Skip to main content

तेव्हा भेटूच.

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी रविवार, 11/11/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
header रसरशीत तापलेल्या सोनेरी झळीतल्या आणि ओल्या निसरड्या फसव्या घळीतल्या कात टाकणार्‍या रंगीत पानगळीतल्या आणि गर्दीने नटलेल्या बाजारातल्या आळीतल्या निरव चांदण्यात निपचित पहुडलेल्या आणि काळ्याभोर रेषेत क्षितीजाला भिडलेल्या सगळ्या सगळ्या वाटांवरून सोबत चालतानासुद्धा वाट बघणं मात्र संपत नाही मी तुझी, तू अजून कुणाची... पण या सगळ्या वाटा मिळतात तिथे त्या मुक्कामाला मला खात्री आहे, मीच पोचेन तुझ्या आधी, आणि तुही येशीलच कधीतरी तेव्हा भेटूच. footer

वाचने 1959
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया