Skip to main content

नवे शिवसेनाप्रमुख कोण ?...

लेखक इरसाल यांनी शनिवार, 01/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटामधे (इथे वाद संभवतो) खालील बातमी वाचली. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17437634.cms उद्ध्व ठाकरे उद्या नवे शिवसेनाप्रमुख कोण याची घोषणा करणार आहेत. मला वाटते...... १.शिवसेनाप्रमुख हे पद रिकामे ठेवले जाईल व त्याला "रामाच्या पादुका" करुन कोणाचा तरी भरत केला जाईल. २.उद्धव स्वःता शिवसेनाप्रमुख बनतील.(शक्यता ९०% नाही.) ३. सलोखा होवुन राज ठाकरे नवीन शिवसेनाप्रमुख होतील.(ही शुद्धा शक्यता नाही) ४. मनोहर जोशी नवे शिवसेना प्रमुख होतील.(कसं शक्य आहे ते जोशी आहेत ठाकरे नाहीत) ५. संजय नवे शिवसेनाप्रमुख होतील. तुमच्याकडे अजुन काही ऑप्शन आहेत काय ? जरा मदत करा उद्धव ठाकरेंना.

वाचने 5313
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

इरसाल राव तुम्हीच करा की मदत्,तशी त्यांनी मदत तर मागीतलीही नाही आहे. तरीही हे .शिवसेनाप्रमुख हे पद रिकामे ठेवले जाईलअसेच होइल असे वाटते "रामाच्या पादुका" करुन कोणाचा तरी भरत केला जाईल.ह्याची शक्यता नाही वाटत

मला वाटतं आदित्य ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख करावं. माझी लाख इच्छा आहे, राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख करावं पण हे काही शक्य वाटत नाही. उद्ध्व साहेब स्वतः शिवसेनाप्रमुख होतील असे काही वाटत नाही. किंबहुना एखाद्या धक्कातंत्राचा अवलंब होईल, पण हा धक्का काय असू शकेल आज कै अंदाज बांधता येईना. उद्याच्या दै. सामनाची उत्सूकता लागली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटतं आदित्य ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख करावं.
सहमत! किंवा लोक थोडेसे भावनिक झालेत त्यामुळे आदित्य ठाकरेच्या (होणार्‍या) मुलाला शिवसेनाप्रमुख म्हणून आत्ताच घोषीत करून टाकावं, म्हणजे नंतर घराणेशाही-घराणेशाही म्हणून बोंबलणार्‍यांची उद्या तोंडे बंद करावी लागणार नाहीत.

In reply to by दादा कोंडके

आवडलेला प्रतिसाद.

In reply to by रुमानी

माननीय, आदरणीय, उद्धव ठाकरे साहेबांना मानाचं असं शिवसेनाप्रमुख पद का द्यायला पाहिजे बरं. काही गुणवैशिष्ट्ये सांगितले तर एक वाचक म्हणून आम्हाला ते समजून घेता येईल. -दिलीप बिरुटे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

माझ्या एक लक्षात आलंय आपल्याला एकेक ओळीचा प्रतिसाद डकवायची इतकी घाई झालेली असते की, आपण प्रतिसाद लिहिला नाही तर मिपावरील धागे ओस पडतील असे वाटत असते की काय ? असो. वारसा हक्काने म्हटलं आणि गुणांच्या दृष्टीने म्हटलं तरी प्रबोधनकारांचा वारसा काही एक गुण वैशिष्ट्यांमुळे मा. साहेबांनी तो वारसा पुढे नेला. आता पुढे काय ? असा तो प्रश्न आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तस नाही हो डॉ.साहेब तुम्ही विचारलेला प्रश्नच मला योग्य नाही वाट्ला,आता तुम्ही म्हणता म्हणुन सांगतो कुणाच्या येण्याने अन न येण्याने कुणाला काडीचा फरक पडत नाही,मागे ठाकरे म्हटले होतेच की गेले १० दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री माहीये कुनाच काही अडलय का.मी प्रतीसाद दिला अन नाहीही दिला म्हणुन मिपा काय बंद थोडेच पडणार असो,मी माझी उंची पाहुनच बोललो पण तुम्हाला माझ्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो

In reply to by श्री गावसेना प्रमुख

>>> डॉ.साहेब तुम्ही विचारलेला प्रश्नच मला योग्य नाही वाट्ला, बरं बाबा. माझा प्रश्न योग्य नव्हता. माझं चुकलं. :) >>> तुम्हाला माझ्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो नै हो, मला कै त्रास वगैरे होत नाही. दिलगिरी वगैरे्ची तर काही गरज नाही. लिहिण्याच्या भरात माझंच लिहिणं जरा रफ झालं. :( कोणीही होवो शिवसेनाप्रमुख आपल्याला काय त्याचं. चलो गले मिलो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही आमच्या पेक्षा मोठे आहात डॉ.साहेब त्यामुळे माफी मागीतली, आणी तुमचा हक्कच आहे रागवण्याचा तो सोडु नका असो जाउ द्या.

गुणवैशिष्ट्ये .........?म्हणाल तर राज सहेबांनकडेच जाते पद पण राजकारण त्याच्यावर नाहि चालत हो .........! आत कशावर चालते ते विचारु नका..

भांचूत ! मटातील बातमी आणि तीच्या खालच्या प्रतिक्रिया पुन्हा मिपावरती वाचायच्या म्हणजे वैताग येतो आजकाल. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17437634.cms लोकं 'ओरिगिनल' कधी लिहायला लागणार ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

दॅट्स इट, आमचा लाडका 'ओरिगिनल' परा परत आलेला आहे! परा इज बॅक :) - ('ओरिगिनल') सोकाजी

- आपण सध्या शिवसेनेचे कार्यप्रमुख आहात. शिवसेनाप्रमुख म्हणून सूत्रं स्वीकारणार आहात काय?

हा विचारही माझ्या मनाला कधी शिवू शकत नाही. शिवसेनाप्रमुख हे फक्त बाळासाहेब ठाकरेच! तेच शिवसेनाप्रमुख! तेच हिंदुहृदयसम्राट!! या सर्व बिरुदावल्या त्यांच्यासाठीच निर्माण झाल्या व त्यांनाच शोभून दिसल्या. शिवसेनाप्रमुख हे एकमेव आणि एकमेवाद्वितीय. दुसरे शिवसेनाप्रमुख निर्माण होणे नाही. आम्ही आजही मानतो, शिवसेनाप्रमुख आपल्यात आहेत. कडवट निष्ठावंत शिवसैनिकांमुळेच मी शिवसेनाप्रमुख आहे असं ते नेहमी म्हणत. शिवसैनिक आजही आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखही आहेत. त्यांची जागा घेण्याची माझी योग्यता नाही. शिवसेनाप्रमुखांची सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी झटेन, हे मात्र नक्की! शिवसेनाप्रमुखांच्या मागे ‘माजी शिवसेनाप्रमुख’ किंवा ‘प्रथम शिवसेनाप्रमुख’ असे निरर्थक शब्द कधीच लागणार नाहीत. ते सदैव आमच्यात आहेत. -उद्धव ठाकरे

‘कोण म्हणतंय बाळासाहेब आपल्यातून गेले? ते आपल्यातच आहेत. आपली परीक्षा घेत आहेत. म्हणूनच शिवसेनाप्रमुखपदी बाळासाहेब ठाकरे हेच अखंड राहतील. दुसरा शिवसेनाप्रमुख होणार नाही. - इति- मा. उद्ध्वजी ठाकरे. धन्यवाद साहेब, हे तर आम्हाला आम पब्लिक म्हणूनही कळतं की दुसरा शिवसेनाप्रमुख होणं शक्य नाही. दोन दिवसापासून दैनिकं वाचून काही धक्का-बिक्का देता की काय असं वाटतं होतं. असो, महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी व आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीला एका मिपाकराच्या हार्दिक शुभेच्छा.....!!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब या शुभेच्छा "मनसे" दिल्यात असे समजावे का आंम्ही कि आपल वर वर दाखवण्यापुरते? ह घ्या ;)

शिवसेनाप्रमुख ', ' हिंदुहृद्यसम्राट ' या बिरुदावल्या केवळ बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभून दिसायच्या. त्यांची जागा घेण्याची माझी योग्यता नाही, असं सांगत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ' शिवसेनाप्रमुख ' हे पद स्वीकारण्यास नकार दिला. उद्धव यांच्या या वक्तव्यामुळं आता नवे शिवसेनाप्रमुख कोण या चर्चेवर पडदा पडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आज, रविवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ' सामना ' ला मुलाखत दिली. पुढचा शिवसेनाप्रमुख कोण, असा प्रश्न उद्धव यांना विचारले असता ते म्हणाले, ' हा विचारही माझ्या मनाला कधी शिवू शकत नाही. शिवसेनाप्रमुख हे फक्त बाळासाहेब ठाकरेच! तेच शिवसेनाप्रमुख! तेच हिंदुहृदयसम्राट!! या सर्व बिरुदावल्या त्यांच्यासाठीच निर्माण झाल्या व त्यांनाच शोभून दिसल्या. शिवसेनाप्रमुख हे एकमेव आणि एकमेवाद्वितीय. दुसरे शिवसेनाप्रमुख निर्माण होणे नाही. '

शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेत. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पक्ष नेत्यांची महत्वपूर्ण बैठक काल मातोश्री इथं झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी भावूक वातावरण होतं. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधार डाके, सुभाष देसाई, संजय राऊत, रामदास कदम बैठकीला हजर होते. शिवसेनाप्रमुखांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली वचनबद्ध असल्याचा विश्वास सर्व नेत्यांनी व्यक्त केला.

In reply to by अविनाशकुलकर्णी

पुर्वी लोक म्हणत, 'दादा कोंडकेंचे चित्रपट बघितले की वृत्तपत्र वाचायची गरजच नाही' तद्वत, तुमचे प्रतिसाद वाचून आता लोक असं म्हणतील की 'अकुंचे प्रतिसाद वाचले की वृत्तपत्र वाचायची गरजच नाही' :)

In reply to by दादा कोंडके

@तुमचे प्रतिसाद वाचून आता लोक असं म्हणतील की 'अकुंचे प्रतिसाद वाचले की वृत्तपत्र वाचायची गरजच नाही'>>> =)) का हो? ते तिकडनं बघुन इकडे लिहितात का? :-b

In reply to by अत्रुप्त आत्मा

का हो? ते तिकडनं बघुन इकडे लिहितात का?
बघून लिहितात? ते चंगळवादी नाहीत त्यामुळे फक्त चोप्य पस्ते करतात. ;)

२०१४ मधे होणार्‍या विधानसभा निवड्णुका लक्षात घेता कोणीही प्रमुख असेल तरी फरक पडणार नाही. बहूतेक सहानुभूतीचा फायदा घेवून शिवसेना सत्तेवर येईलही.

थोडक्यात आता शिवसेनेत ठाकरे घराण्याची घराणेशाही राहणार नाही. बाळासाहेब गेले, मग त्यांचा मुलगा, त्यांचा मुलगा असे नाही वाह वाह फारच छानच

शिवसेनेच्या कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयाला न मानता उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख हे पद स्वीकारले नाही हे उत्तम झाले.उगाच जबाबदारी न पेलवली गेली तर उगाच त्या पदाला बट्टा लागायचा ज्याचे मराठी मनात अत्युच्च स्थान आहे. ४० डीबीच्या वर आवाज चिरकायला लागतो.

(भारतिय)राजकारणात जे हवे आहे ते आधी 'नको नको' म्हणायची पद्धत आहे.असे केल्याने लोकांत्,पक्षात काय प्रतिक्रिया उमटते ते बघायचे असते.मग त्यानुसार मोर्चेबांधणी करून हवे ते पदरात पाडून घ्यायचे असते किंवा पुढची संधी मिळेपर्यंत गप्प रहायचे असते.

मराठी माणसाच्या हितासाठी तरी मला हा निर्णय घातक वाटतो. फारतर असे म्हणता येऊ शकते की शिवसेनाप्रमूख असे पद बरखास्त झाले आहे आणि या पूढील सर्व निर्णय मी आणि मीच घेणार आहे. लोकांना नेता हवा असतो. प्रत्येक पीढीच्या अपेक्षा आणि समस्या वेगवेगळ्या असतात आणि त्यांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च पदाचा स्विकार केला गेला पाहिजे. शिवाजी महाराजानतर संभाजी -> राजाराम -> ताराबा ई यांनी छत्रपती पद स्विकारले नसते तर काय इतिहास झाला असता याचा विचार करावयाला हवा. मिपापरिवारातर्फे उद्धवजी यांनी शिवसेनाप्रमूख पद स्विकारावे अशी विनंती वजा सूचना करावी असे मला वाटते.

In reply to by कलंत्री

शिवाजीने लोकांसाठी लोकांचे स्वराज्य तयार केले, म्हणून इतर राज्यांप्रमाणे ते "भोसला एम्पायर" न होता "हिंदवी स्वराज्य" झाले. जरी शिवाजीने राज्यव्यवस्थेत अनेक क्रांतिकारी बदल घडवले तरी त्यावेळेच्या पद्धतीनुसार नंतर ती गादी संभाजीकडे आणि नंतर राजाराम तसेच ताराबाईकडे आली आणि लोकांनी स्विकारली. मला बाळासाहेबांच्याबद्दल अनेक बाबतीत असहमती असली तरी प्रचंड आदर आहे. तरी देखील शिवसेना हे काही हिंदवी स्वराज्य नसून एक राजकीय पक्ष आहे. त्यात काही गैर नाही. कालानुरूप आहे. तरी देखील असे वाटते की घराणेशाही हळू हळू मोडीत (phase out) काढायची एक संधी आहे. एका अर्थी शिवसेनाप्रमुख पद रिक्त ठेवून त्याची जर सुरवात केली असेल तर ते स्वागतार्ह आहे. पण ते काही असोत हिंदवी स्वराज्य आणि पक्ष म्हणून शिवसेना यांची तुलना बरोबर वाटली नाही.

In reply to by विकास

पण ते काही असोत हिंदवी स्वराज्य आणि पक्ष म्हणून शिवसेना यांची तुलना बरोबर वाटली नाही.
तंतोतंत. अतिरेकाचासुद्धा अतिरेक होऊ लागलाय आजकाल.