Skip to main content

आभाळाचा श्वास

लेखक जेनी... यांनी रविवार, 11/11/2012 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन येताना..! आभाळातनं मोती सांडावेत आणि तुझा भास व्हावा कोंडलेल्या मनाचा थोडा श्वास मोकळा व्हावा! मोकळ्याच ढगांची गडगड हा ऋतु कोणता असावा? बंध भावनांचे जपण्या तो बहुधा सज्ज नसावा! निळसर रंग पुन्हा एकदा, एखादाच ढग भरुन यावा सांडणार्‍या थेंबाला मार्ग पापण्यांनी सुचवावा! अशावेळी सांज होती हा विसर का रे पडावा? विसावलेल्या मनाचा पुन्हा श्वास भरुन यावा! भरुन येताना आभाळ क्षण धुंद जरा असावा फक्त आभास चांदण्याचा रात्रीच्या श्वासांत उरावा! footer

वाचने 1912
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

फारच सुंदर

सांडणार्‍या थेंबाला मार्ग पापण्यांनी सुचवावा हे विशेष आवडले. कविता चांगली झाली आहे.

सहज सुचले म्हणुन ह्या ओळी टंकतोय दाटता रात्र ती ही चांदकिरणात तो दिसावा, विरल्या आठवणीत पुन्हा मिळतो जसा विसावा