✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गाण्याचे व चालीचे इस्लामी करण.

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Sun, 12/02/2012 - 12:10  ·  लेख
लेख
गाण्याचे व चालीचे इस्लामी करण. हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे गाण्यांचे झपाट्याने चाललेले इस्लामी करण... पुर्विच्या गाण्यात गावाताल्या छो~या "रामा रामा गजब हुइ गवारे" म्हणत थिरकताना दिसत. मात्र हल्ली रामा रामा शब्द जाऊन मौला.अल्ला..बंदा हुजुर...गरीब नवाज..खुदा ...असे शब्द व कव्वाली टाईप चाली वा सुफी चाली जास्त दिसतात असे निरिक्षण आहे..व त्या वर नाचणा~या नायिका... राक स्तार सिनेमच्या जाहिराति बघताना असो वा खान कंपनीचे सारेच सिनेमे असो वा इतर सिनेमे असो हे जादाच जाणवते... रेहमान बद्दल असे ऐकिवात आहे कि तो हिंदुच्या पवित्र गीता वा त्या प्रकारच्या गाण्याना चाली लवणार होता पण त्याची आई कट्टर असल्याने तिने काफर च्या देवाची गाणी म्हणण्यास ना पसंती दाखविली व त्या मुळे तो बेत क्यान्सल केला गेला असे फेबु वा एका साइत वर वाचल्याचे आठवते...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9227 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

आपले ऑब्झरवेशन

रणजित चितळे
Sun, 12/02/2012 - 12:26 नवीन
बरोबर पण मला हे कोणी ठरवून करत असेल असे वाटत नाही. त्यामुळे काळजीचे कारण नसावे असे आता तरी वाटते
  • Log in or register to post comments

काही काळापुरता प्रभाव असतो.

जानु
Sun, 12/02/2012 - 12:36 नवीन
काही काळापुरता प्रभाव असतो. सातत्य असल्यास विचार करावा. र.चि. ना १+
  • Log in or register to post comments

त्यांनी रामा किंवा तत्सम बोल

श्री गावसेना प्रमुख
Sun, 12/02/2012 - 12:36 नवीन
Image removed. त्यांनी रामा किंवा तत्सम बोल घेतले तरी ते विचीत्र पद्धतीने घेतल्याने(कॅरेक्टर ढिला वैगरे) वाद होतात्,त्यामुळे ते नसलेलेच चांगले.
  • Log in or register to post comments

पूर्वी तर अल्ला-मौला गाणी खूप

सस्नेह
Sun, 12/02/2012 - 12:40 नवीन
पूर्वी तर अल्ला-मौला गाणी खूप होती. 'याल्ला याल्ला दिल ले गयी' 'अल्ला तेरो नाम' बेकस पे करम्..सरकारे मदीना' तेरे प्यारमे..अल्ला देख रहा है' इफ्तदाये इश्कमे हम्..अल्ला जाने क्या होगा आगे' आणखीहि बरीच. त्या मानाने आता कमीच आहेत...
  • Log in or register to post comments

क्या बात

चौकटराजा
Sun, 12/02/2012 - 13:10 नवीन
अल्ला मेरी तौबा अल्ला मेरी तौबा अल्ला बचाये नौजवानोसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

याच्या उलट देखील झालेले आहे.

विजुभाऊ
Sat, 12/08/2012 - 14:26 नवीन
याच्या उलट देखील झालेले आहे. उदा:दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर....... हे मूळ भक्तीगीत होते त्याचे "तू चीज बडी है मस्त मस्त" असले बाजारू गीत झाले. तसेच " मेरा पिया घर आया" हे विरह गीत होते त्याचे डान्स गीत झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अकु

संजय क्षीरसागर
Sun, 12/02/2012 - 13:01 नवीन
Image removed. सगळं मनातलं एकदाच काय ते व्यवस्थित उतरवून मग काय तो ग्रंथ प्रकाशित करावा यासाठी ही डायरी सप्रेम.
  • Log in or register to post comments

+११११११११११११११

बॅटमॅन
Sun, 12/02/2012 - 22:25 नवीन
+११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

इफ आय अॅम नाॅट राँग, तुम्ही

किसन शिंदे
Sun, 12/02/2012 - 17:57 नवीन
इफ आय अॅम नाॅट राँग, तुम्ही ह्याच विषयावर या आधीही एक धागा काढला होतात.
  • Log in or register to post comments

हो ना...

दादा कोंडके
Sun, 12/02/2012 - 18:04 नवीन
हो ना. तरी या शिंच्या गीतकारांवर त्याचा काहीही फरक पडलेला नाही त्यामुळे रागाउन त्यांनी आता दुसरा धागा उसवलाय काढलाय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मला तर उलट भारत म्हणजे फक्त

नितिन थत्ते
Sun, 12/02/2012 - 18:21 नवीन
मला तर उलट भारत म्हणजे फक्त पंजाबच असं वाटण्याची परिस्थिती दिसते.
  • Log in or register to post comments

चिच्चांशी बाडिस

आनंदी गोपाळ
Sun, 12/02/2012 - 19:32 नवीन
चिच्चांशी बाडिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अगदी मनातलं बोल्लात थत्तेचाचा

बॅटमॅन
Sun, 12/02/2012 - 22:27 नवीन
अगदी मनातलं बोल्लात थत्तेचाचा!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थोडी पुरवणी

ऋषिकेश
Mon, 12/03/2012 - 16:50 नवीन
पंजाब+मुंबई+दिल्ली+कोलकाता+ वाई इथे(च) भारत संपतो :) (पूर्वी शिनशिनरीसाट्।ई काश्मिर असायचे त्याचे आता आऊटसोर्सिंग युरोपात झालेले आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अहो थत्तेचाचा..

गवि
Mon, 12/03/2012 - 16:58 नवीन
मला तर उलट भारत म्हणजे फक्त पंजाबच असं वाटण्याची परिस्थिती दिसते.
अहो टीव्ही कमी बघता का तुम्ही? आता घरातल्या घरातही नथीपैठण्या घालून : "मैं आत्या की सारी चालें समझती हूं.." किंवा "आई, तुमने तो कमाल का पांसा फेका है.." किंवा "इश्श सासूबाई, मेरेलिये रसोईमें बहुत काम पडे है.. मैं तात्यासाहेब के लिये खाना परोसती हूं.." अशी "फक्त संबोधनं मराठी वापरणारा" एक नवा ब्रँड किंवा व्हेरियंट टीव्हीवरच्या सिरियलांत नाही का पाहिलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मान्य, पण हे प्रमाण फक्त

बॅटमॅन
Mon, 12/03/2012 - 18:12 नवीन
मान्य, पण हे प्रमाण फक्त टीव्ही सीरियल्समध्ये जास्त आहे. मोठ्ठ्या पिच्चरांत लय कमीये. शिवाय मराठीकरण हे लोवर क्लासद्वारे जास्तकरून प्रोजेक्ट केले जाते-याला अपवाद इंग्लिश-विंग्लिश, चिंगम, इ.इ. काही पिच्चर. पण इंग्लिश-विंग्लिश मध्ये देखील गोडबोले नामक पुणेकर गृहस्थ राजमा-चावल मिटक्या मारून खातोय आणि वर त्याची आठवण काढतोय असे जे दाखवलेय ते पाहून एक मिपाकर म्हणून डॉळे पाणावून वाहू लागले. तुलनेने पंजाबीकरण हे कितीतरी अधिक सर्वव्यापी आहे-किती म्हणून उदाहरणे द्यावीत ती थोडीच आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सिंघम

चिरोटा
Mon, 12/03/2012 - 18:44 नवीन
बाजीराव सिंघम 'मराठा हू मै मराठा' म्हणतो. नाव बाजीराव असले तरी नायिका त्याला सिंघम म्हणत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

उस्ताद राशीद खानांनी गायलेली

आळश्यांचा राजा
Sun, 12/02/2012 - 22:01 नवीन
उस्ताद राशीद खानांनी गायलेली भक्तीपूर्ण भजने मला फार आवडतात. हे मीरा भजन तर विशेष.
  • Log in or register to post comments

प्रचंड आभार

काळा पहाड
Sat, 12/08/2012 - 02:55 नवीन
प्रचंड आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

फक्त रहमानसाठी..

सुहास
Sun, 12/02/2012 - 23:02 नवीन
तसं आपल्याला या धाग्यात काहीच दम वाटत नाही, पण फक्त ए. आर. रहमानचे नाव ते ही वाईट दृष्टीकोनातून आल्याने एक पिंक टाकतो. संगीतकाराचा गाण्यातल्या म्युझिकशिवाय गाण्यात कुठेही संबंध नसतो, गाण्यात अल्ला घालायचे की भगवान घालायचे की आणखी काही घालायचे हे संगीतकाराने बांधलेली चाल (मीटर) बघून गीतकार ठरवत असतो. बॉलिवूड मधला ट्रेंड बघता इथे मुस्लिम गीतकार जास्त आहेत हेही धागाकर्त्यांनी ध्यानात घ्यावे. दुसरी गोष्ट म्हणजे संगीताला (म्युझिकला) कोणत्याही धर्माशी जोडू नका. कव्वाली आणि सुफी चालीचे म्युझिक आले की मुसलमानी म्युझिक आले असे जर तुम्हास वाटत असेल तर अवघड आहे. बाकी फेसबुकवरचे जर १००% खरे असते आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला असता तर जग आजपर्यंत किमान ५० वेळा तरी नष्ट झाले असते. --सुहास
  • Log in or register to post comments

+++++++++

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/02/2012 - 23:08 नवीन
++++++++++११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास

+१

जेनी...
Mon, 12/03/2012 - 00:23 नवीन
+१ सुहास एकदम सहमत. बाकि अविकां ची जुनी स्टायिल आहे हि . विषय काढुन पळुन जायचे . आता ते धाग्याकडे फिरकणारहि नाहित त्यामुळे मग आपणच आपली मतं मांडत बसायचा जाम कण्टाळा येतो ते नुसते लांबुन मज्जा बघतात :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास

सहमत

रामदास
Mon, 12/03/2012 - 12:01 नवीन
आयडीमध्ये कु दिसला की पळून जावे असे धोरण तूर्तास मी स्विकारले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

+१

अर्धवटराव
Mon, 12/03/2012 - 00:25 नवीन
. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास

++++

पियुशा
Mon, 12/03/2012 - 16:05 नवीन
+++++११११११११११११११११११११११११११११११ टु सूहास प्लिज निदान संगिताला (म्युझिकला ) कुठ्ल्याही धर्माशी / देशाशी /पंथाशी जोडु नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास

हे

चिरोटा
Mon, 12/03/2012 - 18:25 नवीन
प्लिज निदान संगिताला (म्युझिकला ) कुठ्ल्याही धर्माशी / देशाशी /पंथाशी जोडु नका
खरे तसे असायला हवे पण संगिताचा वरील कशाशीही संबंध नसतो हे समजणे भाबडेपणाचे ठरेल.सध्याच्या काळात संगीत काय वा कुठलिही कला,पद्धतशीर मार्केटिंग केले जाते.मोठे आर्थिक् व्यवहार,कुठलातरी मोठे संगीत कंपू,गुरु, ह्यामागे असतातं. बॉलिवूडमधल्या अनेक गीतकारांना हल्ली विशिष्ट पंथिय शब्दच जास्त का सुचावेत हा अकु ह्यांचा प्रश्न आहे.व्यक्तिशः मला त्यात धर्माचा संबध वाटत नसून 'माल जास्त खपतो म्हणून बनवला जातो' असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

महंमद रफी

क्लिंटन
Sun, 12/02/2012 - 23:37 नवीन
"मधुबन मे राधिका नाचे रे गिरीधर की मुरलिया बाजे रे" हे गाणे महंमद रफींनीच गायले आहे ना?
  • Log in or register to post comments

तशी तर खूप आहेत

राही
Mon, 12/03/2012 - 02:14 नवीन
बैजु बावरातली सगळी भजने, जोगन, तानसेन,आस्तिक वगैरेतली गाणी,कृष्णावरची सगळी गाणी,राधा,मीरा वगैरेंची गाणी इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

तोच तर मुद्दा आहे!

विकास
Mon, 12/03/2012 - 18:21 नवीन
"मधुबन मे राधिका नाचे रे गिरीधर की मुरलिया बाजे रे" हे गाणे महंमद रफींनीच गायले आहे ना?
ते गाणे सैगल/मन्ना डे/महेंद्र कपूर/मुकेश यांना का म्हणायला दिले नाही? ;) असो, चर्चेचे वर्गिकरण "विरंगुळा" मधे करायचे राहीले असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

शीर्षक खटकले.

हारुन शेख
Mon, 12/03/2012 - 03:42 नवीन
धागा अर्थात उथळ. प्रतिक्रियांचे कौतुक :) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

अपेक्षित

पैसा
Mon, 12/03/2012 - 11:53 नवीन
धाग्याचे नाव पाहून उघडावा असेही वाटले नव्हते. पण शेवटी बघितला. अकुंकडून अपेक्षित धागा. रहावत नाही म्हणून रेहमानबद्दल ४ शब्द खरडतेच. लगान सिनेमातालं "ओ पालनहारे" आणि "मधुबन में जो कन्हय्या" ही गाणी कोणी संगीत दिलेली आहेत हो? या सिनेमाचा निर्माता/अभिनेता कोण आहे हो? सांगायची गरज आहे का? आणि रेहमानचा "वंदे मातरम" अल्बम कसा विसरलात?
  • Log in or register to post comments

!!!

गवि
Mon, 12/03/2012 - 12:14 नवीन
धाग्याचे नाव पाहून उघडावा असेही वाटले नव्हते. पण शेवटी बघितला.
काय करणार.. डूटी.. असंच ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

म्हणून रेहमानबद्दल ४ शब्द

किसन शिंदे
गुरुवार, 12/06/2012 - 13:06 नवीन
म्हणून रेहमानबद्दल ४ शब्द खरडतेच. लगान सिनेमातालं "ओ पालनहारे" आणि "मधुबन में जो कन्हय्या" ही गाणी कोणी संगीत दिलेली आहेत हो?
सहमत! याच परंपरेतलं जोधा अकबरमधलं बेला शेंडेने गायलेलं "मनमोहना" विसरून कसं चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

Unexplored territories

चिरोटा
Mon, 12/03/2012 - 15:18 नवीन
हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे गाण्यांचे झपाट्याने चाललेले इस्लामी करण
ह्यामागे ईस्लामीकरण वगैरे नसून सुफी/बंदा/मौला वगैरे बॉलिवूडमध्ये unexplored territories आहेत.पूर्वीच्या काळात थोडीफार गाणी असतीलही पण सध्या असल्या गाण्यांना चलती आहे. अजीर्ण होईपर्यंत गोष्टी ताणणे हा बॉलिवूडचा स्वभावधर्म आहे.
  • Log in or register to post comments

धागाकर्त्यांच्या भावनांशी

llपुण्याचे पेशवेll
Mon, 12/03/2012 - 15:31 नवीन
धागाकर्त्यांच्या भावनांशी सहमत आहे. इस्लामचे उदात्तीकरण सरसकट सर्वत्र चाललेले दिसत आहे. गाण्यांमधे तर असे शब्द मुद्दाम येताना दिसतात. बाकी मांजर बनून डोळे मिटून दूध प्यायचे का हे आपले आपण ठरवावे.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. नाहीतरी आजकाल

पिंगू
Mon, 12/03/2012 - 16:50 नवीन
सहमत आहे. नाहीतरी आजकाल बॉलीवूडमध्ये पंजाबी सूफी संगीताचा प्रभाव जरा जास्तच होत आहे. - पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

नको तिथे धर्म घुसडू नका

पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 12/06/2012 - 09:55 नवीन
गाणे ऐकताना त्यातला अर्थ, शब्दांचे सामर्थ्य आणि अर्थातच आवाज (तो आपल्या हृदयाला किती भिडतो) आणि संगीत याच गोष्टी बघाव्यात. गाणारा/संगीत देणारा कोणत्या धर्माचा आहे, त्यात राम आहे की मौला/खुदा (माझ्यासाठी दोन्हींमध्ये फरक नाही) हे बघू नये असे मला वाटते. मला जसा किशोर कुमार/ मन्ना डे/हेमंत कुमार आवडतात त्याचप्रमाणे महंमद रफी/तलत आझीझ हे पण आवडतात. इतकेच काय तर मला जगजीतची काही गाणी आवडतात तशीच गुलाम अली/मेहदी हसनचीही गाणी आवडतात. आणि हो.चुपके चुपके ऐकावे ते गुलाम अलीचेच. जगजीत सिंगच्या चुपके चुपकेमध्ये गुलाम अलीच्या चुपके चुपके च्या नखाचीही सर नाही असे मला वाटते.पण तसे वाटायचे कारण म्हणजे गायकांचा धर्म नसून कोणाचा आवाज हृदयाला अधिक भिडतो हे महत्वाचे. तेव्हा नको तिथे धर्म घुसडू नये ही विनंती.
  • Log in or register to post comments

परफेक्ट.

गवि
गुरुवार, 12/06/2012 - 10:16 नवीन
परफेक्ट. हिंदू संगीत संस्कृतीइतकीच मुस्लिम संगीत / कला संस्कृतीही परंपरेने डेव्हलप झाली आहे. कितीतरी खांसाहेब गुरुशिष्य परंपरेत प्रसिद्ध आहेत. अशा खांसाहेबांचे , उस्तादांचे शिष्य हे सर्वधर्मीय आहेत. प्रगल्भ विकसित अशा संगीतपद्धतीचा प्रभाव व्यावसायिक संगीतावरही पडणं म्हणजे मुस्लिम किंवा तत्सम प्रभाव वाढवण्याचं षडयंत्र असं का वाटून घ्यावं? संगीत, खेळ, नृत्य, एकूण वेगवेगळी कलाक्षेत्रं तरी जात धर्म यांच्या पलीकडे असावीत अशी फार इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

हजार बार सहमत

चौकटराजा
गुरुवार, 12/06/2012 - 10:37 नवीन
खून का , ऐश का, जुनून का , रहम का , दुआ का या हुन्रर का कोई मजहब नही होता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

काय अविनाश कुलकर्णी साहेब

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 12/06/2012 - 10:21 नवीन
Image removed. काय अविनाश कुलकर्णी साहेब निवांत ना,इथे आग लागलीयेImage removed.झोपता काय
  • Log in or register to post comments

चर्चा गायकाचा धर्म हि नसुन

अविनाशकुलकर्णी
Fri, 12/07/2012 - 11:23 नवीन
चर्चा गायकाचा धर्म हि नसुन गाण्याचे इस्लामि करण हा आहे... दबंग..व अक्षय देवगण खान कंपनिच्या सिनेमाची गाणी निट ऐकली कि जाणवते..
  • Log in or register to post comments

हरकत काय आहे?

श्रीरंग_जोशी
Fri, 12/07/2012 - 12:57 नवीन
इस्लाम काय आपल्याला परका आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

क्या बात है.

अर्धवटराव
Sat, 12/08/2012 - 00:04 नवीन
एका वाक्यात सर्व विवादांचे निर्मूलन (बीर्याणी आणि मसालेभात भोक्ता) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हम्म्म्म..... झोपेतून उठलात

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 12/08/2012 - 01:44 नवीन
हम्म्म्म..... झोपेतून उठलात की बोलू....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

नाही...

विकास
Sat, 12/08/2012 - 01:12 नवीन
चर्चा गायकाचा धर्म हि नसुन गाण्याचे इस्लामि करण हा आहे...
इस्लाममधे मला वाटते संगीतच निषिद्ध आहे. त्यामुळे संगिताचे इस्लामीकरण होते म्हणणे अयोग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

रफिच्या ७० च्या दशकातल्या

अविनाशकुलकर्णी
Fri, 12/07/2012 - 11:26 नवीन
रफिच्या ७० च्या दशकातल्या गाण्याचे दाखले इथे लागु पडतात का? २०१२ चालु आहे..गाणी निट आइकली कि इस्लामि करण किति वेगाने होत आहे ते जाणवते.
  • Log in or register to post comments

अरेच्या !

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/07/2012 - 13:03 नवीन
माझा इथला चौकशी करणारा प्रतिसाद का उडाला बा ? का अजून स्कोर सेटल करण्याचे खेळ चालूच आहेत? :) असू दे.. असू दे.. तुम्हाला आनंद मिळतोय ना? मग चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

गाणी निट आइकली कि इस्लामि करण

कवितानागेश
Sat, 12/08/2012 - 08:38 नवीन
गाणी निट आइकली कि इस्लामि करण किति वेगाने होत आहे ते जाणवते>> मग आता आपण काय करायचे बरे????? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

ओक्के..

चिगो
Mon, 12/10/2012 - 14:52 नवीन
मग आता तूम्ही ह्याच्याविरोधात मोर्चे काढा, निषेध करा.. रेहमान आणि त्याच्यासारख्या इस्लामीकरण (?) करणार्या संगीतकारांना वाळीत टाका.. मी तोपर्यंत त्याचे 'ओ पालनहारे' 'मधुबन मे जो कान्हा', 'श्रीरामजी आये' इत्यादी, तसेच 'पिया हाजी अली' 'मौला मेरे ले ले मेरी जान' वगैरे ऎकतो.. काय त्रास आहे साला.. अरे नसेल ऎकायची अशी गाणी तर नका ऎकू ना ! कूणी नरड्याला चाकू लावून ऎकायला भाग पाडतोय का?
  • Log in or register to post comments

किती हा भाबडेपणा...

नितिन थत्ते
Mon, 12/10/2012 - 18:04 नवीन
हेच ते.... अकु सांगतायत,"सावध रहा". त्या लोकांचा डाव लक्षातच येत नाहीये तुमच्या. जेव्हा सगळं हिरवं होईल तेव्हा मग अकुंची आठवण येईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा