गुंतून राहणं चांगलं की गुंतल्यानंतरही वेळ येईल तेव्हा शांतपणे विलग होणं चांगलं यावर जे बोलणं झालं त्यातून त्याची डिटॅचमेंट हे प्रकटन याआधी लिहिलं गेलं.
निसर्ग हा इतका जिवंत, इतका व्हर्सटाईल आहे, की प्रत्येकाला तो वेगळा दिसतो, नवं काही देतो.
लेखावर आलेल्या प्रतिसादांमधूनही हेच जाणवलं. अनेकांनी त्यांना जाणवलेल्या - पटलेल्या आणि न पटलेल्या - गोष्टी तिथे मांडल्या.
ही मूळ चर्चा ज्यांच्याशी झाली, त्यांनाही तो जसा जाणवला तसा.. त्यांच्याच शब्दात.
---------------------------------------------------------------------------------
अटॅचमेंट व डिटॅचमेंट... वेदना की आनंद?
सूर्योदय असो की सूर्यास्त, दोन्ही वेळा आकाशात रंग उधळत असतात.
पण सूर्योदय आल्हाददायक वाटतो तर सूर्यास्त एक अनामिक उदास कढ आणतो..
रंग सारखे असले तरी एक सुरुवात असते, आणि दुसरी अखेर असते.
समुद्राच्या लाटांप्रमाणे हरघडी वेगळे रूप, वेगळी छटा आणि वेगळा भाव.
नुकतेच जन्मलेले तान्हे मूल, खळाळत्या झर्याच्या रूपात उगम पावणारी नदी, वेलीवर उमललेली कळी, मातीच्या काळ्या लाटेमधून उगवलेला नाजूकसा कोंब किंवा झाडावरचे इवलेसे पोपटी पान या अफाट सृष्टीशी, निसर्गाशी आपली नाळ जोडण्यासाठी सतत धडपडत असतात. एकरूपता अशीच साधली जाते, नाही का?
विश्वाच्या या पसार्यात हे सगळे जीव संपूर्ण असतात, आपलं वेगळेपण जपतात आणि तरीही सृष्टीलाही परिपूर्ण बनवतात.
पूर्णातून पूर्ण काढले तर काढलेले पूर्ण असते आणि शिल्लक असते तेही पूर्णच असते.
निसर्ग वेगळा आहेच.
सर्व सजीव वैविध्यांना सामावून घेऊन प्रत्येक क्षणी नवीन कुणालातरी आपलंसं करण्यासाठी तो उत्सुक असतो.
जाणार्यांना जसा तो अलिप्तपणे निरोप देतो तसाच तो येणार्यांचेही स्वागत करतो, अलिप्तपणेच...
पण त्या अलिप्ततेतही एक ओलावा असतो.
निसर्ग प्रत्येक घटकाला प्रगतीची, उत्कर्षाची ओढ लावतो.. तारुण्याची ओढ लागलेल्या बालकाप्रमाणे.
दुसर्याचा स्वतःइतका किंबहुना स्वतःपेक्षा जास्ती उत्कर्ष घडवणार्या निसर्गाच्या या 'स्व'भावाला एकरूपता म्हणावे की आणखी काही..? हीच ना अटॅचमेंट?
वाचने
1962
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच की!
अगदी
In reply to खरच की! by स्पंदना
तुमचं निरीक्षण आवडलं. जो
In reply to खरच की! by स्पंदना
छान
In reply to खरच की! by स्पंदना
हम्मSSS,
छान ...आता सवयी वर पण येवु
निसर्ग आपले काम, बर्याच अंशी