हिंदुहॄदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरेंना विनम्र श्रध्दांजली.
हिंदुस्थानातील हिंदुचा बुलंद आवाज असणार्या या मराठी वाघाला काळाने स्वतःमधे समावुन घेतले आहे. :(
संभाजीनगरात मराठवाडा संस्कृती मंडळावर साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी कोण आटापिटा करायचो. साहेबांचं भाषण एक जादु असायची. साहेबांचं वक्तृत्त्व ही एक दैवी देणगीच होती. आता केवळ आठवणी.
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..
-दिलीप बिरुटे
माझ्या कळत्या वयापासून 'बाळासाहेब ठाकरे' हे नाव घेतले की केवळ एकच व्यक्ती डोळ्यासमोर उभी रहात असे. ही व्यक्ती आपल्यातून निघून जाईल असे कधीच वाटले नव्हते. प्रत्येक मराठी माणसाच्या विचारविश्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग आता कायमचा नाहीसा झाला...
श्रद्धांजली.
बाळासाहेब म्हटले की सेनेचे सुरुवतीचे दिवस आठवतात. मी तेव्हा खूपच लहान होतो, पण सेनेच्या सभांना दादरमध्ये होणारी गर्दी आणि मिळणारा प्रचंड व उस्फुर्त प्रतिसाद अजुनही लक्षात आहे. खड्या आवाजात बोलणारे बाह्या दुमडलेला सदरा व विजार या पोशाखातले , व उजवा हात वरच्या दिशेने उचललेले बाळासाहेब डोळ्यासमोर येतात. त्यांच्या भाषणशैलीवर बहुधा आचार्य अत्रे यांचा प्रभाव असावा. बोलणे एकदम रोखठोक. "एका प्रार्थनस्थळातुन विशिष्ठ जमातीच्या लोकांकडुन दगडफेक झाली" वगैरे गुळ्मुळीत भाषा त्यांना कधीच मानवली नाही.
ते इडल्या विकतात तर आपण वडे विकु असे बाळासाहेबांनी सुचविताच दादरमध्ये सर्वत्र भगव्या टोप्या घातलेले शिवसैनिक वडे विकताना दिसु लागले. दहा वर्षांपूर्वी कबुतरखान्या समोरच्या गल्लीच्या नाक्यावर वडापाव खाताना गाडीच्या मालकांना सहज म्हटले की काका, आपली गाडी वर्षानुवर्ष पाहतोय, अजुन तीच चव, तीच मऊसूत हिरवी चटणी, फक्त तुमच्या डोक्यावर आता भगवी टोपी नाही! मालकांना भरुन आले, म्हणाले गाडी १९६८ पासून लावतोय. धंदा कसा चोख असावा, तो ईमानदारीने करतोय; आजही सर्वात स्वस्त आणि दर्जेदार वडा आपलाच आहे.
सुधीरभाऊ ऐन विशीत महापौर झाले, अर्थातच मुंबईचे सर्वात लहान महापौर, तेव्हा निघालेल्या त्या प्रचंड मिरवणुका अजुनही आठवतात.
मुंबईत जेव्हा जेव्हा हिंदु - मुसलमान दंगे झाले तेव्हा हिंदुना सेना आणि बाळासाहेब हे मोठे आधार वाटत असत. ९२ च्या दंग्यात एका रात्री शितलादेवी मंदीरावर हल्ला होणार अशी अफवा उठली तेव्हा कर्फ्यु फाट्यावर मारुन हजारो शिवसैनिक समुद्रकिनार्यावरुन लपत छपत माहिमला पोचल्याची सर्वत्र चर्चा होती.बाळासाहेब हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते पण आजही आपल्या अनुयायांवर आणि अवघ्या महाराष्ट्रावर इतका प्रभाव असलेले असे दुसरे व्यक्तिमत्त्व दुसरे नाही. त्यांच्या निष्ठावंतांची तुलना ही शिवरायांच्या मावळ्याशी केली तर वावगे ठरु नये. निष्ठावंत शिवसैनेकांना हा धक्का सहन करणे फार जड जाईल.
कधीही कुठल्याही कारणास्तव कुण्या राजकीय पक्षाने भारत बंद वा मुंबई बंद चा आवाज दिला तर प्रत्येक मुंबईकर एकमेकाला तातडीने विचारु लागे 'साहेबांचा पाठिंबा आहे का?" जर सेनेने बंद पुकारला तर मुंबई बंद! जर सेनेने पाठिंबा दिला नाही, तर मुंबईकर चाकरीवर हजर.
शिवसैनिकांनाच काय, 'बाळासाहेब आता आपल्यात नाहीत' हे सत्य स्विकारायला समस्त मुंबईकरांना वेळ लागेल. ईश्वर या झंझावाती नेत्याच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.
संपलं सर्व. काय बोलणार. काल त्यांची तब्येत सुधारतेय हे ऐकुन आशा उंचावल्या होत्या, पण वाईट बातम्या कधीच खोट्या ठरत नाहीत त्याचा प्रत्यय आला. एक जबरदस्त डॅशिंग माणुस आपल्याला सोडुन गेला. बाळासाहेबांना श्रद्धांजली.
जन्माला येणारा माणूस मरणाची वेळ सोबत घेऊनच येतो असे म्हंटले तरी काहींचे मरण पचवणे अवघड जाते. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक.
महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात देशाच्या राजकारणात भले-बुरे योगदान असलेल्या या ढाण्या वाघाचा अंत म्हणूनच काळजाला चटका लावतो.
मी लहान असताना बाळासाहेबांचे नाव ऐकू येई. माझ्या आत्याचे मिस्टर हे शिवसैनिक. त्यांच्याकडून बाळासाहेबांबद्दल आणि शिवसेनेबद्दल ऐकू येई परंतु तेव्हा ते समजण्याचे वय नव्हते. दसरा मेळाव्याचे फोटो पेपरात येत त्यातली भव्यता आणि दिमाख बघून हा माणूस काहीतरी वेगळा आहे एवढे मात्र निश्चित जाणवत असे. अधूनमधून त्यांच्या वादग्रस्त भाषणांमुळे आणि लेखांमुळे ते चर्चेत असत. काही असले तरी सडेतोड आणि निर्भीड मतप्रदर्शन आणि दिलदार वृत्ती ही त्यांच्या रक्तातच होती असे वाटते. एका अनोख्या व्यक्तिमत्त्वाला आणि कुशल संघटकाला महाराष्ट्र मुकला.
बाळासाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
(दू:खी)रंगा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..... *~*~*~*~*~*~* :(
बाळासाहेब... तुम्ही किमान शम्भरी नक्की गाठाल... असे वाटले होते.... पण १५ वर्षं आधी पोरके केलेत तुम्ही महाराष्ट्राला.... :( :( :(
_______________________
'राज'कारणातली बरीच समीकरणं आता झपाट्यानं बदलतील.... याबद्दल शन्का नाही....
गेल्या ४-५ दिवसांपासून येत असलेल्या बातम्यांवरून ही बातमी लवकरच यायची शक्यता आहे असे अपेक्षित होतीच.
कालच टीव्हीवर ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे मनोहर जोशींनी जाहिर केले तरी त्यांचा बोलताना दाटून येणारा आवाज, डोळ्यातून येणारे अश्रू थांबवायची कसरत आणि एकूणच देहबोली यावरून का कोण जाणे बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत आहेत ही बातमी चुकीची आहे असेच वाटले.
बाळासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.
"कालच टीव्हीवर ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे मनोहर जोशींनी जाहिर केले तरी त्यांचा बोलताना दाटून येणारा आवाज, डोळ्यातून येणारे अश्रू थांबवायची कसरत आणि एकूणच देहबोली यावरून का कोण जाणे बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत आहेत ही बातमी चुकीची आहे असेच वाटले."
खरयं..
वाईटातून चांगले घडावे ............अशी एक अंधुक आशा ...................साहेबांची सेना आणि म न सेना आता तरी एक व्हावी...............!
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली !
चार दोन दिवसात समजून उमजून देखील काळीज थोडंसं हललंच.
श्रद्धांजली नि मानाचा मुजरा...!
गेल्या चार दोन वर्षात 'वर'देखील ना सुद्धा लोकांची वानवा भासू लागलेली दिसतेय.सर्वार्थानं मोठे लोक पटापट पदोन्नती करताना दिसत आहेत.... :(
मा. बाळासाहेब ठाकरेंना विनम्र श्रध्दांजली.
संयुक्त महाराष्ट्रातील आणि संयुक्त महाराष्ट्राचा सतत पुरस्कार करणार्या आणि त्या करीता संघर्ष केलेल्या सच्च्या नेत्यांच्या फळीतील शेवटचा नेता ही आता निघून गेला.
(आता राहिलेत ते दिल्ली शासनकर्त्यांपुढे व्यक्तीगत फायद्या करीता हुजरी करणारे कथित नेते.)
एखाद्या समुदायावर 'गारुड घालणं' म्हणजे काय ते या माणसानं शिकवलं.
कुणी लाख फाटक्या तोंडाचा म्हणो पण असंख्य विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचं आणि बांधुन ठेवण्याच काम यानं केलं.
९३च्या दंग्यांच्या काळात केवळ साहेब आणि त्यांचे मावळे होते म्हणुन कुर्ल्यासारख्या ज्वलनशील भागाच्या जवळ राहात असतानाही कुणाची टाप नव्हती आमच्या भागात दंगा करण्याची.
गेल्या दोन चार दिवसांपासून कानावर येणाऱ्या बातम्यांमुळे मनाची तयारी होत होती. पण तरी सुद्धा आत खोलवर एक अंधुकशी आशा होती. हा वाघ त्या काळावरही मात करेल.
पण अखेर काळ जिंकला.
आत काही तरी तुटल्यासारखं सारखं वाटतय. :(
माननिय बाळासाहेबांनी आज या जगाचा निरोप घेत महाराष्ट्रयातल्या मराठीमाणसाला अखेरचा "जयमहाराष्ट्र" तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक स्वाभिमानी व अभिमानी "हिंदुला" अखेरचे "जयहिंद" केले..बाळासाहेबांच जाण हे मानल तर प्रकृतीला धरुन आणि निसर्ग नियमाला अनुसरुनच आहे...पण तरीही त्यांच्या जाण्याच्या बातमीने पोटात खड्डा पडला.....सेनेचा हा ढाण्या वाघ गेली ४५ वर्षे खड्या आवाजात डरकाळी फोडत होता एकाहाती किल्ला लढवत होता..आज बाळासाहेबांनी काय दिले? याचा विचार अनेक जण करतायत....या उत्तुंग व्यक्तिमत्वाने .. मराठी माणसामधे स्वाभिमानाचा व्हनी चेतवला .. मराठी माणसाला मानाने जगायला शिकवले..हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले..जाज्वल्य देशाभिमान प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला .. बाबरी पडल्यानंतर त्याचे श्रेय आपल्या सैनिकांना देताना परिणामांचा विचार केला नाही.. आणि उगिचच जातीपातीचे घाणेरडे राजकारण कधी केले नाही.. अतिशय विश्वासु असलेले जुने सहकारी साथ सोडुन अर्ध्या वाटेतुन निघुन गेले तरी बाळासाहेब डळमळले नाहित.. अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एकमेव असामान्य नेता . कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ..आज आपल्यातून निघून गेलाय...त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधी भरुन निघेल का?हा प्रश्न सतावतोय ....मला आणि माझ्यासारख्या अनेकांना..त्यांच्या पश्चात सेनेचे काय होणार ?हा प्रश्न देखिल भेडसावतोय.
शिवतिर्थावरीलच नव्हे तर प्रत्येक जाहिर सभे मधे त्यांच्या मुखातून उच्चारले जाणारे "येथे उपस्थित माझ्या तमाम हिंदु बांधवांनो व भगिनींनो"हे चिरपरिचीत संबोधन या पुढे ऐकू येणार नाही....त्यांच्या ओजस्वी वाणीतून निखार्या प्रमाणे बाहेर पडणारे ते राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असलेले मनस्वी व जाज्वल्य विचार यापुढे कधी ऐकु येणार नाहीत्..त्या ढाण्या वाघाची ती डरकाळी आज कायमची शांत झाली..असा मनस्वी व द्रष्टा नेता असा माणूस या पुढे होणे नाही..
आज एक छ्त्र हरपले...
एक पर्व संपले..
एक अखंड अविरत घोंघावणारे वादळ शांत झाले...
महाराष्ट्र ...मराठी माणूस्..स्वाभिमानी व अभिमानी हिंदू.. भगव्यावर श्रद्धा असणारी प्रत्येक व्यक्ती..आणि निष्ठावान शिवसैनिक कायमचे पोरके झाले....पण तरीही बाळासाहेब आपल्यातून फक्त शरिराने दुर गेलेत्..त्यांनी दिलेले विचारांचे व हिंदुत्वाचे धगधगते अग्नीकुंड बाळासाहेबांवर श्रद्धा असणार्या प्रत्येकाला कायम पेट्ते ठेवायला लागेल्..आणि या देशातल्या प्रत्येक हिंदुंच्या आत कुठे तरी दडलेली ती बाळासाहेब नावाची वृत्ती व प्रवृत्ती जागृत करावीच लागेल. याच प्रवृत्तीच्या जागे होण्याने काँग्रेस नावाची या देशाला लागलेली वाळवी नष्ट करता येईल. ...महाराष्ट्रावर व देशावर पुन्हा डौलाने भगवा फड्केल ती आणि तीच माननिय बाळासाहेबांना खर्या अर्थाने श्रद्धांजली असेल...
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
भले श्रिमान बाळासाहेब विषयि गैरसमज असोत पण हिन्दुंना गरजेच्या वेळेस त्यानि जी एक्जुट केलि त्याला तोड नाहि,हे खरे! कारण ते मरण्यापुर्वि म्हणाले की हा देश आजारि झाला आहे व त्यासाठि देशाला वेंटिलेटरची जरुरि आहे,बाळासाहेब खरा योद्धा माणुस व नररत्न!
मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी बाणा ह्यांचा धडाडीने पुरस्कार करणारा एक नेता गेला.
असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला अशी मराठीची गत होऊ घातली होती तेव्हा मराठीला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणार्यात बाळासाहेब अग्रस्थानी होते. ह्या एकाच कामाकरता माझ्यासारखे असंख्य मराठी लोक त्यांचे ऋणी राहतील.
शिवाजी महाराजांइतकेच सावरकरांनाही मानणारे आणि ते जाहीरपणे ठणकावून सांगणारे बाळासाहेबच.
त्यांच्या जाण्याने शिवसेनेतच नव्हे तर महाराष्ट्रातही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
माझी मनःपूर्वक श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि पितृतुल्य नेता गेला.
विनम्र श्रद्धांजली.
सहेब :(
पोरका....
हिंदुहॄदय सम्राट मा.
भावपूर्ण श्रद्धांजली...
श्रद्धांजली...
विनम्र श्रध्दांजली
साहेबांना
आज आम्ही पोरेके झालो एक
श्रद्धांजली
उद्धव, आदित्य आज खर्या
विश्वास बसत नाही.
.......
युगांत!!
एक बुलंद व्यक्तिमत्त्व हरपले!
भगव्या ध्वजाचा निष्ठावंत शिलेदार अनंतात विलीन झाला!
बाळासाहेबांना विनम्र आदरांजली
संपलं सर्व. काय बोलणार. काल
श्रद्धांजली..
बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली
मा. बाळासाहेब ठाकरेंना
झालेत बहु होतील बहु परंतु या
भावपूर्ण श्रद्धाजंली
श्रध्दांजली...
बाळासाहेब...हा महाराष्ट्र सदैव तुमचा ऋणी राहील!!!
अरेरे, शेवटी ते घडलेच!
श्रद्धांजली
अकस्मात तोही पुढे जात आहे...
व्यक्ती मरते विचार उरतो
बाळा साहेबांचे शेवटचे भाषण..
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना
In reply to बाळा साहेबांचे शेवटचे भाषण.. by मदनबाण
बाळासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली
"कालच टीव्हीवर ते उपचारांना
In reply to बाळासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली by क्लिंटन
श्रद्धांजली
(No subject)
भारतीय राजकारणात स्वतःचा
बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली !!
मा. बाळासाहेब ठाकरेंना विनम्र
मा. बाळासाहेब ठाकरेंना विनम्र
वाईटातून चांगले घडावे .......
+१
In reply to वाईटातून चांगले घडावे ....... by मंदार कात्रे
श्रध्दांजली
चार दोन दिवसात समजून उमजून
.
साहेबांना विनम्र श्रध्दांजली
पोरका झालाय महाराष्ट्र!!
मा. बाळासाहेब ठाकरेंना
एक युगांत झालाय आज.
एखाद्या समुदायावर 'गारुड
श्रद्धांजली
जगात अगोदरच बोटावर मोजन्या
विनम्र श्रंद्धाजली...
श्रद्धांजली
माननिय बाळासाहेबांनी आज या
भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_
भावपूर्ण श्रद्धांजली!
ते जातील असं २-३ दिवस खरं
विनम्र श्रद्धांजली
हिन्दुर्हदय सम्राट
... !!!
दिलदारा, सलाम !
श्रध्दांजली
अजुन काय लिहायचं...........
साहेबांना विनम्र श्रध्दांजली!
माननीय बाळासाहेबांच्या थोर
एक तेजस्वी पर्व संपले. विनम्र
विनम्र श्रध्दांजली....
साहेबांचा अखेरचा प्रवास सुरु
माझीही श्रद्धांजली