मैदा चकली
हाय मिपाकर्स ..
कशी झाली दिवाळी ?
आज माझी रेसेपी बघून तुम्हाला पिवशी डोक्यावर पडलीये का असा प्रश्न पडू शकतो ? दिवाळी झाल्यानंतर चकलीरेसेपी ?
असो .....
मैदा चकली :
साहित्य : ३ वाट्या मैदा , बटर / तेल एक चमचा , तीळ २ चमचे , ओवा १ छोटा चमचा , जिरे १ छोटा चमचा , हिंग छोटा अर्धा चमचा , हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार , एक वाटी शिजवलेली मुग दाळ, लालतिखट १ चमचा (ऑप्शनल )
कृती :
मैद्याची सुती किंवा तलम कापडामध्ये पुरचुंडी बांधून घ्या.
आता ही पुरचुंडी एका डब्यात घालून डब्याला घट्ट झाकण लावा.
कुकरमध्ये अर्धा डब्बा बुडेल इतपत पाणी घेऊन त्यात हा मैदा (पुरचुंडीचा डब्बा ) १५ -१० मिनिट वाफवून घ्या . साधारण ४-५ शिट्ट्या होतील.
कुकरची वाफ गेल्यावर हा मैदा काढून घ्या ह्याचा मोठा ढेकूळ तयार झाला असेल तो लाटण्याने फोडून घ्या अन मग चाळुन घ्या.
आता ह्यात जीर ,ओवा ,मीठ, बटर /तेल हिंग लालतिखट अन शिजवलेली मुगाची डाळ घालून एकजीव गोळा करा .
दाळ शिजवताना जे पाणी घालतो त्याच पाण्यात हा मैदा मळुन घ्या पीठ कणकेसारखे मऊ असावे ,घट्ट नको नाही तर चकली पाडताना तुमचे हाताचे मसल्स टाईट होतील ;) आता हा गोळा १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
आता तेल गरम करा तेल कडकडीत झाल कि आच मंद करा. सोरयाला तेलाचा हात लावून यात मिश्रण घालून एका ताटात आधी चकल्या पाडून घ्या. अन मंद आचेवर चकल्या खरपूस तळून घ्या . ह्या चकल्या अगदी कुरकुरीत अन तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात.
हुस्श्श.....आतापर्यंत ( पा.कृ . साठी ) घेतलेल्या कष्टाचे कुरकुरीत अन खुसखुशीत फळ घरच्यांना चाखायला मिळाल्यावर हरबरयाच्या झाडावर चढण्यासाठी तयार असा ;)
* ह्या चकल्यांना साउथकडे मैदा मुरुक्कु म्हणतात फक्त यात मुगाची डाळ अन तिखट नसते

वाचने
24908
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
चकलीसाठीचं नवं काँबीनेशन
छान आहे.
पुणेरी ??
In reply to छान आहे. by सस्नेह
@हा माझा पहिलाच प्रयत्न होता
In reply to पुणेरी ?? by पियुशा
वेढे वेड लावण्यासारखे हैत नै
In reply to @हा माझा पहिलाच प्रयत्न होता by अत्रुप्त आत्मा
+१११११११११.......
In reply to छान आहे. by सस्नेह
मस्त
मस्त!
वाह!
खास चकल्या..
चकल्या आकारात गंडल्या आहेत.
मस्त रेसेपी...!
स्वारी..............
आग खुप छान चकल्या अगदी
छान झाल्यात चकल्या.
वाह वाह
हायला! नवीनच प्रकार दिसतोय!
मैद्याची चकली नाही ग कधी केली
वरातीमागुन घोडं!
छान
मला सुरुवातीला मैदा मुरूक्कु
ओय ट्विटी... तुमने चकली बनाने
दिवाळीचा सगळ्यात भारी आवडता
मस्त केलीय चकली