साहित्य: सफरचंद १ किलो, खवा ३५०ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर स्वादानुसार,बदाम काप,बेदाणे,काजू तुकडे,तूप ३चमचे.
कृती: प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावी.कढईत तूप तापत ठेवावे.गॅस बारीक ठेवावा. साले काढ्लेल्या सफरचंदाच्या फोडी करुन घ्याव्या. त्यातील बिया काढून फोडी किसाव्या, किस लगेच तुपात टाकून परतावा.याच प्रकारे सगळ्या सफरचंदांचा किस करुन तुपावर टाकावा. १० मिनीटे किस परतल्यावर त्यात साखर मिसळावी. साखर विरघळली की खवा मिसळावा.बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे यापैकी आवडीप्रमाणे मिसळावे.थोडा वेळ परतावा. वेलची पावडर घालावी.बदामाच्या कापानी सजवावे.( किस लगेच परतल्यामुळे काळा पडत नाही.)
समस्त मिपाकरांना नमस्कार!!!!! पहिलाच प्रयत्न आहे पोस्ट टाकण्याचा!! करण्यापेक्षा टायपिंगला जास्त वेळ लागला!! जमेल हळूहळू!!
वाचने
6663
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो समोर दिसण्यसाठी काय
मस्त गं!
फोटू झाक दिसतोय...!
शॉलेट्ट
मस्त दिस्तो आहे हलवा.
एकदम वेगळी पाकृ
मस्त दिसतोय हलवा... करुन
सुरेख रंग आलाय. फिका पिवळा.
छान आवडला
In reply to सुरेख रंग आलाय. फिका पिवळा. by स्पंदना
वाह...
टेम्प्टींग...
"If the Doctor is Handsome
In reply to टेम्प्टींग... by प्रभाकर पेठकर
मला वाटले असे काहीतरी आहे
असे असेल तर!!
In reply to मला वाटले असे काहीतरी आहे by आनन्दा
ह. घ्या हो!
In reply to असे असेल तर!! by अनन्न्या
सफरचंद हलवा? बरं, हलवले. पुढे?
In reply to ह. घ्या हो! by आनन्दा
अतिअवांतर: अशाही पाकृ...
In reply to सफरचंद हलवा? बरं, हलवले. पुढे? by एस
शाब्बाश रे पठ्ठ्या
In reply to अतिअवांतर: अशाही पाकृ... by एस
धन्यु मालक...
In reply to शाब्बाश रे पठ्ठ्या by अर्धवटराव
तिखट चहा
In reply to सफरचंद हलवा? बरं, हलवले. पुढे? by एस
व्वा! फारच छान...
In reply to तिखट चहा by स्मिता.
छान
आभार!!
वाह्ह ! (मूग हलवा प्रेमी)
लय भारी!!!
मस्त दिसतो आहे. मिपाला अजुन
नको नको...
In reply to मस्त दिसतो आहे. मिपाला अजुन by मृत्युन्जय
मस्त !!
अहा.....मस्त दिसतोय हलवा
वा! नविनच पदार्थ ऐकतोय