Skip to main content

पनीर पापडी

लेखक सूड यांनी रविवार, 11/11/2012 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एका हॉटेलच्या मेनूकार्डवर पहिल्यांदा हा पदार्थ पाहिला. उत्सुकतेने मागवला आणि थोड्या अनवट पदार्थाची चव घेता आली. यात काय काय वापरलं असावं, याचा खाता खाता विचार सुरू झाला. पनीर आणि पापड हे तर सहज कळून येत होते. पण बाकीचे पदार्थ अंदाजपंचे वापरून हा पदार्थ घरी बनवायचा घाट घातला. साहित्यः पनीर पाव किलो पापडाचा चुरा (मी उडदाच्या पापडाच्या बोटभर जाडीच्या पट्ट्या कापून घेतल्या होत्या.) तीन मोठे चमचे डाळीचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर एक हिरवी मिरची बारीक चिरून (आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता) चवीपुरते मीठ चिमूटभर हळद तळणासाठी तेल. पनीर पापडी कृती: पनीरचे साधारण इंचभर आकाराचे तुकडे कापून घ्यावे. डाळीचं पीठ, भजीसाठी भिजवतो त्यापेक्षा किंचीत पातळ भिजवून घ्यावं. कारण पापडाचे तुकडे पनीरला नीट चिकटावे म्हणून हे पीठ वापरायचं आहे. पनीरवर त्याचा जाड थर तयार होता कामा नये. या पीठात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून नीट ढवळून घ्यावं. आता एका कढईत तेल तापत ठेवावं. तेल नीट तापलं की पनीरचे तुकडे डाळीच्या मिश्रणात बुडवावे, जास्तीचं पीठ निथळलं की पापडाच्या तुकड्यांमध्ये घोळवून तेलात मध्यम आचेवर तळावेत. गॅसची आच मोठी राहिल्यास पापड करपून जायची शक्यता असते, त्यानुसार अंदाज घेऊन आच कमी-जास्त करत राहावं. तळून झाले की टिश्यूपेपरने जास्तीचे तेल टिपून सॉस किंवा चटणीसोबत हा पदार्थ गरमगरम खायला द्यावा. पनीर पापडी footer

वाचने 3165
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मस्त ! :) हा पदार्थ अजुन माझ्या खाण्यात आलेला नाही... पण मस्तच लागत असावा. :) (पनीर प्रेमी) :)

जबरी. आता सूडकडे जाऊन हा पदार्थ खाणे आले.

In reply to by प्रचेतस

+११. :-) तसेच चंदेरीला जावूया रे.

चला सक्तीचे उपवास सुरु होण्यापुर्वी एक दिवस हे करुन . . . . खायला घालायला लावलं पाहिजे सुडला.

पापड आणि पनीर काँबो पहिल्यांद्याच ऐकलं चाखणं तर दुरच. नवीन प्रयोगाबद्दल सूडाचे अभिनंदन. असेच नव नवीन प्रयोग करुन मिपाकरांना खिलवत रहा. :)

आता नक्कीच करून पहायला हवी ही रेसिपी

छान आहे आयडीया !!!

कॉम्बिनेशन वाचून चांगले असणार याचा अंदाज आला. फोटो तर मस्तच!