१) छोट्या कैर्या ५-६ मोठ्या असतील तर १-२
नुसती कैरी पाहूनच तोंपासु की नाही!:स्मित:
२) १ मोठा चमचा मिठ
३) १ मोठा चमचा साखर
४) पाऊण चमचा लाल मसाला किंवा लाल तिखट
५) १ चमचा गोडे तेल
पाककृती
१) प्रथम कैर्यांचा सुगंध घेत घेत कैर्यांची साले सुरीने काढा. छोट्या कैर्या असल्यास त्याचे दोन भाग करून कोय काढून टाका. बाठेवाल्या असल्यास तशाच किसण्यासाठी ठेवा, किसुन झाल्यावर बाठे टाकता येतात.
२) आता कापलेल्या कैर्या किसून घ्या. ही प्रक्रिया करताना तोंडाला पाणी सुटणे, लहान मुलांनी मध्येच कैर्या पळवणे असे प्रकार होऊ शकतात. अगदीच अनावर झाल्यास एखादा तुकडा तोंडात टाका. :स्मित:
३) किसामध्ये मिठ, मसाला, साखर टाकुन एक चमचा कच्च्या तेलाची धार सोडा (कच्च्या तेलाची म्हणजे न तापवता वगैरे). हा किस हाताने एकजीव करा म्हणजे तुमच्या हाताची चवही त्याला येईल. पण न राहवून बोटे तोंडात जाणार नाहीत याची काळजी घ्या :हाहा: धिर असेल तर थोडा वेळ मुरवत ठेवा म्हणजे पाणी सुटेल आणि रसाळ लज्जतदार, मसालेदार कोशिंबीर तयार होईल.
हा मी अधीरपणाने न मुरवाता काढलेला तयार कोशिंबीरीचा फोटो.
अधीरपणाने काढण्याचे कारण ह्या फोटोवरून समजेलच :स्मित: आमची बच्चेकंपनी मुरायच्या अधीच तुटून पडली होती कोशिंबीरीवर.
अधिक टिपा:
विशेष टिप म्हणजे मुलांना आधी सांगूच नका हा प्रकार करणार आहात नाहीतर तुमच्या पाककृतीत मध्ये मध्ये अडथळे येतील :हाहा: मुलेच काय काही मोठी माणसेही अडथळा आणतात घाई करुन.
जर साखर मिठाचे प्रमाण कमी वाटले तर नंतर थोडे टाकावे.
मसाला असला तरी हा प्रकार मुले आवडीने खातात.
तेल आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालेल.
लाल तिखट असल्यास पाव चमचा पुरे.
वाचन संख्या
9099
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त तोंपासु....
+१
In reply to मस्त तोंपासु.... by इरसाल
आई ग्गं...
बनविण्यात आली
भन्नाट !!
अगदी म्हणजे अगदी म्हणजे केव्हा एकदा
अगदी अगदी.. सुदैवाने इकडे
In reply to अगदी म्हणजे अगदी म्हणजे केव्हा एकदा by लीलाधर
___/\___काय रे परा सारखं
In reply to अगदी अगदी.. सुदैवाने इकडे by गवि
हॅ हॅ हॅ.. मी आणि गवि एकच
In reply to ___/\___काय रे परा सारखं by प्यारे१
वॉव !!!! कैर्या आहेतच ,आजच
झकास!
चान चान !! आम्ही जरा वेगळ्या
आम्ही यात खमंग फोडणी करुन
In reply to चान चान !! आम्ही जरा वेगळ्या by सुहास..
कैर्या दिसल्या की त्या सोलणे
आह!
नशीब तुम्हाला तिथे कैर्या
(No subject)
वा! आत्ता मी नुसत्याच कैर्या
छ्या. कैर्या किसायला कुणाला
यकु हो बारीक तुकडे करुनही
फोटो मस्त!
कैरी पाहूनच तोंपासु कोशिम्बिर
पाकक्रुती आणी प्रतिसाद दोन्ही
पाकक्रुती आणी प्रतिसाद दोन्ही
धन्यवाद