'गाणं' या गोष्टीशी सर्वांचाच आयुष्यात कधी ना कधी संबध आलेला असतो. पण ‘गायन’ करण्याचा प्रसंग मात्र सर्वांवरच आलेला नसावा. म्हणजे शाळकरी वय किंवा कॉलेजचं ग्यादरिंग वगैरे सोडून. तरीसुद्धा, ‘गायनी गळा’ असो अथवा नसो, ‘गायनी कळा’ मात्र सर्वांनाच आयष्यात केव्हा ना केव्हा हमखास येऊन गेलेल्या असतात. आणि प्रत्येक घराच्या बाथरूमच्या भिंतींना, घरातल्या सर्वांच्या या ‘गायनी कळा’ चांगल्याच परिचित असतात. (आणि काही घरांच्या टॉयलेटच्या भिंतींनासुद्धा ! )
या गायनी कळांनी आणलेल्या गमतीदार प्रसंगांचे काही किस्से.
मंगल कार्याला पार्श्वभूमीवर गाणी वाजत ठेवण्याची पद्धत आहे. एक आपला स्पीकरवाला पकडायचा अन गाण्याचं कंत्राट त्याच्या हवाली करायचे. पण कोणत्या प्रसंगी काय वाजवावे याचे भान त्या वाजवणाऱ्याला क़्वचितच असते. माझ्या एका दूरच्या काकांच्या मुलीच्या लग्नाच्या वरातीत या गायनवाल्यांनी ‘हम आज अपनी मौतका सामान ले चले’ हे गाणे वाजवून अवघड प्रसंग आणला होता. तसेच एका वधू-वर मेळाव्याला ‘मै का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया..’ हे गाणे लावलेले आठवते.
आम्ही शाळेत असताना पीटीचे गायकवाड सर नवीन आलेले. ते होते संगीतप्रेमी. पहिल्याच दिवशी पीटीसाठी मैदानात गेल्यावर त्यांनी सांगितले.
‘मुलानो आणि मुलींनो, पीटी करताना संगीताच्या तालावर केली तर स्टेप्स चुकणार नाहीत अन पीटीचे श्रमसुद्धा जाणवणार नाहीत. चला __ मी पेटी वाजवतो. ड्रम कोण वाजवणार ?’
मग ड्रम चांगला वाजवू शकणाऱ्या पक्याला त्यांनी ड्रमची जिम्मेदारी सोपवली. अन आम्हाला स्टेप्स सांगून गायकवाड सरांनी पेटीवर ‘पीटी’ गीत सुरु केले,
‘गोरो गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण..’
अन आम्ही ‘वहिणी’च्या तालावर हातपाय घुमवू लागलो.
*******
कॉलेजात गेल्यावर ‘ग्यादरिंग’ नामक प्रकारात ‘गायनी कळे’ ची हौस भागवायला भरपूर संधी मिळे.
एकदा गायन स्पर्धेत आमच्या दिनेश नावाच्या बऱ्यापैकी सुसह्य गळा असणाऱ्या मित्राने भाग घेतला होता. स्पर्धकांची संख्या जास्त असल्याने प्रत्येकाला गाणे म्हणायला चार मिनिटेच वेळ दिला गेला होता. स्टेजवर गायकाच्या समोर एक दिवा टांगला होता. वेळ संपल्यावर, बेल वाजून गाण्याचा रसभंग होऊ नये पण गायकाला तर वेळ संपल्याचे समजावे म्हणून बेलऐवजी तो दिवा लावण्याची आयडीया होती.
दिनेशने गाणे मोठे छान भावूक निवडले होते. ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे..’
गाणे अगदी रंगात आले. शेवटच्या कडव्याची पहिली ओळ तो म्हणू लागला,
‘एक एक नक्षत्राचा दिवा लागताना..’
आणि त्याच क्षणी चार मिनिटे संपल्यामुळे त्याच्या समोरचा दिवा प्रकाशू लागला !
मग काय, पोरांनी टाळ्या अन शिट्ट्यांचा हैदोस घातला !
******
कुणाच्यातरी लग्नाला गेले होते.
भटजीबुवांची अंतरपाट धरून ‘मुलाच्या मामानी मुलाला घेऊन यावे, मुलीच्या मामानी मुलीला आणावे..’ इ. कॉमेंट्री सुरु होती. चीफ भटजीबुवा साठीच्या आसपासचे, दाढीचे पांढरे खुंट गालावर धारण केलेले. अॅरसिस्टंट भटजी तरुण होता. दोघे सोवळे नेसून स्टेजवर उभे होते.
मुलगा मुलगी आले. मंगलाक्षता सुरु झाल्या. आधी रेकोर्ड केलेल्या मंगलाक्षता झाल्या. त्या संपल्यावर ‘ताराबलं चंद्रबलं...’ म्हणण्यासाठी चीफ भटजीबुवा तोंड उघडणार इतक्यात त्यांचा मोबाईल सोवळ्याच्या गाठीतून वाजू लागला.
भटजीबुवा ज्येष्ठ नागरिकमध्ये मोडणारे. रिंगटोनमधून अगदी अथर्वशीर्ष नाही, तरी गेलाबाजार ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा..’ ऐकायला येईल अशी किमानपक्षी आमच्या कानांची अपेक्षा. पण प्रत्यक्षात कानावर पडले, ‘कजरारे कजरारे...तेरे कारे कारे...’
*****
माझी एक मावसबहीण प्रोफेसर आहे. तिच्या मुलाचं बारसं होतं. बाळाला छानपैकी नटवून पाळण्यात ठेवल्यावर जमलेल्या साळकाया-माळकायांनी ठेवणीतला ‘आतला’ काढून अंगाईगीते म्हणायला सुरुवात केली. पण प्रत्येक अंगाईबरोबर उत्सवमूर्तीच्या रडण्याचा सूर चढतच चालला. अखेर बाळाचं रडणं विकोपाला गेल्यावर त्याच्या आईला पाचारण केलं. तिनं अगोदर सगळी अंगाईगीतं बंद करायला लावली. मग बाळाला मांडीवर घेऊन आपली पेश्शल अंगाई सुरु केली,
‘एवढा मोठ्ठा भोपळा..
आकाराने वाटोळा...
त्यात बसली म्हातारी...’
आणि काय आश्चर्य ! लेकीचे ‘घट्ट’ झालेले लाडू खाऊन भोपळ्यातली म्हातारी लठ्ठ व्हायच्या आत बाळराजे गुडूप झोपले की हो !
थक्क होऊन बायकांनी याचं इंगित विचारल्यावर ती विदुषी माता सांगती झाली,
‘अगं, PHd चा अभ्यास करता करता अंगाई पाठ करायला सवड कुठली व्हायला मला ? मग मी आपली याला झोपवताना ‘एवढा मोठ्ठा भोपळा..’ म्हणत असे. तेवढं एकच बालगीत येतं बाई मला..!’
*******
आणखी एका आतेभावाच्या मुलाची वेगळीच कथा. सहा वर्षाच्या या बाळाला म्हणे टॉयलेट मध्ये गेल्यावर गाणं म्हटल्याशिवाय ‘शी’च होत नाही. मी एकदा आतेभावाच्या घरी गेले असताना हे चिरंजीव टॉयलेटच्या मोहिमेवर चालले होते. त्याची आई त्याला म्हणाली,
‘आज राहूदे रे गाणं म्हणायचं !’
आज्ञाधारक चिरंजीवाने गाण्याशिवाय भरपूर प्रयत्न केला. पण काही जमेना.
तो रडवेल्या सुरात ओरडला, ‘ए आई, होत नाहीये गं...’
‘.....म्हण बाबा म्हण ! पण जरा हळू..’ इति माता.
लगेच चिरंजीवांनी ठेका धरला, ‘जन गण मन अधिनायक जय हे...’
मी ठारच झाले. ‘अगं, म्हणेना गाणं, पण हे गाणं....?? ..टॉयलेटमध्ये ???’
‘अहो ताई, त्याला दुसरं कुठलंच गाणं पूर्ण पाठ नाही ना म्हणून तो पहिल्यापासून हेच म्हणतो !’ राष्ट्रमाता बाणेदारपणे वदली.
*******
हा मात्र चक्षुर्वैसत्यम नाही, तर ऐकीव किस्सा.
आठ वर्षीय बालिका माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीची मुलगी. मैत्रिणीची मैत्रीण आहे शास्त्रीय संगीताची फॅन. मुलीला कुठे ठेवायची सोय नसल्यामुळे संगीताच्या कार्यक्रमांना मुलीला घेऊन जायची. मुलगीपण भारी शहाणी ! शांत बसून सगळं ऐकायची. एकदा मात्र रागदारी ऐन भरात आली असताना हिने ‘आई मला शू करायच्चीये...’ असे तारसप्तकात जाहीर करून सभेला गार केले.
मग मैत्रिणीने तिला समजावून सांगितले, ‘किनई पिंकी बेटा, शू आल्यावर हळूच मला म्हणायचं, आई मला गाणं म्हणायचंय.’
पिंकी खरोखरंच शहाणी . मग प्रत्येक वेळी ती ‘गाणं’ आल्यावर आईला सांकेतिक भाषेत बरोब्बर सांगे.
एकदा पिंकी बाबांच्या बरोबर सेमिनारला गेली. आणि तिथे सेमिनार सुरु झाल्यावर तिला ‘गाणे’ आले. ती बाबांना म्हणाली, ‘बाबा, मला किनई, गाणं म्हणायचंय.’
बाबा दचकलेच. ‘आत्ता..? आत्ता नाही म्हणायचं बेटा, घरी गेल्यावर म्हण हं..’
गाण्याची भानगड बाबांना काहीच माहिती नव्हती.
थोडावेळ गेल्यावर पुन्हा पिंकी ‘बाबा, मला जोरात गाणं म्हणायचंय..’
ती ऐकत नाहीसं बघून अखेर बाबा म्हणाले, ‘बरं, बरं, हळूच माझ्या कानात म्हण हं...’
*******
अशा या विलक्षण गायनी कळा ! त्यांचे असेच आणखी काही मजेदार किस्से माहिती असल्यास इथे अवश्य टंकावे....!
वाचने
7641
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हण बाबा म्हण ! पण जरा हळू..
थोडावेळ गेल्यावर पुन्हा पिंकी
वाईट्ट हसतोय.
बेक्कार हसतेय !!
खूपच मस्त
मग आता हात जोडुन झोपलेय का
In reply to खूपच मस्त by कलश
असाच एक किस्सा..
ओहो
In reply to असाच एक किस्सा.. by ह भ प
आमचा एक मित्र टॉयलेटला जाताना
In reply to ओहो by इरसाल
.....जो याद आती है मगर आती
In reply to आमचा एक मित्र टॉयलेटला जाताना by सूड
(No subject)
जबरी
भयानक जबरदस्त किस्से आहेत.
हा हा हा
अकेले अकेले....
हसून हसून दमछाक झाली.
हा हा हा..... सॉलिड्ड होत हे.
हा हा हा... बघ... हसताना
In reply to हा हा हा..... सॉलिड्ड होत हे. by Mrunalini
ऑ ??
In reply to हा हा हा... बघ... हसताना by Mrunalini
माझी पण हिच अवस्था झालीये.
In reply to ऑ ?? by जेनी...
(No subject)
किस्से धमालेत.....
जाम हसलो, ब-याच दिवसांनी
धमाल किस्से एकदम
हा भारी लेख माझ्याकडून
(No subject)
In reply to हा भारी लेख माझ्याकडून by रेवती
पी ना पी ना
In reply to हा भारी लेख माझ्याकडून by रेवती
म्हणुनच मला राग येतो कुणी
In reply to पी ना पी ना by स्पंदना
ही हा हा हा हा!!!!!!!
In reply to म्हणुनच मला राग येतो कुणी by जेनी...
मस्त !!
'मुलीच्या लग्नाच्या वरातीत या
In reply to मस्त !! by खेडूत
तीर्थक्षेत्रातली गायनी कळा
अंबाबाई वाघावर बसून मोबाईल वर
In reply to तीर्थक्षेत्रातली गायनी कळा by अभ्या..
:)
In reply to तीर्थक्षेत्रातली गायनी कळा by अभ्या..
उचित पार्श्वसंगीत
कथा!
In reply to उचित पार्श्वसंगीत by रमेश आठवले
हसुन हसुन वाईट अवस्था झालीय ग
एकदा रेडीओवर दिवाळीची गाणी
=))
माझ्या लग्नाच्या सीडी मध्ये
खरे व काल्पनिक
स्नेहांकिता जी, अतिशय मस्त लेख.
हहपुवा.