माझे अत्यंत आवडते लाडू. पोटभरीचे, चविष्ट आणि पौष्टीकसुद्धा.
बच्चेकंपनी हे लाडू खाउन खूप खूष होते.
साहित्यः १ कप गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड, बेदाणे (ऑप्शनल)
कृती:
१) एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात गव्हाचे पीठ घालून तूपावर परता.
२) ५-१० मिनिटं मध्यम गॅसवर गव्हाचे पीठ अधेमधे परतून चांगले भाजून घ्या.
३) गॅस बंद करून त्यात साखर, वेलदोडे पूड घालून चांगले हलवून मिक्स करून घ्या.
४) मिश्रण लाडू वळण्याइतकं कोमटं झालं की लाडू करायला घ्या. प्रत्येक लाडू वळताना त्याला १ बेदाणा लावा. असे सोपे आणि पौष्टीक लाडू तयार :-)


वाचने
12726
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त दिसतायत लाडू.
झक्कास
माझी एक शंका
खमंग भाजून
In reply to माझी एक शंका by पियुशा
गव्हाचा तयार आटा वापरायचा. तो
In reply to माझी एक शंका by पियुशा
लाडू चिकट झाले नाहीत
In reply to माझी एक शंका by पियुशा
लै झ्याक दिसायलेत लड्डू
+१
In reply to लै झ्याक दिसायलेत लड्डू by अत्रुप्त आत्मा
मला आवडतात हे कणकेचे लाडू.
छान
सुंदर!
छान.
मस्त. नक्की करुन बघणार ह्या
दिवाळी जवळ आली कि वजन वाढतं
लाडुचा फोटो पाहुन क्षणभर मला
थोडा रवा
छान. बेसन लाडूसारखेच दिसताहेत
धागा वाचला. फोटो पाहिला.
उत्तम रेसिपी!
चविष्ट आआआआअ
चविष्ट आणि सोपे लाडु आवडले.
चविष्ट
मस्त
मस्त दिसतायत लाडू
हो. पैसाताई,