लेख लिहीण्याचा उद्देश : वेळ उपलब्ध असणे (वेळ जात नसणे), विचारवंत म्हणून प्रसिद्धीस येणे, आपोआप प्रकाशित होत असल्याने औत्स्युक्यापोटी इ.
लेखाची प्रेरणा : कान डोळे आणि मस्तिष्कावर आदळणा-या बातम्या, लोकांच्या प्रतिक्रिया, जालीय काथ्याकूट इ.
भारत या देशात नकारात्मक दृष्टीकोण असणारे लोक राहतात असं वाटतं. परवा एका नव्या टीव्ही वाहिनीच्या उद्घाटनास गेलो असता वक्त्यांनी सांगितले कि सकारात्मक दृष्टीकोण ठेवा. सतत नकारात्मक वार्तांकनांमुळे देशाचा दृष्टीकोण नकारात्मक बनत चालला आहे. म्हणूनच या वाहिनीवर फक्त सकारात्मक गोष्टी दाखवण्यात येतील. या सकारात्मक बाबी इंटरअॅक्टीव्ह पद्धतीने प्रेक्षक आणि वाहिनी व्यवस्थापक यांच्यात देवाणघेवाणीद्वारे दाखवण्यात येणार आहेत. मला विचारलं तर काय सुचवावं या प्रश्नावर विचार करता खालील सकारात्मक विचार सुचले.
१. सिलेंडरची दरवाढ : विरोध दर्शवणे चूकच. भारतात चंगळवादाने अति खाणे होत चालले आहे. आरोग्यविषयक सवयी बिघडल्याने लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. जनता लठ्ठ झाल्याने कमी जागेत जास्त नागरिक मावू शकत नाही. सिलेंडरची दरवाढ केल्यास लोक जपून खातील, फिट राहतील. यामुळे देखण्या लोकांचा देश ही ओळख प्राप्त होईल.
२. भ्रष्टाचार : या गोष्टीकडे नकारात्मक नजरेने पाहणे चुकीचे आहे. कै. जसपाल भट्टी यांनी तर सांगितले होते कि लाच कायदेशीर केली कि भ्रष्टाचार बंद होईल. ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणता आहात तो कार्यक्षमतावाढीसाठी आवश्यक असा प्रोत्साहन भत्ता आहे. आज तो कायद्यात बसत नसल्याने लोकांमधे चुकीचा संदेश जात आहे. जसजसा भ्रष्टाचार वाढतो आहे तसतशी देशाची प्रगती वाढते आहे हे विशेष ! सकारात्मक दृष्टीकोण ठेवून जसपालजींची सूचना अंमलात आणणे गरजेचे आहे.
३. प्रदूषण, भेसळ : एका सर्वेमधे असे आढळले कि जे लोक कायम फिल्टरचे पाणी पितात ते जास्त आजारी पडतात. म्हणूनच एका राकट आणि कणखर अशा देशाचे नागरिक केवळ मनानेच नव्हे तर शरीरानेही कणखर असावेत आणि कुठल्याही प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांची जडणघडण व्हावी या दृष्टीने हे घटक अत्यावश्यक आहेत. शरीरास जितक्या जास्त प्रतिकूल परिस्थितीत न्याल तितकी त्याची प्रतिकारक्षमता वाढत जाते. रोगांशी लढण्यासाठी प्रतिबंधक यंत्रणा शरीरात विकसित होणे गरजेचे असते. हा सर्व सखोल विचार करून प्रदूषण आणि भेसळवाढीसाठी सर्व पावले उचलली जात आहेत.
४. जालीय काव्यचौर्य : जालीय कवींना अनेकदा विनंती करूनही कवितांचा मारा चालूच राहील्याने त्यांच्या कविता आपल्या नावाने बिनदिक्कतपणे डकवण्याचे प्रकार लोकप्रिय होताना दिसत आहेत. अशा प्रकारे आपली बौद्धीक संपदा चोरीस जात असल्याचे पाहून कवितांचे कारखानदार आपले उत्पादन थांबवतील हा एक सामाजिक दृष्टीकोण यामागे असल्याचे समजते.
लेखास मिळणा-या प्रतिसादावरून पुढचे भाग टंकावयाचे कि नाही याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.
वाचने
4172
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
या नव्या वाहिनीनी अचानक
सकारात्मक लेख !
(No subject)
चौकटराजाजी धन्यवाद. आपला
प्रतिसादांची काळजी करू नका,
In reply to चौकटराजाजी धन्यवाद. आपला by खटासि खट
स्नेहांकिता तैंच्या
In reply to प्रतिसादांची काळजी करू नका, by सस्नेह
+१
In reply to प्रतिसादांची काळजी करू नका, by सस्नेह
सोनखत
In reply to +१ by दादा कोंडके
कोंबडी खत?
In reply to सोनखत by आनंदी गोपाळ
५. युद्ध , दंगली , साथीचे रोग
याच न्यायाने
हीच गोष्ट स्फोट, युद्ध याबाबत
In reply to याच न्यायाने by तिमा
कसे?
In reply to हीच गोष्ट स्फोट, युद्ध याबाबत by अन्या दातार
तसेच , घरातून पळून जाऊन लग्न
हा आमच्या एका मित्राने खरोखरच
In reply to तसेच , घरातून पळून जाऊन लग्न by ज्ञानराम
लेख चांगला आहे
त्याची योजना तयार आहे. पण
In reply to लेख चांगला आहे by पैसा
हा स्फोट लोकसंख्या कमी
In reply to त्याची योजना तयार आहे. पण by खटासि खट
लेख आणी प्रतिक्रिया दोन्ही
(चित्र जालावरुन घेतले आहे.)
िवचार चांगला आहे
सकारात्मक दृष्टीचा अंगिकार
हॅहॅहॅ लई भारी
In reply to सकारात्मक दृष्टीचा अंगिकार by खटासि खट