Skip to main content

१२.१२.१२

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 27/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चाप्रस्तावाचे कारण - विषयाशी संबंधित समर्पक बाफ उपलब्ध नसणे चर्चेचा हेतू - अत्यंत महत्वाच्या विषयाकडे सदस्यांचे लक्ष वेधून घेणे सध्या केंद्रातील सरकारवर एकामागून एक आरोप होत असतानाच एकामागून एक घोटाळे उजेडात येत आहेत. त्यामुळे अर्थातच सरकार धास्तावले असावे, निवडणुकीच्या भीतीने पस्तावले असावे अशा नंदनवनात राहत असतानाच मित्राने जाहीर केले कि २०१२ या वर्षात कधीतरी जगबुडी होणार असल्याने सरकार निर्धास्त आहे. मंत्रालयातल्या आगीत होरपळून जिवानिशी वाचलेल्या सरकारास अशा रितीने जगबुडी ही इष्टापत्ती वाटावी याचे नवल वाटले. पण पुन्हा मित्र दोन दिवसांनी आला आणि सरकारच्या पापाचा घडा भरणार असे म्हणू लागताच आम्ही विचारले कि जगबुडीचे काय ? तेव्हां जगबुडीतून सावरण्याचा उपाय सापडल्याचे त्याने सांगितले. हा उपाय वाचकांसाठी येथे देत आहोत. २०१२ हा मायन लोकांच्या भविष्यात अखेरचा दिवस नोंदवून ठेवला असे समजले जात असले तरी त्यातल्या काही ओळींचा खुलासा नुकताच झालेला आहे. "१२.१२.१२ हा २०१२ या वर्षातील आणि जगाच्या इतिहासातील अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी बाराच्या ठिकाणी जन्मलेले मूल आपल्या तेजस्वी प्रतापाने बाराच्या सूर्यासारखे अवकाशात झळाळून उठेल. अर्थात या बालकाच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १२ हा अंक येत असलेल्या कुठल्याही स्थळाकडे प्रयाण करावे. ज्या ठिकाणी आपली मती चालेनाशी होईल असे वाटू लागेल अशाच ठिकाणास आपले इच्छित स्थळ संबोधून तेथे मायन लोकांनी सांगितल्याप्रमाणे घागरविधी करावा. येणेप्रमाणे जगबुडी टळू शकेल." आम्हास हा भाग ज्याप्रमाणे प्राप्त झाला त्याप्रमाणे इथे देण्यात आलेला आहे. हातचे राखून ठेवले नाही, पदरचे त्यात मिसळले नाही. तरी वाचकांनी आपल्याकडील अमोघ माहीती चर्चेदरम्यान द्यावी आणि एका महत्वाच्या कार्याची सिद्धी करावी ही विनंती. आपला णम्र खट

वाचने 3988
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

१२ तारखेनंतर जेव्हढे दिवस जग राहील तितके दिवस पॉवरमॅन(महाराष्ट्रीयन) पंतप्रधान होनार आहेत.(साभार कोअर कमीटी ) शेवटची इच्छा म्हणुन

तो नोस्ट्रयाड्यामस बाबा जी तर दुसरच काहितरी बोलून गेलाय की हो. भारत म्हणे महासत्ता होणारे आणि जगभरात उदय किवा उदयन नावाचा हिन्दु राजा राज्य करणारे म्हणुन. बाकी कशात सत्ता नाही गाजवली तरी भ्रष्टाचारात अम्हीच राज्य करणार. :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जगभरात उदय किवा उदयन नावाचा हिन्दु राजा राज्य करणारे म्हणुन
छत्रपती उदयनराजे भोसले कि काय ?

अध्यात्मिक दृष्ट्या विचार केलातर प्रत्येक ओळीचा अर्थ लागेल. जाउ द्या ना घरी, म्हणजे वरती हे लक्षात घेउन गाण ऐकाव.