नळ-टाक्यांची पारंपारिक कोडी वाचून कंटाळा आला म्हणून वाटलं की एक वेगळं कोडं घालावं. गणिती कोडं आहे म्हटल्यावर काहीही गृहीतकं चालतात असं असलं तरी शक्यतो अचाट गृहीतके टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
कोडं असं आहे:
अ. समजा जगात एक लक्ष कोटी (एक ट्रिलियन) बॅरल खनिज तेल उपलब्ध आहे आणि त्यापैकी २०१२ मध्ये (फक्त) १० अब्ज बॅरल तेल वापरले गेले. मानवी प्रगतीमुळे तेलाच्या वापरात दर वर्षी १% ने वाढ होते असे समजले. तर,
१. जगातले तेल कधी संपेल का?
२. संपणार असेल तर किती वर्षे लागतील?
ब. समजा तेल संपणार असेल म्हणून किंवा संपणार नसले तरी ते जाळल्याने प्रदूषण होते म्हणून आपण स्वच्छ उर्जेचे पर्याय शोधले आणि इतर स्रोतांबरोबरच अतिप्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेचा वापर करण्याचे ठरले. समजा फक्त सौरऊर्जेचा वापर करून सगळी कामं करायची ठरली तर जगाच्या क्षेत्रफळाच्या १/७ भाग सोलर पॅनल्सनी झाकावा लागेल असे कळले. पण सुदैवाने पवनऊर्जा, जलविद्द्युत ऊर्जा वगैरे इतर पर्याय असल्याने सौरऊर्जेसाठी जगाच्या क्षेत्रफळाच्या फक्त १/१४ भाग लागेल असे ठरले. एक चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाच्या सोलर पॅनलसाठी २५० ग्रॅम खनिज धातू लागतो. पृथ्वीचा आकार पूर्ण गोलाकार आहे असे धरले आणि त्रिज्या ६४०० कि.मी. आहे असे धरले तर,
३. ठरल्याइतकी सौर ऊर्जा मिळवण्यासाठी एक चौ.मी. क्षेत्रफळ असलेली किती पॅनल्स लागतील?
४. ठरल्याइतकी सौर ऊर्जा मिळवण्यासाठी किती किलो धातूची गरज पडेल?
क. समजा खनिज धातूचे अनंत साठे पृथ्वीवर आहेत आणि खाणीतून काढलेल्या प्रत्येक एक टन ओर मध्ये १० किलो धातू सापडतो आणि हे प्रमाण स्थिर असून कमी होत नाही. सध्या खाणीतून ५० टन ओर काढण्यासाठी १ बॅरल तेल लागते आणि दर अब्ज टनांमागे हे प्रमाण १% ने कमी होते कारण तेलावर चालणार्या काही यंत्रांच्या जागी विजेवर चालणारी यंत्रं येतात.जगात रोज १२५ लाख टन ओर उपसले जाते असे समजले तर,
५. खाणकाम फक्त विद्द्युच्चलित यंत्रांनी करण्याची स्थिती येईल का?
६. अशी स्थिती येणार असेल तर ती यायला किती वर्षे लागतील?
ड. सध्या खनिज तेलाचा EROI (ऊर्जा गुंतवणूक परतावा) १०० आहे असे धरले आणि सौर ऊर्जेचा १० आहे असे धरले आणि हा परतावा नवीन तंत्रज्ञानामुळे दरवर्षी २% ने वाढेल असे धरले आणि सौर ऊर्जेवरची सबसिडी आणि संशोधन निधी मिळून दरवर्षी ४०० बिलियन डॉलर्स जगभर खर्च करायचे ठरले तर,
७. सौरऊर्जा खनिज तेलाइतकी स्वस्त होण्यासाठी किती वर्षे लागतील?
८. सौरऊर्जेने खनिज तेलाची जागा घेण्यासाठी सबसिडी व संशोधन निधी मिळून एकूण किती खर्च केला जाईल?
वाचने
4479
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
२०१२ मध्ये जगाचा विनाश होणार
+१
In reply to २०१२ मध्ये जगाचा विनाश होणार by खटासि खट
ये हुई ना बात ! बक अप ननिभाऊ.
बाबो...कोडं कसलं, ही तर पुरी
हम्म्म...
नुस्तं समजायचं :)
In reply to हम्म्म... by राजेश घासकडवी
तुम्ही शाळेतपण गणिते अशीच
In reply to हम्म्म... by राजेश घासकडवी
हो...
In reply to तुम्ही शाळेतपण गणिते अशीच by विश्वनाथ मेहेंदळे
ठीक आहे.
In reply to हम्म्म... by राजेश घासकडवी
मानलं बुवा तुम्हाला
In reply to ठीक आहे. by नगरीनिरंजन
कमाल आहे! तुम्ही नीट वाचले
In reply to मानलं बुवा तुम्हाला by राजेश घासकडवी
चूक झाली खरी
In reply to कमाल आहे! तुम्ही नीट वाचले by नगरीनिरंजन
नक्कीच.
In reply to चूक झाली खरी by राजेश घासकडवी
माझी उत्तरे
योग्य दिशेने जात आहात. फक्त
In reply to माझी उत्तरे by क्लिंटन