साहित्यः
करंदी १ ते २ वाटे
२ कांदे चिरुन
१ वांग्याच्या फोडी
२ छोट्या टोमॅटोच्या फोडी
२ मिरच्या
थोडी चिरलेली कोथिंबीर
१ ते १ १/२ मसाला
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
चविनुसार मिठ
२ पळ्या तेल
पाककृती :
करंदीचे शेपुट डोक्याकडील टोकेरी भाग व मधले पाय काढून टाकावेत. डोके पूर्ण काढायचे नाही. त्याच भागाला जास्त चव असते.
भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यावर कांदा बदामी रंग येई पर्यंत तळून घ्या.
तळलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून परता. आता ह्या मसाल्यावर धुतलेली करंदी व वांगी घालून परतून घ्या.
जर रस्सा करायचा असेल तर गरजेपुरते पाणी घाला.
साधारण १०-१२ मिनीटांत करंदी शिजेल. मग त्यावर टोमॅटो, कोथिंबीर मिरच्या (मोडून), मिठ घाला.
रस्सा असणार्या करंदीला ढवळून एक उकळी येऊ द्या. सुके करायचे असेल तर एक वाफ आणा आणि गॅस बंद करा.
हे आहे करंदीचे कालवण (रस्सा)
अधिक टिपा:
१) करंदी म्हणजे छोटी कोलंबी सुकवलेली. सुके मासे खारट असतात त्यामुळे मिठ थोडे कमी प्रमाणात घालावे.
२) टोमॅटो ऐवजी चिंच, कोकम घालू शकता.
३) कोणत्याही सुक्या माश्यांमध्ये वांगे, शेवग्याच्या शेंगा चविष्ट लागतात. करंदीत बटाटाही घालता येतो.
४) करंदीचे सुके करताना सिमला मिरची घातल्यासही छान लागते.
५) मसाला असेल तर दिड चमचा तिखट असेल तर १ सपाट चमचा वापरावा.
६) सुक्या माश्यांमध्ये लसुण सहसा घालत नाहीत. पण मन साशंक असेल तर घालू शकता फोडणीला किंवा पेस्ट करुन.
याद्या
9886
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म. आता यावर काय बोलू?
धन्यवाद !!!!!!
वा वा वा
ह्यात इंच साइझचे कापलेले
In reply to वा वा वा by इरसाल
घोलमा अए आमच्यात म्हणतात
व्वा जागुताई वा
_/\_ सुकेमासे प्रेमी
गणपा, यश, सोत्री, इरसाल,
आमच्या गावाची म्हण
ह्यालाच सोडे म्हणतात का ? की
बालपण आठवले. लहान असताना
पियुशा सोडे वेगळे. सोडे
जागुताइइइइइइइइइइइइइ
चखणा...
तोंडाला पाणी सुटले
ह्यालाच सोडे म्हणतात का ? की