Skip to main content

हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहे. कसाबला फाशी?

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 21/11/2012 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
गुजराथ निवडणुका, महागाई, सत्ताधा-यांवर सतत होणारे अपहाराचे आरोप, देशांतर्गत वाढता विरोध, मा.बाळासाहेबांचे अंत्यविधीचे वेळी उसळलेला जनसागर इत्यादी गोष्टीपासुन लक्ष वळवण्यासाठी हुकुमाचा एक्का काढण्यात आलेला आहे. वरिल अनेक मुद्यांप्रमाणे अजून एक मुद्दा वारंवार उपस्थीत केला जातो. तो म्हणजे "अफजल गुरू" आणि "कसाब" यांची फाशी. अफजल गुरूची फाशी अजून होत नाही कारण सत्ताधारी आघाडितील घटकपक्षाचा असलेला विरोध. पण गुजराथ निवडणूक, मुंबईत उसळ्लेला जनसागर, मोदी करीश्मा या गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरणार असे दिसत आहे. आत्ताच म.टा.च्या इआवृत्तीत एक महत्वाची बातमी वाचण्यात आली. कसाबला पुण्यात देणार फाशी? त्यात म्हणले आहे की पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला असून कसाबला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात ( जेल ) हलवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते . त्यामुळे कसाबच्या फाशीची अंमलबजावणी पुण्यामध्येच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे . पुढे असे म्हणले आहे की राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत कसाबच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली जाण्याची तसेच फाशीची वेळ अधिकृतरित्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. म.टा.ने चे.पु.वर हद्द केली आहे. तीथे म्हणले आहे "दहशतवादी कसाबला पुण्यात दिली फाशी - आर आर पाटील". आत्ताच इसकाळनेसुध्दा चे.पु.वर बातमी अपलोड केली आहे "अजमल कसाबला लटकविले फासावर" - सूत्र बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.

वाचने 28898
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे. मला नाही वाटत की काँग्रेस कसाब ला एका राज्याच्या निवडणुकीसाठी फाशी देइल्,कॉंग्रेस ला मुस्लिम मतांची काळजी असते नेहमी तसे नसते तर त्यांनी अफजल ला कधीचेच फासावर लटकविले असते,ते फक्त चर्चेचा झोत कसाब कडे वळवण्याचा प्रयत्न करताहेत.जेणेकरुन शिवसेनेबद्दल लोकांच्या मनामध्ये जी सहानभुती निर्माण होइल तीला अगोदरच पायबंद घालता येइल. राहीले बाळासाहेब, बाळासाहेबांच्या आणी मोदींच्या करीश्मा कसाकाय झाकोळला जाइल बरे,कसाब ला इतके दिवस बिर्याणी खाउ घातली आहे ते लोक सहजासहजी नाही विसरनार, अफजल गुरुचीही फाशी लटकलेली आहेच ना त्याचे काय?

नुकतीच मटाच्या इ-आवृत्तीत बातमी वाचण्यात आलीय. त्याला आज सकाळी ७.३० वा फासावर लटकवण्यात आले आहे. आज करोडो भारतीयांच्या मनाला खर्‍या अर्थाने शांती मिळेल.

In reply to by इनिगोय

कसाबला मारले याचा आनंद आहेच. पण जनता काही लहान बाळे नाहीत की एखादे चॉकलेट दिले की मोठ्ठे खेळणे विसरतो. :) कसाबला फाशी द्यायचे टायमिंग म्हणजे बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या वेळच्या जनसागरावरून लक्ष खेचण्यासाठीच केलेली खेळी आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कसाब नक्की "मेला" कि पाकिस्तानात धाड्ला ??? आनि आपण त्याला असा इतका गुप्ततेने का मारला? आप्ल्या देशात आप्ल्यला कस्ली भिती??? नाझीवाद असता तर अशी वेळच आली नसती.....

In reply to by चिंतामणी

अफजल गुरुबद्दल बोला.
याविषयी थत्तेचाचांचे मत ऐकायला आवडेल.बाकी मी त्यांच्या लिखाणाचा मोठ्ठा फॅन आहे पण त्यांच्या मिपावरील स्वाक्षरीत एक मजकूर वाचल्याचे आठवते---"अरे तुम्ही आज अफझल गुरूला फाशी द्या ही मागणी केली नाहीत का? मग तुम्हाला राष्ट्रवादी कसे म्हणवते" याच्याशी मात्र सहमत नाही. तेव्हा कसाबच्या मागोमाग अफझल गुरू असावा याविषयी त्यांचे मत वाचायला आवडेल.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

ती स्वाक्षरी एका दुसर्‍या सदस्याच्या स्वाक्षरीचे विडंबन होते. मला आता आठवत असेल तर राष्ट्रवादी असा शब्द नसून देशभक्त असा शब्द होता. कसाबला फाशी देण्याबाबत काही प्रश्नच नव्हता. खरे तर तो भारतीय नागरिक नसल्याने त्याच्यावर खटला वगैरे चालवण्याची गरज नाही असे माझे मत वेळोवेळी व्यक्त केले आहे. अफजल गुरू मात्र भारताचा नागरिक आहे. आणि त्याच्यावरील खटला योग्य पद्धतीने चालवला गेला नाही असे भाजपचे विद्यमान खासदार आणि कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी म्हटले आहे. तरीही न्यायव्यवस्थेने ठोठावलेली शिक्षा (योग्य पुराव्या आधारे ठोठावली असावी असे गृहीत धरून) सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मगच अंमलात आणायला हवी असे माझे मत आहे. परंतु कसाब आणि गुरू (अ‍ॅक्च्युअली) फासावर जाऊ नयेत असे इथल्या (त्यांना फाशी द्यायचा धोशा लावणार्‍या) काही लोकांना वाटत असावे असे म्हणण्यास या धाग्यावर येत असलेल्या प्रतिसादांवरून वाटते आहे.

In reply to by नितिन थत्ते

>> परंतु कसाब आणि गुरू (अ‍ॅक्च्युअली) फासावर जाऊ नयेत असे इथल्या (त्यांना फाशी द्यायचा धोशा लावणार्‍या) काही लोकांना वाटत असावे असे म्हणण्यास या धाग्यावर येत असलेल्या प्रतिसादांवरून वाटते आहे. हे म्हणजे अगदी खास. नेमके मार्मिक आणि मोजके

In reply to by नितिन थत्ते

जेठमलानींनी इंदीरा गांधी आणि राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची देखील म्हणूनच वकीली केली होती. त्यतील म्हणणे देखील आपल्याला मान्यच असेल अशी आशा करतो.

In reply to by विकास

त्यांचे म्हणणे मान्य आहे असे कुठे म्हटले आहे? न्यायालयाने अफजल गुरूला दिलेली शिक्षा (योग्य प्रक्रिया पूर्ण करून) अंमलात आणलीच पाहिजे असे मी म्हटले आहे. मी फक्त भाजपच्या खासदाराचे काय म्हणणे आहे ते सांगितले.

In reply to by नितिन थत्ते

मी फक्त भाजपच्या खासदाराचे काय म्हणणे आहे ते सांगितले. म्हणजे भाजपाच्या खासदाराने म्हणले तर ते बरोबर असणार असे आपल्याला म्हणायचे आहे का? ;) अजून एक अर्थ असा देखील आहे: केवळ आपल्या पक्षाचा खासदार म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीत भाजपा पक्षश्रेष्ठी लक्ष घालत नसावेत.

In reply to by अमोल केळकर

एक सुधारणा "डेंग्युने अर्धमेल्या कसाबला फासावर लटकवला" हे जात्स समर्पक वाटते नाही का? बाकी काँग्रेसने एक लक्षात ठेवावे "जो बुंद से गई वो हौद से नही आती"

२०१२ सालातली सर्वांत चांगली बातमी. बाळासाहेब असतानाच हे घडले असते तर अजून छान वाटले असते. असो... प्रणवदांना बाळासाहेबांनी केलेल्या विनंतीला मान दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.

बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.">>>>>>> चिंतामणी यांच्याशी सहमत.. कसाबला फाशी द्यायची असती तर केव्हाच देता आली असती पण योग्य वेळ साधून हे केलेले आहे... वा वा, यातही राजकारण शोधताय. असं एका रात्रीत ठरतं काय >>>> मग काय इतके दिवस त्याला ठेऊन लोणचे घालायचा विचार करत होतं का सरकार..!!!!!! मेला याच आनंद झाला पण इतक्या उशीरा का??? हा च प्रश्न पडतोय..

वास्तविक कोणाच्या मरणांवर आनंद व्यक्त करावा अशी आपली संस्कृती नाही.. अश्या हरामखोराला वास्तविक जाहीर फाशी द्यायला हवी होती. सी. एस . टी . वर नागडा करून उल्टा टांगून पब्लिक कडून त्याला मारवण्याची माझी इच्छा मात्र अपुरी राहीली....थान्कु प्रणव दा !

मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप नागरीकांना आज खर्‍या अर्थाने शांती मिळेल.. भारतीय न्याय संस्थेचा अभिमान व कौतुक वाटावे तेवढे कमीच.. प्रणवजींनी शब्द पाळला...

मला वाटते अशा खेळ्यानी आपले मत बदलावे इतकी भारतीय जनता खुळी नाही. ह्या फाशीला जनतेच्या मते उशीरच झालेला आहे. सबब कॉग्रेसला याचा भावनिक लाभ मिळेल व त्याचे रुपांतर मतात होईल असे वाटत नाही. बाकी मी तुम्हाला राष्ट्रपति निवडणुकीत पाठबळ देतो तुम्ही माझी ही कसाबला फाशीची विनंति मान्य करा अशी जर अट बाळासाहेबानी टाकली असेल तर त्यांच्या राजकारणाला व देशभक्तीला सलामच केला पाहिजे !

हे वृत्त अधिकृत नाही तेव्हा त्यावर प्रतिक्रीया देणे किंचित घाईचे ठरावे .. मात्र जर हे खरे असेल तर या प्रकरणात सद्य कायद्यानुसार - भारतीय घटनेनुसार- सदर आरोपी दोषी ठरण्यासाठी भरपूर कष्ट उपसून साक्षी-पुरावे गोळा करून भक्कम केस उभी करणार्‍या पोलिस पथकाचे, निर्भिड साक्षी देणार्‍या नागरीकांचे, जबाबदार वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांचे, समर्थपणे केस उभी करणार्‍या वकील मंडळींचे, अतिशय वेगाने व खास लक्ष देऊन पाठपुरावा करणार्‍या न्याययंत्रणेचे, संयमी प्रतिक्रीया देणार्‍या राजकीय पक्षांचे/नेत्यांचे आणि कसाबलाही आपले म्हणणे मांडायची संधी मिळण्यासाठी त्याची वकीली करणार्‍या वकिलांचेही आभार आणि अभिनंदन करणे अधिक अगत्याचे वाटते.

In reply to by ऋषिकेश

दहशतवादी कसाबला सकाळी साडेसातला फाशी दिली ही अधिकृत बातमी आहे. विविध वाहिन्यांवर सुशीलकुमार शिंदे यांनी माहिती दिली. मटाची बातमी सतत घुसखोरी करुन भारतीय नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा मृत्युच असेल असा एक संदेश जावा. -दिलीप बिरुटे

In reply to by बॅटमॅन

कसाब असे दुरुस्त करत होतो तर प्रतिसाद टाकलाच का ! विशेषाधिकारात दुरुस्ती केली आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडेसे अवांतर- हा अधीकार सगळ्यांना होता. तो "विषेषाधिकार" का झाला? मिपामध्येसुध्दा घटनेचे ३०७वे कलम आहे वाटते. :P

In reply to by चिंतामणी

>>> हा अधीकार सगळ्यांना होता. अंहं. लेखन संपादनाचा अधिकार सर्वांना होता. पुढे तो अधिकार काढुन टाकण्यात आला. प्रतिसादाला उपप्रतिसादाचा बूच मारल्यावर मूळ प्रतिसाद सदस्यांना संपादित करताच येत नाही. विशेषाधिकार यासाठी वापरावा लागला की बातमीचा दुवा आणि मसुदा कसाबचा आणि प्रतिसादाचे शीर्षक अफजल गुरुचे झाले होते. :) गोंधळ नको म्हणुन प्रतिसाद संपादित केला. अन्य कोणी सदस्यांनी अशी विनंती केली असती तर असा बदल केलाच असता. घटनेत ३०७ वे कलम काय आहे बॉ ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जम्मु आणि काश्मीर राज्याला विषेशाधीकार देणारे घटनेतील कलम. या बद्दल अजून माहिती हवी असल्यास येथे टिचकी मारा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>प्रतिसादाला उपप्रतिसादाचा बूच मारल्यावर मूळ प्रतिसाद सदस्यांना संपादित करताच येत नाही. सध्या असे बूच मारले नसतानाही प्रतिसाद संपादन करता येत नाही. :(

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सदस्य म्हणून वावरत असताना संपादक म्हणून मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करणे बरे नव्हे. म्हणजे सरकारी नोकरीत सरकारी कामासाठी मिळालेल्या वाहनाचा वापर वैयक्तिक कामासाठी करणे. ;-) बघा पटते का?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बातमी बद्दल आभार.. सकाळी घरातून निघताना सगळीकडे 'सुत्राकडून' इतकेच सांगितले जात होते म्हणून तसे लिहिले होते. आता तसे असल्याने मी वर उल्लेख केलेल्या सगळ्या संबंधितांचे आभार आणि अभिनंदन!

आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. प्रणवदांचे, सुशीलकुमार शिंदे व आर आर पाटील ह्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन.

In reply to by अमोल खरे

अभिनन्दन!!.. कसाब'ला फाशी दिली गेली.... :) :) :) ____________________________________ बाळासाहेबांनी "वरती" देखील आपली हुकुमत चालवायला सुरुवात केलेली दिसतेय... ;) . 'यमदूत' तरी काय करणार.. शेवटी "बाळासाहेबां"चाच्च शब्द अन्तिम असतो...!! इथेही.. आणि तिथेही... किंवा कुठेही!!!..... अभिनन्दन पुन्हा एकदा !!!!!

२६/११/२००८ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामधील एक अतिरेकी अजमल कसाब याला मे २०१० मध्ये सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. त्यावर त्याचे अपील उच्च (फेब्रू २०११) व सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळले. परकीय नागरिकाला भारतीय न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावण्याचे हे उदाहरण कदाचित पहिलेच असावे. ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यावर कसाबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. नियमाप्रमाणे राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यावर मत (अहवालाच्या रूपाने) मागवले व केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारचे मत मागवले. दोन्हीकडून दयेचा अर्ज फेटाळण्याची विनंती राष्ट्रपतींना करण्यात आली. ५ नोव्हेंबरला राष्ट्रपतींनी या अर्जावर नकारात्मक निर्णय घेतल्यावर २ दिवसांत कसाबला फाशी देण्याच्या प्रक्रियेवर निर्णय घेण्यात आला. २१ नोव्हेंबर हि तारीख ठरवण्यात आली. या हल्ल्यांतील मृतांना व शहिदांना यामुळे थोड्या प्रमाणात का होईना न्याय मिळाला. या हल्यांचे खरे सूत्रधार अजूनही सीमेपलीकडे मोकळे असल्याने पूर्ण न्याय झाला असे म्हणता येणार नाही. एवढा क्लिष्ट व मोठ्या आकारमानाचा खटला विशेष सत्र न्यायालयाने केवळ १ वर्षांत संपवला हि नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. गुन्ह्याच्या तीव्रतेमुळे दया दाखवली जाण्याची कुठलीही शक्यता नव्हती. कसाब भारताच्या शत्रुराष्ट्राचा नागरिक असल्याने त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात कुठल्याही पातळीवर वेळखाऊपणा दाखवला गेला नाही. तरीही कुठल्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही हे पण महत्त्वाचे. याबद्दल राज्य व केंद्र सरकारचे व शिक्षेची प्रक्रीया पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन. हल्ल्यांना ४ वर्षे पूर्ण होण्याअगोदर हि शिक्षा देण्यात आली हे बरेच झाले. कारण जखमांवरच्या खपल्या पुन्हा एकदा निघाल्या असत्या. आता या सर्व घडामोडींमागे (निवडणुकांचे अथवा मतांचे) राजकारण असल्याचे म्हणणे पूर्णपणे असंयुक्तिक आहे. कारण वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन केली तर त्यामागे राजकारण शोधतात, हे एका प्रगल्भ समाजाचे घटक म्हणून शोभनीय नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

५ नोव्हें.ला राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला म्हणजे मला आपली एक वेडी आशा, "बाळासाहेबांना ते जाण्यापूर्वी हे माहित असेल की दया अर्ज फेटाळलाय आणि लवकरच फाशी होणार. प्रणवदांनी शब्द पाळला."

In reply to by मी_आहे_ना

दोन्ही सरकारमधील निवडक व्यक्तीनांच व अधिकाऱ्यांनाच या गोष्टीची माहिती असणार... कमालीची गुप्तता पाळली गेली जे अपेक्षितच होते. २००४ मध्ये कोलकाता येथे या अगोदरची फाशीची शिक्षा अमलात आणली होती तेव्हा मानवाधिकारवाल्यांनी मोर्चे वगैरे काढले होते. या बाबतीत तसे नसते घडले तरी अतिरेक्यांनी अपहरण, घातपात असे काही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती...

In reply to by श्रीरंग_जोशी

असेच म्हणतो. कसाबला फाशी दिली नाहि तर ते मुस्लीमांचे लांगुलचालन (शब्द बरोबर आहे का हो?), दिली तर गुजरात निवडणुका वगैरे... (मुस्लीम लांगुलचालन होत नाहि असं नाहि...पण कसाबला फाशी दिल्यास भरतीय मुस्लीम समाजास दु:ख वगैरे अजीबात होणार नाहि हे नक्की... तेंव्हा या प्रकरणात व्होटबँकचं लॉजीक बसत नाहि) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तुम्ही विषय निट वाचला नसावा असे वाटते. धाग्यात कुठेही मुस्लीम अनुनयाविषयी (तुमच्या भाषेत "लांगुलचालन") म्हणलेले नाही. महत्वाचा मुद्दा जी वेळ साधली याबद्दल आहे.

In reply to by चिंतामणी

मी कुठे म्हटलय कि धाग्यात मुस्लीम अनुयय आला आहे म्हणुन?? मी केवळ नाण्याच्या दोन बाजु दाखवल्या. अर्धवटराव

In reply to by श्रीरंग_जोशी

वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन केली तर त्यामागे राजकारण शोधतात,
मला वाटते असे हवे होते. वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन उशीरा का होइना, पण केली तर त्यामागे राजकारण शोधतात

In reply to by आनन्दा

कसाबला लौकरात लौकर फाशी दिले जावे हि लक्षावधी किंवा कोट्यावधी लोकांची भावना असू शकते. पण इतक्या मोठ्या आकारमानाचा व क्लिष्ट स्वरूपाचा खटला कुठलीही कायदेशीर तडजोड न करता या वेळेत त्याच्या शेवटापर्यंत नेणे हे कौतुक करण्यासारखेच आहे. जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या मारेकऱ्यांनाही यापेक्षा अधिक उशीराने फाशी दिली गेली होती. त्या खटल्याचे आकारमान निश्चितच यापेक्षा लहान होते. अशा प्रकारचे खटले जर घिसाडघाईने खटले चालवून मृत्युदंडाची शिक्षा दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या विश्वासहर्तेला धक्का पोचू शकतो. अनेक देश गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणात भारताला सहकार्य करतात त्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

In reply to by श्रीरंग_जोशी

१६८ जणांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या आणि ज्याची प्रत्येक हालचाल कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आहे अश्या माणसाला खरे तर विशेष न्यायालय स्थापन करून जलदगती न्याय मिळवून द्यायला होता.

हा हुकुमाचा एक्का असेल तर हुकुमाचे राजे,राणीं, गुलाम ते दुर्री कोण अशा विचारात पडलोय. असो, मारलं ते बरंच झालं. आनंद आहे.

In reply to by ५० फक्त

सगळ्या कैदेतील अतीरेक्यांची लिस्ट नाही माझ्याकडे. नाहीतर राणी, गोटु, दश्शी, नश्शी........................... सगळे सांगीतले असते. पण हुकुमाचा राजा माहीत आहे ना. "अफजल गुरू". जो सध्या फारुक अब्दुल्लांनी धरून ठेवला आहे.

In reply to by चिंतामणी

राष्ट्रपतींनी अफझल गुरूचा दया अर्ज परत गृहमंत्रालयाकडे फेरविचारासाठी पाठवलेला आहे. आज गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत; " “Afzal Guru’s file will not be kept pending for long. I will clear Afzal Guru’s file within 48 hours of its receipt.” वास्तवीक गृहमंत्रालयाने तो आधीच नाकारला होता आणि तसे राष्ट्रपतींना कळवले होते. पण मध्यंतरी गृहमंत्री बदलले म्हणून परत विचारासाठी पाठवला. ही नेहमीची पद्धत आहे असे संबंधीत अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

हुश्श... अ‍ॅट लास्ट.. शेवटी झालं एकदाचं...सरकारी प्रलंबित ख्यालामधे शेवटी कार्यवाही झाली हेही थोडं नाही.

बाकीचे जाऊ दे. भडवा मेला ते खुप बरे झाले. आणि माणूस मेल्यावर शत्रुत्व संपते वगैरे म्हणणर्‍यांना इथे नको त्या जागी मारण्यात आले आहे हे सामजुन घ्या,

आज सकाळी हि बातमी चहा टपरीवर ऐकायला आली, आधी वाटल अफवाच असेल पण नंतर खात्री केली आणी आनंद झाला. --टुकुल

डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या कसबाला फाशी देऊन हरामी कॉंग्रेस ने अचूक वेळ साधली आहे.एरवी फाशीच्या पूर्ततेसाठी महिनाभर तयारी करत असतात...गुन्हेगाराच्या मापाचा दोर तयार करणे,त्याची एका डमी पुतळ्या बरोबर चाचणी घेणे ई. पण ह्या वेळी मात्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मात्र माफीचा अर्ज फेटाळून ८ दिवसाच्या आताच त्याला फाशी दिली? कॉंग्रेस ने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. १) कसाब तसाही मरणारच होता,पण डासाला क्रेडीट मिळू नये म्हणून घाई करून त्याला फाशी दिली गेली. २)बाळासाहेबांच्या महानिर्वानामुळे शिवसेना बद्दलची सहन्भूतीची लाट थोडी दूर ढकलली जाईल. ३)२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला हा मुद्दा जोरदारपणे वापरता येईल. ४) सध्या भ्रष्टाचाराच्या गर्तेत पूर्णपणे बुडालेल्या कॉंग्रेसला लोकांचे लक्ष दूर करता येणे सहन शक्य होईल.

In reply to by अविनाशकुलकर्णी

प्रतिसादाशी असहमत आहे. १. राष्ट्रपतींनी परवानगी ५ तारखेला दिली. तेव्हा ८ दिवसात फाशी दिली ही माहिती चुकीची आहे २. कसाबला काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या सरकारने फाशी दिलेली नाही. भारतीय न्याय व्य्वस्थेने फाशी दिली आहे ज्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

काथ्याकूटप्रेमापोटी निव्वळ तांत्रिक मुद्दा काढतो आहे.. ;) :- डेंग्यूने अर्धमेला नसावा. पूर्ण बरा झाला असावा. कारण फाशी देण्याच्या नियमानुसार (ऐकीव / वाचीव माहिती) ज्याला फाशी द्यायची तो कैदी फाशी देतेवेळी सर्वसाधारण दृष्ट्या रोगग्रस्त नसावा, अर्थात मेडिकली फिट असावा अशी पूर्वअट किंवा नियम आहे. (अर्थात पूर्वीपासूनचे विकार, मधुमेह, रक्तदाब, एड्स वगैरे यात धरले जात नसणार, केवळ अ‍ॅक्यूट प्रकारचे इन्फेक्शन, सर्दीताप, जखमा आदि रोग धरले जात असणार असा अंदाज आहे.)

In reply to by गवि

अर्थात मेडिकली फिट असावा अशी पूर्वअट किंवा नियम आहे.
असं असताना माझाही एक भाबडा पण तांत्रीक प्रश्न. :) एखाद्या एड्स ग्रस्त अपराध्याला (ज्याला फाशीची शिक्षा झाली आहे असा) लटकवणार की तो बरा होई पर्यंत वाट पहाणार?

In reply to by गवि

गडबडीत कंस वाचलाच नाही. :P

In reply to by अविनाशकुलकर्णी

डेंग्यू नि [डंगीने] अर्धमेला झालेल्या कसबाला [कसाबला]
तो डंगीने अर्धमेला झाला नव्हता तर त्यातून तो बाहेर पडला होता, हे आपण तूर्तास सोडून देऊ. पण तो डंगीग्रस्त होता असे वादासाठी जरी मान्य केले, तरी त्यामुळे नक्की सरकारचा काय फायदा झाला असे आपणास म्हणायचे आहे? म्हणजे तो डंगीग्रस्त नसता तर 'कौन माई का लाल मुझे फाँसी पे चढाता है बे?' असे म्हणून त्याने जेलमध्ये धुमाकूळ घातला असता, तेव्हा घाबरून सरकारने त्याच्या डंगीचा फायदा उठवला,जेणेकरून त्याला असे काही करता आले नाही, असे ह्यातून ध्वनित होते आहे!

कसाबची फाशी एक गौडबंगाल ....... १. कोणालाही फाशी देताना सूर्योदयापूर्वी फाशी दिली जाते पण कसाब ला सूर्योदय होवून एक दीड तासाने फाशी देण्याचे कारण काय ? २.कसाब च्या आधी ७/८ लोकांनी दयेचा अर्ज केला होता त्यांच्या अर्जावर सुनावणी न होता अचानक कसाब च्या अर्जावर निर्णय कसा ? ३.दया अर्ज फेटाळल्याची बातमी गुप्त ठेवण्याचे कारण काय कि अर्ज फेटाळलाच नाही ४.सुर्योदयानंतर फाशी देऊन सुद्धा त्याचा मृतदेह घाईगडबडीत दफन करण्याचे काय कि पुरावे नष्ट करायचे होते ? ५. CAG चे रिपोर्ट लिक करणारी कॉंग्रेस ची रखेल असणाऱ्या भारतीय मिडिया ला दया अर्ज फेटाळल्याची बातमी कशी काय मिळाली नाही ? ६.कसाब ला डेंगू झाला होता मग त्याचे पुढे काय झाले ? ७.यश चोप्रा सारखा कोट्यावधी माणूस लीलावती मध्ये उपचार घेऊन सुद्धा मृत्युमुखी पडतो तर वैद्यकीय सुविधा नसताना कसाब बरा कसा झाला ? ८.कोणत्याही आजारी व्यक्तीला फाशी देता येत नाही मग कसाब ला फाशी कशी काय दिली ? ९.कसाब ला फाशी देणार आहेत हि बातमी पाकिस्तान ला जर पत्राने आणि फ्याक्स ने दिली होती तर पाकिस्तान च्या मिडिया मध्ये तशी बातमी का आली नाही ? १०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ? . . मित्रांनो कॉंग्रेस जनतेला जनतेला मूर्ख बनवत आहे, उद्या जर कोणी माहितीच्या अधिकारात कसाब च्या मृत्यूचे रिपोर्ट मागितले तर ते सुरक्षेचे कारण सांगून माहिती नाकारली जाईल आणि कसाब च्या मृत्यू चे खरे कारण कसाब सोबतच दफन होऊन जाईल —

In reply to by अविनाशकुलकर्णी

एकच आणि शेवटची विनंती करतो आहे: कसाबला काँग्रेसने मारले असा बोभाटा करून त्याचे श्रेय एकट्या काँग्रेसला देऊन उगाच काँग्रेसला मोठे आणि भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस, नागरीकांच्या संयमाला लहान करू नका. वर म्हटल्याप्रमाणे कसाबला भारतीय न्यायप्रणालीने फाशी सुनावली होती कारण तो दोषी होता हे सप्रमाण सिद्ध झाले होते. राष्ट्र्पतींनी (जे पक्षनिरपेक्ष पद आहे)या निर्णयावर शिकामोर्तब केले. मग असे असताना काँग्रेसला श्रेय का द्यावे? श्रेय द्यायचेच असेल भारतीय संघराज्याला द्यावे लागेल

In reply to by ऋषिकेश

हेच म्हणतो. शंका कशावरही घेतली जाऊ शकते म्हणून प्रत्येक ठिकाणी शंकाच घेत राहणे योग्य वाटत नाही.

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशभौ, रोज सकाळ संध्याकाळ जप करण्याचा मंत्र इनव्हॅलिड झाल्यामुळे होत असलेली चिडचिड बाहेर येत असावी. कदाचित या काहींची कसाब फाशी जावा अशी इच्छा नसेल. ;)

In reply to by नितिन थत्ते

काय सुचवू पाहत आहात ? कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, हे? कसाब जिवंत राहिल्यास काँग्रेस वर टीका करता आली असती म्हणून त्याला फाशी झाल्याचे दु:ख येथील कुणाला वाटत असेल ? कसाबच्या फाशीने दु:खी होण्यासाठी आम्ही काय काँग्रेसचे समर्थक आहोत काय हो ? फॉर द रेकॉर्ड्स, काँग्रेसला शिव्या देण्यासाठी अजूनही अनेक विषय तयार करून ठेवले आहेत त्यांनीच. मी काय म्हणतो, अफझल गुरु ला तत्काळ फाशी देऊन आणि सगळ्या घोटाळ्यांची पूर्ण चौकशी करून आणि दोषींना शिक्षा देऊन तुमचे कॉंग्रेस येथील विरोधक मिपाकरांना पूर्ण नि:शस्त्र का नाही करून टाकत ? सुचवून बघा जरा...