बारा जोतिर्लिंगापेकी एक , साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या वेळेस भटकंतीला ( it means trak la ) कुठे जायचे याच्यावर विचार झाला , नि सर्वानुमते भीमाशंकर हे ठिकाण निश्चित करण्यात आले . ट्रेकची तारीख ठरली १ Dec 2012. जवाबदारीची वाटणी हि झाली .
ती खालील प्रमाणे :-
धीरज :- जेवण
समीर :- हिशोब
प्रतीक नि तुषार :- प्रवासाची व्यवस्था …
mail, meeting ,नाही ,हो अस करता करता शेवटी १८ सदस्य झालोत ….
१७ मुले + १ मुलगी ( not fair at all)
(नुसती मुलींची संख्या वाढवून नाही हो उपयोग ,त्यांना ट्रेक ला पण यायची सवय लावली पाहिजे )
असो सकाळी ६ वाजताच्या सिंहगड एक्सप्रेसने निघायचे ठरलं .
" ५.३० शार्प @ शिवाजी नगर " smiley
सगळ्यात शेवटी पोहोचणारा मीच म्हणजे ५.४० ला. तो पर्यंत सर्व पाहोचले होतो .
खर तर हा सुखद धक्का होता ….
एवढी वेळ कटीबद्धता पाहून मस्त वाटल .
Headcount , कोण रात्री किती वाजता झोपून लवकर कस उठले , नको नको त्या प्राण्यांनी ( इन्क्लुडींग GF) या सर्वानी कशी झोप मोड केली , इत्यादी इत्यादी कार्यक्रम पार पडले .
१ group photo पण झाला …
ट्रेन आल्यावर जागा कशी पकडायची ( किंवा बळकावयाची ,याची प्लानिंग पण झाली ) ..
खात्या 'पित्या' घराची पोर …. ती जागा पकडणारच ….
ट्रेन आली , जागा पकडली .
मग गाडीमधले सोपस्कार सुरु झालेत ,
जागे वरून होणारा दंगा , जागा मिळून हि दरवाज्यात बसण्याचा तो प्रकार .
चांगली मुलगी पाहून मुद्दाम केलेली fluttering ….... वगेरे वगेरे ….
तश्या नजरेत ' भरतील ' असा ३ ,४ पोरी डब्यात होत्या .
मग एकदाचा आमचा इ स्टाप आला.
कर्जत.....
कर्जत ला उतरून मग सकाळची न्याहारी ( मराठीत सांगायचं झाल तर breakfast ) करायला गेलो .
न्याहारीत कांदापोहे ( हॉटेलचे ) नि वडा सांबर होता .
तो आटोपून मग ट्रेकमधले सर्वात मोठे काम होते , ते रिक्षा वाल्यांशी घासाघीस करून खांडस ( base village ) पर्यंत रिक्षा ठरवणे .
पहिल्यांदा समीर नि प्रतीक पुढे गेले …
नंतर त्यात धीरज सामील झाला.
रिक्षा वाल्यांशी संवाद करून ' सामोपचाराने 'भाडे ठरेल ….
( भाडखाऊनी त्रास दिला ते सांगायला नको )
मग खांडस पर्यंत प्रवास चालू झाला .
रिक्षावाल्यांच्या पण . . ( टिंब टिंब ) प्रमाणे हद्दी असतात , हे त्यावेळेस समजले -)
त्या हद्दी वरून थोडा वाद झाला ….पण त्यांच्या भांडणात आमचा फायदा होऊन आंम्ही काठेवाडी पर्यंत
पोचलो . ( Thanks to Dhiraj smiley )
17 मावळे नी १ माऊली ,यांनी ट्रेक ला सुरुवात केली.
ऑफिसच्या थंड " गार " वातावरणात , खुर्चीवर बसून मजबूत झालेले त्यांचे शरीर ,
किबोर्ड वर टिचक्या मारून झालेले बलदंड बाहु ,
( सकाळचे १०.४५ मिनिटे .. )
अश्या मावळ्यानसाठी भीमाशंकर ट्रेक , रणरणत्या उन्हात करणे काही अवघड नाही .
( असो १ गोष्ट राहिली , ट्रेक चालू करण्यापूर्वी मुलांचा sun cream लावण्याचा कार्यक्रम पार पडला ) मग सुरुवात झाली ट्रेक ची ,
सुरवातीच रस्ता तसा सोप्पा होता ..
जाता जाता १ बोर्ड लागला ,जंगलात कोण कोण ते प्राणी आहे याचा .
त्यात बिबट्या , तरस , माकड इत्यादी इत्यादी निरुपद्रवी प्राण्याचा उल्लेख होता .
पण त्यामध्ये माणसासारख्या उपद्रवी नि घुसखोर प्राण्याचा उल्लेख नाही , हे पाहून वाईट वाटलं .
नंतर थोड चालल्यावर झाडी सुरु झाली , चढण पण कठीण झाली होती .
आणि अर्धा तास चालल्यावर आम्ही आमच्या पहिल्या पडावावर पोहचलो .
गणपती मंदिर ….
मंदिरात ताक पिऊन , पुढे सुरवात झाली .
तसा रस्ता थोडा कठीण आणि चढण्याचा होता , पण आजूबाजूला झाडी असल्यामुळे आणि ताजेतवाने असल्याने चढता येत होते.
काही वेळाने एका पठारावर आलो .
त्या पूर्वी २,४ सुकलेले धबधबे पार केलेत.
या दरम्यान १ प्रसंग झाला , पठारावर कोणीतरी रात्री पार्टी केली होती .
प्लास्टिक , कचरा , बियरच्या कॅनस ,प्लेटस वगेरे वगेरे पडल्या होत्या .
निसर्गात येऊन निसर्गाची एवढी अव्हेलाना.
सोटा घेऊन त्यांना अश्या जागेवर फटके मारले पाहिजे कि रोज सकाळी आठवण झाली पाहिजे .
असो , आम्ही कचरा आवरायला सरसावलो .नी १० मिनिटात तो सर्व कचरा आवरला गेला .
आता बॅगेसोबत कचऱ्याच्या हि पिशव्या घेऊन चालू लागलो .
हौशी मंडळी त्यांच्या कॅमेरातून स्थितःचित्रे ( means photos) काढत होती .
मस्त view दिसत होता . खाली छोटासा झरा होता , आजुबाजूची शेती , छोटी पण टुमदार घर आणि पुढे पठारावर असलेली घनदाट झाडी .
त्या झाडीतून चालत चालत थकवा निघून गेला , हो पण भूक लागली होती .
चालत चालत जवळ जवळ २.३० तास झाले होते , मग १ कामचलाऊ झोपडीच्या इथे आम्ही " दुपारचा LUNCH "घेतला .
जेवणात मेथी पराठे , चटणी नी बटाट्याची भाजी , आणि भुकेल्या मावळ्यांनी ( Google suggested मवाल्यांनी ) सर्व संपवली .
त्यातच धीरज नी २ कविता ऐकवल्या .
( कवी लोकांना काय फुकट श्रोते मिळाले कि काय ते सुरु होतात smiley )
असो..४५ मिनिटे आराम करून ट्रेकिंगचा दुसरा टप्पा सुरु झाला .
त्या वेळेस बरोबर घडाळ्यात दुपारचे २.१५ वाजले होते .
पोट पुढे आलेल्या पोटात पोटभर ढकललं होत ,पण पुढची चढण पाहून पोटात गोळा आला .
भरीत भर ( खाणे नाही ) चढताना नावालाही सावली नाही , सूर्य डोक्यावर ,
अशी बिकट परिस्थितही आमची पावले आम्हाला घेऊन चढू लागली. smiley
साधरण बोटावर मोजून ,१० मिनिटे झाली असतील , नी सर्वांनी इ स्टाप घेतला .
पाणी हि तसं आता मोजकच उरल होत .
सर्वात वरती चढण्यात होते , समीर ( हवा का झोका ) and one & only the greatमृणाल.
त्या मागे हि बरीच मंडळी होती ,
क्रमाक्रमाने सर्व मंडळी जात होती , पण सर्वात शेवटी होता , विवेक the शर्मा .
' भारदस्त ' व्यक्तीमत्वाची , ' वजनदार ' असामी .
पंजाबदा पुत्तर भटीनडे दि शान ,
अपना विवेक यार्र !!!
तर विवेक नी धीरज सर्वात शेवटी .
विवेक दर ५ मिनिटांनी १० मिनिटे थांबत होता .
२ घोट पाणी म्हणून १/२ बाटली पाणी पित होता .
उन्हाने चेहरा लाल झाला होता ..
विवेकला घेऊन चढण्याची तुलना हि फक्त तोफ घेऊन गडावर चढण्याशी होऊ शकते .
अशातच काही सदस्य पुढे गेले होते .
रस्ता जरी डाव्या बाजूला जायचा असला तरी थोडस उजव्या अंगाला वरती , प्रतीक , भूषण नी तुषार दिसत होते .
थोड जवळ गेल्यावर समजल , नको त्या जागेची मस्ती त्यांना नडली होती , नी शॉटकट म्हणून ते तिकडे गेले .
आता पुढे जाणे अशक्य झाले लक्षात आल्यावर ते परत आले .
इकडे धीरजचा विवेकशी , नी विवेकचा स्व:ताशी संघर्ष चालू झाला .
शेवटी विवेक ने pen killer ( दुखाशामक गोळी ) घेऊन धीरज नी इतरांचा pain कमी केला .
कौशिक पण आता थकला होता , तरी तो चालत होता .
आता चढण संपून सरळ झाडीचा रस्ता लागल होता .
सूर्य पण डोंगराच्या दुसरया बाजूला गेल्यामुळे मस्त सावली आली होती .
समोरून काही गावकरी येत होती .
मंदिर किती दूर ? विचारल्यावर १० मिनिटे म्हटली ,
विवेकने ते ऐकून भारी dialog मारला " धीरज भाई ये १० मिनिट मतलब , गावावलोके १/२ घंटा है .
घंटा SS हम जल्दी पोहचणे वाले है !”
एकंदरी शेवटी घाम गाळात , थांबत ,चालत आम्ही वरती पहोचालो .
वरती पाण्याचे भारतात स्वच्छ म्हणता येईल अस तळं होत.
मंदिर ५ ते १० मिनिटे अंतरावर होते ….
( FB वरच वाक्य आहे , भारतात अंतर वेळेत मोजतात )
हात पाय धूऊन चालत चालत मंदिराच्या पायऱ्यानशी पोहचलो .
तेथे ओंकार , समीर नी प्रतीक होते , त्यांनी थंड पाण्याच्या बाटल्या शेवटी येणाऱ्यानसाठी आणून ठेवल्या होत्या . सोबत शोऐब नी लिओ पण होते .
( आमच्या इथले शंकर एहसान , लॉय म्हणजे " सिवा , शोऐब नी लिओ )
काही आस्तिक लोक देवळात गेली होती . काही तिथे माणसातल्या देवासाठी थांबली होती .
तो पर्यंत घड्याळ्यात ४.२० झाले होते .५ वाजता पुण्याला जायची बस पकडायची होती .
सो हळू हळू सर्व जमा होऊन ५ वाजे पर्यंत बस स्टाप वर गेलो .
सगळे fresh झालो , चहा , जुस , कणीस पोटात ढकलू लागलो .
काही लोक बेंचवर पहुडली , काही गप्पांचे फड रमले .
पण सर्वात आतापर्यंत सुंदर गोष्ट पाहायला मिळाली , तो म्हणजे सूर्यास्त .
क्षितिजावर होणारा सूर्यास्त , तो संधीप्रकाश , खाली दिसणारी ते डोंगर नी झाडी सर्व कस मंत्र मुग्ध करणारे . या निसर्गदेवते समोर काहींचे कॅमरे लवले तर काहींच्या माना .
संध्याकाळचे ६.१५ वाजले होते , ५ वाजताची बस अजून आली नव्हती .
तसा भारतीय " प्रमाण " वेळे नुसार पण एवढा ' वेळ ' नको व्हयला.
मग पुण्याला जाण्यासाठी दुसरे पर्याय शोधण्यास सुरुवात झाली .
पर्याय १ . भीमाशंकर वरून मंचर ला जायचे , व तिथून पुण्याला .
यात बरीच अनिश्चितता होती . १८ लोकांना वाहन मिळणे कठीण .
पर्याय २ .पुण्यासाठी थेट गाडी शोधणे .
तशी थेट गाडी मिळणे कठीण , परत १८ लोक . smiley
पर्याय ३. भिमाशंकरला मुक्काम करणे .
हा सर्वात शेवटचा पर्याय निवडण्यात आला.
पर्याय ४. परत रात्री उतरून खांडस ला जाणे . ( suggested by prateek )
ह्या पर्यायावर प्रतीक ला शिव्या टाकण्यात आल्या हे सांगायला नको .आणि पर्याय खारीज करण्यात आला.
अंधार दाटला होता नी लख्खं चांदण न्हाल होते .
खूप दिवसांनी ( रात्रीनी ) असं चांदणे पहिले होते .
रणरणत उन्हं , सावली , सूर्यास्त नी आता चांदण . निसर्ग हि माणसाच्या मनासारखंच असतो .
त्यातच १ गाडी भेटली . Direct पुण्या पर्यंत , पण त्यात १८ लोकं मावली नाही . smiley
उतरल्यावर दुरून मोठा Head light दिसला , आणि बस आली .
पण ती बस महामंडळाची नसून खाजगी होती .
त्यातून ' माल ' म्हणता येतील असा पोरी उतरल्या . (साधारण ३० एक पोरी असतील )
कोणीतरी "स्पाय" गिरी करून , माहिती मिळवली ,त्या पोरी night ट्रेकला आल्या होत्या .
त्यातच कोणीतरी आपणही " Night “ ट्रेक करावा असा सल्ला दिला .
आणि बहुतेक मुलांनी त्याला समर्थन दिले .
तितक्यात १ बस आली महामंडळाची , पण ती कल्याण साठी होती .
त्या बस ड्रायव्हर ने मागून पुण्याची बस येत आहे अस सांगितलं .
आणि शेवटी १५ मिनिटांनी पुण्याची बस आली , त्या वेळेस घडाळ्यात ०७.१५ मिनिटे झाली होती .पुन्हा जागा पकडण्याचे सोपस्कार झालेत आणि बस मध्ये आम्ही बसलो .
बस सुरु झाले , सर्व पेंगू लागली .
डोळे मिटले गेले.
खरच trek म्हणजे काय ?
नुसता डोंगरावर चढणे. का पाठीवर bag नी गळ्यात कॅमेरा लटकावून हिंडणे .
नाही , ट्रेकमुळे निसर्गाच्या जवळ गेलो. रेल्वेतून पाहिलेला खंडाळ्याचा घाट , टमटम मधून ( रिक्षा) पाहिलेले खांडस गाव . भर उन्हात चढताना अनुभवलेला डोंगर , अंगाला शांत करणारी सावली ,
झोपडीत घेतलेलं जेवण , एकमेकांची साथ देत गाठलेले शिखर , शंकरा पुढे नतमस्तक झालेले मस्तक , स्वच्छ पाहिलेले ते चांदणे , नी आता शांत मिटलेले डोळे.
सगळचं अद्वितीय !!!!
I always say , “Trek builds your character “
what say guys ?
–
धीरज भंडारे.
dhiraj.bhandare@gmail.com
वाचने
13021
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा अनुभव मी ही ९३-९७ सलग पाच
धन्यवाद
In reply to हा अनुभव मी ही ९३-९७ सलग पाच by गणपा
वृतांत आवडला.
उद्या नक्की फोटो टाकतो सर .
In reply to वृतांत आवडला. by हारुन शेख
छान ट्रेक केला म्हणायचा ...
ओळखल असेलच मला तू ?
In reply to छान ट्रेक केला म्हणायचा ... by गणेशा
फटू नसतानाही मजा
Thanks for ur appreciation .
In reply to फटू नसतानाही मजा by चौकटराजा
लेखनशैली विशेष आवडली.
Thank you sir...
In reply to लेखनशैली विशेष आवडली. by बॅटमॅन
+१
In reply to लेखनशैली विशेष आवडली. by बॅटमॅन
लेखनशैली थोडीथोडी 'आमचा पक्ष
In reply to +१ by मालोजीराव
Thanks sir ...
In reply to +१ by मालोजीराव
लिखाणाच्या बाबतीत 'लेखनशैली
ताकाला जाऊन भांडे काय लपवायचे ?
In reply to लिखाणाच्या बाबतीत 'लेखनशैली by ५० फक्त
कृपया ताक आणि भांडे यांचा
In reply to ताकाला जाऊन भांडे काय लपवायचे ? by नावात्_काय्_आहे
मिपावर नवीन आहे सांभाळून घ्या . :-)
In reply to कृपया ताक आणि भांडे यांचा by मालोजीराव
मिपावर बहुदा ताक आणि भांडे हे
In reply to कृपया ताक आणि भांडे यांचा by मालोजीराव
तुमच्या सारखे सुज्ञान नागरिक स्वतची जवाबदारी समजतात
In reply to मिपावर बहुदा ताक आणि भांडे हे by ५० फक्त
वर्णन
एकंदरीत नवीन सदस्यांची संख्या पाहता आम्ही गणपती घाटाचा रस्ता घेत
In reply to वर्णन by तिमा
गोरखगड-मच्छिंद्रगड-सिद्धगड
I I SIR .
In reply to गोरखगड-मच्छिंद्रगड-सिद्धगड by मालोजीराव
छान वर्णन व लेखनशैली.
फोटो टाकतो उद्या
In reply to छान वर्णन व लेखनशैली. by सस्नेह
फोटो टाका राव.
हडसर नि चावधान night trek plan करतोय .
In reply to फोटो टाका राव. by मोदक
चावंड म्हणायचे आहे का?
In reply to हडसर नि चावधान night trek plan करतोय . by नावात्_काय्_आहे
धीरज, मस्त लिहिलय!
thank you sir
In reply to धीरज, मस्त लिहिलय! by संजय क्षीरसागर
अजीबात नाहि
In reply to thank you sir by नावात्_काय्_आहे
+१ टू अर्धवटराव.
In reply to अजीबात नाहि by अर्धवटराव
+१, टु अर्धवटराव आणि गणपाभौ..
In reply to +१ टू अर्धवटराव. by गणपा
I LOVE CRITICS
In reply to अजीबात नाहि by अर्धवटराव
मोदकराव मला पण संगतीला घेऊन
फोटो टाकतो उद्या....
In reply to मोदकराव मला पण संगतीला घेऊन by सुहास झेले
झकास
ही नागफणी
In reply to झकास by नितिन काळदेवकर
होय
In reply to ही नागफणी by चौकटराजा
आणि हो तुम्ही सुचवलेला प्लान एकदम मस्त आहे.
In reply to झकास by नितिन काळदेवकर
लेखनशैली आवडली. खुलवुन लिहिले
:-) शेवटी वाघ म्हंटल काय नि वाघ्या म्हंटल काय ?
In reply to लेखनशैली आवडली. खुलवुन लिहिले by मृत्युन्जय
तुझी पोरगी एकदम माल आहे रे
In reply to :-) शेवटी वाघ म्हंटल काय नि वाघ्या म्हंटल काय ? by नावात्_काय्_आहे
छान!
धन्यवाद परा
In reply to छान! by परिकथेतील राजकुमार
लवकर टाका फोटो
In reply to धन्यवाद परा by परिकथेतील राजकुमार
खिडकीत बसून शुक शुकला काय
In reply to लवकर टाका फोटो by परिकथेतील राजकुमार
तुमची इच्छा
In reply to खिडकीत बसून शुक शुकला काय by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to तुमची इच्छा by परिकथेतील राजकुमार
आम्ही फक्त येणाऱ्या प्रतीकीयाना "पोहोच'पावती " देतो..
In reply to तुमची इच्छा by परिकथेतील राजकुमार
@आम्ही फक्त येणाऱ्या
In reply to आम्ही फक्त येणाऱ्या प्रतीकीयाना "पोहोच'पावती " देतो.. by नावात्_काय्_आहे
भा पो ...
In reply to @आम्ही फक्त येणाऱ्या by अत्रुप्त आत्मा
वर्णन एकदम मस्त, सरळ सरळ
मिसिंग फटू..
मित्रा,
उत्सुकता
In reply to मित्रा, by प्राध्यापक
नितीन, आहुपे गावाला
काही हरवत नाही तर ती जत्रा