Skip to main content

रंगीत चिरोटे

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 11/11/2012 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी मैदा १/४ वाटी पिठीसाखर १ टेस्पून तूप मोहनासाठी २ टेस्पून तूप + २ टेस्पून कॉर्नफ्लोअर एकत्र करून साटा तयार करणे खायचा शेंदरी रंग २ थेंब १ टीस्पून दुधात केशर मिसळून घेतलेले तळण्यासाठी तूप सजावटीसाठी पिस्त्याचे काप चिरोटे पाकृ: मैद्यात थोडेसे मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालून पाण्याने किंवा दुधाने पीठ घट्ट मळून घ्यावे. भिजवलेले पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. भिजवलेल्या पिठाच्या गोळ्याचे चार भाग करावे. दोन भागात खाण्याचा शेंदरी रंग घालून एकत्र करावा. एका भागात केशरमिश्रित दूध घालून एकत्र करावे व एक भाग पांढराच राहू द्यावा. तयार उंड्यांच्या पातळ पोळ्या लाटून घ्यावा. पोळीवर साटा लावून दुसरी पोळी ठेवावी, परत साटा लावून तिसरी पोळी ठेवावी व पुन्हा साटा लावून चौथी पोळी ठेवावी. अलगदपणे पोळ्यांचा रोल तयार करावा व त्याचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे. तुकडे जिथून कापले आहेत, त्या बाजूने हलके दाबून लाटावे. चिरोटे गरम केलेल्या तुपात तयार चिरोटे मध्यम आचेवर तळावे. चिरोट्यावर अलगदपणे तूप उडवावे, म्हणजे छान पदर सुटतात. तळल्यावर वरून लगेच पिठीसाखर भुरभुरावी व पिस्त्याच्या कापांनी सजवावे. चिरोटे चिरोटे चिरोट्यांवर पिठीसाखर भुरभुरण्याऐवजी साखरेचा पाकही घालू शकता. footer

वाचने 4186
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मस्त दिसतायत रंगीत चिरोटे. आमच्या घरी हा प्रकार बनवत नाहीत. वरील चित्रात दाखवलेल्या लाट्या तयार झाल्या की आई त्याच्या पुर्‍या लाटुन, त्यात करंजीचं सारण भरुन (२ इन १) रंगीत करंज्या नेहमी करते.

आमच्याकडे चिरोट्याला लोणी + बेकिंग पावडर (१ वाटी लोणी +१ चमचा बेकींग पावडर) फेसून ,हा साटा लावतो. त्यामुळे चिरोटे खुसखुशीत होतात पण पाकळ्या अश्या सुटत नाहीत. दोन्ही क्रुतींचा सुवर्णमध्य काढून करून पाहीले पाहिजेत.

जबरी यार........ !! हे चिरोटे माझेसुद्धा अतिशय आवडते आहेत. तिरंगी चिरोटे एकदम कातिल दिसताहेत :)

छान कृती आणि फोटू. मलाही आवडतात चिरोटे (खायला अन् करायलाही). रंगीत मात्र कधी करून नाही पाहिले. तुझ्यासारखी हौशी सुगरण मात्र आमच्या डोळ्यांची भूक भागवत असते. धन्स.

दिसायला सुरेख. खायला ही रूचकर असतील.

काय छान झालेत चिरोटे!

चिरोटे फारच सुंदर दिसत आहेत.

सुरेख झालेत!फोटो अप्रतिम!