✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हिवाळ्यात व्हेगस

क
कोलबेर यांनी
Wed, 11/14/2007 - 23:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7530 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

शुभेच्छा!

विसोबा खेचर
Wed, 11/14/2007 - 23:32 नवीन
वरूणदेवा, आपल्या दौर्‍याकरता आमच्या शुभेच्छा! दौरा कसा झाला, काय काय मजा केलीत ते मिसळपाववर अवश्य लिहा बरं का! :) तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

कोलबेर
गुरुवार, 11/15/2007 - 00:07 नवीन
तात्या शुभेच्छांबद्दल आभार! दौरा यशस्वी झाला की सचित्र लेख मिसळपाववर नक्की टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

झायन/ब्राईस

नंदन
गुरुवार, 11/15/2007 - 00:40 नवीन
मी दोन वर्षांपूर्वी ३१ डिसेंबरच्या रात्री व्हेगसला होतो. रानडे किंवा लक्ष्मी रोडला दिवाळीच्या खरेदीसाठी जशी झुंबड होते, तशा रस्त्यावर फुललेल्या गर्दीमुळे धमाल आली होती. ग्रँड कॅन्यनचे रोड्स/नॉर्थ रिम बंद असण्याबरोबरच प्रत्यक्ष कॅन्यनमध्ये दृश्यमानता कमी असणे हाही एक मोठा धोका आहे. शिवाय त्याचा आगाऊ अंदाज बांधणेही अवघड आहे. झायनबद्दलही काही सांगावेसे वाटते. व्हेगसपासून केवळ ३ तासांच्या अंतरावर आहे, त्यामुळे एका दिवसात पाहून होईल असे हे पार्क नाही. एकतर हिवाळ्यामुळे काही पॉइंट्स बंद असतील, शिवाय डे-लाईट सेविंग वेळ आणि एकंदरच डोंगराळ भाग असल्यामुळे सूर्यास्तही बराच लवकर होईल. त्यामुळे (माझ्या अंदाजाप्रमाणे) दुपारी फार फार तर चार पर्यंतच ट्रेकिंगला वेळ मिळू शकेल. अगदीच जर धावती भेट द्यायची असेल आणि ट्रेकिंगचा उत्साह असेल, तर 'एंजेल्स लँडिंग' हा ट्रेक नक्की करण्यासारखा आहे. जर उंचीची भीती वाटत असेल, तर शेवटचा भाग पार करणे अवघड आहे. पण जर तसे नसेल, तर तो भाग (तीन-एक फूट रुंदीची ट्रेल आणि दोन्ही बाजूंनी खोल दरी) ट्रेक करण्यासारखा. शिवाय वरून दिसणारे दृश्यही अप्रतिम. दुसरा पर्याय म्हणजे थोडेसे अधिक लांब असलेले ब्राईस कॅन्यन पार्क. हे झायन एवढे प्रेक्षणीय नसले तरी एका दिवसात ड्राईव्ह करून सहज पाहून होण्यासारखे आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

नंदन, फारच

कोलबेर
गुरुवार, 11/15/2007 - 02:01 नवीन
नंदन, फारच छान माहिती! अनेक अभार. शेवटच्य दिवशी परतीची फ्लाईट रात्री उशिरा व्हेगसहून असल्याने, ग्रँड कॅन्यन ते व्हेगस ह्या परतीच्या प्रवासात झायॉन पार्क आटपावी म्हणतोय. कारण तो पूर्ण दिवस हातात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

साउथ रीम

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/15/2007 - 00:44 नवीन
वरुण, साउथ रीम बंद असल्याचे आजवर कधीही ऐकलेले नाही. मीही ग्रँड कॅन्यनला नाताळातच गेलो होतो काही वर्षांपूर्वी. नॉर्थ रीम ला जायचे असल्यास मात्र उन्हाळ्यातच जावे असे सगळे लोक सांगतात. मी आजवर तिथे गेलेलो नाही. - सर्किट
  • Log in or register to post comments

साउथ रिम वर्षभर उघडी

धनंजय
गुरुवार, 11/15/2007 - 00:53 नवीन
मी हिवाळ्यात साऊथ रिमला गेलो. रस्ते उघडे होते आणि गर्दीही खूप होती! नॉर्थ रिम मार्च पर्यंत बंदच होती.
  • Log in or register to post comments

आभार

कोलबेर
गुरुवार, 11/15/2007 - 01:58 नवीन
जलद प्रतिसादांबद्दल धन्यवाद! साउथ रीम १२ महिने उघडी असते हे खरे, पण व्हेगसहून तिकडे जाणारा रस्ता बर्फामूळे बंड पडतो का? गुगल मॅप्सवर हा रस्ता काढला असता शेवटचा भाग कधी कधी बंद असतो अशी नोंद आढळ्याने मला शंका आली. रस्ता बंद पडला तरी हॅलीकॉप्टर आणि ट्रेन च्या सफरी चालू असतात पण मला ड्राईव्ह करुन जायचे असल्याने ही शंका मनात आली. सगळे बुकींग केल्यावर ऐनवेळी रस्ताच बंद असल्याने सगळा विरस होऊ नये म्हणून ही उठाठेव. पुन्हा एकदा सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments

रस्ताही

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/15/2007 - 02:12 नवीन
रस्ताही उघडाच असतो. एकदा आय-४० ला लागले की मग काहीच प्रश्न नाही. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

वा! शुभेच्छा!

प्रियाली
गुरुवार, 11/15/2007 - 02:05 नवीन
वेगासला मजा करा. मस्त ठीकाण आहे. पुन्हा पुन्हा जाण्यासारखे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा