निवग-याचा सांबारा.
दिवाळीचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय म्हणून हा वेगळा पदार्थ देत आहे. मागच्या
पाककृतित फ़ोटो नाहीत असे सगळ्यांनी विचारले पण तो कॅमेरा वगैरे हाताळायचे
मला कुठले जमायला! या ही वेळी फ़ोटॊ नाहीत. तरी गोड मानून घ्यावे (खावे).
येथे वाचून कुणी हा पदार्थ केल्यास त्याचे फ़ोटो अवश्य द्यावेत.
हा पटकन होणारा व पोटभरीचा ब्रेकफ़ास्टला करायचा पदार्थ आहे.
साहित्य: तांदुळाची पिठी दोन वाट्या, सांबारासाठी साहित्य: सांबार मसाला,
धने व जिरे पुड, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, सांबारात घालण्यासाठी लाल भोपळ्याच्या फ़ोडी, फ़रसबीचे तुकडे,
मिळाल्यास शेवग्याच्या शेंगा, बारीक चिरलेला कांदा. बटाट्याच्य़ा फ़ोडी, शिजवलेली तुरीची डाळ १ वाटी, तिखट, मिठ, तेल ईत्यादी.
प्रथम सांबार करून घ्यावे. हिंग कढिपत्ता घालून फोडणी करावी त्यात सांबारात घालावयाच्या भाज्या घालून दोन चांगल्या वाफा येऊ द्याव्यात. त्यावर शिजलेली डाळ घोटून घालावी मसाला,धने जीरे पुड, मिठ, तिखट, व आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ घालावा सांबार चांगले उकळू द्यावे. यात शेवग्याच्या शेंगा नेहमीप्रमाणे तुकडे करून न घालता मी त्या आधी उकडून त्याचा गर काढून सांबारात घालते.
अडीच वाट्या पाणी घेउन आधण ठेवावे त्यात अर्धा चमचा मिठ, व एक चमचा तुप घालावे.पाण्याला चांगली उकळी आली
की त्यात तांदुळाची पिठी घालुन लगेच गॅस बंद करावा. सतत हलवित रहावे गुठळी होणार नाही याची काळजी घ्यावी. हा गोळा गरम असताना जरा तेलाचा हात लावून मळून घ्यावा. ईडली पात्राला तेलाचा हात लावून ठेवावा. आम्ही केळीची पाने व चाळणी वापरीत असू. आपल्या कुरड्याच्या सो-या (साचा) घेउन मध्यम आकाराची जाळी बसवावी. मळलेल्या पिठाचा गोळा त्यात घालून ईडली पात्रातील खळग्यांमध्ये कुरड्या घालतो त्या प्रमाणे निवग-या घालाव्या. बारा ते पंधरा मिनिटे वाफ द्यावी.
ईडली प्रमाणेच निवग-या अगदी सहज सुटून येतात. एका बाउल मध्ये गरम गरम निवग-या घालाव्या वर सांबार घालून बारीक चिरलेला कांदा वरून आवडत असल्यास घालून सर्व करावे. ही डिश गरम गरमच चांगली लागते.
ता. क. खांसाहेबांनी दिलेल्या चिजा कुणीतरी विचारल्या. पण तो विषय वेगळा. त्या चिजा अशा लिहून दाखवता येणार नाहीत. आजकालच्या नोटेशन पध्दतीने शिकवल्या नाहीत. त्या समोर बसूनच शिकले. असो.
वाचने
3750
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
येथे वाचून कुणी हा पदार्थ
वरणफळे
तो कॅमेरा वगैरे हाताळायचे
निवग-याची कृती
+ १ टु ऑल प्रतिसादक
मस्त!
अनवट पाकृ
In reply to मस्त! by साती
सहमत
In reply to अनवट पाकृ by पैसा