Skip to main content

मसाला मसूर डाळ

लेखक प्रियाकूल यांनी शुक्रवार, 02/11/2012 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
अख्खी मसूर डाळ ५-६ तास भिजवून ठेवा. त्याला मोड आणले तरी चालतील. नंतर ते कोरडे करून घ्या.एका काढीत तेल गरम करून त्यात मसूर तळून घ्या.दाणे दाबून पहा. क्रिस्पी झाले कि काढा.लगेच काळ मीठ आणि जिरेपूड लावून घ्या.प्रत्येक वेळी डाळ तळून काढली कि मीठ आणि जिरपूड लावून घ्या. तरच मीठ आणि जिरेपूड सगळीकडे लागते.आवडत असल्यास तिखट पण घालता येईल .मसाला मसूर डाळ तयार.झटपट अन खमंग.हि डाळ चिवडा,भेळ मध्ये छान लागते. तळताना तेल उडते तेव्हा जरा जपूनच तळा.:)

वाचने 8540
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by जेनी...

मलाही असच वाटायचं.पण कीने मी ना दाल माखनी बनवताना जरा जास्त भिजवली डाळ आणि थोडीशी करून पहिली. मस्त झाली. चणा दाल पण अशीच करता येते.ती पण मस्त लागते. आमच्याकडे दिवाळीत हे दोन नमकीन ठरलेलेच असतात माझ्यासाठी.

उत्तर भारतात दालमोठ हा नमकीन पदार्थ सर्व हल्वायांकडे मिळतो. ह्याचे घटक काय आहेत आणि ह्यात व मसाला मसूर दाल यांच्यात काय फरक आहे याचा खुलासा केल्यास बरे होईल.

In reply to by रमेश आठवले

दालमोठ हा प्रकार माहित नाही पण गूगल वर पाहिल्यावर असं वाटतंय कि तेच हे आहे. त्यात चण्याच्या आणि मसूरच्या डाळीवर बारीक शेव,आमचूर टाकून देतात असावेत.

In reply to by प्रियाकूल

गूगल वर शोध घेतल्यावर दालमोठ पाक कृतीचा हिंदी भाषेत खालील धागा सापडला. http://nishamadhulika.com/snacks/chana-dal-namkeen-recipe.html

????????????????//// आमच्या आवडत्या " डाळ " या प्रकारात फोटो टाकायची सक्ती आहे हे माहीत नसावे , याबद्दल आमच्या स्वता बद्दल भयानक खेद वाटतो आहे ... असो ..पुढल्या वेळी " बटाटा - मसुर दाल " बनवुन सुड घेण्यात येईल !

In reply to by सुहास..

करा करा..मी पण तुम्ही दिलेली रेसिपी करून पाहीन आणि रीसूड घेईन.हाहाहा.;) बादवे,फोटो टाक लालाव..गूगल वरचा आहे. मी केलेली डाळ संपली.
From maze khadyache prayog