पहिल्यांदाच सांगते, ही पाकृ माझी नाही हं. याची कर्ती-करवती माझी वहिनी शिल्पा. तिचं माहेर हुबळी.तीच या पाकृची अन प्रतिसादांची मालकीण.
दिवाळीचा गोडधोड फराळ खाऊन झाल्यावर भाऊबीजेला भाऊरायाला ओवाळायला कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूरची पद्धत अशी की दिवाळीचा फराळ खाऊन ‘गुळमाट’ झालेलं तोंड भाऊबीजेला ‘वशाट’ खाऊन खंगाळायचं ! घरोघरी भाऊबीजेला मटण ! या भाऊबीजेला आमच्या भावांना (मायंदाळ हैत ) खिम्याच्या गोळ्यांचा आठव आला. झालं ! शिल्पा हुबळीची. मग हुबळी स्टाईल खिमा-पालकबॉल्स ग्रीन करीची फर्माईश झाली. भाऊरायानं लगबगीनं बाजारात जाऊन कवळ्या मटनाचा ताजा खिमा आणला.
शिल्पानं साहित्य जमा केलं. मी लगेच मोबाईल घेऊन फोटो काढायला उभी राहिले.
पाव किलो खिमा , १ लहान कांदा बारीक चिरून १ चमचा मीठ
पाव चमचा हळद, २ चमचे टोमॅटोसॉस १ चमचा सोय सॉस
१ वाटी तेल, १ चमचा लसूण पेस्ट १ चमचा मिरची पेस्ट
पांढरा मसाला : ७-८ लवंगा, ३ इंच दालचीन
१ चमचा जिरे, ३ चमचे धणे
४ वेलदोडे २ इंच आले,
१ वाटी खोबरे, १० पाकळ्या लसूण
३-४ काड्या कोथिंबीर देठासहित.
हिरवा मसाला : १ कांदा मोठे तुकडे करून १ टोमॅटोमोठे तुकडे करून
१ वाटी बारीक चिरलेला पालक ७-८ मिरच्या
७-८ काड्या कोथिंबीर देठे काढून चिरलेली.
या पाकृला तेल अंमळ जास्त लागतेबरं !-- कोल्हापूरपेक्षा हुबळीचे लोक तर्री खाण्यात माहीर. त्यामुळे कट पाहून नाके मुरडणार्यांनी इकडे पाहूच नये अशी णम्र इनंती.
आता खिमा धुवून निथळत ठेवला अन दोन्ही मसाले तयार केले.
पांढऱ्या मसाल्यासाठी काढलेल्या साहित्यातले गरम मसाले १ चमचा तेलात २ मिनिटे परतून घेतले व पांढऱ्या मसाल्याच्या इतर साहित्याबरोबर मिक्सरमध्ये वाटून घेतले.
हिरव्या मसाल्यासाठी कांदा व टोमॅटोचे मोठे तुकडे व मिरच्यांचे तुकडे १ चमचा तेलात वेगवेगळे परतून घेतले. मग चिरलेला पालक व कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटून घेतले. आवडत असल्यास यात थोडी पुदिन्याची पाने घातली तर वेगळाच स्वाद येतो.
आता खिम्यामध्ये पाव चमचा मीठ, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर व लसूण मिरची पेस्ट घालून २-३ मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून घेतले व या मिश्रणाचे तेलाचा हात लावून पेढ्यापेक्षा थोडे लहान लहान गोळे बनवले.
गॅस पेटवून वर कुकर ठेवून त्यात तेल घातले. तेल तापल्यावर शिल्पाने कांदा घालून परतला. २ मिनिटांनी हळद घालून हलवले. मग अलगद खिम्याचा एक एक गोळा तेलात सोडला अन गॅस मंद केला.
आता ५ मिनिटे बिलकुल हलवायचे नाही. ५ मिनिटांनीगोळ्यांचा रंग बदलून पांढरट होऊ लागला. मग अगदी हलक्या हाताने गोळे खालीवर करून पुन्हा २ मिनिटे ठेवले. मग त्यात प्रथम हिरवा मसाला घालून ३-४ मिनिटे हलकेच परतले.
मग पांढरा मसाला घालून तसेच परतले.
आता मीठ , सोया सॉस व टोमॅटो सॉस घालून मिसळले अन कुकरचे झाकण लावून पूर्ण आचेवर दोन शिट्ट्या केल्या अन मंद आचेवर पुन्हा ५-७ मिनिटे ठेवले.
कुकर थंड झाला अन खिमा-पालकबॉल्स ग्रीन करी खानेको तैय्यार !
गरमागरम भाकरी, तांबडा रस्सा अन खिमा-पालकबॉल्स ग्रीन करी असे मस्त सजले ताट !
चला मंडळी जेवायला....!
वाचने
5248
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर पाककृती
+१००
In reply to सुंदर पाककृती by रामदास
फटू दिसलेच न्हाईत.
मस्त!
वांगी अजून आठवणीत
In reply to मस्त! by पैसा
वा.... superb.... एकदम टेस्टी
फोटू आणि पाकृ छानच. शाकाहारी
मीपण सध्या शाकाहारीच आहे
In reply to फोटू आणि पाकृ छानच. शाकाहारी by रेवती
काय म्हणे
हा हा हा !
In reply to काय म्हणे by स्पंदना
घरच्या आठ्वणीने डोळे भरलेत.
In reply to काय म्हणे by स्पंदना
घरच्या आठ्वणीने डोळे भरलेत.डिश बघून घरीच आहेस असं समज. सध्या तरी. इथे आलीस कि मी करून खाऊ घालीन आपल्या हाताने.वाचवा वाचवा
अरे वा! दमदार पदार्थ दिसतोय..
लै भारी गं
पालक आणि मटणाची युती एकदम
तोंडाला पाणी सुटले डीश पाहूनच.....
शेवटचा फटू निव्वळ जीवघेणा!!!
बेस्तरवारला....
जबरदस्त!!