(मा जागुतै यांची क्षमा मागून)
साहित्य : दोन छटाक नवोदित मिपाकर (किंचित) कवी
दोन चमचे यमके
दोन चमचे चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ यापैकी आयत्यावेळी जे हाताला लागेल ते.
काही लाडिक खरडी.
एक चिमुट तरल भावना किंचित ठेचून.
अर्धी वाटी तिखट प्रतिसाद
पाव वाटी आंबट प्रतिसाद.
२-३ गोग्गोड प्रतिसाद. (हे शक्यतो नवमिपाकरांचे असावे )
फोडणीसाठी बेताचे उपरोधिक प्रतिसाद.
कृती : प्रथम नवोदित कवी लाडिक खरडीमध्ये घोळवून एक महिना मुरत ठेवावेत.
या काळात आंबट तिखट प्रतिसादांचा अभ्यास करावा. यानंतर मुरलेल्या कवीच्या मिश्रणात ठेचलेल्या भावना चांगल्या मिसळून घ्याव्यात. मग पत्येक ओळीच्या शेवटी एक एक यमक पेरावे. अधून मधून चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ शिंपडावे.
आता मिपावर प्रसिद्ध करावे. मग आंबट तिखट प्रतिसादांची आयती झणझणीत फोडणी त्यावर येऊन पडेल. आता ‘लाडिक खरडी’ वाल्यांना मध्ये मध्ये गोग्गोड प्रतिसाद पेरण्यास सांगावे.
झाले रुचकर चारोळ्यांचे लोणचे तयार ! किमान पन्नास प्रतिसादांची ग्यारंटी !
वाढत्या प्रतिसादांबरोबर लोणचे अधिकाधिक मुरात जाते.
टीप : राजकारणी धाग्यांमुळे आलेल्या अरुचीवर प्रभावी उपाय करणारे व तोंडास चव आणणारे आहे.
वाचने
10036
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्
+१ / -१
In reply to स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स् by जेनी...
अय्या खरच की !
In reply to +१ / -१ by श्रीरंग_जोशी
अग्गायाया....मीच फसले. आधी
मला हा सुडंबन शब्द अवडंबर
In reply to अग्गायाया....मीच फसले. आधी by रेवती
मी पण फसले, म्हटले आज
काय पण शॉल्लीड लोणचे
तुम्ही तर होलसेल 'लोणचेवाले
In reply to काय पण शॉल्लीड लोणचे by लीलाधर
लोणचेवाले की डेअरीवाले
In reply to तुम्ही तर होलसेल 'लोणचेवाले by ५० फक्त
(No subject)
सहीच..
सुडंबित लोणचे अतिउत्तम!!!!
स्स्स्स्स्स्स.
_+१
In reply to स्स्स्स्स्स्स. by प्यारे१
:)
लई भारी, फार फार धन्यवाद.
नवोदीत कवींचे लोणचे करणार्या
विडंबनारीष्ट दोन चमचे दोन वेळा....
संकोच आणि कसला हो?
In reply to विडंबनारीष्ट दोन चमचे दोन वेळा.... by ज्ञानोबाचे पैजार
आमच्या कडे बॅरल भर भरुन
In reply to विडंबनारीष्ट दोन चमचे दोन वेळा.... by ज्ञानोबाचे पैजार
आमच्या कडे बॅरल भर भरुन विडंबनारीष्ट उपलब्ध आहेअसं म्हणता ? मग येउद्या की एक झकास विडंबन ! शांपल तरी समजेल !>>आमच्या कडे बॅरल भर भरुन
In reply to विडंबनारीष्ट दोन चमचे दोन वेळा.... by ज्ञानोबाचे पैजार
पन सुडकेश, गुर्जी सोताच
In reply to >>आमच्या कडे बॅरल भर भरुन by सूड
मागणी
:)
In reply to मागणी by पैसा
अगदी अगदी!
In reply to :) by प्रचेतस
खरंय.
In reply to अगदी अगदी! by पैसा
लोकं लोणच्याचा मनमुराद आस्वाद घेत असताना...
In reply to खरंय. by प्रचेतस
असं करणार्या सदस्याच्या
In reply to लोकं लोणच्याचा मनमुराद आस्वाद घेत असताना... by मोदक
कोण हो कोण असे करणारे,
In reply to लोकं लोणच्याचा मनमुराद आस्वाद घेत असताना... by मोदक
-१
In reply to लोकं लोणच्याचा मनमुराद आस्वाद घेत असताना... by मोदक
@तस्मात बरणी घट्ट बंद करून
In reply to -१ by प्रचेतस
येकदम शमत
In reply to @तस्मात बरणी घट्ट बंद करून by अत्रुप्त आत्मा
@अतृप्त असुनही काय कस खाव हे
In reply to येकदम शमत by स्पंदना
मग त्रुप्तता कशात असते?
In reply to @अतृप्त असुनही काय कस खाव हे by अत्रुप्त आत्मा
.............................
In reply to मग त्रुप्तता कशात असते? by प्रचेतस
-११
In reply to -१ by प्रचेतस
बरोबर !!
In reply to अगदी अगदी! by पैसा
मिपाच्या बरणीत मुरलय
मस्तं पा.कृ.
चारोळ्यांचे लोणचे लैच चमचमीत
बरोब्बर..
In reply to चारोळ्यांचे लोणचे लैच चमचमीत by प्रचेतस
बाकी काही अनुभवी मिपाकर कवी सुद्धा हे लोणचे वरचेवर घालत असतात बरे.बरोब्बर.. काही सदस्य प्रत्यक्षपणे लोणचे घालतात... काही अप्रत्यक्षपणे.. काही सदस्य कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवून असतात व कच्चा माल कमी पडू नये याची स्वतः जबाबदारी घेतात. काही सदस्य दिसेल त्या कच्च्या मालाचे लोणचे करतात. काही "पावरफुल" सदस्य बाकीच्या सदस्यांनी लोणचे घालू नये म्हणून बरणी घट्ट बंद करणे / बरणी लपवून समस्त जनांसाठी अदृष्य करणे अशा ही कला लीलया दाखवतात. मुरलेले लोणचे वर उपसून स्वाद चाखणे तर काहीजणांचा आवडीचा खेळ आहे!!! आत्तापर्यंत ऐकलेला खंग्री प्रकार. एका आग्यावेताळाने एका निष्पाप सदस्याला लोणचे घालण्यासाठी भरीस घातले, त्या बिचार्याने कच्च्या मालावर लैच परिश्रम घेवून लोणचे घातले, संस्कारीत केले (फोडणी वगैरे!) लोणचे भारी झाले आहे असे खाजगी चर्चांमध्ये कौतुकही झाले, आणि त्याच आग्यावेताळाने त्याच लोणच्याबद्दल वाईट्साईट बोलून लोणच्यासह सदस्याची पब्लीकमध्य साले काढली! :-D सर्वात वाईट वाटते ते आजारी सदस्यांचे :-( या सदस्यांना वेगवेगळे समिक्षकी आजार असल्याने स्वत:शिवाय दुसरे कोणीही बनवलेले लोणचे वाईट्टच दिसते!@सर्वात वाईट वाटते ते आजारी
In reply to बरोब्बर.. by मोदक
हम्म्म्म
विडंबन उत्तम जमले आहे. अर्थात
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
सहमत व्हायचे दिवस संपले तुमचे
In reply to विडंबन उत्तम जमले आहे. अर्थात by किसन शिंदे
ना सहमत
In reply to सहमत व्हायचे दिवस संपले तुमचे by ५० फक्त
पाठवणार्याचा पत्ता चुकीचा
झाले रुचकर चारोळ्यांचे लोणचे
झाले रुचकर चारोळ्यांचे लोणचे तयार ! किमान पन्नास प्रतिसादांची ग्यारंटी !ब्वॉर! अग मागल्यावर्षी पासुन माझ्याकडे काही चारोळ्या पडलेल्या आहेत. आता बघतेच करुन तुझ्या पद्धतिने. बाकी हे लोचणे किती दिवस टिकते? आणि हे कधी आणि कुठे वाढावे?बाकी हे लोचणे किती दिवस टिकते
In reply to झाले रुचकर चारोळ्यांचे लोणचे by स्पंदना
लोणचे..
सापडला!
In reply to लोणचे.. by ह भ प
आम्हाला नवकवींची अॅलर्जी आहे
पन आमचं ‘दर्शन’ चालंल का ?
आता तु नवी नसली तर काय झाल?
In reply to पन आमचं ‘दर्शन’ चालंल का ? by सस्नेह