चिकन शवर्मा
गेल्या आठवड्यात व्हेजींसाठी फलाफील आणि व्हेज-शवर्मा झाला. एक आठवडा कोंबडीलाही विश्रांती मिळाली असेल. म्हणुन पुन्हा सामिश प्रेमींसाठी चिकनकृती. :)
साहित्य :
चिकन थाईज. (हाडं काढुन टाकलेली.)
२ चमचे तंदुर मसाला.
२ चमचे आलं वाटण.
१ चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ चमचा काळीमिरी पुड.
१ चमचा लसुण पुड. / वाटण.
एका लिंबाचा रस.
चवीनुसार मीठ.
कृती :
शक्यतो हाडं काढुन चिकनच्या मांड्यांकडचा भाग घ्यावा. कट कट कमी करायची असल्यास सरळ चिकन ब्रेस्ट वापरावे.
चिकनचे दोन भाग करुन घ्यावे. (एक मसालेदार तर एक कमी तिखट बनवण्यासाठी.)
एका भागात तंदुर मसाला, आलं वाटण, लाल तिखट, लसुण पुड, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करावं.
तर दुसर्या भागात मीठ, काळिमिरी पुड, आल वाटण, लसुण पुड आणि लिंबाचा रस टाकुन एकत्र करावं.
चिकनला चरबी नसेल तर १-२ चमचे तेल टाकावं.
दोन्ही चिकन फ्रीजमध्ये किमान २ तास तरी मुरत ठेवावं.
चिकन मी ओव्हनमध्ये भाजायचं ठरवलं होतं. काही ओव्हन मध्ये ग्रिल करण्यासाठी गोल फिरणारी खास सोय असते जी माझ्या ओव्ह्नमध्ये नाही. म्हणुन घरच्या घरीच तारेचे २ स्टँड बनवले. जे फिरते नव्हते पण बराचसा तसाच इफेक्ट मिळाला जसा मला हवा होता.
त्या स्टँडमध्ये चिकनचे तुकडे ओवून घेतले. वरून एक लिंबाची फोड ठेवली.
ओव्हन २००°C वर १० मिनिटं तापवुन घेतल्या नंतर हे दोन्ही स्टँड आत ठेऊन ३० मिनिटं भाजुन घेतलं.
चिकन तयार झाल्यावर त्याचे लहान तुकडे करून घ्यावे. सोबत लेट्युस, टॉमेटो, ताहिनी सॉस, फ्रेंच फाईज यांची ही जुळवा जुळव करुन ठेवावी.
(पेठकर काकांनी दिलेली 'बटाटा न वापरण्याची' टीप पुढल्यावेळी वापरली जाईल. पण तुम्ही ती आत्ताच वापरायला हरकत नाही.)
पिटा ब्रेड/ खुबुस अर्धा उघडुन त्यात वरील मिश्रण भरुन घ्यावं.
रोल करुन गरम-गरमच सर्व्ह करावं.

वाचने
23357
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
लाजवाब!
!!!!
खुपच मस्त.. आणि घरच्या घरी
अफलातुन
घरगुती तारेच्या ष्ट्यांडसाठी
खतरा दिसतोय शवर्मा
मस्तच रे!
घरगुती तारेच्या स्टँड ची
अप्रतिम शवार्मा....
लाजवाब प्रेझेंटेशन
In reply to लाजवाब प्रेझेंटेशन by प्रचेतस
अगदी
In reply to अगदी by प्रशांत
+१
हुम्म्म्म
आहा..
In reply to आहा.. by गवि
हा मायक्रोवेव्ह ओव्हन नाही
In reply to आहा.. by गवि
हे सर्व प्रश्न हास्यास्पद
In reply to हे सर्व प्रश्न हास्यास्पद by गणपा
पण आमच्या कडे मात्र हल्ली
In reply to हे सर्व प्रश्न हास्यास्पद by गणपा
मायक्रो + कन्व्हेक्शन असा
In reply to मायक्रो + कन्व्हेक्शन असा by रेवती
एखादं वेळ करुन पाठवा की,
In reply to आहा.. by गवि
माझ्या आयुष्यात आतापर्यंत
- माझा सध्या घरी वापरत असलेला ओव्हन हा मावे+कन्व्हिक्शन+ग्रील असे बरेचसे मोड असलेला आहे. हा प्रकार करताना आधी दोन मिनिटे ग्रील आणि पाच मिनिटे मावे मोडवर बनवला. नंतर बटाट्याऐवजी पनीर घालून हा पदार्थ करताना आधीचे सेटिंग वापरल्यास पनीर छान भाजले गेले पण सुटून खाली पडत होते. त्यासाठी आता फक्त पाच मिनिटे मावे मोड पुरेसा आहे हे कळलं आहे.
-
केक करताना इथं सगळेजण आधी प्रिहिटिंग ते पण फॅरनहाईट मध्ये देतात आणि २०मिनिटं साधारण बेक करतात. मी सरळ माझ्या ओव्हनमध्ये असलेला 'जगातल्या प्रसिद्ध पाकृ' हा पर्याय वापरते आणि तोही विना प्रीहिटिंग. पाच मिनिटात मस्त लुसलुशीत आणि स्पाँजी केक तयार होतो. पाच मिनिटे हे चॉकलेट केकसाठी मावेचं स्वत:चं सेटिंग आहे पण त्यासाठी मोड आणि तापमान काय घेत असावा ते माहित नाही.
-
या पाकृसाठी मी मावे+ग्रील ६०० डिग्री से. वरती ओव्हन तीन मिनिटे प्रीहिट केला आणि नंतर त्यच सेटिंग्जवरती ३ ते ३:३० मिनिटे कुकीज बेक केल्या. आधी लेखातलं वेळेचं सेटिंग लावलं होतं, आणि घरभर खमंग वास सुटल्यावर ही फक्त बेक होण्याची सुरूवात असेल म्हणून सोडून दिलं होतं. तरी मध्येच जाऊन त्यांचा बदलता रंग पाहून मावे बंद केला म्हणून ठीक. परिणामी कुकीज अर्ध्या करपल्या होत्या. नंतर दोनदा केल्या त्या मात्र न करपता छान झाल्या.
- इडली साध्या मावे मोडवर ९०० डि.से. वरती साडेचार ते पाच मिनिटांत होतात.
माझ्यामते हे थोडं ट्रायल आणि एररमधून जमू शकेल. मलाही अजून असले प्रश्न पडतात.In reply to माझ्या आयुष्यात आतापर्यंत by मस्त कलंदर
वा वा.. खूप खूप धन्यवाद्स..
In reply to वा वा.. खूप खूप धन्यवाद्स.. by गवि
गवि
In reply to वा वा.. खूप खूप धन्यवाद्स.. by गवि
एक राहिलं. मावेसेफ नसलेल्या
In reply to आहा.. by गवि
हा हा...
मेटल फ्रेंडली...
जियो गणपा
दिल खुश हुआ
पाहिले
सर्व करा म्हणे
पुण्यात पुर्वी हाईट बार मध्ये
आज खायलाच पाहिजे
मस्त आहे
वााााहहह