असतेस घरी तू जेव्हा.....
(संदीप सलील यांची माफी मागून सगळ्या हतबल पुरुषांसाठी नवीन स्त्रीसूक्त)
असतेस घरी तू जेव्हा...
जीव उंदराएवढा होतो.....
कुत्रं लागल्यागत मागे...
मी इकडे तिकडे पळतो....
भूत पाहून बोबडी वळावी
बर्फाळ तसा मी होतो...
तुझी नजरच खलास करते..
अन देहच आडवा होतो........
येतात शेजारी दारापाशी....
उत्साहाने उजळती तोंडे........
कुणी हळूच डोकावले घरी....
तर त्यालाही प्रसाद मिळतो....
तव भीतीत थरथरणार्या...
मज स्मरती हजार वेळा........
मार खाऊनच बाहेर पडावे...
हा असाच शेवट होतो.....
तू संग सखे मज काय
मम गुन्हाच नक्की कसला?
आयुष्याचा हा एक त्रास
न कळेना कधी हा संपतो??
जरी झालो तुझाच नवरा
ना शूर मी अजुनी झालो.......
दर वेळी जाणवत राहते....
मी कायमचा अडकलो.....!!
भलतीच गरम डोक्याची दिसते!!!
पंखा
चालू करा, डोकं थंड होईल.माम्लेदारचा पन्खा साहेब, कविता मस्त झाली आहे.
काही दिवसानी बहुतेक पती
काय पण
अगं पूजा, 'अदखलपात्र'
हे फक्त विडंबन आहे...
कवितेतला पुरुष इतका अगतिकपणे
हे विशेश
वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरीही....
गांधींनी सुद्धा सत्याग्रह
लढ बाप्पू.......