मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुली आणि आम्ही

वडापाव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
परवा आमच्या कॉलनीमागल्या मोठ्या रस्त्यावरच्या बसस्टॉपवर मी वाट बघत बसलो होतो. आता, बस स्टॉपवर बसचीच वाट बघता येते, असं नाही. मी कॉलेजवरून लवकर परतलो असल्याने तिथे येऊन बसलो होतो. ज्या मुलीची वाट बघत होतो, ती माझी मैत्रीण तयार व्हायला इतका काही वेळ लावते, की काही विचारू नका. वास्तवीक सकाळी अकराच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावरून फेरफटका मारायला काय मोठी एवढी तयारी करावी लागते ते तिचे तिला ठाऊक. या मुली नेहमीच एवढा वेळ लावतात. मग त्यांना अगदी शिकवणीला जायचं असलं, तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते म्हणे. बरं, एवढं करून 'आमच्या क्लासमध्ये चांगला दिसणारा एकही मुलगा नाही', 'आमचे सर सुंदर मुलींच्या बाबतीत जरास्से हेच आहेत, पण काय शिकवतात म्हणून सांगू!' - हे आहेच. आता जर असं असेल, तर अशा क्लासला जाताना तरी नट्टापट्टा करायची काय गरज? बरं, त्यांना तसं विचारून बघा, तर 'छे! मी अजिबात मेकअप करत नाही हा! ती अमूक अमूक करते मेकअप. मी फक्त क्रीम लावते, आय लायनर लावते, काजळ घालते, आणि लिप ग्लॉस लावते - बास्स! एवढंच!' यातली अमूक अमूक म्हणजे या मुलींची नावापुरती असलेली कोणीतरी जीवलग मैत्रीण असते. हे सगळं ऐकलं की, मेकअप म्हणजे नेमकं काय करत असाव्यात या मुली अजून, असा प्रश्न पडतो मला. अर्थात, याबाबतीत माझी जिज्ञासा जास्त तीव्र स्वरूपाची नसल्याने या प्रश्नावर मी जास्त विचार करत बसत नाही. एकदा कॉलेजमधल्या माझ्या एका मैत्रीणीबरोबर ट्रेनमधून घरी परतत असताना तिने मला विचारलं, 'तुम्ही पुरुष मंडळी रोज-रोज दाढी करत बसता, त्यापेक्षा एकदाच गाल वॅक्स का नाही करून टाकत?' आता चेहऱ्याला मेण लावल्याने दाढी उगवणं कायमचं बंद होतं की काय, अशा निरागस कल्पनेनं माझं मन अचंबित झालं होतं; अहो मेण हे फक्त दिवे गेल्यावर उपयोगी पडतं, असा माझा जन्मापासूनच समज होता. माझ्या मेण न लावलेल्या, आणि अर्धवट हिरव्या पडलेल्या त्या चेहऱ्यावर मला झालेला हा नवा साक्षात्कार स्पष्टपणे प्रकट होत होता. मी तरी माझं मेणासंबंधीचं अज्ञान लपवण्याच्या हेतूने म्हटलं, 'छ्‌या बुवा! आपल्याला त्या वॅक्स पेक्षा शेविंग क्रीमच सोयीचं पडतं. फेस आला की कसं, दाढी करायला मजा येते. मेणाला फेस येतो का? नाही. त्यामुळे त्यात मजा नाही.' दुसऱ्याच्या अज्ञानाला हसू नये, ही शीकवण मी नेहमीच पाळत आलोय. अहो मी लोकांच्या अज्ञानाला त्यांच्या पाठीही हसत नसतो. आणि ही बया इतक्या मोठ्याने हसायला लागली म्हणता, मला काही कळेनाच. 'अर्रे!! वॅक्स म्हणजे ते वालं वॅक्स नाही! वॅक्सिंग वॅक्सिंग!!' मी आपलं उगाचच, 'अच्छा अच्छा, वॅक्सिंग होय! मला वाटलं-' तसं मला तोडत ती म्हणाली, 'राहू दे हां विद्वान साहेब, तुला वॅक्सिंग म्हणजे माहित नाही ते ऍड्‌मिट कर. फेस इट, फेस इट!' यातल्या फेस इट वर तिने इतका जोर का दिला, ते मला कळल्यावाचून राहिलं नाही, पण मी माझं अज्ञान मान्य केलं. तसा मी खिलाडूवृत्तीचा आहे. नाही माहिती तर नाही माहिती आपण कशाला लपवा? त्या दिवशी स्त्रियांच्या फक्त डोक्यावरच केस उगवतात, आणि ते फक्त डोक्यावरच उगवत असल्याने ते जास्त असतात, या माझ्या ठाम समजुतीचा अंत झाला. माझ्या ज्ञानात भरपूर भर घालण्यात आली, आणि काही दूरूस्तीची कामे सुद्धा पार पडली. इतकंच नाही, तर मला अजून कोणी गर्लफ्रेंड का मिळाली नाही, यावर मुक्त आणि व्यक्त भाष्य झाले. अर्थात्‌, मगाशी सांगितल्याप्रमाणे, मी अतिशय खिलाडूवृत्तीचा असल्याकारणाने मी ते सर्व मुकाटपणे ऐकून घेतलं. पुरुषांप्रमाणे मुलीसुद्धा दाढीमिशी करतात, हे मला आता समजलेलं आहे. दाढी करण्याला त्यांनी ब्लिचिंग असं नाव ठेवलंय, आणि मिशी काढली, असं म्हणायच्या ऐवजी 'मी अप्पर लिप्स करून आली' असं थर्ड पर्सन सिंग्युलरचं व्याकरण स्वत:साठी लावत त्या रोखठोकपणे सांगतात. मुलींच्या चेहऱ्यावरचे केस त्या ब्लिचिंग करून घालवतात की असं काहीतरी जेव्हा माझ्या कानावर आलं, तेव्हा आमची मोलकरीण जमीन साफ करायला जी ब्लिचिंग पावडर वापरते, तिने चेहरा सुद्धा साफ करता येतो हे मला अजिबात पटेना. वॅक्सिंगच्या एका अनुभवाने मी शहाणा झालो होतो, म्हणून ज्या सुमुखीच्या तोंडून 'मी पार्लरला जात्येय, ब्लिचिंग करायचंय' असं मी ती चेहऱ्याभोवती बोट फिरवून दाखवत असताना ऐकलं, तेव्हा फक्त 'ब्लिचिंग?' एवढंच कपाळावर आठ्या आणत म्हणून मी माझं अज्ञान ग्रेसफुली प्रकट केलं. अर्थात्‌ या अज्ञानाबाबत माझं हसं झालं नाही. या मुली पार्लर मध्ये तासन्‌तास घालवतात. मेसेज करून चौकशी केली, की 'आता झालंय सगळं ऑलमोस्ट, फक्त क्लीन-अप बाकी आहे' असं उत्तर येतं. हे क्लीन अप करणं, म्हणजे सलून मध्ये न्हावी दाढी झाल्यावर तुरटी फिरवतो, त्याला समांतर असावं, असा माझा समज आहे. पण हा समज गैर असो वा नसो, मला या बाबतीतल्या माझ्या संभाव्य अज्ञानातच सूख आहे. या मुली सुंदर दिसण्यासाठी एवढी जोमाने तयारी करतात, याची मला काही वर्षांपूर्वी सूतराम कल्पना नव्हती. त्या मानाने आम्ही पुरुष मंडळी काहीच मेहनत घेत नाही असं म्हणायला हरकत नाही. जिम मध्ये रोज जाऊन चार बैठका मारल्या आणि गाढवासारखी ओझी उचलली, याला मेहनत म्हणायला आता मी तयार नाही. वास्तवीक आम्हां पुरुषांना जास्त मेहनत करण्याची मुळी गरजच नाही हे आता माझ्या लक्षात आलं आहे. आमचं निश (niche) हे बायकांच्या तुलनेत जास्तच असणार, याची मला खात्री आहे. निश म्हणजे एखाद्या जीवाची निसर्गातील इतर घटकांच्या नजरेतील भूमिका, किंवा अवस्था. आम्हां पुरुषांच्या बाबतीत मला अवस्था हा शब्द जास्त सुटेबल वाटतो. असो. हे निश बहुतांशी प्राणी-प्रजातींत पुरुषांमध्ये जास्त चांगलं आढळून येत असावं. उदाहरणार्थ, सिंह-सिंहीण, मोर-लांडोर, चिमणा-चिमणी, कोकिळ-कोकिळा(मी दोघांनाही बघितलंय), कोंबडा-कोंबडी, बोका-भाटी, इ. प्रजातींमध्ये नर हे मादीपेक्षा सुंदर दिसतात. मला विचाराल, तर कुत्रा-कुत्री मध्ये सुद्धा मला कुत्राच जास्त छान वाटतो. इथे, एक नमूद करतो, की लांडोर आपल्याला तेवढी सुंदर वाटली नाही, तरी मोराला तीच सर्वांत सुंदर वाटते, कारण ते सजातीय आहेत. त्याचप्रमाणे, आपल्या पुरुष जातीला जरी स्त्री ही जगातील सर्वांत सुंदर वस्तू वाटत असली(आणि वाटायलाच हवी), तरी निसर्गाच्या दृष्टीतून आम्ही पुरुष मंडळीच जास्त सुंदर ठरत असू. या मला झालेल्या अवलोकनातूनच नट्टापट्टा करण्याची गरज पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त का भासते, ह्या मला सतत भेडसावणारया प्रश्नाचे उत्तर मला कळले.

वाचने 26219 वाचनखूण प्रतिक्रिया 147

ज्ञानराम 05/11/2012 - 16:22
आणि इंद्राला भुलणारी अहल्या विसरलात वाट्टं??? ईद्राला ती भुलली नव्हती काय .. ईद्र त्या रुषिंचे रुप घेऊन आला होता.. .. >>> सूडजी ....आणी आयडी च काय घेऊन बसलात ?? इथे तर मुलांची नाव मुलींच्या नावासारखी असतात ..( उदा . स्नेहल, शितल..बरेच...ईत्यादी) आणी सुंदरते विषयी चर्चा चालू आहे... आय डी विषयी नाही.....

In reply to by ज्ञानराम

बॅटमॅन 05/11/2012 - 16:31
म्हंजे रोजचा नवरा नेमका कोण आहे हेपण तिला नै कळालं का? बर बर..अहल्येला तो इंद्र आहे हे माहिती असूनसुद्धा तिने इंद्राबरोबर संग केला होता. अहल्या दगडापासून पुन्हा बाई बनल्यावर (एका पुरुषामुळेच बरं का) नारदाने तिला विचारलं की तो इम्द्र आहे हे तिला माहिती होते ना? तर त्यावर तिचे उत्तर होते "हो". मग नारदाने विचारले का? तर तिच्या उत्तराचा सारांश होता "अगदी ब्रह्मचर्य वगैरे करणारी साध्वी जरी असली, तरी हॉट पुरुष आला की व्हायचे ते होतेच". या श्लोकात हेच दिलेले आहे, किंबहुना अधिक रोखठोकपणे. भाषांतरात मी अतिशय सोवळी भाषा वापरली आहे. "ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्या: साध्व्या: ह्यपि च श्रूयते| युक्तं हि पुरुषं दृष्ट्वा योनि: संक्लिद्यते स्त्रियः||" तेव्हा ही एकांगी मुक्ताफळे बंद करा. पाशात काय, दोघेही फसतात. पण जणू कुठल्याच गोष्टीसाठी पुरुषांची गरज स्त्रियांना नसल्याचा आव जो इथे आणल्या जात आहे, तो तद्दन पोकळ आहे.

In reply to by बॅटमॅन

विश्वनाथ मेहेंदळे 08/11/2012 - 03:21
बापरे. माझ्यापण शेंडीला झिणझिण्या आल्या. इथल्या तथाकथित पुरोगामी महिलावर्गाला झेपणार नाही रे बाबा हे.

In reply to by ज्ञानराम

सूड 05/11/2012 - 16:38
>>सूडजी ....आणी आयडी च काय घेऊन बसलात ?? इथे तर मुलांची नाव मुलींच्या नावासारखी असतात ..( उदा . स्नेहल, शितल..बरेच...ईत्यादी) आणी सुंदरते विषयी चर्चा चालू आहे... आय डी विषयी नाही..... बरं तुमच्या सोयीचं तेवढंच उचललंत !! तुम्हीच वरती विश्वामित्र मेनकेला भुलल्याचं म्हटलंय, त्यावर मी जांभूळ आख्यान....द्रौपदी....काही आठवतंय का ज्ञाराजी ?? असं विचारलं होतं त्याला सहज बगल दिलीत. 'कर्ण मिळाला तर वर्षभराचे सहा समान भाग होतील' असं म्हणणारी द्रौपदी विसरलात ? फक्त पुरुष भुलले नव्हते, बायकाही भुलल्या होत्या. उगा उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार करु नका.

गवि 05/11/2012 - 16:55
एक मिनिट शांतता. मला आता बर्‍यापैकी दाट शंका पडली आहे. पुरुष हे बाईलवेडे, स्त्रीला सहज भुलणारे, पाघळणारे, तिच्या कह्यात जाणारे बावळट, मूर्ख , दुबळे असतात ? की स्त्रीवर हुकूमत गाजवणारे, स्त्रीवर सत्ता कायम ठेवणारे, तिला कोंडणारे, तिचं दमन करणारे, तिला गुलाम बनवणारे,तिला उपभोग्य वस्तू समजणारे, तिचा येताजाता गैरफायदा घेणारे क्रूर, बेदरकार, रानटी एमसीपीज इ. इ. असतात? दोन्हीपैकी एकच असणार इतकं नक्की.. राईट ?

In reply to by गवि

बॅटमॅन 05/11/2012 - 16:59
या दोन्हींपैकी जी प्रतिमा जेव्हा सोयीस्कर असेल तेव्हा प्रोजेक्ट करून त्याआधारे पुरुषांवर पॉलेमिक्स बरळायला सोपे पडते, उदा. दिल्ली बाजूला अजून एखादा बलात्कार झाला किंवा खाप पंचायतीचा अजून एखादा रानटी निर्णय आला की पुरुष हे
स्त्रीवर हुकूमत गाजवणारे, स्त्रीवर सत्ता कायम ठेवणारे, तिला कोंडणारे, तिचं दमन करणारे, तिला गुलाम बनवणारे,तिला उपभोग्य वस्तू समजणारे, तिचा येताजाता गैरफायदा घेणारे क्रूर, बेदरकार, रानटी एमसीपीज इ. इ
आणि मोनिका लेविन्स्कीसारखे प्रकरण आले की तेच पुरुष मग बाईलवेडे वगैरे असतात.

In reply to by गवि

५० फक्त 05/11/2012 - 17:05
माझ्या मते हे वेळ,काळ,गरज आणि परिस्थितीनुसार बदलतं, स्त्री एखाद्या पुरुषाची होईपर्यंत ती एक स्वतंत्र मनुष्य असते, जेंव्हा ती आपली होते तेंव्हा वस्तु होउन राहते. हा नियम अपवादानेच सिद्ध होतो, पांचाली ही एका पुरुषाची झाली नाही म्हणुन ती स्वतंत्र राहु शकली.

In reply to by गवि

कवितानागेश 05/11/2012 - 17:17
कसेही असले तरी त्यांना वॅक्सिंग, ब्लिचिंग, मेक-अप अश्या गोष्टींमधले काही कळत नाही. ;)

In reply to by कवितानागेश

जेनी... 05/11/2012 - 22:01
@माऊ . अगं त्यांना करायला मिळत नाहित ह्या (वॅक्सिंग, ब्लिचिंग, मेक-अप )गोष्टी म्हणुन जळतात आपल्यावर :-/

In reply to by गवि

श्री गावसेना प्रमुख 08/11/2012 - 09:02
होय.सगळे पुरुष अल्याड(उजेडात) सभ्यपणा दाखवतात्, अन पल्याड(अधांरात) त्यांच्यात एक रा़क्षस असतोच झोपलेला

ज्ञानराम 05/11/2012 - 16:59
त्याच काय आहे... मी जांभूळ आख्यान वाचलंच नाही... आणी द्रोपदी असं म्हणाली होती का ?? " हे मला माहीत च नव्हत हो.. म्हणून मी द्रोपदीच्या धाग्यावर रीप्लाय केला नाही... बरं तुमच्या सोयीचं तेवढंच उचललंत !! ( माझ्या सोयीच नाही हो उचललं .. खरचं...

ज्ञानराम 05/11/2012 - 17:03
त्याच काय आहे... मी जांभूळ आख्यान वाचलंच नाही... आणी द्रोपदी असं म्हणाली होती का ?? " हे मला माहीत च नव्हत हो.. म्हणून मी द्रोपदीच्या धाग्यावर रीप्लाय केला नाही... बरं तुमच्या सोयीचं तेवढंच उचललंत !! ( माझ्या सोयीच नाही हो उचललं .. खरचं...

In reply to by ज्ञानराम

जेनी... 05/11/2012 - 17:08
=)) टेन्शन नै घ्याचं ! एक लक्षात ठेवाचं , जेव्हा समुरच्याकडं बोलाय काय नसतं तवा तो पूरुष आयडी का स्त्री आयडी ह्यावर चर्चा करतु . =)) कूल र्हाचं आणि हो , सूइचचं उचलाचं ;) आपला फूल सपूर्ट :)

In reply to by जेनी...

>>एक लक्षात ठेवाचं , जेव्हा समुरच्याकडं बोलाय काय नसतं तवा तो पूरुष आयडी का स्त्री आयडी ह्यावर चर्चा करतु अनुभवाचे बोल दिसतायेत.

In reply to by जेनी...

अगदी अगदी !! खाई त्याला खवखवे म्हणतात. माझी स्वाक्षरी अजूनपर्यंत कोणालाच खटकली नव्हती, तुला ती खटकली यावरुनच सर्व कळलं.

In reply to by सूड

श्री गावसेना प्रमुख 06/11/2012 - 09:47
तुला ती खटकली यावरुनच सर्व कळलं. पुजा बाय तुमचा एक फोटो टाका धाग्यात (तुम्ही खर्या स्त्री आय डी असाल तर) 1

In reply to by जेनी...

श्री गावसेना प्रमुख 08/11/2012 - 09:07
काहोन इतुक्या रागावतात्,आम्हाला नाय बघायचा तुम्चा फटु. ते म्या मिपा करांना तुम्च्या बद्दलचा गैरसमज दुर व्हावा म्हणुन्शान सांगल मिनि.(इतका संताप योग्य नाही सार्वजनीक ठिकाणी) आणी तुम्ही सांगीतल तेव्हा मी घरी जानार हे तुम्हाला कुनी सांगीतल

सुर 05/11/2012 - 17:32
गरज नसताना,नकोत्या वादांमुळे धाग्याने शंभरी गाठली एकदाची..

In reply to by जेनी...

बॅटमॅन 05/11/2012 - 18:30
आज्जे तुझेपण लै परतिसाद हैत बरं त्या नकोशा वादात.. आता परत म्हणशील माझेपण आहेत-हो आहेतच, पण
गरज नसताना,नकोत्या वादांमुळे धाग्याने शंभरी गाठली एकदाची..
याला सहमती तू दाखवलीयेस मी नै ;)

In reply to by बॅटमॅन

मी तर आधीपासनच भौराया म्हणते :-/ तुच नंतर ..फाआर फाआर उशिराआनं आज्जे म्हणाय लागला ..मला वाटलं तुला नाती समजय नायत म्हणुन म्हणतोस ,:D म्हणुन म्हटलं असुदे असुदे ..आसुदे कळत एखाद्याला...त्यात एवढं काय ;) =))

In reply to by जेनी...

मी तर आधीपासनच भौराया म्हणते :-/ तुच नंतर ..फाआर फाआर उशिराआनं आज्जे म्हणाय लागला :-/..मला वाटलं तुला नाती समजय नायत म्हणुन म्हणतोस ,:D म्हणुन म्हटलं असुदे असुदे .. नाय कळत एखाद्याला...त्यात एवढं काय ;) =))

In reply to by जेनी...

बॅटमॅन 05/11/2012 - 22:27
या निमित्ताने "पुरुषांचे होणारे ऊठसूट भावीकरण" असा एखादा धागा काढायला हरकत नसावी. ** ** याचा अँटिडोट काय असावा याचा विचार करीत आहे. * मला काय ** फरक नै पडत तू माझं भौरायीकरण केल्यानं पण हे कैच्याकै असतं.

वीणा३ 06/11/2012 - 00:46
त्याचप्रमाणे, आपल्या पुरुष जातीला जरी स्त्री ही जगातील सर्वांत सुंदर वस्तू वाटत असली(आणि वाटायलाच हवी), तरी निसर्गाच्या दृष्टीतून आम्ही पुरुष मंडळीच जास्त सुंदर ठरत असू. बर्याच प्राणी, पक्ष्यांमध्ये नर हे माणसांच्या दृष्टीने सुंदर दिसतात, आणि मादी कुरूप, तरीही तिला आकर्षित करण्यासाठी ते नाच करून दाखवतात, रंग बदलतात थोडक्यात त्यांचा नट्टापट्टा करतात. तोच नियम लावायचा झाला तर माणसांमध्ये स्त्री (इतर निसर्गाच्या दृष्टीने) सुंदर असुनहि (इतर निसर्गाच्या दृष्टीने) कुरूप पुरुषाला आकर्षित करण्यासाठी नट्टापट्टा करत असावी. फक्त आपल्या संस्कृती-सभ्यता च्या नावाखाली तिला मी पुरुषाला आकर्षित करण्यासाठी नट्टापट्टा करत्ये असं म्हणता येत नसावं. विचार करत होते कि उद्या मी चांगली साडी नेस्लीये मेकप करत्ये आणि सासूने विचारला तर तिला सांगत्ये कि मी ना तुमच्या मुलाला आकर्षित करण्यासाठी नटत्ये तर त्यांना किती धक्का बसेल :प.

In reply to by वीणा३

रेवती 06/11/2012 - 00:49
तुमच्या मुलाला आकर्षित करण्यासाठी नटत्ये देवाऽऽ हसून जीव गेला. खी खी खी. मी माझ्या साबांना असं काहीसं म्हणतीये असं डोळ्यासमोर आलं.

In reply to by वीणा३

जेनी... 06/11/2012 - 01:00
तुमच्या मुलाला आकर्षित करण्यासाठी नटत्ये तर त्यांना किती धक्का बसेल :प. कसला टोला हाणलाय =)) 'मान'९?) का माण९?) ते गये =))

In reply to by वीणा३

बॅटमॅन 06/11/2012 - 03:46
विचार करत होते कि उद्या मी चांगली साडी नेस्लीये मेकप करत्ये आणि सासूने विचारला तर तिला सांगत्ये कि मी ना तुमच्या मुलाला आकर्षित करण्यासाठी नटत्ये तर त्यांना किती धक्का बसेल :प.
रोचक!! पण सासूने नीट विचार केला तर ती हसत हसत अनुमोदन देईलच नैका :P

In reply to by वीणा३

विश्वनाथ मेहेंदळे 08/11/2012 - 03:16
योग्य शब्दात सांगितले तर काही खास वाटणार नाही, कारण सासूने पण तेच केले असेल ना तरुणपणी. चोराच्या वाट चोरांना कळतात हो. हां, पण ते योग्य शब्दांचे लक्षात ठेवले पाहिजे. उगाच भावनेच्या भरात "तुमच्या मुलाला तापवायला..."* असे काही बोलू नये. * हेच सगळ्यात सभ्य वाक्य सुचले. नाही तर याची बरीच व्हर्जन्स आहेत. इच्छुक व्यनी करतीलच. पुरुष आयडीन्नी व्यनी करायची गरज नाही, त्यांना सहज सुचतील ती वाक्ये. स्त्री आयडीन्नी स्वतःच्या जबाबदारीवर व्यनी करावा. हीच सूचना स्त्री आयडी घेतलेल्या पुरुषांना किंवा पुरुष सदृश मानवांना पण लागू आहे.

दिव्यश्री 09/01/2014 - 14:32
लेख आणी प्रतिसादही ... :) क्रीम लावते, आय लायनर लावते, काजळ घालते, आणि लिप ग्लॉस लावते - बास्स! एवढंच!'>>> पुरुषांना बरीच माहिती दिसते मेकअपची :P