राम लड्डू साहित्यः
५-६ तास भिजवलेली १ वाटी पिवळी मुगाची डाळ
५-६ तास भिजवलेली १/२ वाटी चणा डाळ
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची
बारीक चिरलेली कोथींबीर
चवीनुसार मीठ
पुदीना चटणी साहित्यः
मुठभर कोथींबीर
मुठभर पुदीना
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची
(आवडी प्रमाणे कमी-जास्त)
१/२ टीस्पून जीरे
१ टीस्पून लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
१/२ टीस्पून साखर
वरील सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरवर चटणी तयार करून घ्यावी.
पाकृ राम लड्डू:
भिजवलेल्या डाळींतून सर्व पाणी काढून, निथळून घ्यावे.
दोन्ही डाळ एकत्र करून,मिक्सरवर पाणी अजिबात न घालता बारीक वाटून घ्यावे.
वाटलेले डाळींचे मिश्रण एका भांड्यात काढून ते हलके व पांढरे होईपर्यंत फेटावे.
(साधारण ५-७ मिनिटे लागतात)
आता फेटलेल्या डाळींच्या मिश्रणात चवीनुसार मीठ,चिरलेली हिरवी मिरची व चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.
कढईत तेल मंद आचेवर तापत ठेवावे.
तापलेल्या तेलात हाताने मिश्रण घेऊन गोलाकार भजी सोडावी
.(मिश्रण हलके झाल्यामुळे तेलात सोडताच भजी वर तरंगू लागेल)
मंद आचेवर सर्व राम लड्डू सोनेरी रंगावर तळून घावे.
सर्व्हींगः
एका ताटात किंवा द्रोणात तयार राम लड्डू रचून ठेवावे.
त्यावर पुदीन्याची चटणी घालावी.
त्यावर किसलेला कच्चा मुळा व थोडी कोथींबीर घालावी.
(मी येथे लाल मुळा वापरला आहे)

गरमा-गरम राम लड्डू चाट सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
वाह!
मस्त पाककृती!
खमंग
ज्याम भारी सही पाककृती आहे.
......
तोंपासु
लै भारी !!
सुपर्ब फोटो !
खुप छान
मुळ्यामुळे जरा वेगळी चव नाही
ही तर मुगाची भजी
मुगाची भजी बनवताना
In reply to ही तर मुगाची भजी by अनन्न्या
अगदी वेगळी पाकृ. असा प्रकार
पहाणे हेही एक खाणेच आहे... ही
आता घरीच करता येतील हे छान.
नवे कॉम्बिनेशन.. करून बघण्यात
मस्त
नेहमीप्रमाणे मस्तच
रुचकर तसेच पौष्टिक आणि फटु
+१
In reply to रुचकर तसेच पौष्टिक आणि फटु by गणपा
स्सही..
नविन
अहाहा... अख्खा "द्रोण" उचलुन
मस्त!
झक्क्कास