परीक्षणांचा काथ्याकूट
मंडळी आपल्यापैकी बर्याच जणांना सिनेमे पहायला आवडतात. काहींना लगेच त्यावर परीक्षण(लेख) लिहायला त्याहून जास्त आवडते. कोणताही सिनेमा पहायच्या आधी त्या सिनेमा बद्दल थोडे भले-बुरे वाचायला मिळाले तर मला बरे वाटते. मुख्य म्हणजे हा सिनेमा बघायचा की नाही हा मुख्य हेतू.
पण बरेचदा परीक्षणाचे धागे व त्यातल्या चर्चा पाहून, मतभिन्नता पाहून गोंधळायला होते खरे. म्हणून वाटलं परीक्षणांच्या धाग्यांचाच काथ्या कुटावा. इतर लोकांना परीक्षण चर्चा वाचून काय आकलन होते हे तरी बघूया. मला लक्षात आलेले काही मुद्दे खाली. तुम्हा लोकांना काय वाटते ते देखील येउ द्या.
१) बरेचसे सदस्य अक्षरश: आलेला प्रत्येक सिनेमा बघतात. मग तो अत्यंत दगड असो की प्रचंड यशस्वी माईलस्टोन असो. मग परीक्षणांचा नेमका उपयोग काय?
२) तुम्ही जितके जास्त सिनेमे बघीतले असतील तितके तुम्ही जास्त प्रगल्भ आहात असा दावा करता येतो त्याकरता हे संख्याबळ असणे गरजेचे. जर काही सिनेमे बघीतले नाही तर मोठा गहजब होईल, आपली पत कमी होईल असे भय असावे. घ्या लोकशाहीत, पुन्हा एकदा हे संख्याबळ, प्रथा परंपरा चालवणे अनिवार्य.
३) बॉलीवूड, हॉलीवूड कोणताही असो, तो सिनेमा आवडणारे व नावडणारे दोन्ही बाजुचे बरेच सदस्य असतात. फक्त बिचार्या मराठी सिनेमाच्या बाबतच मात्र सिनेमा न आवडलेल्यांची मेजॉरीटी असते. :-)
४) सिनेमा आवड-निवड, मतप्रदर्शन यात बरेचदा हा फरक दर्शकांच्या अनुभवात, योग्य माहितीपूर्ण उदाहरणात दिसण्याऐवजी, फक्त वयात आणी सरसकटीकरणात दिसतो.
५) आवडता सिनेमा यावर लिहायला तुलनेत कमी लोक पुढे येतात पण सिनेमा नावडला हे सांगायला लोक जास्त हिरीरीने येतात.
६) 'मला अमुक सिनेमा आवडला नाही' हे वाक्य पुरेसे नसते. संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या प्रमाणे तो सिनेमाच अमुक अमुक तत्वांना, मुल्यांना हरताळ फासणारा असल्याने, ती विचारसरणीच कशी वाईटच आहे हे सिद्ध करता येणे गरजेचे. प्रत्येक माणसाच्या, समाजाच्या कालानुरुप, अनुभवानुरुप, तत्वे, सवयी, आवडीनिवडी बदलू शकतात हे पुरेसे नसते.
७) २०-२० क्रिकेट मधे बॅटींग करताना उत्तम फूटवर्क, शॉट सिलेक्शन जजमेंटपेक्षा, हँड आय कोऑर्डीनेशन बरे असणे महत्वाचे समजले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही सिनेमाला फोडताना चित्रपटसृष्टी, फिल्म मेकिंग प्रक्रीया, त्यातले महत्वाचे घटक, उदाहरणे, समीक्षेचे शास्त्र माहीत असलेच पाहीजे असे नाही. तुमचे हक्काचे पैसे, वीज, डाउनलोडचा वेळ, खराब प्रींट बघतानाचा डोळ्यावरचा ताण याचा हिशोब चुकता करता येणे महत्वाचे. थोडा संयम दाखवला की कोणतरी एकजण टोरंट, ऑनलाईन लिंक मागतो व लगेच कोणतरी एक देतोच, मग आपण गुन्हा करायला मोकळे. 'चोर तो चोर वर शिरजोर' म्हणीचा उत्तम प्रत्यय सिनेमा परीक्षण चर्चा वाचताना येतो.
८) समोर टिव्हीवर, संगणकावर दिसतेय ते बघणे इतकेच काय ते सत्य असताना, आपली प्रगल्भता, व्यासंग, चोखंदळपणा यांना चार चौघात पॉलीश करणे हे आद्य कर्तव्य असल्याचे दाखवून देणे महत्वाचे. (हेच रोज ताटात पडेल ते गिळणे असताना खाद्यसंस्कृतीची तुतारी वाजवणे, लायब्ररीतून, मित्रांकडून, उधार पुस्तके मिळतील ती वाचणे असताना समीक्षेचा पुलित्झर मिळाल्याच्या थाटात लिहणे बाबत म्हणता येईल.)
एकंदर तुमच्या वाचनात येणार्या परीक्षणांबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्हाला परीक्षणातून काय हवे असते?
प्रतिक्रिया
+१००
एक राहीला
काही जण आपण पाहिलेला पिक्चरच
मराठी सिनेमाच्या बाबतच मात्र सिनेमा न आवडलेल्यांची मेजॉरीटी असते.हे खरं माय मराठी वरचं प्रेम ! ;) बाकी मराठी चित्रपट बनवणारे चित्रपटाचे शिर्षक इतक रद्दड का निवडतात ते अजुन मला कळालेले नाही ! हळद ,कुंकु टिकली साडी धोतर हिचा भाउ तिचा भाऊ बहिणीची माया ,ताईचे प्रेम,बंड्या आणि अश्या छापाची नावे वाचुन वीट येतो,तर चित्रपट पहाण्याचे धारीष्ट्य कोण करणार ? ;) जाता-जाता :--- सहजराव हा "अय्या" इफेक्ट तर नाही ना ? ;)परीक्षणे
ओह! तसे आम्ही चित्रपट उदासीन!
बहुतेक मुद्यांशी १०० % सहमत !
+/-
ह्या लेखाचे शिर्षक
हे व्यसन आहे
अरे वा