स्वर साम्राज्ञी !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
स्वर सम्राज्ञी चा उद्या वाढ दिवस आहे. मला आठवते तेंव्हा पासून राणी गाते आहे. माझा एक काका “बाईंचा” मोठ्ठा पंखा होता. जाता जाता त्याने मला कोकिळेचा पंखा करून टांगले. रेडिओ मॉस्को वर “हवा में उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का” हे गाणे ऐकले आणि मी पुरता बिघडलो. पुढे जावून त्यामागच्या काळातील गाणी ऐकली आणि अनुशेष भरून काढला. शिरीष कणेकर वाचता झालो आणि हिरो वर्षीप सुरु झाली. भक्ती इतकी की कोणी मल्लिकेच्या गाण्याविषयी प्रतिकूल बोलले तर तो आयुष्यातून कटाप होत असे. पुढे वय वाढले आणि भक्ती कमी झाली आणि दिव्यत्वाची प्रचीती आली. थोडे संगीत शिकलो आणि काळी चार मधल्या तार सप्तकातला मध्यम अचूक भेदण्याच्या अदाकारी ने अचंबित झालो. पुढे संगीतकार आणि हया गायिका असा “इतिहास-भूगोल” सारखा जोडीने अभ्यास सुरु झाला. मागच्या पिढीचे आवडलेले शंकर-जयकिशन जरा नावाडू लागले. बाईंच्या आवाजावर त्यांचे संगीत थोडे कुरघोडी करते आहे असे उगाचच वाटून गेले. खय्याम वर जीव जडला. जयदेव, सलीलदा , वसंत देसाई हे तुलनेने कमी प्रसिध्द – यशस्वी संगीतकार अधिकाधिक आवडू लागले. अण्णा चितळकर आणि मादाम यांचा समसमा संयोग, नौशाद व मदन मोहन बरोबर कोरलेली लेणी , एस.डी आणि एल पी यांनी पडलेला पाऊस - असा प्रवास सुरु झाला.
आपण “मराठी “ मातीत जन्माला आल्याचा एक मोठा फायदा की आपल्याला मातृभाषेत हे स्वर्गीय गाणे अगदी भरपूर ऐकता आले. पं.हृदयनाथांनी ही घरची कामधेनु संपूर्ण महाराष्ट्रावर ओवाळली. श्रीनिवास खळे , बसंत प्रभू , वसंत पवार हया किमायागारानी त्या दिव्य स्वराचे सोने केले.
आर डी ने मात्र असे का केले हे कोडेच आहे ? एकाच सिनेमामधली काही गाणी मोठीला काही गाणी छोटीला. का ?
उद्या ८३ वा वाढ दिवस आहे. माझा त्या सुरांवर लोभ माझ्या वाढदिवशी वाढत जातो. रिती वर्तमान काळ आहे तो!
हया वर्षी ग्रेस गेले . त्यांनी लिहिले आहे
सूर नोव्हे तीर कंठी लागलेला शाप हा !
त्या शापित गाण्याने माझे शापित जीवन सुसह्य झाले त्या साठी हे स्फुटलेखन!
प्रतिक्रिया
स्वरसम्राज्ञिस मानवन्दना !
स्वरसम्राज्ञिस प्रणाम आणि शुभेच्छा !!!
अगदी मनापासून
हे स्फुटलेखन!
आर डी ने आपली सगळी चांगली
हम्म!
लेख आवडला पण...
तर्री
सूर नोव्हे तीर कंठी लागलेला शाप हा
ही पहा
प्रचंड धन्यवाद!
ही खानोलकरांची नाही !
कुलकर्णी मोड : खानोलकर रचनेला विस्कळीत पण अर्थाला पक्के ! तर ग्रेसची रचना पक्की पण अर्थ अती दुर्बोध - आपण दोघांचे बी पंखे !शुचिनं दिलेल्या लिंकवर आरती प्रभू असा उल्लेख आहे
नाही - प्रचंड मोठी गफलत !