीच भाज्या चिरून एकत्र कराव्यात.
ही कोशिंबीर झटपट करून पटकन् संपवावी लागते आणि संपतेही.
धन्यवाद.
वाचने
50029
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त दिसतेय!
फोटो ईस्टमनकलर आलाय !
'रॉ' धाडस
हायला !!
+१.
In reply to हायला !! by परिकथेतील राजकुमार
अरेरे, हा तर एक शुद्धा
कोशिंबिरीतून खजूर वजा करुन
सलाड मधुन (बेबी)पालकची एक-दोन
छान
धन्यु
In reply to छान by सविता००१
छान लागतो कच्चा पालक....
फोटो भारी आलाय...
चांगली पाकॄ.... करुन बघायला
छानचं
हेल्दी
पालक अन माझा ३६ चा आकडा आहे
कच्च्या मेथीची पचडी फार छान
In reply to पालक अन माझा ३६ चा आकडा आहे by पियुशा
वेगळी..
माहिती तशी ऐकीव आहे पण खूप
रंग
प्रतिसाद देणार्यांचे आभार.
मस्तच कोशिंबीर. एकदा अशी खजूर
काय सजावट आहे रेवती. अन गाजर
अप्रतिम...
युके/युएस बेबि पालक मिळतो तो
मला
पालकसभेत पालक खुर्चीवर बसलेला
In reply to मला by इरसाल
पालकसभेत पालक खुर्चीवर बसलेला...उभा नाहीका वो ? तुमी काय मास्तुरे आहात वाटतं ?नाय वो
In reply to पालकसभेत पालक खुर्चीवर बसलेला by सस्नेह
हा हा हा. मजेशीर आहे बुवा!
In reply to नाय वो by इरसाल
आवो ताई, मास्तूरेंना आनंद
In reply to पालकसभेत पालक खुर्चीवर बसलेला by सस्नेह
पचडी !
In reply to आवो ताई, मास्तूरेंना आनंद by रेवती
फोटो एकदम जबरदस्त आलाय. पण
माझ्याकडे ..
हाहा मजेशीर प्रतिसाद.
In reply to माझ्याकडे .. by चौकटराजा
वा मस्त!